Skip to main content

निरोप

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 12/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
थरथरणारे ओठ लपविती व्यथा मनीची दुखरी आवाजातून शब्द सांगती कथा तुझी ग दुसरी निरोप देण्या आलीस तू जरी स्मितकळ्या लेवूनी कशा खुलाव्या तव वदनी त्या कळा खोल दाबूनी बळे रोखीले अश्रु पुसती राहू तुजविण कशी मी कांता ओठातील आवाज बोलती मुळी करू नको माझी चिंता लटिके ऐसे का बोलावे गुलाब पंखी ओष्टकळ्यानी वाटे हळूच उकलावे का गुपित त्यांचे मम अधरांनी पर्ंतू आहे ठावूक मजला आत साचले प्रच्ंड वादळ स्पर्श जरासा होता माझा, लाटांचे उफळतील सागर मुठीत ओला रुमाल लपवुनी वळलो तुजला सोडुनी जाता, पाठीचे मग मिटले डोळे, चिंब नेत्रवती तुजशी बघता
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1746
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

निरोप देण्या आलीस तू जरी स्मितकळ्या लेवूनी कशा खुलाव्या तव वदनी त्या कळा खोल दाबूनी लय भारी.... :)

आवडली.

खुप छान !!! मस्तच !!!! आवडलि कविता !!