थरथरणारे ओठ लपविती व्यथा मनीची दुखरी
आवाजातून शब्द सांगती कथा तुझी ग दुसरी
निरोप देण्या आलीस तू जरी स्मितकळ्या लेवूनी
कशा खुलाव्या तव वदनी त्या कळा खोल दाबूनी
बळे रोखीले अश्रु पुसती राहू तुजविण कशी मी कांता
ओठातील आवाज बोलती मुळी करू नको माझी चिंता
लटिके ऐसे का बोलावे गुलाब पंखी ओष्टकळ्यानी
वाटे हळूच उकलावे का गुपित त्यांचे मम अधरांनी
पर्ंतू आहे ठावूक मजला आत साचले प्रच्ंड वादळ
स्पर्श जरासा होता माझा, लाटांचे उफळतील सागर
मुठीत ओला रुमाल लपवुनी वळलो तुजला सोडुनी जाता,
पाठीचे मग मिटले डोळे, चिंब नेत्रवती तुजशी बघता
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1764
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
निरोप देण्या आलीस तू जरी
निरोप देण्या आलीस तू जरी स्मितकळ्या लेवूनी
कशा खुलाव्या तव वदनी त्या कळा खोल दाबूनी
लय भारी.... :)
अरुण्जी तुम्च काव्य फार फार
अरुण्जी तुम्च काव्य फार फार आवड्ल..... >>>>
कविता हळवे करून
कविता हळवे करून गेली.....
आवडली .
सुंदर
आवडली.
खुप छान !!!
खुप छान !!! मस्तच !!!! आवडलि कविता !!
मस्त...
मस्त...
कविता आवडली ...
कविता आवडली ...
छान कविता
कविता आवडली.
प्रतिसाद देणार्या सर्व
प्रतिसाद देणार्या सर्व रसिकांना धन्यवाद.