आज सकाळी एका माणसाच्या शरीरात नाकावाटे शिरलो.
म्हटले याला चांगला मोठा संसर्गजन्य रोग लावावा.
कारण आम्ही जातीने जीव-जंतू जिवाणू विषाणू.
आम्ही ज्याच्या संपर्कात त्याला लागलेत आजार रोग.
काही अंधश्रध्दाळू म्हणोत बापडे आपल्याच कर्माचे भोग.
तर शरीरात थोडे आतवर - नसांमध्ये पोहोचलो.
इतर माणसांच्या तुलनेत या व्यक्तीचे शरीर काही वेगळेच होते.
इतरांचे रक्त लाल तर याचे रक्त कोठे लाल, कोठे हिरवे, कोठे निळे,
कोठे भगवे, कोठे पिवळे, कोठे दुरंगी, कोठे तिरंगी होते.
जरा जरा वेळाने त्या रक्ताचे रंग बदलत होते.
मी मनात म्हटले की या सर्वरक्तीय प्राण्याच्या शरीरात काही रुजता येणार नाही.
तो माणूस जोरजोतात झिंदाबाद मुर्दाबाद च्या घोषणा देत असतांना त्याच्या तोंडावाटे बाहेर पडलो.
वाचने
2446
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेगळ्या कल्पनेचे लेखन आवडले.
+१
In reply to वेगळ्या कल्पनेचे लेखन आवडले. by नितिन थत्ते
+२ असेच म्हणते
In reply to +१ by गणपा
देवाशप्पथ
In reply to वेगळ्या कल्पनेचे लेखन आवडले. by नितिन थत्ते
अरे वा! एकदम छान.
इंटरेस्टिंग जर्म!
रोचक लिखाण
व्वा..व्वा...पा.भे...अल्टिमेट
पण अजुन थोडं रंगवायचं ना
In reply to व्वा..व्वा...पा.भे...अल्टिमेट by अत्रुप्त आत्मा
फारच छान रुपक..