मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संसर्गजन्य जिवाणू

पाषाणभेद · · जनातलं, मनातलं
आज सकाळी एका माणसाच्या शरीरात नाकावाटे शिरलो. म्हटले याला चांगला मोठा संसर्गजन्य रोग लावावा. कारण आम्ही जातीने जीव-जंतू जिवाणू विषाणू. आम्ही ज्याच्या संपर्कात त्याला लागलेत आजार रोग. काही अंधश्रध्दाळू म्हणोत बापडे आपल्याच कर्माचे भोग. तर शरीरात थोडे आतवर - नसांमध्ये पोहोचलो. इतर माणसांच्या तुलनेत या व्यक्तीचे शरीर काही वेगळेच होते. इतरांचे रक्त लाल तर याचे रक्त कोठे लाल, कोठे हिरवे, कोठे निळे, कोठे भगवे, कोठे पिवळे, कोठे दुरंगी, कोठे तिरंगी होते. जरा जरा वेळाने त्या रक्ताचे रंग बदलत होते. मी मनात म्हटले की या सर्वरक्तीय प्राण्याच्या शरीरात काही रुजता येणार नाही. तो माणूस जोरजोतात झिंदाबाद मुर्दाबाद च्या घोषणा देत असतांना त्याच्या तोंडावाटे बाहेर पडलो.

वाचने 2446 वाचनखूण प्रतिक्रिया 10

बहुगुणी 29/01/2012 - 21:10
कविकल्पनेतच 'इंटरेस्टिंग जर्म' आहे असं वाटलं :-) (स्वगतः 'सर्व-रक्तीय' म्हणजे 'सहिष्णू' असं अभिप्रेत असेल का? तसं असलं तर 'जंतू' नेमका कशाचा आहे आणि त्याला 'सहिष्णू' सावज वर्ज्य का असावं हे नीटसं कळलं नाही :-( पण ते झालं माझं न्यून, कवितेच्या ज्या समजल्या त्या ओळी आवडल्याच. [बाकी 'नस' म्हणजे चेतातंतू, रक्तवाहिनी नव्हे, एवढं एकच शास्त्रीय खुस्पट :-) अर्थात्, नसेतही जंतू प्रवेश करू शकतातच.] . )

In reply to by अत्रुप्त आत्मा

कवितानागेश 29/01/2012 - 23:22
पण अजुन थोडं रंगवायचं ना पुढे,,,मजा आली असती..>> म्हणजे जिवाणूला एखादी जिवाणीण भेटेल, वगरै वगरै...... ;)