✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भ्रष्टाचारी उद्योगाविरुद्ध कारवाई व्हावी याकरिता दिलेल्या लढ्याचा वृत्तांत

च
चेतन सुभाष गुगळे यांनी
Wed, 12/21/2011 - 16:33  ·  लेख
लेख
अजय पॉली प्रायवेट लिमिटेड या खासगी उद्योगाकडून सरकारच्या विविध खात्यांची कशा प्रकारे फसवणूक होत आहे याबद्दल मी शासनास एक सविस्तर पत्र लिहीले. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे शासनाच्या ज्या विविध खात्यांची फसवणूक होत असल्याचे मी म्हंटले होते त्यांची चौकशी करण्याकरता शासनाने विविध खात्यांना माझ्या तक्रारपत्राच्या प्रती पाठविल्या व त्या पत्राची एक प्रत मलाही पाठविली. माझ्या मूळ तक्रारपत्रातील ११ व्या मुद्यावर विचार करीत शासनाने ग्राहक तक्रार निवारण मंचासही एक प्रत पाठविली. पुढे ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून काहीतरी चूकीचा समज झाला व त्यांनी मला हे असे काहीसे असंबद्ध पत्र पाठविले. खरं तर माझ्या पत्रात मी ग्राहकाची अप्रत्यक्ष फसवणूक असा शब्दप्रयोग केला होता. त्यामुळे हा मुद्दा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अंतर्गत येत नव्हताच. यास्तव ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या सल्ला मी मानणे शक्यच नव्हते. (तसेही माझ्या मूळ तक्रारीत बिल्डरचा कुठलाही संबंध नसताना तसा उल्लेख करणार्‍या या मंचाने आपल्या गलथान कारभाराचा दाखला दिलाच होता.) तेव्हा मी माझ्या तक्रारीची एक प्रत अजय पॉलीचे थेट ग्राहक असणार्‍या एलजी या उद्योगास पाठविली. इकडे सरकारी खात्यांमार्फत चौकशी सुरू झाली. अजय पॉली यांनी स्वत:ची बाजू मांडली, ज्याच्या प्रती मला विविध सरकारी खात्यांमार्फत फिरून पाठविल्या गेल्या, कारण मी तक्रारदार होतो आणि तक्रारदारास काय कार्यवाही होत आहे ते कळवावे असे मुंबईहून स्पष्ट आदेश होते. अजय पॉली यांनी दिलेले स्पष्टीकरण म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशातलाच प्रकार होता. त्यांनी सरळ माझ्यावरच कारवाई करावी अशी मागणी केली होती. (प्रत्यक्षात अशी कुठलीही कारवाई झाली नाही. खरे तर अशी काय कारवाई होते हे पाहण्यास मी देखील उत्सुक होतोच व त्या कारणास्तवच हे वृत्त अनेक महिने प्रसिद्ध केले नव्हते. म्हणजे पुढे काय अंतिम लढाई होईल ती झाल्यावरच सगळा सविस्तर वृत्तांत टाकावा असा विचार होता. परंतू आता इतक्या कालावधीनंतर आता अजय पॉली असे काही करेल असे वाटत नाही म्हणून आता हे सर्व प्रकाशित करीत आहे.) गंमतीची गोष्ट म्हणजे शासनास माझ्या विरोधात लिहीणारे अजय पॉलीचे श्री. अनिल गोखले मलाच दूरध्वनी वरून संगणकावर मराठी कसे टंकावे याबाबत मार्गदर्शन घेत होते. मी त्यांना याबाबत पूर्ण सहकार्य करीत होतोच परंतू बहुदा शासनाकडून स्पष्टीकरणाकरिता दबाव येत असल्यामूळे पुरेसा वेळ न मिळाल्याने शेवटी त्यांनी घाईने हे हस्तलिखीत स्वरूपातच पाठविले. पुढे निवांत वेळ मिळताच त्यांनी माझ्याकडून पुन्हा दूरध्वनीवरून सविस्तर मार्गदर्शन घेत संगणकावर मराठी टंकणे शिकून घेतले. त्यावेळी मजपाशी त्यांनी लिहीलेल्या स्पष्टीकरणाची प्रत शासनामार्फत पोचली होती, ज्याची त्यांना कदाचित कल्पनाही नसावी. असो. तर त्यांनी आपल्या स्पष्टीकरणाच्या पुष्ट्यर्थ अनेक कागदपत्रे जोडली होती ज्या सर्वांची प्रत शासनाने मला पाठविली. त्या सर्वच प्रती इतक्या असंबद्ध तसेच वाचता येऊ नये इतक्या काळसर झालेल्या असल्याने इथे प्रकाशित करीत नाहीये. परंतू त्यातील एका दाखल्याची प्रत इथे देत आहे. हा दाखला मंडल आयोग शिरूर यांनी दिला आहे. या दाखल्यावर स्वाक्षरी सोबत जो दिनांक टाकला आहे तो आहे २०.०२.२०११ तर स्पष्टीकरणाच्या पत्राची तारीख १९ एप्रिल २०१० आहे. या एकच गोष्टीवरून अजय पॉलीच्या स्पष्टीकरणातील भंपकपणा सिद्ध होतो. अर्थात मी ही गोष्ट पुन्हा शासनास कळवायच्या फंदात पडलो नाही. कारण शासनाने मला या प्रती केवळ माझ्या माहितीकरिता पाठविल्या होत्या. त्यांनी त्यावर माझा अभिप्राय मागविला नव्हता. पुढे यथावकाश चौकशी / कार्यवाही या गोष्टी झाल्या. अजय पॉलीतील काही चमचे मंडळी वगळता तमाम कर्मचारी वर्ग खुश झाला. त्यांचे वेतनही वाढले व त्यांनी मला तसे कळविले. इकडे शासनाकडूनही मला या त्रुटींची पूर्तता झाल्याचा अहवाल पाठविण्यात आला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
मत
संदर्भ
बातमी
शिफारस
सल्ला
अनुभव
माहिती

प्रतिक्रिया द्या
17728 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

आशु जोग माफ करा ... तुमचेच वाक्य वापरतोय ते हि थोडा बदल करुन

वसईचे किल्लेदार
Fri, 12/23/2011 - 14:49 नवीन
बाकी कुठेही कशावरहि भांडायला पेशन्स लागतो आणि **** मधे दमही लागतो (ह. घ्या.)
  • Log in or register to post comments

नमस्कार

रमताराम
Sat, 12/24/2011 - 13:02 नवीन
गुगळेसाहेब. सर्वप्रथम तुम्ही दिलेल्या लढ्याबद्दल हार्दिक अभिनंदन. माझ्या परिचयात असा चिकाटीने पाठपुरावा करणारी नि प्रश्नाची तड लावणारी कोणी व्यक्ती आहे याचे समाधान आहे. आपल्या स्वतःच्या समस्यांबद्दल रडतराऊगिरी करणार्‍यांच्या समाजात दुसर्‍यासाठी झगडणारा नि त्यासाठी शासनासारख्या सुस्त नि किचकट व्यवस्थेच्या सार्‍या प्रोटोकॉल्स वगैरेची माहिती असणारा एखादा आहे हे स्पृहणीय आहे. जाताजाता थोडे तुमच्या उठसूठ भीमगर्जना करण्याच्या वृत्तीबाबत. अहो जालावर लिखाण केले की त्यावर कुजकट, हलकट शेरे मारणारे भरपूर आहेत हो. त्यांचे मनावर घेतले तर कसे चालणार. तसेही समाजात माकडेच अधिक, त्यांच्या माकडचेष्टांकडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर. आता मूठभर मूर्खांसाठी तुम्ही सार्‍यांनाच दोष देणार का? त्यांच्या टीकाटिपण्णीतून भले भले श्रेष्ठी सुटले नाहीत, तुम्हालाच मान देतील ही अपेक्षा अनाठायी आहे. तिकडे दुर्लक्ष करून तुमच्या विचारांशी सहमत असलेल्या किमान त्याबद्दल आदर असणार्‍यांशी तुम्ही संपर्क वाढवून शकताच ना? की त्याची तुम्हाला आवश्यकता वाटत नाही? तसे असेल तर जाऊ द्या झालं. तुम्हीही संकेतस्थळाबद्दल तुच्छता दाखवत 'आम्ही फक्त ब्लॉग लिहितो' असे म्हणत आपले तथाकथित जालहुच्चभ्रूपण मिरवणार असाल तर तुमचा निर्णय. मिपासारख्या संस्थळावर लिखाण करणे म्हणजे सुज्ञ असुज्ञ दोन्हींच्या चिकित्सेला सामोरे जाणे नि त्या अनुषंगाने आपले दोष हुडकून त्यांची पुनरावृत्ती टाळणे हा उद्देश असतो. तुम्हाला तुमचे लेखन स्वयंसिद्ध अथवा निर्दोष आहे असे समजत असाल तर तर निव्वळ ब्लॉग लिहून तुम्ही ही आत्मसंतुष्टता तुम्ही संभाळू शकता. खरंतर 'आम्ही चाललो' च्या जालगर्जना करणार्‍यांना आम्ही 'थ्यांक्यू' पण म्हणण्याची तसदी घेत नाही. पण तुमचा अपवाद करावासा वाटला. असो.
  • Log in or register to post comments

चेतन साहेब मनापासुन अभिनंदन

वेताळ
Sat, 12/24/2011 - 19:16 नवीन
अश्या समाजपयोगी कार्याला तुम्हाला शुभेच्छा........
  • Log in or register to post comments

दिलदार मिपाकर!

शिंगाड्या
Mon, 12/26/2011 - 10:58 नवीन
गुगळेसाहेब, आपल्या चिकटीला सलाम...आणि वरील बहुतेक प्रतीसाद आपले कौतुक करणारे आहेत.. तुमच्या ले़खान्ची कधीकधी रेवड्या उडवणार्‍या मिपाकरांची दिलदारी ही यातुन तुम्हाला दिसेल..
  • Log in or register to post comments

नमस्कार, आत्तापर्यंत मी

किचेन
Mon, 12/26/2011 - 15:16 नवीन
नमस्कार, आत्तापर्यंत मी स्पष्टवक्ता आहे, सरळमार्गी आहे, मला अन्यायाची चीड आहे असे गावभर दिंडोरा करणारे अनेक बघितलेत.पण तीच लोक वेळ आली कि मुग गिळून गप्प बसतात.पन तुम्च्यासारखेही समजत आहेत हे बघून आनंद झाला. तुम्ही जे काम करतंय त्याबद्दल खूप शुभेच्छा. तुमच्या कामामध्ये आम्हालाही सामील करून घेतलात तर आनंद होईल. आपल सोडून दुसर्याच कौतुक होत असेल तर वाईट तर वाटणारच.बहुदा तुमच कौतुक करण्याऐवजी , तुमचे पाय खेचायला लोकांना जास्त आवडत.ह्या असल्या बेडकांची कोणत्याही क्षेत्रात कमी नाही.तुम्ही दुर्लक्ष करा. ज्यांनी वेळ नुसता फुकट जात राहिल.अस लिहिलंय त्यांनी परत एकदा विचार करावा.वेळ नक्की कोणी सत्कारणी लावलाय आणि कोणी फुकट घालवलाय. खर तर तुम्ही मिपा सोडू नये अशी माझी फार इच्छा आहे.इथे ज्यांनी शाल,नारळ, चपला (ह्या कशासाठी? चेतन गुगळे काय टोळीयुद्ध लढत होते?) त्यांनी खर तर तुम्हाल;अ थांबण्याची विनंती करायला हवी होती. तसाही ब्लोग्वारही प्रतिक्रिया देण्याची सुविधा असतेच.तुमचा ब्लोगच नाव सांगता का?.प्रतिक्रिया द्यायची नसेल तर संदेश किवा ख.व.त टाका. :(
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा