Skip to main content

नाते पावसाचे

लेखक चेतन यांनी गुरुवार, 05/06/2008 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
नाते पावसाचे पावसाचा शिडकावा अन् मायेचा ओलावा , मातीचा गंध आणि ह्रुदयाचा हा बंध वार्‍याची साद हेलावणारी ती हाक, चमकणारी विजं अन् प्रेमाचे हे बिजं पावसाचे अन् प्रेमाचे नाते तरी काय? सागराचे उधाण अन् कल्पनांचे आसमान चेहर्‍यावर उडणार्‍या तुषारांचे नसते भान हेलकावणार्‍या लाटा अन् भिजलेल्या वाटा, भिरभिरते विचार आणतं असतात मनातं पावसाचे अन् मनाचे नाते तरी काय? पडुन गेल्यावरही पाउस मनाला उफाळतो, वेलींना नटवतो आणि भावनांना ओघळवतो नदितले ते भोवरे भिरभिरतात मनात, चहाच्या कपात अन् कांदाभज्यांच्या मोहात पावसाचे अन् मोहाचे नाते तरी काय? चेतन
Taxonomy upgrade extras

वाचने 3412
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

प्रत्येक क्षणामध्ये काहितरी आपले असते || दु:खात जरी रडलो तरी, सुखात हास्य असते ||| विरह जरी आले तरी, मिलनात गोडवा असतो || ग्रीष्मात जरी उकडलो तरी, पहिल्या पावसात गारवा असतो ||| || पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा ||

पडुन गेल्यावरही पाउस मनाला उफाळतो, वेलींना नटवतो आणि भावनांना ओघळवतो नदितले ते भोवरे भिरभिरतात मनात, चहाच्या कपात अन् कांदाभज्यांच्या मोहात पावसाचे अन् मोहाचे नाते तरी काय? क्या बात है!

धन्यवाद तात्या आणि अथांग सागर (वा! मस्त नाव आहे) पाउसप्रेमी चेतन अवांतरः तात्या हा फोटु का दिसत नाही हो?

In reply to by चेतन

अवांतरः तात्या हा फोटु का दिसत नाही हो? पिकासावर टाकलेल्या चित्रांच्या बाबतीत बर्‍याचदा हा प्रॉब्लेम होतो.. तात्या.