
पावसाचा शिडकावा अन् मायेचा ओलावा ,
मातीचा गंध आणि ह्रुदयाचा हा बंध
वार्याची साद हेलावणारी ती हाक,
चमकणारी विजं अन् प्रेमाचे हे बिजं
पावसाचे अन् प्रेमाचे नाते तरी काय?
सागराचे उधाण अन् कल्पनांचे आसमान
चेहर्यावर उडणार्या तुषारांचे नसते भान
हेलकावणार्या लाटा अन् भिजलेल्या वाटा,
भिरभिरते विचार आणतं असतात मनातं
पावसाचे अन् मनाचे नाते तरी काय?
पडुन गेल्यावरही पाउस मनाला उफाळतो,
वेलींना नटवतो आणि भावनांना ओघळवतो
नदितले ते भोवरे भिरभिरतात मनात,
चहाच्या कपात अन् कांदाभज्यांच्या मोहात
पावसाचे अन् मोहाचे नाते तरी काय?
चेतन
प्रतिक्रिया
पहिल्या पावसाच्या शुभेच्छा
वा!
धन्यवाद
कळत नाही...
In reply to धन्यवाद by चेतन
दुवा
In reply to कळत नाही... by विसोबा खेचर