Skip to main content

महागाई.. महागाई ..

लेखक विदेश यांनी बुधवार, 02/11/2011 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
कौतुक सोन्या-चांदीचे गगनी भाव जरी भिडले गुरुपुष्याच्या मुहूर्तावरी दागदागिने बहु घडले ! थेटरातला चालू आहे उघडा काळाबाजार पहिला खेळच पहायचा जडला आहे आजार ! चार चाकी दोन चाकी वाहने उच्चांकात नवी भाव वाढते पेट्रोलचे नको सायकल चैन हवी ! ग्यास रेशन कपडालत्ता गरजा सोडुन भलतिकडे कर्जामधुनी खर्च वाढतो धूमधडाका चोहिकडे ! रेस क्रिकेट मैदानावर रसिक शौकिनांची गर्दी भरले खिसे खाली होती खंत ना करी कुणी दर्दी ! पोलिसचौकी समोर आहे जुगारअड्डे दारूगुत्ते व्यसनी डोलत फेकती पैसा खाते पुरते हतबल ते ! रंक रंगीले राव नशीले मजेत मधला वर्ग आहे महागाई.. महागाई.. आरडाओरड चालू आहे !
काव्यरस

वाचने 1105
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया