मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव
.........मृत्यूपूर्वीचे शेवटले काही दिवस ती व्यक्ती अन्य मृतांच्या संपर्कात येऊन त्यांचेशी संभाषण करते की काय, असे वाटण्याजोग्या या तीन घटना माझ्या प्रत्यक्ष अनुभवतील आहेत......
प्रश्नः हे नेमके काय असावे, मनस्विदांनी यावर कोणते संशोधन केलेले आहे, जगभरातील प्राचीन साहित्यात असे उल्लेख आहेत का, आणि तुमच्या अनुभवात वा ऐकीवात असे काही प्रसंग आले आहेत का?
घटना १:
माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू पावण्यापूर्वीच्या शेवटल्या तीन-चार दिवसात वर्तमान ( तथाकथित "प्रत्यक्ष" वा "वास्तविक") स्थळ-काळाचे भान नष्ट होउन ती तिच्या बालपणीच्या काळात वावरत होती. अन्न-पाणी घेणे थांबले होते. आम्ही कोणी जवळ गेलो, की ती ओळखत नसे, मात्र "दादा आले" असे म्हणून तिच्या बालपणीच दिवंगत झालेल्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत असे.
घटना २:
माझ्या एका मित्राचे वडील अंतकाळी त्यांच्या खोलीत सतत कुणाशीतरी बोलत असायचे. मात्र त्यांचे वर्तमानाचे भान शाबूत होते. ते त्यांच्या मुलाला वा सुनेला दहा-बारा कप चहा करून आणायला सांगायचे. एवढा कुणासाठी? असे विचारले, की "अरे हे बघ सर्व जण बसले आहेत... असे म्हणून जमिनीकडे बोट दाखवायचे. कोण कोण आहेत? असे विचारले की ते ज्यांची नावे घेत, ते सर्व त्यांचे मृत नातेवाईक व मित्र असायचे.
घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला.
"वातात बरळणे" असे ज्याला म्हणतात, तसा माझा स्वतःचा अनुभव असा, की मी सतरा वर्षाचा असताना टायफॉइड च्या तापात तासनतास उर्दू शेरो-शायरी बरळत असे. मला उर्दू भाषा येत नाही, किंवा शेर वगैरे काहीही माहीत नाहीत.... याचे काय स्पष्टीकरण असावे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेख व सगळे प्रतिसाद वाचले.
लेख आणि प्रतिसाद
तसच अत्रे यान्च्या बाबत हि
माझे वडील पण..
या विषयावर संजय क्षीरसागर यांचे विचार ऐकायला आवडतील..
धागा वाचला, बराच भरकटला आहे.
श्रीमत दासबॊधामध्ये आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.....
प्रचीतिविण ज्ञान सांगणें | या नांव भ्रम ||
आणखी अनेक ओव्या दासबॊधामध्ये
अनेक प्रश्नाचे समर्पक रित्या समाधान करू शकतील ?
ईश्वरभाव हाही भ्रम| निश्चयेंसीं ||११|| दशक १० समास ६ : भ्रमनिरूपण, या समासाची सुरुवातच॥श्रीराम॥अशी झाली आहे. मार्क केलेल्या शब्दांचा एकमेकाशी मेळ कसा बसतो ?अनेक प्रश्नाचे समर्पक रित्या समाधान करू शकतील
तुम्ही श्लोकात लिहीलेलंच पुन्हा लिहीतायं !
ते परमात्म्याला लागू होत नाहीत. तो निर्गुण निराकार स्वरूप आहे.हा परमात्मा कोण ? त्याला मृत्यू नसेल तर त्याचा आपल्या मृत्यूशी संबंध काय ?समर्थानी इथे "ईश्वरभाव" हा भ्रम असे म्हंटले असून "ईश्वर" हा भ्रम आहे असे म्हंटलेले नाही,ईश्वरभाव भ्रम असेल तर ईश्वराचा उपयोग काय ? स्वत : ला 'रामदास' म्हणणं हा ईश्वरभाव आहे की नाही ?तसंच त्या श्लोकात....
उपासनाही भ्रमअसं ही म्हटलंय मग 'श्रीराम जय राम जयजय राम ' हा जप करणं उपासना आहे किंवा नाही?तसंच त्या श्लोकात....
उपासनाही भ्रमअसं ही म्हटलंय मग 'श्रीराम जय राम जयजय राम ' हा जप करणं उपासना आहे किंवा नाही?प्रश्न थेट आहे...
.
असे अनुभव खरे असु शकतात की हा मनाचा खेळ आहे ? मृत्यूनंतर अस्तित्वा असते का ?मानवी मेंदू हा बायोकंप्युटर आहे. देहदहनामुळे ती संपूर्ण डिस्क फॉरमॅट होते. काही कारणामुळे ती संपूर्ण फॉरमॅट झाली नाही आणि काही स्मृतींच्या स्ट्रींग्ज वातवरणात रिलीज होऊन नवजात अभ्रकाच्या मेंदूवर पेस्ट झाल्या आणि नंतर त्याच्या जाणीवेच्या कक्षेत आल्या तर त्या व्यक्तीला सदर स्मृती या आपल्या गतजन्मीच्या आठवणी आहेत असा भ्रम होतो. वास्तविकात पुनर्जन्म अशी काही घटना अस्तित्वात नाही. मृत्यूसमयी बहुतेक जण एकतर भयभीत झालेले असतात किंवा त्यांची शुद्ध हरपलेली असते. सजग व्यक्तीला, आपल्याला जशी झोपेची चाहूल लागते तशी मृत्यूची चाहूल लागू शकते. (वर श्लोक उधृत केला आहे). अशी व्यक्ती कोणत्याही भ्रमात जात नाही त्यामुळे उपरोल्लेखित घटना त्या व्यक्तीच्याबाबतीत घडत नाहीत.मानवी मेंदू हा बायोकंप्युटर
मानवी मेंदू हा बायोकंप्युटर आहे. देहदहनामुळे ती संपूर्ण डिस्क फॉरमॅट होते. काही कारणामुळे ती संपूर्ण फॉरमॅट झाली नाही आणि काही स्मृतींच्या स्ट्रींग्ज वातवरणात रिलीज होऊन नवजात अभ्रकाच्या मेंदूवर पेस्ट झाल्या आणि नंतर त्याच्या जाणीवेच्या कक्षेत आल्या तर त्या व्यक्तीला सदर स्मृती या आपल्या गतजन्मीच्या आठवणी आहेत असा भ्रम होतो.मग त्या स्ट्रिंग्ज फक्त आणि फक्त नवजात अर्भकाच्या (अभ्रक नाही हां...!) मेंदूवरच का पेस्ट होतील..? तुमच्या किंवा आमच्यासारख्या अतिसामान्य जनतेच्या मेंदूवर का पेस्ट होणार नाहीत..?.
मग त्या स्ट्रिंग्ज फक्त आणि फक्त नवजात अर्भकाच्या मेंदूवरच का पेस्ट होतील..?दुसर्याचे विचार मेंदूत शिरायला, व्यक्ती एकतर त्याप्रती रिसेप्टीव हवी (उदा. संमोहन किंवा माइंड रिडींग) किंवा बालकासारखी डॉरमंट हवी. सामन्यांच्या मेंदूत आधीच इतका ट्रॅफिक चालू असतो की अशा स्ट्रींग्ज शिरायला अवधी मिळत नाही. कधीकधी एखादी व्यक्ती डिप्रेशनमधे गेली तर तिचा विचार करण्याच्या क्षमतेवरचा ताबा जातो (ज्याला मन कमकुवत होणं म्हणतात) आणि अशी व्यक्ती सुद्धा अस्तित्वात इतस्तः भटकणार्या विचारांची शिकार होऊ शकते, ज्याला भूतबाधा वगैरे म्हणतात.एक चमत्कारिक 'फर्स्ट हॅन्ड'
तुम्ही तुमचा अनुभव एखाद्या या
काही स्मृतींच्या स्ट्रींग्ज वातवरणात रिलीज होऊन...
>> काही कारणामुळे ती संपूर्ण
वा व भा
.
असं कसं? तुम्हीच वर म्हटलं
आयडींचा पुनर्जन्म होतो हे
माझी आजी माझ्या आत्याकडे गेली
स्मृतीरोपण स्वैर आहे का?
.
पण स्मृती तर एका देहातून दुसऱ्या देहात रोपण झालेल्या आढळून येतातम्हणजे नक्की काय ?स्मृतीरोपण इथे आहे
.
हे रोपण स्वैर घटना आहे का तिच्या मागे काही नियम आहे,अस्तित्वातल्या अनेक न उलगडणार्या रहस्यांपैकी ते एक आहे.माझेही अनुभव
धन्यवाद संजयजी. या विषयाच्या
मृत्यू आणि झोप यात फार मोठं साम्य आहे
तुमच्या जिवेषणा वाल्या
जीव कशात अडकवायचा?
कुठेच अडकवू नका देवा... उगा
जीवेष्णा फार वाईट हो.
अडकून पडूच नका. जन्म
कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म
.
तुम्हाला पुनर्जन्म हा शब्द
मंडळी गेली सहा वर्षात.....
होतं हो हे कधी कधी...
गेली सहा वर्षात मिपावर या
गेली सहा वर्षात मिपावर या धाग्यातील अनुभव पाहता मृत व्यक्तींशी चाललेला, झालेला, होत आहे असा संवाद दिसतो.मिपाच्या सद्य, भूतपूर्व (आणि सद्गती प्राप्त झाल्याने आता भूत झालेल्या) आणि ड्युआयडी घेऊन वारंवार परत येणार्या आयड्यांशी इथेच मिपावर चर्चा करताना या सद्य आणि पुनर्जन्मित लोकांशी भेट घेतल्याचा अनुभव याची आभासी संस्थळी घेता येतो. ड्युआयडी घेऊन वारंवार परत येणार्या लोकांशी प्रत्यक्ष ओळख असल्यास याची देही याची डोळा सगळ्या (तिन्ही) लोकांना भेट दिल्याचे भाग्य लाभते. =))गेली सहा वर्षात मिपावर या
गेली सहा वर्षात मिपावर या धाग्यातील अनुभव पाहता मृत व्यक्तींशी चाललेला, झालेला, होत आहे असा संवाद दिसतो.मिपाच्या सद्य, भूतपूर्व (आणि सद्गती प्राप्त झाल्याने आता भूत झालेल्या) आणि ड्युआयडी घेऊन वारंवार परत येणार्या आयड्यांशी इथेच मिपावर चर्चा करताना या सद्य आणि पुनर्जन्मित लोकांशी भेट घेतल्याचा अनुभव याची आभासी संस्थळी घेता येतो. ड्युआयडी घेऊन वारंवार परत येणार्या लोकांशी प्रत्यक्ष ओळख असल्यास याची देही याची डोळा सगळ्या (तिन्ही) लोकांना भेट दिल्याचे भाग्य लाभते. =))होद्याख
गापै
कर्मसिद्धांत आणि अध्यात्म
जगायची मजाच कृत्यात आहे.