✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जनलोकपाल आणि मिपासंपादक

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Wed, 08/24/2011 - 16:54  ·  लेख
लेख
नमस्कार, गेले काही दिवस मिपा, टीव्ही, वर्तमानपत्रे बघावे तिकडे अण्णा आणि जनलोकपाल ह्यावर खडाजंगी वाचायला मिळत आहे. आपल्याला त्यातले जास्ती काही कळत नाही पण एकूणच आर्थिक, सामाजिक भ्रष्टाचाराला खीळ बसावी , सामान्य लोकांना न्याय मिळावा, अकार्यक्षम अधिकारी तसेच बाबू लोकांना चाप बसावा ह्यासाठी काहीतरी कायदा बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत येवढेच आम्हाला कळले. मग मनात असे आले की, सामान्य मिपाकरांचे प्रतिसादाच्या प्रतिसाद खाणार्‍या, कधी कधी तर अख्खे धागेच घशात घालणार्‍या संपादकांना जनलोकपालच्या कक्षेत आणता येईल काय ? त्यासाठी काय करावे लागेल ? अनिवासी संपादकांना ह्यातून सूट मिळण्याची शक्यता आहे का ? तसे असल्यास ते सध्या ज्या देशात आहेत त्या देशाशी एखादा करार (गुन्हेगार हस्तांतरा सारखा) करून त्यांना ह्या न्याय कक्षेत आणता येईल काय ? संपादक मंडळ ह्या आयडीवर गुन्हा दाखल झाल्यास त्याचे उत्तरदायित्व नक्की किती व कोणत्या संपादकांवर लादता येईल ? आणि मुख्य म्हणजे कोणी मिपाकर ह्यासाठी उपोषण करेल काय ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34772 वाचन

💬 प्रतिसाद (170)

प्रतिक्रिया

ए मेल्या, तूच कर उपोषण अन्

रेवती
Wed, 08/24/2011 - 21:04 नवीन
ए मेल्या, तूच कर उपोषण अन् बिपोषण! संमंवर गुन्हे दाखल करतोय म्हणे! बरं झालं कोणकोण संपादक आहेत ते नक्की माहित नाहिये.
  • Log in or register to post comments

सापडल्या...

धमाल मुलगा
Wed, 08/24/2011 - 21:23 नवीन
ह्यांना अंबिका सोनी ह्यांची खुर्ची देऊन टाका रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ओ द्येसमुक, तुम्ही उगं मदे

रेवती
Wed, 08/24/2011 - 21:40 नवीन
ओ द्येसमुक, तुम्ही उगं मदे मदे करू नका हां! ते लवासा शिट्टीचं काय झालं? त्याफुडची ईस येकर जिमीन मिळाली का? आन् ती पत्रकं छापायला टाका ना राव! अवो कोंची म्हून काय इचारता? तीच ती शेंडी, जान्वं, पळी, पंचपात्राची वो! आपली निशानी हाय ना ती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ओ नको ओऽऽ..

धमाल मुलगा
गुरुवार, 08/25/2011 - 14:32 नवीन
एक तर आमची आदर्श वाट लागलीए. त्यात पुन्हा हायकमांडनी अण्णांची समजूत घालायचा अवजड उद्योग माथी मारला.... तुम्ही आणि आता त्या लवासाच्या भानगडीत नका ओढू हो. :( - हसमुख देशमुख.
आन् ती पत्रकं छापायला टाका ना राव! अवो कोंची म्हून काय इचारता? तीच ती शेंडी, जान्वं, पळी, पंचपात्राची वो! आपली निशानी हाय ना ती!
ह्या कामासाठी कृपया ग्रीसमधील 'स्पार्टन मूलनिवासी संघ' ह्यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती. ;) - धम्या लिओनायडस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

स्पार्टन मूलनिवासी संघ मला

स्पा
गुरुवार, 08/25/2011 - 14:42 नवीन
स्पार्टन मूलनिवासी संघ मला खरड करू शकता :D ग्रीसमधील हापिस ठाकुर्लीत म्हात्रे बिल्डींग मध्ये उघडण्यात आलेले आहे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

तुमी पलायनवाद स्विकारलात ते

रेवती
गुरुवार, 08/25/2011 - 19:43 नवीन
तुमी पलायनवाद स्विकारलात ते समजलं धमालराव! स्पा, चल, दिलं तुला ह्यांडबिलं छापायचं क्वांट्रॅक्.......शेंडी, जानवं आणि पळी पंचपात्री घ्येतलेला मनुक्ष पायजे..........नुस्ता चित्रात.....नायतं येशील घ्युन बुवाला! -चंडीका मोनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आज्जे

सूड
गुरुवार, 08/25/2011 - 19:50 नवीन
>>शेंडी, जानवं आणि पळी पंचपात्री घ्येतलेला मनुक्ष पायजे फकस्त येवडंच ?? त्ये तुमचं कद, सवळं का काय त्ये नगं व्हय ?? -मिपा स्वयंभोचक संघ सदस्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

पायजेल की! सवळं बी पायजेल,

रेवती
गुरुवार, 08/25/2011 - 20:11 नवीन
पायजेल की! सवळं बी पायजेल, त्याशिवायचा मानूस छापनार व्हता व्हय? अवो काय जनाची न्हाई पन मनाची तरी......पुन्ना अश्लील म्हनायला मोकळे तुमी इरोदी गटवाले! ह्ये आस्सं असतय राजकारन! ह्ये मी धमाल रावांना म्हंतिये......आपलं काम दुसर्‍याच्या गळ्यात मारायचं आनि वर पिरेमाचा आव आनायचा! ठिके, या बारीला मापी दिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

<संतसज्जन मोड सुरु > आज्जी,

सूड
Fri, 08/26/2011 - 15:24 नवीन
<संतसज्जन मोड सुरु > आज्जी, श्लील-अश्लील सारं काही सापेक्ष असतं बरं !! <संतसज्जन मोड संपला> -इति ह. भ. प. रुमाल फुगला वार्‍यावर्तीधर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

प्रकाटाआ

सूड
Fri, 08/26/2011 - 15:27 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

च्छ्या!

धमाल मुलगा
गुरुवार, 08/25/2011 - 20:01 नवीन
पलायन कसलं? शेवटची सही पाहिलीत ना? मीही स्पार्टनच. फक्त 'स्पार्टन मूलनिवासी संघ' ह्यांना काम मिळावे म्हणून तिकडे पाठव्तोय. :D स्पा ट्राओपस, तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणं काम तुमच्यापर्यंत आणून दिलं आहे. पार्टी आपलीच आहे, बिलिंग नीट करा. घरचंच काम समजून करा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

पार्टी आपलीच आहे, बिलिंग नीट

स्पा
गुरुवार, 08/25/2011 - 20:10 नवीन
पार्टी आपलीच आहे, बिलिंग नीट करा. घरचंच काम समजून करा तेजी चिंता करू नगा फकस्त आपल बिडी काडीच बघा कायतरी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

स्पा बिडीच काय म्हायती नाय .

प्रीत-मोहर
गुरुवार, 08/25/2011 - 20:19 नवीन
स्पा बिडीच काय म्हायती नाय . पण काडी घालेलच तो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बाब्बो !!

सूड
गुरुवार, 08/25/2011 - 20:21 नवीन
बाब्बो !! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

माते

स्पा
गुरुवार, 08/25/2011 - 20:34 नवीन
स्पा बिडीच काय म्हायती नाय . पण काडी घालेलच तो हॅ हॅ हॅ __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

अस्सं?

धमाल मुलगा
Fri, 08/26/2011 - 11:49 नवीन
बघू काय तुझ्याकडं? आँ? @ स्पा-र्टन, दोन टायमाला चाय, बिडी आणि वीस रुपये रोज. बघा सौदा पटतोय का? ;) (वि.सु.: ज्या सदस्यांना उपरोल्लेखित ऐतिहासिक बिदागीची माहिती नसेल त्यांचा मिपा-अभ्यास अत्यंत कमी पडतो आहे. अस्सल मिपाकर होण्यासाठी अभ्यास वाढवण्याची गरज आहे. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

कॄपया

परिकथेतील राजकुमार
Fri, 08/26/2011 - 11:57 नवीन
माझ्या आंदोलनाच्या आडून स्वतःच्या तुंबड्या भरुन घेउन भ्रष्टाचाराला खतपाणी घालु नये अशी सर्वांना नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

माझ्या आंदोलनाच्या आडून

स्पा
Fri, 08/26/2011 - 12:04 नवीन
माझ्या आंदोलनाच्या आडून स्वतःच्या तुंबड्या भरुन घेउन भ्रष्टाचाराला खतपाणी घालु नये अशी सर्वांना नम्र विनंती. अवो परान्ना ;) कार्यकर्त्यांना(बिपीन दा नव्हे) बी उपाशी माराल का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

दोन टायमाला चाय, बिडी आणि वीस

स्पा
Fri, 08/26/2011 - 12:01 नवीन
दोन टायमाला चाय, बिडी आणि वीस रुपये रोज. बघा सौदा पटतोय का? मालक .. अवो ग्रीस वरून हापिस हिकर आलाय, तर फक्त चा नि बिडी ? अस व्होतू का कधी? वडापाव च पघा कि कायतरी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ह्यांना अंबिका सोनी ह्यांची

चिंतामणी
Wed, 08/24/2011 - 22:59 नवीन
सहमत रे धम्या. :p :-p :tongue: (च्यामारी धम्याच्या. सोत्री आणि तु भ्रमणध्वनीवर बोलून कास्टींग करता का रे?) :~ :-~ :puzzled:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

चिंतुकाका तुमाला नक्की काय

रेवती
गुरुवार, 08/25/2011 - 19:39 नवीन
चिंतुकाका तुमाला नक्की काय म्हणायचय? स्पष्ट बोला, उगीच आडून वार करू नका.;) -चंडीका मोनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

काय परा!! आज दोन्ही टायमाला

प्राजु
Wed, 08/24/2011 - 22:06 नवीन
काय परा!! आज दोन्ही टायमाला का?? ;) की कालचीच आहे..?
  • Log in or register to post comments

उपोषण कशाला?

पिवळा डांबिस
Wed, 08/24/2011 - 22:20 नवीन
आणि मुख्य म्हणजे कोणी मिपाकर ह्यासाठी उपोषण करेल काय ? त्यापेक्षा कोणी मिपावर प्रशिद्ध होणार्‍या सुलभ पाकक्रिया करून फक्त ते अन्न(?) खाऊन राहील काय असं विचारा... उपोषणापेक्षा लवकर मरेल!!!!! :)
  • Log in or register to post comments

सहमत

विकास
गुरुवार, 08/25/2011 - 16:51 नवीन
त्यापेक्षा कोणी मिपावर प्रशिद्ध होणार्‍या सुलभ पाकक्रिया करून फक्त ते अन्न(?) खाऊन राहील काय असं विचारा...उपोषणापेक्षा लवकर मरेल!!!!! =) सहमत! पण मग असे केले तर? - पराण्णांनी उपोषणापेक्षा अशा सर्व पाकक्रीया (मिपाचा) निषेध म्हणून खात रहाण्याचा निर्धार केला तर? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अयाया.. आख्खा धागा बघून पोट

पिंगू
Wed, 08/24/2011 - 22:27 नवीन
अयाया.. आख्खा धागा बघून पोट धरुन हसून र्‍हायलो ना रे... - (गुपचुप परिवर्तनवादी) पिंगू
  • Log in or register to post comments

परा यांच्यावर योग्य ती कारवाई

बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/24/2011 - 22:29 नवीन
परा यांच्यावर योग्य ती कारवाई लवकरच करणेत येईल!
  • Log in or register to post comments

फाऊल!!

पिवळा डांबिस
Wed, 08/24/2011 - 22:41 नवीन
परा यांच्यावर योग्य ती कारवाई लवकरच करणेत येईल! कारवाई "केल्या जाईल" हा मिपा आक्टान्वये संमंत झालेला शब्दप्रयोग न वापरल्याबद्दल प्रथम बिकांवर कारवाई करण्यात यावी अशी मी मागणी करतो.... सध्या सगळ्या अरबी उंटशहाण्यांना उचलून आपटायचे दिवस आहेत. होस्नी मुबारक गेला, गडाफी गेला... अब तेरा क्या होगा रे बिका? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मिष्टर पिडां, आम्ही आत्ताच

बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/24/2011 - 22:46 नवीन
मिष्टर पिडां, आम्ही आत्ताच अधिकारिक घोषणा केली आहे असे समजा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

आँ?

पिवळा डांबिस
Wed, 08/24/2011 - 22:53 नवीन
कंची घोषना ते लिवलंच नाय!!! अशा क्रिप्टिक लिहिण्याबद्दल बिका यांचे नांव बदलून ते विप्र असे ठेवावे अशी मी आता मागणी करतो!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

घ्या म्हणजे तुम्हाला माहीतच

शुचि
Wed, 08/24/2011 - 22:56 नवीन
घ्या म्हणजे तुम्हाला माहीतच नव्हते की बिका आणि विप्र हे एकाच व्यक्तीचे डुप्लीकेट आय डी आहेत. मग कसे तुम्ही ज्येष्ठ मिपाकर काका? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

शुचिकाकूंना अणुमोदन देतो!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/24/2011 - 23:01 नवीन
शुचिकाकूंना अणुमोदन देतो! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

निषेध

विनायक प्रभू
गुरुवार, 08/25/2011 - 17:00 नवीन
एक नॉन चा एका कन्फर्म्ड ए.एम.सी बरोबर तुलना केल्याबद्दल पिडां शुची तै चा निषेध. बिका कसले कारवाई करतायत? त्यानी रंगा साहेबांकडे 'कोथिंबिर' कशी निवडावी ची शिकौणी लावलीय ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

ज्येष्ठ मिपाकर?

पिवळा डांबिस
Wed, 08/24/2011 - 23:06 नवीन
का गरिबाला "ज्येष्ठ मिपाकर" वगिरे म्हणून लाजवतांय? हम तो आपके चरणरज!!! हां, 'काका' अशासाठी या दोन्ही ध्यानांबरोबर बसून मी प्यार्ट्या गाजवलेल्या आहेत.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

पराण्णा म्हणू नका

चेतन सुभाष गुगळे
Wed, 08/24/2011 - 23:04 नवीन
परिकथेतील राजकुमाराचा परा झाला इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचा पराण्णा करू नका हो. त्यामुळे तो परका झाल्यासारखा वाटतो. अवांतर: ण आणि न मध्ये बरेच लोक फरक करत त्यामुळे पुढे पराण्णा चा परान्ना असा उल्लेख होण्याची भीती आहे. चुकून असं घडलंच तर त्याची फार पंचाईत होईल. आमच्या इथे लोकांनी हॉटेलचं जेवु नये व स्वत:च्या घरचंच खावं याचा प्रसार करण्याकरिता अनेक तरूणींना "परान्नाला शिवणार नाही" अशी शपथ घ्यायला लावली जातेय. हे लोण पुढे वाढत गेलं तर परान्ना झालेल्या पराचं काय होईल?
  • Log in or register to post comments

अनेक तरूणींना "परान्नाला

पिवळा डांबिस
Wed, 08/24/2011 - 23:16 नवीन
अनेक तरूणींना "परान्नाला शिवणार नाही" अशी शपथ घ्यायला लावली जातेय. उलट अनेक तरूणी (आणि प्रौढा, पुरंध्री इत्यादि इत्यादी) जर 'परान्ना'ला एकदा शिवल्या तर पुन्हा आयुष्यात दुसर्‍या कुठल्याच 'अन्ना'ला शिवणार नाहीत!! आमचा परान्ना म्हणजे काय समजलांत तुम्ही? त्याच्या दुकानातला गुलाबी ताटवा बघितलेला दिसत नाही तुम्ही!!! :) हो की नाही हो श्रामो? (मिपावर काहीही शाबीत करायचे झाल्यास श्रामोंची साक्ष घ्यायची अशी जुनी प्रथा आहे!!! ते पराच्या दुकानात ताटवे बघत पडलेले असतात असा कुणीही अर्थ काढू नये!!!) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

+१

नंदन
Wed, 08/24/2011 - 23:20 नवीन
मिपावर काहीही शाबीत करायचे झाल्यास श्रामोंची साक्ष घ्यायची अशी जुनी प्रथा आहे!!!
सहमत!
ते पराच्या दुकानात ताटवे बघत पडलेले असतात असा कुणीही अर्थ काढू नये!!!
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

+२

Nile
गुरुवार, 08/25/2011 - 04:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

>> ते पराच्या दुकानात ताटवे

शुचि
Wed, 08/24/2011 - 23:25 नवीन
>> ते पराच्या दुकानात ताटवे बघत पडलेले असतात असा कुणीही अर्थ काढू नये!!!)>> =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/24/2011 - 23:55 नवीन
उलट अनेक तरूणी (आणि प्रौढा, पुरंध्री इत्यादि इत्यादी) जर 'परान्ना'ला एकदा शिवल्या तर पुन्हा आयुष्यात दुसर्‍या कुठल्याच 'अन्ना'ला शिवणार नाहीत!!
स्पाने कृपया जॉनच्या शरीरावर पराच्या चेहेरा आरोपित करावा अशी विनंती मी पुन्हा एकदा करते आहे.
ते पराच्या दुकानात ताटवे बघत पडलेले असतात असा कुणीही अर्थ काढू नये!!!
श्रावण, ही गुंतागुंताची चीज आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

देव चिरतरूण आहे.

चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 08/25/2011 - 00:03 नवीन
<< स्पाने कृपया जॉनच्या शरीरावर पराच्या चेहेरा आरोपित करावा अशी विनंती मी पुन्हा एकदा करते आहे. >> काय ते सारखं सारखं जॉन जॉन चालवलं आहे. अहो तो चार दिन की चांदनी आहे. हे असले स्टेरॉईड खावून बॉडी बनविणारे खुप जण आले नि गेले. आपला देव आनंद पाहा. कसा चिरतरूण आहे. अभिजात सौंदर्याकडे पाहा. तकलादू गोष्टींचा नाद सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

काय ते सारखं सारखं जॉन जॉन

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/25/2011 - 00:31 नवीन
काय ते सारखं सारखं जॉन जॉन चालवलं आहे. अहो तो चार दिन की चांदनी आहे. हे असले स्टेरॉईड खावून बॉडी बनविणारे खुप जण आले नि गेले.
पिंपरी-चिंचवडला आणखी पाणी का हवं आहे हे आत्ता समजलं. एवढी आग लागल्यावर पाण्याचा वापर जास्त होणारच.
आपला देव आनंद पाहा. कसा चिरतरूण आहे.
आपला? देव आनंद आपला कधीपासून झाला? तुम्हाला हवा असेल तर तुम्हीच ठेवा स्वतःकडे.
अभिजात सौंदर्याकडे पाहा. तकलादू गोष्टींचा नाद सोडून द्या.
छ्या, मी कशाला सौंदर्याकडे पाहू? माझी आवड वेगळी आहे. इश्श, तुम्हाला बरं माहित जॉनचं सौंदर्य तकलादू आहे ते! तुम्हाला बर्‍या बाई, आतल्या बातम्या असतात. अय्या, मग सध्या त्याचं कोणाबरोबर अफेअर सुरू आहे ते सांगा ना प्लीज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

<<आपला? देव आनंद आपला

चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 08/25/2011 - 10:30 नवीन
<<आपला? देव आनंद आपला कधीपासून झाला? तुम्हाला हवा असेल तर तुम्हीच ठेवा स्वतःकडे>> हे वाचलं, http://www.loksatta.com/lokprabha/20090227/metkut.htm यातलं शेवटचं वाक्य "देव करो आणि आपल्या देव आनंदवर अशी पाळी कधीही न येवो" वाचून देव आपला असल्याचं वैश्विक सत्य जाणवलं, पटलं म्हणून असं लिहीलं असो. <<तुम्हाला बरं माहित जॉनचं सौंदर्य तकलादू आहे ते! तुम्हाला बर्‍या बाई, आतल्या बातम्या असतात>> तो सिगारेटी फुकत असतो ते कुणापासून लपून राह्यलंय. व्यसनी माणसाचा र्‍हास होतंच असतो तेव्हा हे सौंदर्य तकलादू च ठरणार. << मग सध्या त्याचं कोणाबरोबर अफेअर सुरू आहे ते सांगा ना प्लीज.>> कोण घरंदाज महिला अफेअर करेल, सरळ लग्नच नाही का करणार? आणि अफेअर करायचं तरी जॉनबरोबर? अशा महिलेची अभिरूची काय पातळीची तेही समजतंच की. अशा महिलांची माहिती मी तरी ठेवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

तो सिगारेटी फुकत असतो ते

वपाडाव
गुरुवार, 08/25/2011 - 16:38 नवीन
तो सिगारेटी फुकत असतो ते कुणापासून लपून राह्यलंय.
भलते सलते आरोप खपवुन घेतले जाणार नाहीत.... तो निरोगी, निर्व्यसनी आहे.... अजय देवगन किंवा शारुख म्हणा खुश्शाल हवं तर....
अशा महिलांची माहिती मी तरी ठेवत नाही.
मग काय ठेवता ? म्हंजे कश्या महिलांची माहिती ठेवता असे म्हणावयाचे आहे.... अवांतर :: आपल्या लग्नाला किती वर्ष झाले आहेत ? (हा प्रश्न वैयक्तिक नाही....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

वैयक्तिक च आहे

चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 08/25/2011 - 18:10 नवीन
<< अवांतर :: आपल्या लग्नाला किती वर्ष झाले आहेत ? (हा प्रश्न वैयक्तिक नाही....) >> हा प्रश्न वैयक्तिक नव्हे तर मग सार्वजनिक आहे काय? असल्यास प्रथम या प्रश्नाचे स्वत:च्या संदर्भात उत्तर द्या. तसेच मला हा प्रश्न विचारण्याचे प्रयोजन ही स्पष्ट करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

मोठे व्हा आणि विश्वाचा पसारा किती ते शिका आधी!

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/25/2011 - 18:42 नवीन
यातलं शेवटचं वाक्य "देव करो आणि आपल्या देव आनंदवर अशी पाळी कधीही न येवो" वाचून देव आपला असल्याचं वैश्विक सत्य जाणवलं, पटलं म्हणून असं लिहीलं
शी! कणेकरांनी काहीही लिहीलं म्हणून मी काय ते "वैश्विक सत्य" म्हणावं काय? कणेकरांना इंग्लिश पिक्चरमधलं इंग्लिश समजत नाही (त्यांच्याच कोणत्यातरी कार्यक्रमात त्यांनी असले बालिश विनोद केलेले आहेत), 'योनी-मनीच्या गुजगोष्टी' हे नाटक त्यांना सहन होत नाही असल्या लोकांच्या रूचीला काय वैश्विक सत्य म्हणायचं? कणेकरांच्या लेखाचा उत्तम प्रतिवाद या नाटकाच्या भाषांतरकार, दिग्दर्शिका वंदना खरे, यांनी उत्तम पद्धतीने केलेला आहे. तर हे म्हणे "वैश्विक सत्य"! आणि हो, माझ्यापेक्षा दीड-दोन पिढ्या मोठ्या असणार्‍या कणेकरांना देव आनंद वाटत असेल 'आपला', मला का वाटावा? वयाचं अंतर सोडा, माझ्या वयाच्याच माझ्या मैत्रिणीला शाहरूख खान वाटतो 'आपला', मला नाही वाटत! लोकांची अभिरूची माझ्यावर लादणारे कोण तुम्ही?
तो सिगारेटी फुकत असतो ते कुणापासून लपून राह्यलंय.
हे आणि हे वाचा.
व्यसनी माणसाचा र्‍हास होतंच असतो तेव्हा हे सौंदर्य तकलादू च ठरणार.
अहो व्यसनच कशाला? मूर्खपणा आणि/किंवा वयामुळेही सौंदर्य तकलादू ठरतं. आता (तुमचा आणि कणेकरांचा) देव आनंद नाही का बुद्रुक म्हातारा दिसत? तेव्हा जॉनबद्दल असं वाटलं की नवीन धरायचा किंवा कॉलिन फर्थसारखा मस्त पिकायला लागलेला चार्मिंग माणूस पकडायचा.
कोण घरंदाज महिला अफेअर करेल, सरळ लग्नच नाही का करणार?
का बुवा? तुमची आणि माझी अभिरूची वेगळी आहे, तसंच तुमच्या आणि त्या घरंदाज महिलेच्या, उदा. बिपाशा बासू, आयुष्याबद्दलच्या कल्पनाही वेगळ्या असतील. तुम्ही तुमची नीतीमत्ता काय "वैश्विक सत्य" म्हणत तिच्यावरही लादणार का काय?
आणि अफेअर करायचं तरी जॉनबरोबर? अशा महिलेची अभिरूची काय पातळीची तेही समजतंच की. अशा महिलांची माहिती मी तरी ठेवत नाही.
तुम्हाला आतली माहिती बरीच आहे असा तुम्ही दावा करता म्हणून विचारलं. नसेल माहित तर नाही माहित म्हणा की! कोणा अनोळखी स्त्रीबद्दल माहिती नसताना तिच्याबद्दल का उगाच राळ उडवताय? (जसं काय या स्त्रीला मराठी आंतरजालावरच्या १५-२० हजारपैकी एक आयडी 'चेतन सुभाष गुगळे' काय म्हणतो याने तिला काही फरकच पडणारे! पण सभ्य-सुसंस्कृतपणा नावाचीही काही चीज असते.) गुगळे, तुम्ही कोणत्या विश्वात रहाता हो? नाही, तुमच्या विश्वातली "वैश्विक सत्य", माझ्या जगात क्षणभर(च) विनोदी वाटण्याएवढी 'महान' का आहेत? बाकी शिव्या, त्यांचे उगम, त्यांचे अर्थ, त्यांचा वापर या विषयावर पंगाशेट मस्त मुद्दे मांडत आहेत तेव्हा मी त्यांच्याशी बोलेन. त्यात मला जास्त मजा येते आहे. ते उगाच मला आणि इतर कोणाला "वैश्विक सत्य" आणि नीतीमत्तेचे धडे देत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

कधी केला?

चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 08/25/2011 - 19:11 नवीन
<< तुम्हाला आतली माहिती बरीच आहे असा तुम्ही दावा करता >> असा दावा मी कधीच केला नाही. << मोठे व्हा आणि विश्वाचा पसारा किती ते शिका आधी! >> हा सल्ला न मागता तुम्ही कशाला देताय? माझ्या मोठेपणाविषयी मी इथे जास्त काही लिहीत पण तुम्हाला जर कधी त्याविषयी माहिती झालंच तर तुम्ही तुमचे शब्द मागे घ्याल याची खात्री देतो. (माहिती करून घ्यायचीच असेल तर फक्त गुगलच्या सर्च विंडोत मराठीत "चेतन गुगळे" आणि "चेतन सुभाष गुगळे" हे शब्द टाकून मिळणारे सर्व सर्च रिझल्ट्स पाहावेत आणि नसेल पाहायचे तर नका पाहू पण मग मला "मोठे व्हा" असा सल्ला तरी देऊ नका.) विश्वाच्या पसार्‍याविषयी देखील मला पुरेशी माहिती आहे. << गुगळे, तुम्ही कोणत्या विश्वात रहाता हो? >> विश्व एकच आहे. वेगवेगळं असू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

असा दावा मी कधीच केला

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/25/2011 - 19:25 नवीन
असा दावा मी कधीच केला नाही.
मग जॉनचे स्टेरॉईड घेणे आणि धूम्रपान कुठून कळलं हो तुम्हाला? लब्बॉड!
विश्व एकच आहे. वेगवेगळं असू शकत नाही.
असं कसं, तुम्ही भागवत पुराण वाचलेलं नाहीत? त्यातला १०.८७.४१ भाग वाचा, त्यात अनेक विश्वांचा उल्लेख आहे. असं मल्टीव्हर्सचं विकीपान म्हणतं. आणि, तुम्हाला मल्टीव्हर्स वगैरे काही, काही माहित नाही का? कुठल्या विश्वात रहाता हो तुम्ही गुगळे? का हे "वैश्विक सत्य"ही आता तुम्ही कणेकर किंवा इतर कोणी मराठी लेखकाचा हवाला देऊन माझ्यावर लादणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

मी लादेन थोडाच आहे?

चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 08/25/2011 - 19:35 नवीन
<< "वैश्विक सत्य"ही आता तुम्ही कणेकर किंवा इतर कोणी मराठी लेखकाचा हवाला देऊन माझ्यावर लादणार? >> मी कशाला लादणार? वेगळ्या विश्वातले सदस्य एकमेकांशी संवाद साधतात का? आपण इथे एकमेकांशी संवाद साधतोय म्हणजे एकाच विश्वातले असणार ना? काही सल्ले हे समोरच्याला आवडत नाहीच. तुम्ही मला मोठे व्हा असा सल्ला दिला ज्याचा छुपा अर्थ मी मोठा नाही असा होतो. मी तुम्हाला एक सल्ला देतो पाहा आवडतोय का? सभ्य आणि सुसंस्कृत व्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

गोलपोस्ट बदलू नका

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/25/2011 - 19:47 नवीन
वेगळ्या विश्वातले सदस्य एकमेकांशी संवाद साधतात का? आपण इथे एकमेकांशी संवाद साधतोय म्हणजे एकाच विश्वातले असणार ना?
गोलपोस्ट बदलू नका. विश्व अनेक असू शकतात यावरून आपण बोलत होतो. आणि हे समजल्यावर तुमचं विश्व मोठं झालं ना, झालं किनई? वेगळ्या विश्वात असणं आणि मोठं होणं हे ही तसंच, लाक्षाणिक आहे; आणि इनो घेणंही!* कोण म्हणे मी सभ्य आणि सुसंस्कृत नाहीये? है कोई माई का लाल (किंवा लाली?) ;-) तुमच्या विश्वातल्या वैश्विक सत्यांप्रमाणे मी नसेनही सभ्य आणि सुसंस्कृत. बट हू केअर्स? आपल्याला तर बुवा मोठं होणंच महत्त्वाचं वाटतं! *आमचा आगामी धागा: मिसळपाव सभासत्त्वासाठी येऊ घातलेल्या सी.ई.टी.च्या तयारीसाठी 'दवनीत' मार्गदर्शक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

त्याचप्रमाणे मोठं असण्याची व्याख्याही वेगळी असू शकते.

चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 08/25/2011 - 19:57 नवीन
माझ्या मते तुम्ही सभ्य व सुसंस्कृत नाहीच मूळी (कारण तुम्ही स्वत:च मांडलेल्या शब्दाचा शब्दकोशातील सर्वात अश्लील अर्थ तुम्हाला अभिप्रेत असतो. असं अश्लील विशेषण ज्या पुरूषाला बहाल करता त्या पुरूषाच्या छायाचित्रावर या धागाकर्त्याचा चेहरा आरोपित करायला सांगता). अर्थातच माझ्या कल्पनेतल्या या शब्दांच्या व्याख्या / लक्षणे तुम्हाला मान्य नाहीत. त्याचप्रमाणे तुमच्या मते मी जरी मोठा नसलो तरी त्या शब्दाच्या तुम्ही ठरविलेल्या व्याख्या / लक्षणे मलाही मान्य नाहीत. << विश्व अनेक असू शकतात यावरून आपण बोलत होतो. >> मी हे बोलतच नव्हतो. तुम्ही मला कोणत्या विश्वात राहता असं विचारल्यावर मी एकाहून अधिक विश्व असू शकत नाही एवढंच सांगितलं होतं. जे सर्वव्यापी आहे तेच विश्व (universe) या माझ्या मतावर अजुनही ठामच आहे. तुम्ही दिलेले दाखले / संदर्भ यातली मते / कल्पना मला मान्य नाहीत. यावर चर्चा काय करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा