✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अतिशय गाजलेलं भंपक पुस्तक

च
चेतन सुभाष गुगळे यांनी
Wed, 08/17/2011 - 10:49  ·  लेख
लेख
नुकतंच बहुचर्चित अल्केमिस्ट हे पुस्तक वाचलं. पाऊलो कोएलो यांच्या पुस्तकाचं जगभरात प्रचंड कौतुक झालेलं असून त्याच्या अनेक भाषांत कोट्यावधी प्रती विकल्या गेल्या आहेत (अशी माहिती सदर पुस्तकाच्या शेवटच्या पृष्ठावर होती). याचं अजिबात आश्चर्य नाही की अशी पुस्तकं लिहीली जातात. याचं देखील आश्चर्य नाही की अशी पुस्तकं छापली जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक अशी पुस्तकं पैसे (आणि त्याहून ही मुल्यवान असा वेळ) खर्चून का वाचतात? माझ्यापुरतं म्हणाल, तर अनेक ठिकाणी छापून आलेल्या या कादंबरीच्या अवास्तव कौतुकाला बळी पडूनच मी या कादंबरीच्या वाचनात माझा वेळ वाया घालविला. आता प्रश्न असा उरतो की हे जे कुणी या कादंबरीच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून इतरांनाही हे पुस्तक वाचण्यासाठी उद्युक्त करत आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? (निदान माझ्यासाठी तरी हा नक्कीच अनुत्तरीत प्रश्न आहे) या पुस्तकातून बरंच काही शिकायला मिळतं असा प्रशंसकांचा सूर आहे. मला तरी संपूर्ण पुस्तक वाचल्यावर "असलं पुस्तक वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" यापेक्षा अधिक काही शिकायला मिळालं नाही. पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी मराठीत एक म्हण आहे. माझ्या वाया गेलेल्या वेळेवरून इतरांनी बोध घ्यावा व आपला बहुमूल्य वेळ वाचवावा अशी त्यांना सावधगिरीची सूचना करण्याकरिताच हा लेखन प्रपंच.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
37930 वाचन

💬 प्रतिसाद (133)

प्रतिक्रिया

का बरे?

मिहिर
Wed, 08/17/2011 - 10:55 नवीन
मला चांगले वाटले. अर्थात पंखा वगैरे नाही झालो, पण वेळ वाया गेल्यासारखे मुळीच वाटले नाही.
  • Log in or register to post comments

सहमत ...

sagarparadkar
Wed, 08/17/2011 - 15:11 नवीन
मला पण पुस्तक बरं वाटलं ... अगदी वेडावून जाण्यासारखं नव्हतं हे खरंच .... पण एकूणात छान आहे. पण माझ्या अनेक परिचितांच्या प्रतिक्रियाही तुमच्यासारख्याच आहेत. त्यांना, खासकरून सॅन्तिआगो ज्या पडक्या चर्चमधून सुरवातीला बाहेर पडलेला असतो नेमका तिथेच परत येवून त्या चर्चच्या 'अल्टर' खाली त्याला मोठा खजिना सापडतो, ही कल्पना काही तितकीशी स्वीकारार्ह वाटली नाही ... त्यामुळे त्यांची खूपच चिडचिड झाली होती. 'तुझे असून तुजपाशी, परि तू जागा चुकलाशी' ह्या मराठी संतवचनाशी साधर्म्य आल्यामुळे (तेसुद्धा एका आंतर्राष्ट्रीय लेखकाच्या लेखनात) त्यांची फारच निराशा झाली होती ... कारण त्यांच्यामते मराठीत काहीच 'आंतर्राष्ट्रीय' वगैरे नसावे .... अर्थात त्यातील एका वाक्याने अनेकांचा आशावाद जागा राहतो, ते म्हणजे If you really want something, the entire universe conspires to give it to you .... पण प्रत्यक्षात तसं काही अनुभवास येत नाही :) त्यामुळे मग जास्तच राग येतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर

असलं पुस्तक वाचण्यात अजिबात

मराठी_माणूस
Wed, 08/17/2011 - 10:56 नवीन
असलं पुस्तक वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" असल म्हणजे कसल ? तुम्हाला असे का वाटते, ह्या पुस्तकातील तुम्हाला काय आवडले नाही ? कसलीही समीक्षा न करता नुसतेच हे पुस्तक वाचु नका म्हणणे योग्य नव्हे
  • Log in or register to post comments

असहमत..

शैलेन्द्र
Wed, 08/17/2011 - 11:02 नवीन
असहमत..
  • Log in or register to post comments

अल्केमिस्ट हे मला तर बॉ बरे

विजुभाऊ
Wed, 08/17/2011 - 11:15 नवीन
अल्केमिस्ट हे मला तर बॉ बरे वाटले. त्या लेखकाची पुस्तके ही थोडा वेगळा विचार देणारी असतात.
  • Log in or register to post comments

चांगले पुस्तक

जाई.
Wed, 08/17/2011 - 11:21 नवीन
मलाही पुस्तक आवडल एकदा वाचण्यासारख आहे
  • Log in or register to post comments

@चेतन सुभाष गुगळे, या

सोत्रि
Wed, 08/17/2011 - 11:22 नवीन
@चेतन सुभाष गुगळे,
या कादंबरीच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून इतरांनाही हे पुस्तक वाचण्यासाठी उद्युक्त करत आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे
हा तुमचा एकच मुद्दा मान्य. मलाही हे पुस्तक वाचल्यावर हाच प्रश्न पडला होता. पण आपले मराठी साहित्य किती प्रगल्भ आहे ह्याची ती एक पोच होती ;)
"असलं पुस्तक वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये"
पण हे जरा भडक विधान आहे. त्या पुस्तकातली कथा चांगली आहे. पुस्तक वाचुन वेळ वाया अजिबात जाणार नाही. फक्त ह्या पुस्तकबद्दल एवढा जो फुगा/बुडबुडा केला गेला आहे, त्याअपेक्षेने पुस्तक जर वाचले तर अपेक्षाभंग पदरी पडु शकतो.
कसलीही समीक्षा न करता नुसतेच हे पुस्तक वाचु नका म्हणणे योग्य नव्हे
100% सहमत. पुस्तकाबद्दल जरा अजुन थोडे लिहीले असते तर लेख आणखी वजनदार झाला असता. - (अल्केमिस्ट) सोकाजी
  • Log in or register to post comments

मुद्दा मान्य आहे तर...

चेतन सुभाष गुगळे
Wed, 08/17/2011 - 11:37 नवीन
तुम्हाला मुद्दा मान्य आहे हे वाचून बरे वाटले. << त्या पुस्तकातली कथा चांगली आहे. >> ती कथा दोन पानांतही आटोपता येईल. त्याकरिता इतका फापटपसारा कशाला? यापेक्षा उत्तम परीकथा अरेबियन नाईट्स मध्ये आहेत. इतक्या वेळेत तिथल्या शंभर कथा वाचून होतील. << कसलीही समीक्षा न करता नुसतेच हे पुस्तक वाचु नका म्हणणे योग्य नव्हे >> भंपक या एका शब्दातच सर्व पुस्तकाची समीक्षा केली आहे. अजून वेगळे काय लिहायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

प्रकाटाआ

सोत्रि
Wed, 08/17/2011 - 12:57 नवीन
प्रकाटाआ - (अनुल्लेखाने मारणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

अतीक्षय

Nile
Fri, 08/26/2011 - 05:31 नवीन
अतीक्षय गाजलेला भंपक धागा* असे रुपांतर झालेले दिसते. चालूद्या. ** (उल्लेखाने मारणारा) निळोजी *सूचना:मंद लोकांनी जास्ती स्पष्टीकरण मागू नये, दिले जाणार नाही. खूलासा संपला. **सदर प्रतिसाद धाग्याला आहे, उपप्रतिसाद नाही याची नोंद, आतापावेतो कळलं नसल्यास, घेणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

शक्य आहे..

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/26/2011 - 08:19 नवीन
<<अतीक्षय गाजलेला भंपक धागा* असे रुपांतर झालेले दिसते.>> आपल्याला असे वाटणे शक्य आहे. असे रूपांतर झालेले दिसते म्हणजे मूळात तो धागा असा नव्हता असा अर्थ त्यातून निघतो. << सदर प्रतिसाद धाग्याला आहे, उपप्रतिसाद नाही याची नोंद, आतापावेतो कळलं नसल्यास, घेणे. >> मूळात तो धागा असा नसेल तर तो कुणाच्या तरी प्रतिसाद - उपप्रतिसाद यामूळेच असा झाला (गाजला) असणार ना? तेव्हा सदर धाग्याला असा प्रतिसाद देऊन काही उपयोग नाही. *मंद लोकांकडे कोणी जास्ती स्पष्टीकरण कशाला मागेल. ते देऊ शकणार का? तेवढी त्यांची कुवत तरी कुठून असणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

+१

परिकथेतील राजकुमार
Wed, 08/17/2011 - 12:28 नवीन
सोत्रेंशी थोडाफार सहमत आहे.
या पुस्तकातून बरंच काही शिकायला मिळतं असा प्रशंसकांचा सूर आहे. मला तरी संपूर्ण पुस्तक वाचल्यावर "असलं पुस्तक वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" यापेक्षा अधिक काही शिकायला मिळालं नाही.
एखाद्या पुस्तकाचे अथवा चित्रपटाचे रसग्रहण, परिक्षण टाकताना आपल्याला काय आवडले आणि काय आवडले नाही हे लोकांसमोर आणणे जास्ती महत्वाचे असते. नुसते वाचा - बघा / वाचू नका - बघू नका अशी विधाने करणे अयोग्य वाटते. प्रत्येकाची आवड आणि आवाका वेगवेगळा असल्याने कोणाला काय आवडावे हे आपण ठरवू नये. आपण आपले प्रामाणिक मत मांडून निर्णय वाचकांवर सोडावा. नुकतेच मिपावर देल्ही-बेली च्या संदर्भात काही धागे आले होते. त्या सर्वच धाग्यात परस्पराविरोधी सूर उमटले होते, मात्र हा बघा किंवा बघू नका असे सल्ले कोणीच कोणाला देत नव्हते हे जास्ती महत्वाचे. अर्थात सदर पुस्तकाच्या लेखकाला अनावृत्त पत्र लिहायला तुम्ही मोकळे आहातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

पराशेठशी सहमत !!! प्रत्येकाची

धन्या
Wed, 08/17/2011 - 12:47 नवीन
पराशेठशी सहमत !!!
प्रत्येकाची आवड आणि आवाका वेगवेगळा असल्याने कोणाला काय आवडावे हे आपण ठरवू नये. आपण आपले प्रामाणिक मत मांडून निर्णय वाचकांवर सोडावा.
अगदी अगदी. आम्ही पसायदान जितक्या आत्मियतेने ऐकतो तेव्हढयाच चवीन अल्ताफ राजाची गाणी सुद्धा ऐकतो. शेवटी काय तर प्रत्येकाची आवड आणि आवाका वेगवेगळा असतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

त्यापेक्षा

Nile
Wed, 08/17/2011 - 22:52 नवीन
हाफिसात बसून कामं कराल तर देशाचं काहीतरी भलं होईल!!! पुस्तकं वाचताहेत लेकाचे.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आम्हाला हाफीसात जाण्याचेच

धन्या
गुरुवार, 08/18/2011 - 00:10 नवीन
आम्हाला हाफीसात जाण्याचेच पैसे मिळतात. हाफीसात केलेल्या कामाचेच पैसे मिळू लागले तर बाईकचं पेट्रोलही परवडणार नाही ;) आणि देशाचं भलं करण्याचा ठेका तिकडे क्रांती हवी असणार्‍यांनी घेतलाच आहे. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत राहा आणि लोकांना शांतपणे पुस्तके वाचू दया. लोकांनी पुस्तके वाचली तरच त्यावर ती पुस्तके भंपक आहेत की नाही यावर साधकबाधक चर्चा होईल आणि या चर्चेतूनच विचारमंथन होऊन देश प्रगतीपथावर जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अगदी अगदी

स्वैर परी
गुरुवार, 08/18/2011 - 20:05 नवीन
आम्हाला हाफीसात जाण्याचेच पैसे मिळतात. हाफीसात केलेल्या कामाचेच पैसे मिळू लागले तर बाईकचं पेट्रोलही परवडणार नाही
अगदी अगदी! बाकि, हे पुस्तक बघुनच वाचावस वाटत नाहि.. काय माहित का ते! :| काहितरी भयंकर फिलॉसॉफिकल लिहिले असावे अशी शंका येते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

बाकि, हे पुस्तक बघुनच वाचावस

धन्या
गुरुवार, 08/18/2011 - 20:43 नवीन
बाकि, हे पुस्तक बघुनच वाचावस वाटत नाहि.. काय माहित का ते! काहितरी भयंकर फिलॉसॉफिकल लिहिले असावे अशी शंका येते!
पुस्तक थोडं फार फिलॉसॉफीकल आहे. नाही असं नाही. निदान पुस्तकातून मिळणारा संदेशतरी फिलॉसॉफीकल आहे. काहीसा "तुझे आहे तुजपाशी, परी तू दुनिया फिरतोशी" असा. पण पुस्तक इतकंही चांगलं नाही जितका त्याचा उदो उदो केला गेला आणि ईतकंही वाईट नाही की कुणी त्याला "भंपक" म्हणावं. असो. अंदाज अपना अपना. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वैर परी

हम्म... मला तरी हे पोस्तक

आत्मशून्य
Sun, 08/21/2011 - 14:20 नवीन
नेवर गिव्हप संदेश देणारे आहे असं वाटलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

या कादंबरीच्या कौतुकात पानं

सविता
Wed, 08/17/2011 - 15:28 नवीन
या कादंबरीच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून इतरांनाही हे पुस्तक वाचण्यासाठी उद्युक्त करत आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे - सहमत कसलीही समीक्षा न करता नुसतेच हे पुस्तक वाचु नका म्हणणे योग्य नव्हे - डब्बल सहमत!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

तुमचा लेख वाचला. ते पुस्तक

नगरीनिरंजन
Wed, 08/17/2011 - 11:25 नवीन
तुमचा लेख वाचला. ते पुस्तक वाचले आहे. टुकार आहे हे माहिती असूनही मिळेल ते वाचायची सवय असल्यावर काय करणार? असो. ह.घ्या. आणि सोडून द्या. आपल्याला जे टुकार वाटेल ते दुसर्‍याला वाटेलच असे नाही.
  • Log in or register to post comments

ती कथा दोन पानांतही आटोपता

विजुभाऊ
Wed, 08/17/2011 - 11:47 नवीन
ती कथा दोन पानांतही आटोपता येईल जगातील प्रत्येक कथेचे असेच असते. महाभारतालादेखील वन लायनर असतेच एकश्लोकी रामायण उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments

वन लायनर

तिमा
Wed, 08/17/2011 - 19:18 नवीन
मला ते पुस्तक आवडले असे म्हणता नाही आले, तरी वेळ वाया गेला असे वाटले नाही. अवांतर : महाभारताचा वन लायनर काय आहे ते वाचण्याची उत्सुकता आहे. मी ऐकलेला : महाभारत ही एक अक्करमाशांची कहाणी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

एक श्लोकी महाभारत

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 08/18/2011 - 08:40 नवीन
आदौ पाण्डववधार्तराष्ट्रजननं लाक्षागृहे दाहनं द्यूते श्रीहरणं वने विहरणं मत्स्यालये वर्धनम् । लीलागोग्रहणं रणे वितरणं सन्धिक्रियाजृम्भणं भीष्मद्रोणसुयोधनादिमथनं एतन्महाभारतम् ॥ एक श्लोकी रामायण आदौ रामतपोवनाभिगमनं हत्व मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् । वालीनिग्रहणं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहननं एतद्धि रामायणम् एक श्लोकी भागवत आदौ देवकिदेविगर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनिजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणम् । कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीजसत्पालनं श्रीमद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम् ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

अरे वा... आम्ही शाळेत असताना

धन्या
गुरुवार, 08/18/2011 - 20:46 नवीन
अरे वा... आम्ही शाळेत असताना गावात कुणाकडे पूजा (ती सत्यनारायणाचीच असणार) असली की जेवणाच्या पंक्ती उठायच्या. त्यावेळी मग श्लोक म्हणण्याची चढाओढ लागायची. आणि हे तिन्ही श्लोक आम्ही न चुकता म्हनत असू. आता गावी यातलं काहीच होत नाही. कालाय तस्मै नमः :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

आता गावी यातलं काहीच होत

वपाडाव
Mon, 08/22/2011 - 10:10 नवीन
आता गावी यातलं काहीच होत नाही. कालाय तस्मै नमः
अम्रिकेत न जाता गावात हेच केले असते तर आत्म्याला थोडी का होइना शांती लाभली असती.... बाकी कुणी काय करावे हे ज्याचे त्याचे मत, मी आपले न्रिक्षण नोंद्विले....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ती फुलराणी , हे एक गाजलेले

मराठी_माणूस
Wed, 08/17/2011 - 12:10 नवीन
ती फुलराणी , हे एक गाजलेले भंपक नाटक आहे . ह्या नाटकाचे सार खालील ४ ओळीत. एक प्राध्यापक आपल्या मित्राशी , एका अडाणी फुल विकणार्‍या मुली संबधात खालील पैज मारतो "मि ह्या मुलिला सर्व रीतीरीवाज शीकवुन एका उच्चभ्रु लोकांच्या मेजवानीत नेईन आणि कोणाला कसलाही संशय येणार नाही" आणि तो ती पैज जिंकतो. (अवांतर : मुळ इंग्लीश नाटक मराठीत आणण्याचा उपद्व्याप पुलंनी का केला ते समजत नाही)
  • Log in or register to post comments

शेवटी सत्याचाच विजाय होतो

शाहिर
Wed, 08/17/2011 - 12:37 नवीन
एवढे एकच ओळी मधे सार असताना एवढया ( भंपक) कथा का लिहिल्या गेल्या ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

भंपक

शाहिर
Wed, 08/17/2011 - 12:10 नवीन
का ?? हे समिक्षा करताना सांगायला हवे .. उगीच मल वाटले भंपक म्हणून भंपक असे नको ...
  • Log in or register to post comments

नुकतंच बहुचर्चित अल्केमिस्ट

शाहिर
Wed, 08/17/2011 - 12:15 नवीन
नुकतंच बहुचर्चित अल्केमिस्ट हा धागा वाचला .चेतन सुभाष गुगळे यांच्या धाब्याची मिसल पाव मधे प्रचंड कौतुक झालेलं असून त्याच्या २२७ वाचने झालि आहेत (अशी माहिती सदर धाग्याच्या शेवटी होती). याचं अजिबात आश्चर्य नाही की अशे धागे काढले जातात. याचं देखील आश्चर्य नाही की अशे धागे वाचले जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक अशे धागे मुल्यवान असा वेळ खर्चून का वाचतात? माझ्यापुरतं म्हणाल, तर जिलेबी घातलेल्या या धाग्याच्या मि पा वरील स्थानाला बळी पडूनच मी या धाग्याच्या वाचनात माझा वेळ वाया घालविला. अवांतर : अल्केमिस्ट वाचु नका .. वेळ वाया जातो असा एका ओळी मध्ये का नाही ओ लिहिला तुम्ही
  • Log in or register to post comments

_/\_

सोत्रि
Wed, 08/17/2011 - 12:55 नवीन
अवांतर : अल्केमिस्ट वाचु नका .. वेळ वाया जातो असा एका ओळी मध्ये का नाही ओ लिहिला तुम्ही
_/\_ - (एका ओळीत आणि एकाच चिन्हाने प्रतिसाद दिलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

+१

स्पा
Wed, 08/17/2011 - 12:26 नवीन
श्रीयुत गुगळे स्वत कधी मिसळपाव वर दिसत नाहीत कधी आलेच तर कुंथून कुंथून जिलब्या टाकायला.. बाकी नाहीच त्यांनी कधी दुसर्यांच्या धाग्यावर प्रतिक्रिया दिलेल्या मला आठवत नाहीत स्वतःचा धागा खाली जाऊ नये म्हणून प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देण्याची आणि वाद घालण्याची हातोटी वाखाणण्याजोगीच :) सलाम गुगळे साहेब पु जी शु
  • Log in or register to post comments

कथा

स्मिता.
Wed, 08/17/2011 - 13:07 नवीन
अल्केमिस्ट या पुस्तकातली कथा मला तरी आवडली... मध्येच जरा रटाळ झाली असली तरी रंजक आहे. पण ते पुस्तक वाचून पैसे आणि वेळ वाया गेलेत असे अजिबात वाटले नाही. कदाचित ते पुस्तक मित्राचं होतं आणि माझ्याजवळ खूपच वेळ मोकळा होता त्यामुळे ही जाणीव झाली नसावी.
  • Log in or register to post comments

सहमत

रमताराम
Wed, 08/17/2011 - 13:56 नवीन
पुस्तक भंपक आहे याबाबत सहमत. इतरांनी वाचावे की वाचू नये हा अनाहुत सल्ला मात्र देणार नाही. ज्याचा त्याचा प्रश्न!
  • Log in or register to post comments

मी पण!

Nile
Wed, 08/17/2011 - 22:42 नवीन
आजोबांशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

भंपक म्हणता आहात पण का ते हि

पक्या
Wed, 08/17/2011 - 13:56 नवीन
भंपक म्हणता आहात पण का ते हि लिहा ना. तुम्हाला भंपक वाटले म्हणुन प्रत्येकालाच तसे वाटेल असे नाही. जर तुम्ही इथे त्या पुस्तकाची समिक्षा / परिक्षण लिहिले असते तर तुमच्या मताचे कदाचित स्वागत झाले असते. पण तसे न केल्याने तुमच्या ह्या धाग्याला भंपक म्हणावे असे वाटत आहे.
  • Log in or register to post comments

प्र.का.टा.आ.

गणेशा
Wed, 08/17/2011 - 16:07 नवीन
प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments

प्र का टा आ म्हणजे काय?

उदय के'सागर
Wed, 08/17/2011 - 17:42 नवीन
प्र का टा आ म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

प्रतिसाद काढून टाकला आहे (कधी

धन्या
Wed, 08/17/2011 - 21:35 नवीन
प्रतिसाद काढून टाकला आहे (कधी संपादकांनी तर कधी प्रतिसाद देणार्‍यानेच :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

धन्यवाद, धनाजीराव वाकडे !

उदय के'सागर
गुरुवार, 08/18/2011 - 11:12 नवीन
धन्यवाद, धनाजीराव वाकडे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

प्रतिसाद काढून टाकला आहे (कधी

विजुभाऊ
गुरुवार, 08/18/2011 - 12:49 नवीन
प्रतिसाद काढून टाकला आहे (कधी संपादकांनी तर कधी प्रतिसाद देणार्‍यानेच Smile ) संपादक पूर्ण प्रतिसादच उडवतात. ते त्यानंतर प्र का टा आ असा खुलासाअ देत बसत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

संपादक फक्त प्रतिसाद लाल

मराठे
Tue, 08/23/2011 - 00:21 नवीन
संपादक फक्त प्रतिसाद लाल करतात .. कानाखाली लाल करणे या धर्तीवर वाचावे: ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

चालायचंच!

धमाल मुलगा
Wed, 08/17/2011 - 14:56 नवीन
लोक एव्हढे वेळ, इंटरनेटचं बील खर्च करुन भंपक धागे वाचतातच की. त्यात एखाद्या पुस्तकाची भर! हाय काय नाय काय? -(अल्केमिस्ट आणि भंपक धागे न वाचलेला) ध.
  • Log in or register to post comments

ह्येच म्हणतो. (अल्केमिस्ट न

प्रभो
Wed, 08/17/2011 - 19:10 नवीन
ह्येच म्हणतो. (अल्केमिस्ट न वाचलेला पण भंपक धागे वाचलेला) प्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अक्षी बराबर

रमताराम
गुरुवार, 08/18/2011 - 20:57 नवीन
ध नि प्र शी शमत हाय. (भंपक अल्केमिस्ट नि भंपक धागे दोन्ही वाचलेला) र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

आमी पन!

मेघवेडा
Mon, 08/22/2011 - 14:17 नवीन
(धागा न वाचता वरचे तीन-चार भंपक प्रतिसाद वाचलेला) ढ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

मला आवडले

विशाखा राऊत
Wed, 08/17/2011 - 16:37 नवीन
मी वाचले आहे आणि मला आवडले आहे. इतके भडक विधान करायची गरज नाही..
  • Log in or register to post comments

उत्तर द्या राव......

अनुरोध
Wed, 08/17/2011 - 16:39 नवीन
. . .
  • Log in or register to post comments

भंपक, वाचू नये असं, वगैरे

राजेश घासकडवी
Wed, 08/17/2011 - 16:59 नवीन
माझ्या मते एखाद्या पुस्तकाला भंपक म्हणायला काहीच हरकत नाही. वाचू नका, वेळ फुकट जाईल असंही सांगायला हरकत नाही. माझा वेळ फुकट गेला तेव्हा तुमचाही जाईल, हे सांगणं पुस्तकाच्या भंपकपणाविषयीच सांगणं असतं. 'हा चित्रपट पाहायलाच हवा' असं सांगून लोकांना चित्रपट पहायला उद्युक्त करणं आणि 'भंपक' म्हणून एखादं पुस्तक वाचण्यापासून परावृत्त करणं हे समीक्षेत यायला हवं. पण मुळात समीक्षा यायला हवी. नाहीतर ती केवळ मताची पिंक यापलिकडे काही रहात नाही. चेतन यांनी कथानकाची थोडीशी झलक दाखवून त्यातली अ-सौंदर्यस्थळं दाखवून दिली असती तर त्यांचं मत अधिक गंभीरपणे घेतलं जाईल.
  • Log in or register to post comments

+१, आणि...

Nile
Wed, 08/17/2011 - 22:45 नवीन
त्यात एखाद्याने किलो दोन किलोची समीक्षा लिहलीच तर ती भंपक आहे असे म्हणायला सुद्धा काहीच हरकत नाही असे आमचे मत आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

+१

रमताराम
गुरुवार, 08/18/2011 - 21:01 नवीन
नायल्याशी सहमत आहे. (बघ रे बाबा, तुझ्या सहमतीची परतफेड केली आहे.) (नुकतीच जीएंच्या कथांची भंपक समीक्षा वाचून समीक्षकाला कुठे टांगावे या विचारात पडलेला) रमताराम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा