✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुलगी का नको?

य
युयुत्सु यांनी
Tue, 08/16/2011 - 14:01  ·  लेख
लेख
धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा" या धाग्याला फारसे प्रतिसाद नाहीत हे बघून मी मूळ मुद्द्यावर चर्चा व्हावी म्हणून हा धागा टाकला. मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि मला त्याचे अजिबात दू:ख नाही. उलट कधी कधी (काही लोक आत्तापासून तिचा भावी सून म्हणून विचार करतात तेव्हा) मनोमन सुखावायलाच होते.पण समाजाचा मुलीबद्दल असलेला दृष्टीकोन लक्षात घेताना काही गोष्टी लक्षात येतात. ० मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्‍या खर्चाचा मुलगी वाढविणार्‍या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही. जो मुलाच्या बाबतीत थोडाफार मिळु शकतो. ० मुलगी नवर्‍याचा वंश वाढवते - एकुलती एक मुलगी असेल तर प्रॉपर्टी परक्या घरी घेऊन जाते, हा दृष्टीकोन लोकांच्या दू:खाची नेमकी कारणे हीच आहेत. एकुलती एक मुले वाढवणे जसजसे अनिवार्य होणार तसे सध्याची समाजाची मानसिकता या समस्या जास्त गंभीर बनवणार. या दोनही समस्यांची "समाधानकारक" उत्तरे समाजाला मिळत नाहीत तो पर्यंत मुलींबद्दल समाजात आकस राहणार. टीप : ही जाहीरात नाही!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
50233 वाचन

💬 प्रतिसाद (171)

प्रतिक्रिया

आईच्या जिवाला असलेल्या

गवि
Wed, 08/17/2011 - 14:48 नवीन
आईच्या जिवाला असलेल्या धोक्याची काळजीतरी इतरांना असते हीच मोठी गैरसमजूत वाटते. मेट्रोसेंट्रिक दृष्टीकोन न ठेवल्यास.. माझं म्हणणं आहे की कोणत्याही गर्भपातालाच विरोध असावा. मुलगा असो किंवा मुलगी. त्यासाठी भावनात्मक आवाहन करावे. मुलीचा गर्भ असे वेगळे न म्हणता कोणताही गर्भपात म्हणजे जीवहत्या असं आवाहन आणि नियम सर्वत्र करावेत. गर्भपात करणारी केंद्रे बंद करण्याची गरज नाही. फक्त लोकांच्या भावनेला हात घालायला हवा. आणि तो एकूण अपत्य या विषयाबाबत. मुलगी / मुलगा असे नव्हे. मग ज्यांना खरेच वैद्यकीय इमर्जन्सी म्हणून करायचा आहे ते करतील. किंवा मग जन्माला आलेली मुलगी आईबापांना नको असेल तर तिला जन्मताच थेट आणि रीतसर सरकारी चाईल्ड केअर सेंटरमधे दाखल करुन घेण्याची सोय हवी. (नो क्वेश्चन्स आस्क्ड). तिथे अनाथाप्रमाणे वाढेल पण मरण्यापेक्षा बरं ना ते.. कारण.. गर्भात मारता आलं नाही म्हणून जन्मल्यावर दोनतीन दिवसांतच तिला कचर्‍यात फेकल्याच्या, गळा चिरल्याच्या, पिंपात बुडवून मारल्याच्या असंख्य घटना जवळजवळ रोज वाचण्यात येतात. म्हणजे मुलीला जन्माला घालण्याची सक्ती आईबापांवर केली तरी तिला पुढे प्रेमाने वाढवण्याची कायदेशीर सक्ती कधीच शक्य नाही. अगदी कचर्‍यात नाही फेकले तरी मग अशा नकोशा मुलीला अगदी लहानपणापासून रोजच कचर्‍यासारखे वागवताना मी अनेक घरांत पाहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

प्रतिसाद छान लिहीला आहे फक्त

पक्या
Wed, 08/17/2011 - 15:07 नवीन
प्रतिसाद छान लिहीला आहे फक्त एक मुद्दा खोडावासा वाटतो - गर्भपातालाही सरसकट विरोध नसावा . फक्त मुलगा / मुलगी ह्या निव्व़ळ लिंगभेदावर गर्भपात केला जात असेल तर ते चूक आहे. गर्भातील दोष, आईला काही मोठे आजारपण उद्भवल्यास आणि मुळात म्हणजे आईला मूल नको असताना / मुलाला जन्मानंतर वाढवण्याची मानसिक किंवा इतर.. आर्थिक वगैरे तयारी नसताना चुकून गर्भ राहिल्यास अशा कारणास्तव गर्भपातास विरोध नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गर्भपातालाही सरसकट विरोध

गवि
Wed, 08/17/2011 - 15:39 नवीन
गर्भपातालाही सरसकट विरोध नसावा म्हणून तर भावनिक आवाहनावर भर दिलाय ना. मुलगा / मुलगी असा भेद मधे न आणणे हे तात्कालिक (भावनिक) दृष्ट्या आणि लाँग टर्ममधे उलट इफेक्ट न होण्यासाठीही चांगलेच ठरावे.. शिवाय नीट विचार करुन पाहिलं तर अशा आवाहनात "तुम्ही स्त्रीभ्रूण हत्याकर्ते आहात, किंवा तशा मेंटॅलिटीचे आहात असा थेट आरोप अतएव ऑफेन्सिव्ह वाक्य टाळले जाते. सर्वसमावेशक करायचे तर कोणताच गर्भपात करु नका हे आवाहन जास्त अपील होऊ शकेल. (सर्वच भ्रूणांना जीवनाचा हक्क आहे. प्रत्यक्षात "मुलगा" म्हणून कोणीच हत्या करत नसले तरी..) वैद्यकीयच काय पण इतर कारणांनीही करणारे करत राहतील. बेकायदेशीर ठरवू नये. "नियम" हा शब्द मी चुकून वापरला. भावनिक आवाहन म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी. आता प्रेग्नंट आहात तर त्याला जगू द्या. (अनलेस मेडिकल इश्यू.. इ इ ओघाने आलेच... ते घोषणेतच नको .. इतकेच.. ) म्हणजे आईला मूल नको असताना / मुलाला जन्मानंतर वाढवण्याची मानसिक किंवा इतर.. आर्थिक वगैरे तयारी नसताना चुकून गर्भ राहिल्यास अशा कारणास्तव गर्भपातास विरोध नसावा. हे काहीसे इंटरेस्टिंग आहे. आईला मूल "नको" असणे मान्य. पण त्या नको असण्याच्या कारणातील काही कारणे आपण वैध ठरवणार आणि काही अवैध.. मुलगी आहे म्हणून नको हाही नको असण्याचा प्रकार असू शकतो. त्यासाठी चाचणी आहे म्हटल्यावर ती करुन गर्भपात का करु नये? आणि "चुकीने" प्रेग्नंट राहिले तर चुकीचे प्रायश्चित्त / सुधारणा / उतारा म्हणून केवळ अ‍ॅव्हेलेबल असल्याने गर्भपात केला जाणे याला कसली वैधता आणि नैतिकता आहे? त्या जन्माला येणार्‍या मुलाची चूक आहे का? चूक झाली तर मूल जन्माला घालून वाढवणे, त्यासाठीची मानसिक तयारी करणे हेच त्या चुकीचे प्रायश्चित्त योग्य ठरेल. चूक करण्याइतपत मानसिक तयारी आहे आणि त्याचे फळ भोगायला मात्र अजून तयारी होत नाही हे अनाकलनीय आहे. जबरदस्तीने / बलात्कारातून गर्भ राहिला असेल त्याला "चुकीने" म्हणणे चुकीचे ठरेल.. तरीही तो जन्माला येऊ दिलाच पाहिजे.. मग आईची असमर्थता सिद्ध होत असेल तर सरकारने त्या पोराची / पोरीची जबाबदारी घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

"जबरदस्तीने / बलात्कारातून

शैलेन्द्र
Wed, 08/17/2011 - 16:02 नवीन
"जबरदस्तीने / बलात्कारातून गर्भ राहिला असेल त्याला "चुकीने" म्हणणे चुकीचे ठरेल.. तरीही तो जन्माला येऊ दिलाच पाहिजे.. मग आईची असमर्थता सिद्ध होत असेल तर सरकारने त्या पोराची / पोरीची जबाबदारी घ्यावी." हे बरयं .. म्हणजे त्या जबरदस्तीची शिक्षा मुलीने भोगायची? कुठल्या काळात आहात आपण राजे? हा चुकीने नाही तर "अपघाताने" राहीलेला गर्भ असेल, व प्रयश्चीत्त म्हणुन बलत्कार्‍यास(जर खरच बलात्कार असेल तर), मनुष्यवधाची शिक्षा ठोठावली जावी. बाकी तुमचा सरकारवर जरा जास्तच विश्वास आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मी याच काळात आहे. म्हणूनच

गवि
Wed, 08/17/2011 - 16:21 नवीन
मी याच काळात आहे. म्हणूनच तुमच्या प्रतिसादातला मुद्दा मला पटला आहे. म्हणजे हा विचार मी केलाच नव्हता.. गर्भधारणा ते प्रसूती हा काळही अत्याचारित मुलीला शिक्षेप्रमाणे असू शकतो हे पटलं. मी ते तेवढे विधान मागे घेतो. बलात्कारपीडित किंवा तत्सम अत्याचारांतून राहिलेल्या गर्भांबाबतीत मॉरॅलिटीपेक्षा त्या मुलीच्या चालू आयुष्याला प्राधान्य देऊन तिचा निर्णय अंतिम मानावा. बाकी बाबतीत (चुकीने, मानसिक तयारी नसणे इ इ) विधाने तशीच ठेवत आहे. बाकी सरकारविषयीच्या विश्वासाचे काय बोलावे? हे सर्व नियम, कायदाकानून तरी काय.. ? सरकारचेच आहेत हो ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

उत्तम...

वपाडाव
Wed, 08/17/2011 - 17:22 नवीन
सर्व प्रतिसादांचा सार ह्या प्रतिसादात आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

@गवि, अहो 'चुकून ' असे जे

पक्या
Fri, 08/19/2011 - 04:19 नवीन
@गवि, अहो 'चुकून ' असे जे लिहीले आहे ते बेजबाबदार या अर्थी नव्हे. कुठल्याही बर्थ कंट्रोलवर बघा काय लिहीलेले असते. १००% खात्री कोणताच बर्थ कंट्रोल देत नाही. मूल नको म्हणुन ते वापरले जात असतील आणि तरिही गर्भ राहिला तर त्या केस मधे गर्भपात करण्यास विरोध नसावा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अगदी मान्य.. ते कशा अर्थाने

गवि
Fri, 08/19/2011 - 09:30 नवीन
अगदी मान्य.. ते कशा अर्थाने म्हटले आहे हे कळलं. तरीही मला यावर अजून म्हणावंसं वाटतं की त्या उत्पादनाचा वापर करुन आपण ती लिखित (टक्के) रिस्क घेत असतो. रिस्क घेणे याचा अर्थ त्या उत्पादनाच्या काही टक्के फेल्युअरची जबाबदारी आपण घेणे. ती जबाबदारी घेतली की मग उत्पादनाच्या चुकीने जरी गर्भ राहिला तरी त्याची किंमत गर्भाने चुकवायची हे लॉजिक दुरित वाटते. कोणतीही कार कितीही काळजीपूर्वक चालवली तरी ती वेगात असताना पंक्चर होऊन नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि एखाद्या पादचार्‍याला उडवू शकते (अशी समजा १ टक्का शक्यता प्रति प्रवास आहे) . कारचा किंवा टायरचा मॅन्युफॅक्चरर याला जबाबदार असेल नसेल.. तुम्ही जबाबदार असाल नसाल.. पण पादचार्‍याला त्याची किंमत मोजायला लावणे हे चूकच. याठिकाणी आपण त्याला हॉस्पिटलात नेऊन वाचवण्याची आणि खर्चपाण्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे. मोटारीच्या डिझाईनमुळे झाली चूक, आता हे पादचार्‍या तू मर रस्त्याकडेला पडून असे म्हणून निघून नाही जाता येत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

माझं म्हणणं आहे की कोणत्याही

युयुत्सु
Wed, 08/17/2011 - 15:38 नवीन
माझं म्हणणं आहे की कोणत्याही गर्भपातालाच विरोध असावा. मुलगा असो किंवा मुलगी.
कुमारी मातांचा प्रश्न निर्माण होईल त्याचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

वरील प्रतिसादात हा मुद्दा

गवि
Wed, 08/17/2011 - 15:42 नवीन
वरील प्रतिसादात हा मुद्दा थोडा मांडलाच आहे. कुमारी मातांचा प्रश्न निर्माण होईल त्याचे काय? गर्भपातांमुळे कुमारी मातांचा प्रश्न निर्माण कसा होईल? कौमार्यभंग उघडकीस येतील असे म्हणायचे आहे का? की फक्त कुमारी मातेस (लग्नाशिवाय) मूल झाले तरच ती समस्या.. आणि वेळेत गर्भपात केला की ती समस्या नाही? अविवाहित / कुमारी मातांच्या मुलांचे काय करायचे हा प्रश्न जेन्युईन आहे. ते सरकारने आणि एनजीओजनी ठरवता येईल. जन्माला येऊच न देणे हा उपाय अनिष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

अविवाहित मातांमध्ये वाईट काय

नगरीनिरंजन
Wed, 08/17/2011 - 15:55 नवीन
अविवाहित मातांमध्ये वाईट काय आहे हे मला आजतागायत कळले नाहीय. एखाद्या एकट्या स्त्रीने एखादी मुलगी दत्तक घेतली तर तिचे कोण कौतुक (पाहा: कु.सुश्मिता सेन) पण हेच जर एखादीने लग्न न करता मूल जन्माला घालायचे ठरवले तर समाजाला काय अडचण येते कोण जाणे? अगदीच टीनेजर असतील तर गोष्ट वेगळी पण २१-२२ वर्षाच्या वरच्या कमावत्या स्त्रीने असं केलं तर काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तुमचे म्हणणे अगदी योग्य असले

गवि
Wed, 08/17/2011 - 16:02 नवीन
तुमचे म्हणणे अगदी योग्य असले तरी तो पी एच डी च्या लेव्हलचा मुद्दा (म्हंजी एकदम उदारमतवादी) झाला. आयडियली तशी वृत्ती सर्वत्र झाली पाहिजे.. तरी मी तर त्यापेक्षा बर्‍याच खालच्या यत्तेतला प्रश्न उपस्थित केलाय.. ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

"अविवाहित मातांमध्ये वाईट काय

शैलेन्द्र
Wed, 08/17/2011 - 16:10 नवीन
"अविवाहित मातांमध्ये वाईट काय आहे हे मला आजतागायत कळले नाहीय. एखाद्या एकट्या स्त्रीने एखादी मुलगी दत्तक घेतली तर तिचे कोण कौतुक (पाहा: कु.सुश्मिता सेन) पण हेच जर एखादीने लग्न न करता मूल जन्माला घालायचे ठरवले तर समाजाला काय अडचण येते कोण जाणे? अगदीच टीनेजर असतील तर गोष्ट वेगळी पण २१-२२ वर्षाच्या वरच्या कमावत्या स्त्रीने असं केलं तर काय हरकत आहे?" प्रश्न अविवाहीत मातांचा किंवा योनीशुचीतेचा नसुन, जन्माला येणार्‍या अपत्याचा आहे.. आधीच भारतात मुलांची तशी परवडच होते, त्यातुन जर अशी संतती जन्मास आली जिची जबाबदारी फक्त एक पालक घेणार, तर त्या मुलांचे आयुष्य भावनात्मकदृष्तट्या तितकेसे तितकेसे स्थीर नसेल.. कुटुंब व्यवस्थेत एक जे संरक्षन आज मिळतय त्याला ही मुल मुकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

ओह..

नगरीनिरंजन
गुरुवार, 08/18/2011 - 06:11 नवीन
मुलांची परवड होऊ नये या उदात्त हेतूने अविवहित गर्भवतींना लपूनछपून (क्वचित उघडपणे) गर्भपात करण्यास किंवा प्रसंगी झालेले मूल टाकून देण्यास भाग पाडले जाते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

कमाल करता!

प्रियाली
Wed, 08/17/2011 - 17:07 नवीन
अगदीच टीनेजर असतील तर गोष्ट वेगळी पण २१-२२ वर्षाच्या वरच्या कमावत्या स्त्रीने असं केलं तर काय हरकत आहे?
कमालच करता! गॉसिप करणे, इतरांच्या घरात घुसून चौकशा करणे, उणीदुणी काढून त्यावर गफ्फा मारणे हा भारतीय संस्कृतीचा हक्क आहे नाही का? तो तुम्ही हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

मुळात...

पंगा
Wed, 08/17/2011 - 18:18 नवीन
अगदीच टीनेजर असतील तर गोष्ट वेगळी पण २१-२२ वर्षाच्या वरच्या कमावत्या स्त्रीने असं केलं तर काय हरकत आहे?
मुळात हरकत असावी की नसावी हे ठरवणारे आपण (म्हणजे तुम्ही, मी किंवा संबंधित स्त्री वगळता इतर कोणीही) कोण? हा त्या संबंधित स्त्रीचा वैयक्तिक मामला आहे. मामला खतम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

मुलींची घटती स्म्ख्या पहाता

JAGOMOHANPYARE
Wed, 08/17/2011 - 10:08 नवीन
मुलींची घटती स्म्ख्या पहाता एक दिवस मुलाचे व्डील मुलीच्या वडिलाचे पाय धरतील असे दिवस आणखी २० वर्षानी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. :) त्यातच ३३% महिला आरक्षण झाले म्हणजे ही वेळ त्याहीपेक्षा आधीच येणार. :)
  • Log in or register to post comments

>>मुलगी का नको?लेखात

पक्या
Wed, 08/17/2011 - 14:47 नवीन
>>मुलगी का नको? लेखात दिलेल्या कारणांव्यतिरिक्त अजून १-२ कारणे म्हणजे सुरक्षितता आणि लग्नाची समस्या. मुलाच्या बाबतीत पालक तसे अति काळजी करत नाहित. पण मुलीच्या बाबतीत पालकांना सुरक्षितता, इज्जतीचा मोठा प्रश्न वाटत असतो. काही कारणास्तव मुलाचे लग्न झाले नाही तरी आई वडिलांमागे तो एकटा राहू शकेल पण मुलीचे लग्न जमलेच नाही तर ती कशी एकटी राहील हा काळजीचा प्रश्न पालकांना भेडसावत असावा. शिवाय लग्नाचा सर्व खर्च मुलीकडच्यांनी करणे, मुलगि सासरी गेल्यावर तिच्यावर आई वडीलांना कसलाही हक्क दाखवता न येणे वगैरे गोष्टी अजूनही होत असलेल्या पाहण्यात आल्या आहेत. सधन स्थितीतले, उच्च शिक्षण घेतलेले एक ओळखीतले पालक 'बरय मला मुलगा आहे , मुलींचं खूप कराव लागत ' असं बोलताना प्रत्यक्षात ऐकलं आहे . (म्हणजे मुलींना वाढवताना मुलांपेक्षा जास्त कष्ट , काळजी घ्यावी लागते ह्या अर्थाने ते वाक्य होतं)
  • Log in or register to post comments

मुलींना वाढवताना मुलांपेक्षा

रेवती
Wed, 08/17/2011 - 18:30 नवीन
मुलींना वाढवताना मुलांपेक्षा जास्त कष्ट , काळजी घ्यावी लागते महानच म्हणायला हवेत असे लोक्स!;) खरं तर मुलगा आणि मुलगी यात भेद करण्याचं कारण नाही. पण आपणच आपली परिस्थिती अवघड करून ठेवलिये. माझ्या मुलाचा संसार उद्याच्या काळात कसा यशस्वी आणि सुखाचा होईल? आज त्याला मी ज्या चांगल्या किंवा प्रॅक्टीकल सवयी (जसे घरकामात बरोबरीचा एवढेच नव्हे तर वेळप्रसंगी जास्त वाटा उचलणे, माझे तुझे अशी भांडणे न करणे, बालसंगोपन इ.) लावीन म्हणजे त्याच्यासमोर तसे मी आणि नवरा दोघेही वागू तितके त्याला सोपे जाईल. अश्यावेळी काय अवघड नि काय सोपं? मुलांना अथवा मुलींना सगळं सारखच शिकवावं लागणार (काही नैसर्गिक फरक सोडल्यास). पण असे लोक भेटतात हे खरेच! माझ्या ओळखीच्या एकीला दोन मुली आहेत. ती म्हणाली की मला मुलींची इतकी भयानक आवड आहे की मुलगा जन्माला आला असता तर त्याचे तुकडे करून टाकले असते. माझं वर्षाचं लेकरू कडेवर होतं. अंगावर सरसरून शहारा आला. त्यानंतर पुन्हा तिला भेटले नाही. नुसती दिसली तरी वाट बदलून जात होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

आणखी म्हणजे मुलांनाही

रेवती
गुरुवार, 08/18/2011 - 00:46 नवीन
आणखी म्हणजे मुलांनाही जबाबदारीनं वाढवलं तर मुलींना त्रास होण्याची शक्यता किती कमी होईल? बरीच! पोरांना बिघडायला मोकळं रान द्यायचं मग मुलींना "तूच कशी सांभाळून रहा." हे सांगताना जास्त कष्ट होतात. ते या अश्या महान लोकांमुळेच! एका मर्यादेपलिकडे लहान वयात सांभाळून राहताना कधितरी त्या मुलींचा कडेलोट होतो आणि त्या हवे तसे वागू लागतात, मग कमी कपडे आणि काय केलं की पुन्हा त्याच वाईट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

कोण कुणाच्या घरी राहायला जायचे?

चेतन सुभाष गुगळे
Wed, 08/17/2011 - 19:00 नवीन
लग्न झाल्यावर पुरूष बायकोच्या घरी राहायला गेले पाहिजेत, परंतू ते तसे जायला तयार नसतात असा काहींचा सूर दिसला. यावर काही मतप्रदर्शन करावेसे वाटते. माझ्या परिचयाचे एक ६५ वर्षीय विधूर गृहस्थ आहेत. पुण्यात मोठे घर आहे. दोन विवाहित मुले असून त्यांचीही स्वतंत्र घरे आहेत. या गृहस्थांना पुन्हा विवाह करावयाचा आहे. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वधू संशोधन सुरू झाले आणि उदयपूर येथील एक स्थळ पाहिले गेले. सदर महिला ५३ वर्षीय विधवा असून तिला कोणतेही अपत्य नाही. दोघांनी एकमेकांना पसंत केले तरीही या पसंतीची परिणती विवाहात होऊ शकली नाही. कारण - ६५ वर्षाचे गृहस्थ पुण्यातील आपले घर सोडून जायला तयार नाही, इथे त्यांची बर्‍यापैकी स्थावर / जंगम मालमत्ता आहे, तिचा ही त्यांना सांभाळ करायचा आहे. उदयपूरच्या ५३ वर्षीय महिलेची देखील हीच अडचण आहे. त्यांची उदयपूरची मालमत्ता तर "अतिप्रचंड" या सदरात मोडणारी आहे. उदयपूर येथील महाल सोडून जायची तर त्या कल्पनाही करू शकत नाहीत. अर्थात इतके सगळे असले तरीही, या दोन्ही व्यक्तिंच्या जोडीदारविषयक अपेक्षांमध्ये काही फरक नक्कीच आहेत. पुण्याचे ६५ वर्षीय गृहस्थ ४० ते ५५ दरम्यानच्या वयातील महिलेशी विवाह करण्यास तयार आहेत जी त्यांच्यासोबत येऊन त्यांच्या घरी राहण्यास तयार असेल. तिच्या सांपत्तिक / शैक्षणिक पात्रतेविषयी त्यांच्या कुठल्याही अटी नाहीत. थोडक्यात, एखाद्या गरीब, कमी शिक्षित महिलेशी विवाह करण्यास त्यांना कुठलीही अडचण नाही. त्यामुळे त्यांना जोडीदार मिळणे फारसे अवघड वाटत नाही. याउलट, उदयपूरच्या ५३ वर्षीय महिलेची अपेक्षा जोडीदाराने त्यांच्यासोबत (उदयपूर येथे) येऊन राहावे अशी असली तरीही जोडीदाराविषयी त्यांच्या इतर अटी पारंपारिकच आहेत, जसे की - तो वय, शैक्षणिक / सांपत्तिक स्थिती याबाबत या महिलेपेक्षा वरचढ असावा. आता असा पुरूष (जो त्या महिले इतका / अधिक श्रीमंत आहे) स्वत:ची मालमत्ता सोडून तिच्याकडे का बरे राहावयास जाईल? स्वत:पेक्षा कमी (ही महिला पदवीधर आहे) शिकलेला / कमी वयाचा / गरीब पुरूष जोडीदार म्हणून या महिलेला मान्य नाहीय. या महिलेला (त्यांच्या अपेक्षेप्रमाणे) जोडीदार मिळणे अवघड नाही का? स्त्रियांच्या आपल्या जोडीदाराकडून असणार्‍या अपेक्षा पाहता त्यांना त्यांच्या घरी राहायला येणारा पुरुष जोडीदार भेटणे अवघड दिसते. त्यांना त्यांच्या घरी राहू शकणारा जोडीदार हवा असल्यास त्यांनी त्यांच्या जोडीदार विषयक इतर अपेक्षांमध्येही बदल करायला हवा.
  • Log in or register to post comments

एक्सक्युज नं. ५०

प्रियाली
Wed, 08/17/2011 - 19:05 नवीन
२५ आणि २७ वर्षांच्या मुलाकडे (म्हणजे लग्नाचे प्रचलित वय) स्थावर मालमत्ता असणे थोडे कठीण आहे. इथे सरसकट पुरुषांनी स्त्रियांकडे राहायला जावे असे म्हटलेले नसून जर मुलगी एकुलती एक असेल, फक्त मुली असतील, आई वडिलांना आधार नसेल आणि त्याना शक्य असेल तर नवर्‍याने बायकोकडे राहायला जाण्यात काय गैर आहे असे विचारले आहे.
स्त्रियांच्या आपल्या जोडीदाराकडून असणार्‍या अपेक्षा पाहता त्यांना त्यांच्या घरी राहायला येणारा पुरुष जोडीदार भेटणे अवघड दिसते. त्यांना त्यांच्या घरी राहू शकणारा जोडीदार हवा असल्यास त्यांनी त्यांच्या जोडीदार विषयक इतर अपेक्षांमध्येही बदल करायला हवा.
हे मात्र ठीक आहे. मान्य करण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

छान चर्चा / प्रतिसाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/17/2011 - 20:32 नवीन
वाचतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मुलींवरचे अत्याचार,

नर्मदेतला गोटा
Wed, 08/17/2011 - 21:37 नवीन
मुलींवरचे अत्याचार, असुरक्षितता यामुळे मुलीची जबाबदारी नको वाटते
  • Log in or register to post comments

स्लटवॉक

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/17/2011 - 21:58 नवीन
जबाबदारी फक्त मुलगी आणि तिच्या पालकांचीच का? स्लटवॉकबद्दल ऐकले आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नर्मदेतला गोटा

काकू स्लटवॉकचा काय संबंध ?

आत्मशून्य
Wed, 08/17/2011 - 23:08 नवीन
१० पैकी २ जणी उत्तान कपडे घालून फिरू लागल्या तर उरलेल्या ८ मूलींची त्या २ मूलींसोबत विनाकारणच पंचाइत होइल की ? हेच जर १० च्या १० मूलि तसेच उत्तान कपडे घालून फिरायला लागल्या तर मात्र ती एक जनरलाइज्ड गोश्ट बनेल. मग मात्र त्यात कोणी (विषेश) लक्ष वेधून घेणार नाही. पण हे केव्हां १०/१० उत्तान कपडे वापरू लागल्या तर. पण हे घडलं नाही तर मात्र २ जणींमूळे उरलेल्या ८ मूलीनाही त्रास संभवतो. तसही केवळ जॉकी घालून कोठेही कसेही फिरायला मीळ्णे हा मूलांचा हक्कच आहे. लवकरच त्यासाठी स्टडवॉक आयोजीत करावा म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्मशून्य बाळा...

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/17/2011 - 23:28 नवीन
बाकीच्यांनी काहीही कपडे घातले तरी तुझी* पंचाईत होते का? माझी तरी होत नाही. तर हा मुद्दा समजला नाही. (कमी कपड्यातल्या स्त्रिया आजूबाजूला असतानाही) पूर्ण कपडे किंवा शरीराचा बराचसा हिस्सा झाकणारे कपडे घालणार्‍या मुलींकडे पुरूषांचं लक्ष वेधलं जात नाही असं तुला* वाटतं का? माझा तरी असा अनुभव नाही. तुझा* अनुभव वेगळा असेल तर जरूर सांग. स्लटवॉकमधे सामील होणार्‍या, कमी कपडे घालणार्‍या (ज्यांना तू* आणि इतर काही लोकं उत्तान कपडे(?) म्हणत आहात) मुली आणि स्त्रियांचा आक्षेप काय आहे हे तुला* समजलं आहे काय? आक्षेप आहे तो कमी कपडे घालणार्‍या स्त्रियांनाच त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारासाठी जबाबदार धरण्याला! घरातून बाहेर पडताना चिक्कार कड्याकुलपं घातली नाहीत म्हणून चोराला चोरी करण्याचा नैतिक अधिकार मिळत नाही; चोरी अश्लाघ्यच ठरते. *शक्यतोवर अनोळखी लोकांचा एकेरीत उल्लेख करत नाही, पण तूच एवढा आदर देऊन 'वडील'पण देतो आहेस तर तुझा एकेरीत उल्लेख करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

बाकीच्यांनी काहीही कपडे घातले

आत्मशून्य
गुरुवार, 08/18/2011 - 00:14 नवीन
बाकीच्यांनी काहीही कपडे घातले तरी तुझी* पंचाईत होते का? माझी तरी होत नाही. तर हा मुद्दा समजला नाही.
अवघडं आहे. तूमच न्हवे बहूतेक माझच. कारण माझा मूद्दाच तूमाला कळला नाही. :( आणी इतकं वडीलपण देऊनही या जन्मी तो कळेल असं आता तर अजिबात वाटत नाही. काही लोकांना कदाचीत मोठेपणा पचनी पडत नसावा.
(कमी कपड्यातल्या स्त्रिया आजूबाजूला असतानाही) पूर्ण कपडे किंवा शरीराचा बराचसा हिस्सा झाकणारे कपडे घालणार्‍या मुलींकडे पुरूषांचं लक्ष वेधलं जात नाही असं तुला* वाटतं का? माझा तरी असा अनुभव नाही. तुझा* अनुभव वेगळा असेल तर जरूर सांग.
तूम्ही अनावश्यक वैयक्तीक होताय. पण तूमच्या विधानाचा अभ्यास म्हणून ज्या पूरूषांच्या आजू बाजूला तूम्ही वावरता त्यांची मूलाखत घेता येइल काय ? बाकी माझा वयक्तीक अनूभव मी व्यनी क्रेन म्हणतो. इथचं टाकू म्हणत असाल तर त्याची जबाबदारी आपण घेतली पाहीजे आहे का तयारी ?
स्लटवॉकमधे सामील होणार्‍या, कमी कपडे घालणार्‍या (ज्यांना तू* आणि इतर काही लोकं उत्तान कपडे(?) म्हणत आहात) मुली आणि स्त्रियांचा आक्षेप काय आहे हे तुला* समजलं आहे काय? आक्षेप आहे तो कमी कपडे घालणार्‍या स्त्रियांनाच त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारासाठी जबाबदार धरण्याला!
हम्म.... एकमेकांकडे आकर्षले जात आहेत, दोष लोखंडाचा की लोहचूंबकाचा ... कोण जबाबदार ? इथे सामानज्ञान सांगते दोष दोघांचा. (बाकी हे कळत असतं तर मोर्चे कशाला काढावेसे वाटले असते ;) हलके घ्या कंसातील लीखाण हा विनोद आहे)
घरातून बाहेर पडताना चिक्कार कड्याकुलपं घातली नाहीत म्हणून चोराला चोरी करण्याचा नैतिक अधिकार मिळत नाही; चोरी अश्लाघ्यच ठरते.
हे समजयची अक्कल कायदापालणार्‍या सामान्य माणसाला असते चोराला न्हवे, म्हणून त्यासाठी घरंच उघडी टाकून चोरीच्या विरोधात आंदोलन करणे म्हणजे मोठा जोकच. यानं तर चोर काय सामान्य माणसालाही एकदा घर लूटून बघूया म्हणायचा मोह झाला तर ?
*शक्यतोवर अनोळखी लोकांचा एकेरीत उल्लेख करत नाही, पण तूच एवढा आदर देऊन 'वडील'पण देतो आहेस तर तुझा एकेरीत उल्लेख करते.
हे बघा एक गोश्ट कान उघडून लक्षात ठेवा मला प्रेमाने कोणी कसही उल्लेखावे असं माझं स्पश्ट मतं आहे, त्याला मी विरोध कधीही केलेला नाही / करत नाहीच. पण एकेरी उल्लेखच काय आपण माझ्याशी बोलताना अपशब्दांचा वापर केला तरी मला फरक पडत नाही. पटत नसेल तर माझी खरडवही बघा तिथे एका कम्यूनीस्ट महामूर्खांने अशा शब्दांचा सढळहस्ते वापर केलेला आढळून येइल. तेव्हां जस्ट चिलं.. डीस्क्लेमरची अजिबात गरज न्हवती हो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

शंका

पंगा
गुरुवार, 08/18/2011 - 00:51 नवीन
हे बघा एक गोश्ट कान उघडून लक्षात ठेवा
कान उघडल्याने एखादी गोष्ट लक्षात कशी ठेवता येईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

कान उघडल्याने एखादी गोष्ट

आत्मशून्य
गुरुवार, 08/18/2011 - 01:50 नवीन
कान उघडल्याने एखादी गोष्ट लक्षात कशी ठेवता येईल?
तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे :) आगाऊ सूचना देणं मी माझं कर्तव्य समजतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

कारण माझा मूद्दाच तूमाला कळला

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/18/2011 - 01:49 नवीन
कारण माझा मूद्दाच तूमाला कळला नाही.
मी तेच तर म्हणते आहे. नीट उलगडून सांग की!
तूम्ही अनावश्यक वैयक्तीक होताय. पण तूमच्या विधानाचा अभ्यास म्हणून ज्या पूरूषांच्या आजू बाजूला तूम्ही वावरता त्यांची मूलाखत घेता येइल काय ? बाकी माझा वयक्तीक अनूभव मी व्यनी क्रेन म्हणतो. इथचं टाकू म्हणत असाल तर त्याची जबाबदारी आपण घेतली पाहीजे आहे का तयारी ?
साधारणतः पुरूष आकर्षक दिसणार्‍या स्त्रियांकडे पहातात, मग त्यांनी संपूर्ण अंग झाकलेले का असेना! आता काही डार्विनच्या सिद्धांताएवढा महान सिद्धांत मांडलेला आहे असं नव्हे. साधारण स्त्री-पुरूषांशी बोललं आणि/किंवा थोडं बहुत निरीक्षण केलं की हे समजतं. इथे लिहीलंत तरी माझी ना नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्य काय ते मलाच फक्त एवढ्या कोत्या वृत्तीची मी तरी नाही.
हम्म.... एकमेकांकडे आकर्षले जात आहेत, दोष लोखंडाचा की लोहचूंबकाचा ... कोण जबाबदार ? इथे सामानज्ञान सांगते दोष दोघांचा.
च् च् च् आकर्षणाबद्दल नव्हे, लैंगिक अत्याचाराचे कारण म्हणून तोकड्या कपड्यांकडे निर्देश करण्याला विरोध आहे.
हे समजयची अक्कल कायदापालणार्‍या सामान्य माणसाला असते चोराला न्हवे, म्हणून त्यासाठी घरंच उघडी टाकून चोरीच्या विरोधात आंदोलन करणे म्हणजे मोठा जोकच. यानं तर चोर काय सामान्य माणसालाही एकदा घर लूटून बघूया म्हणायचा मोह झाला तर ?
हे स्पष्टपणे चोरीचं समर्थन आहे ज्याचा मी लिखाणातून निषेध करते, काही स्त्रिया स्लटवॉकमधे सामील होऊन करतात. बाकी शिव्या द्यायला मलाही आवडतं, पण त्या मी मोजूनमापून आणि समोर कोण आहे हे पाहूनच देते. उगाच का आपला बटवा मोकळा करा आणि खजिना दाखवा. तर हे एक असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

मी तेच तर म्हणते आहे. नीट

आत्मशून्य
गुरुवार, 08/18/2011 - 02:25 नवीन
मी तेच तर म्हणते आहे. नीट उलगडून सांग की!
झोपलेल्याला जागं करता येतं म्हणतात. झोपेच सोंग घेतलेल्याला न्हवे. या पलीकडे काय सांगणार ?
च् च् च् आकर्षणाबद्दल नव्हे, लैंगिक अत्याचाराचे कारण म्हणून तोकड्या कपड्यांकडे निर्देश करण्याला विरोध आहे.
हम्म, याबाबत सहमत. बाकी तोकडे कपडे असतील तर आकर्षण जास्त वाटेल इतकचं पण अत्याचारामागे मानसीक विकृती वा क्षणीक तोल जाण्याची प्रवृत्तिच कारणीभूत असते असं वैयक्तीक मत आहे. पण म्हणून स्लट्वॉक करणे (त्याचं समर्थन्/असमर्थन करण्याबाबत नंतर मत नोंदवेन) म्हणजे गाढवपणा होय. यातून कदाचीत विकृतीला प्रोत्साहनच मिळण्याची भीती वाटतेय. :(
हे स्पष्टपणे चोरीचं समर्थन आहे ज्याचा मी लिखाणातून निषेध करते, काही स्त्रिया स्लटवॉकमधे सामील होऊन करतात.
तूम्ही चूकीच्या गोश्टीचा निषेध करत आहात. स्वतः होऊन घरदार उघडं टाकून फिरणं व वरती चोराने चोरी करू नये ही अपेक्षा बाळगण म्हणजे एकतर्फी लादलेला गोड गैरसमज होय. नैतीकतेच्या कल्पना या कम्यूनीजम इतक्याच वाचायला सूंदर असतात, पण प्रत्यक्षात त्या आमलात येणे महाकठीण असते. तसच आपलं म्हणनं हे कोंबडा झाकून ठेवला तर सूर्याने उगवू नये असे मानणे अथवा डोळे मिटून दूध पिलं तर जगाला समजणार नाही अशा गोड गैरसमजात बोक्याने राहणे होय. याबाबत अनेक संतानी फार रोचक दाखले दीले आहेत जे इथे द्यायचा मोह मी आता विस्तारभयाने टाळतो. उलट तूम्ही स्लट्वॉक करणार्‍या लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तींचा निषेध करावा असं मी इथं आवाहन करत आहे. कूलूप लावणे म्हणजे तूरूंगात जाणं न्हवे की ते बंधन वाटावे. आणी तेव्हडी काळजी आपण आपल्या घराची घेतलीच पाहेजे. नाहीतर तूम्हाला तूमच्या घराबद्दल प्रेम आपलेपणा व बंध नाही असेच अधोरेखीत होते. मग ज्या घराशी आपली नाळ जोडली नाहीये ते लूटलं काय अथवा राहीलं काय असा कोणी प्रश्न उपस्थीतत केलाच तर न डगमगता उत्तर द्या. (यासाठी थोडा ऑऊट ऑफ कम्यूनीजम विचारधारा ठेवणे अपेक्षीत आहे ) तसही ज्या गोश्टीमूळे बलात्कार होत नाहीत अशी स्लटवॉक करणार्‍यांची ठाम समजूत आहे त्याबाबत मोर्चा काढायची गरज काय ? जो लोकांना माहीत नाही त्याची जागृती करायला हे मोर्चे वगैरे काढायचे असतात हा बेसीक नियम यांना कळतं नाही काय (बाकी हे कळत असतं तर मोर्चे कशाला काढावेसे वाटले असते :) हलके घ्या कंसातील लीखाण हा विनोद आहे)
बाकी शिव्या द्यायला मलाही आवडतं,
काकू, आपल्या आवडीनीवडी जूळत आहेत असे म्हणतो.
पण त्या मी मोजूनमापून आणि समोर कोण आहे हे पाहूनच देते. उगाच का आपला बटवा मोकळा करा आणि खजिना दाखवा. तर हे एक असो.
आपल्या मतचा आदर आहे पण समोरच्याकडे खजीना असो वा नसो, जसं की मी आधीच स्पश्ट केलंय, आपण काय बोलताय यापेक्षा कसं बोलताय यालाच माझ्यालेखी थोडफांर महत्व असेल. महत्व नसलेल्या गोश्टीच काय होत हे सूज्ञ मिपाकर म्हणून वे.सा.न.ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

काय बोलताय यापेक्षा कसं

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/18/2011 - 02:29 नवीन
काय बोलताय यापेक्षा कसं बोलताय यालाच माझ्यालेखी थोडफांर महत्व असेल.
म्हणूनच का "मला समजत नाहीये, कृपया समजून सांगणे" याला बगल दिली जात आहे. बाकी सर्व असोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

काकू, बगल द्यायचा अजिबात विचार नाही

आत्मशून्य
गुरुवार, 08/18/2011 - 02:36 नवीन
फक्त तूमच्या सारख्या जेष्ठ व खजीनदार व्यक्तीसमोर बोलताना थोड बावरल्यासारखं होतंय, तव्हां बाकी इतर गोश्टी क्लिअर झाल्या असल्यास आपल्याला माझ्या कोणत्या मूद्यावर स्पष्टीकरण हवयं ते जर इथ व्यवस्थीत सांगीतलतं तर तूम्हाला त्याबाबत मदत करेन म्हणतो. किंम्बहूना आपलं म्हणन जिथे पटेल तिथे ते मी उघडपणे मान्य करायचा (अहंकार न्हवे ) स्वाभिमान दाखवेन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

इथलं पहिलंच वाक्य पुन्हा एकदा

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/18/2011 - 02:44 नवीन
इथलं पहिलंच वाक्य पुन्हा एकदा पहाणे. बाकी मी खजिनदार का म्हणे? मिपा सदस्यतेत श्रेष्ठ असा समज करून घेतला आहे, जो तद्दन चुकीचा असू शकतो. आणि ही चूक मान्य करण्याचा मोठेपणा दाखवण्याच्या फंदात मी पडणात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

बाकीच्यांनी काहीही कपडे घातले

आत्मशून्य
गुरुवार, 08/18/2011 - 02:52 नवीन
बाकीच्यांनी काहीही कपडे घातले तरी तुझी* पंचाईत होते का? माझी तरी होत नाही. तर हा मुद्दा समजला नाही.
काकू, हेच वाक्य का ? ... बरं, ठीकाय तूमचा आग्रहच असेल तर उत्तर/स्पश्टीकरण देतोच पण ह्यावर स्पश्टीकरण देण्याआधी तूमची पंचाइत का होत नाही हे कळणे आवश्यक आहे. म्हणजे तूम्हाला व्यवस्थीत समजेल अशा पध्दतीने कौन्सलींग करता येइल.
बाकी मी खजिनदार का म्हणे?
तूम्हीच म्हटलात ना तूमच्याकडे खजीना आहे तो उठसूठ कशाला उघड करायचा ? म्हणून खजिनदार म्हटलयं.
मिपा सदस्यतेत श्रेष्ठ असा समज करून घेतला आहे, जो तद्दन चुकीचा असू शकतो. आणि ही चूक मान्य करण्याचा मोठेपणा दाखवण्याच्या फंदात मी पडणात नाही.
नेमका हाच तर प्रॉब्लेम आहे जी गोश्ट चूकीची असू शकते ती मान्य करण्याचा मोठेपणा दाखवण्याच्या फंदात तूम्ही पडणार नाही. मी म्हणतो नका पडू, पण निदान चूकीच्या गोश्टींच आपल्या प्रतीक्रीयातून निदान समर्थन तरी करू नका ना काकू :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे देवा, गुरूत्वाकर्षणाचा

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/18/2011 - 03:55 नवीन
अरे देवा, गुरूत्वाकर्षणाचा नियम समजला नाही असं म्हटल्यावर "नक्की काय समजलं नाही" असं माझ्या कोणत्याही गुर्जींनी कधी विचारलं नाही. आमच्या गुर्जींची चूकच झाली म्हणायची. पंचाईत का होते हेच नाही समजलं तर का होत नाही हे कसं सांगणार? बाकी आता अवांतरावर माझं मौनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

काकू, तूम्हाला एकसूरी गूर्जी भेटले हे दूर्दैव आहे खरं पण

आत्मशून्य
गुरुवार, 08/18/2011 - 04:31 नवीन
असो, आता तूम्ही तूमचा प्रोब्लेम सांगितला म्हणून माझ्या पध्दतीनं कंन्सल्ट करायचा प्रयत्न करतो. प्रोब्लेम हा आहे की तूमच्या गूर्जीने कधी तूम्हाला एखादा नियम समजला नाही असं म्हटल्यावर "नक्की काय समजलं नाही" असं कधी विचारलंच नाही(जसं आपण म्हणालाच आहात), त्यामूळे मूळातच एखादी गोश्ट समजणे अथवा न समजणे याबाबत तूमच्यामधे बराच गोधळ आहे. पण खरी गंमत नंतरच आहे, तूम्हाला स्वत:लाच हे माहीत नाही की तूम्हाला काय कळलं नाहीये, म्हणजेच जर तूमच्या समोर सफरचंद वरून खाली पाडलं तरी तूम्ही हे गूरूत्वाकर्षण आहे हे मान्य करणार नाही कारण जी गोश्ट तूम्हाला समजली नाही ती समजावून द्यायची सवय तूमच्या गूर्जींना कधी न्हवती व ना ते सामजावून घ्यायची सवय तूमच्या मनाला कधी त्यांनी लागू दीली, याची परीणीती तूम्हाला आधेच सामजावलेल्या गोश्टीही न समजण्यात सतत होत आहे. मघाशी आपण जे म्हणालात की एखादी चूक मान्य करण्याचा मोठेपणा दाखवण्याच्या फंदात तूम्ही पडणार नाही हे सूध्दा एक त्याचेच लक्षण आहे. पटतयं का ? नाही हे जर पटत असेल तरच आपण पूढे विषय अजून समजण्याकडे जाउया, काही कळत नसेल तर लगेच प्रश्न विचारा, अरे हो राहूदे नका उत्तर देऊ अथवा कोनते प्रश्न विचारू , मौन बाळगा तूम्हाला का पटणार नाही हे विषद इथं मी केलचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हाच शब्द आठवला. पूर्वी

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/18/2011 - 04:35 नवीन
हाच शब्द आठवला. पूर्वी चांदण्या देण्याची चर्चा असायची. बाकी चालू द्यात. मी वाचते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

चर्चेमधे आपल्या मूद्दा

आत्मशून्य
गुरुवार, 08/18/2011 - 06:12 नवीन
चर्चेमधे आपल्या मूद्दा मांडायच्या पध्दतीमूळे प्रभावीत झालो हे नम्रपणे नमूद करू म्हण्तो.
बाकीच्यांनी काहीही कपडे घातले तरी तुझी* पंचाईत होते का? माझी तरी होत नाही. तर हा मुद्दा समजला नाही.
हो माझी पंचाइत होते खरी, पण ते कोण, कोणते कपडे, कसे घालतं त्यावर अवलंबून आहे. जसं आता राखी सावंत घ्या तिने कोणतेही कपडे घातले अथवा नाही घातले तर फारशी पंचाइत होत नाही, पण समजा तिच गोश्ट राइसने केली (कोंडेलीजा) तर पंचाइत नाही का होणार ? कसं आहे सगळ्यांकडे राखीसावंत म्हणून बघावं अशी आपली संस्कृती सांगत नाही ना . काय पटतय का माझं बोलणं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आता या दोघींचा परस्परसंबंध

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/18/2011 - 07:12 नवीन
आता या दोघींचा परस्परसंबंध काय? माझ्या माहितीत या दोन्ही स्त्रिया स्वतःला हवे तेच कपडे घालतात, जगाची काय फॅशन आहे याचा विचार (निदान जाहीरपणे) करत नाहीत. काँडी राईस तिला शोभेल ते कपडे घालतात आणि राखी सावंतही! काँडी राईसची प्रतिमा त्यांच्या कपड्यांमुळे निर्माण झालेली नाही, राखी सावंतला इंदिरा गांधींच्या फॅशनचे कपडे घातले तर ती राखी सावंत रहाणार नाही. त्यामुळे या दोघींची कपड्यांवरून तुलना करण्याचं कारण समजलं नाही. शिवाय जगातल्या बहुसंख्य स्त्रिया राखी सावंत आणि/किंवा काँडी राईस यांच्याएवढ्या प्रसिद्धही नाहीत. त्यातूनही काँडी राईस यांनी घरच्यांबरोबर पोहायला जाताना काय कपडे घालावेत हा त्यांचाच प्रश्न आहे. राखी सावंत घालते तेवढेच कपडे घालूनही सुसंस्कृत दिसणार्‍या अनेक स्त्रिया मी तरी पाहिलेल्या आहेत. तुम्ही पाहिलेल्या नसतील तर ती माझी पंचाईत नाही. माझ्या आजूबाजूच्या इतर सर्व स्त्रियांनी काय कपडे घातले आहेत यावरून मी माझे कपडे ठरवत नाही. ऋतू, बजेट, त्या-त्या वेळेस करण्याची कामं यावरून मी माझे कपडे ठरवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

देवा देवा देवा... इथे मुली

धन्या
गुरुवार, 08/18/2011 - 14:25 नवीन
देवा देवा देवा... इथे मुली लोकांना का नकोशा झाल्या आहेत या विषयावर गंभीर चर्चा होत असताना काहींना मात्र कपडयांच्या फ्याशनची पडली आहे... इथेच तर इंडया मार खाते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

धनाजीराव खूप छान प्रतीसाद दिलात.

आत्मशून्य
गुरुवार, 08/18/2011 - 15:31 नवीन
@३_१४ विक्षिप्त अदिती
आता या दोघींचा परस्परसंबंध काय? माझ्या माहितीत या दोन्ही स्त्रिया स्वतःला हवे तेच कपडे घालतात, जगाची काय फॅशन आहे याचा विचार (निदान जाहीरपणे) करत नाहीत. काँडी राईस तिला शोभेल ते कपडे घालतात आणि राखी सावंतही! काँडी राईसची प्रतिमा त्यांच्या कपड्यांमुळे निर्माण झालेली नाही, राखी सावंतला इंदिरा गांधींच्या फॅशनचे कपडे घातले तर ती राखी सावंत रहाणार नाही. त्यामुळे या दोघींची कपड्यांवरून तुलना करण्याचं कारण समजलं नाही. शिवाय जगातल्या बहुसंख्य स्त्रिया राखी सावंत आणि/किंवा काँडी राईस यांच्याएवढ्या प्रसिद्धही नाहीत. त्यातूनही काँडी राईस यांनी घरच्यांबरोबर पोहायला जाताना काय कपडे घालावेत हा त्यांचाच प्रश्न आहे. राखी सावंत घालते तेवढेच कपडे घालूनही सुसंस्कृत दिसणार्‍या अनेक स्त्रिया मी तरी पाहिलेल्या आहेत. तुम्ही पाहिलेल्या नसतील तर ती माझी पंचाईत नाही. माझ्या आजूबाजूच्या इतर सर्व स्त्रियांनी काय कपडे घातले आहेत यावरून मी माझे कपडे ठरवत नाही. ऋतू, बजेट, त्या-त्या वेळेस करण्याची कामं यावरून मी माझे कपडे ठरवते.
- अहो काकू, इथे मूद्दा तूम्ही कोणते कपडे घालता हा नाहीच आहे. आता स्पामधे मी सूध्दा काय कूर्ताघालून बसत नाही. तेव्हां कूठे काय घालयच तारतम्य तूम्हाला, राखी सावंतला, काँडीला अथवा इतर कोणाला नाही असं मी म्हणालोच नाय. आता हीना रब्बानीच उदा. घ्या, कीती मॅनर्स पाळणारी व्यक्ती वाटते ? म्हणून काय सर्व स्त्रीयांनी बूरखा घालूनच वावरायचं असा मोर्चा काढला तर मी काय त्याला पाठींबा देऊ म्हणता ? किव्हां उद्या मी केवळ जॉकी घालून स्टडवॉक आयोजीत केला तर बलात्कारांचे प्रमाण वाढेल म्हणता का ? अर्थातच नाही, स्टडवॉकचा त्याच्याशी काही संबंधच नाही. जसं की स्ल्टवॉकचाही बलात्कार घडण्या न घडण्याशी काही संबंध आहे. मग कशाला समर्थन करताय या बेशर्मी मोर्चांच ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

प्र ति सा द फा र च उ भ ट हो त

गवि
गुरुवार, 08/18/2011 - 16:05 नवीन
प्र ति सा द फा र च उ भ ट हो त चा ल ले त ना ही ? ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

मग तोच तर मुद्दा आहे ना! त्या

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/18/2011 - 20:44 नवीन
मग तोच तर मुद्दा आहे ना! त्या Michael Sanguinetti या कनेडीयन पोलिस शिपायाने "महिलांनी उत्तान कपडे घालणे टाळावे जेणेकरून त्यांचा लैंगिक अत्याचाराला बळी पडावं लागेल." असं* विधान केलं. त्या विधानाचा आणि मानसिकतेचा विरोध म्हणून स्लटवॉक ही कल्पना निघाली. मुद्दा हाच आहे की स्त्रियांच्या कपड्यांच्या लांबी रूंदीमुळे काही फरक पडत नाही. बलात्काराच्या विरोधात, बलात्कार्‍यांच्या विरोधात स्लटवॉक नाही, तेव्हा स्टडवॉकचा मुद्दा निकाली लागतो. तुम्हाला जे कपडे घालून फिरायचं आहे ते कपडे घालण्यास तुम्ही स्वतंत्र आहात, निदान भारतात तरी! लैंगिक अत्याचार ही काही पुरूषांमधली विकृती असते, पण म्हणून मुलगी नको हे म्हणणं रास्त आहे काय? (हा माझा मूळ मुद्दा होता.) काही पुरूषांमधे विकृती आहे म्हणून मुलगीच नको हा चोर सोडून संन्याशाला सुळी देण्यातला प्रकार आहे असं मला सुचवायचं होतं. तर काय बायकांचे कपडे, दुसर्‍यांच्या कपड्यांमुळे तुमच्यावर काय फरक पडतो, कुठून काँडी, हीना आणि राखी आल्या कोण जाणे. असो. *साधारण भाषांतर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

मागे एकदा

प्रियाली
गुरुवार, 08/18/2011 - 22:08 नवीन
मागे एकदा कुठेतरी आणि कुठल्यातरी संकेतस्थळावर मी असं काहीसं लिहिलं होतं की पुरूषांच्या पोटाच्या वर, वर म्हणजे बर्‍याच वर, डोकं नावाचा एक भाग असतो. त्याने विचार करून आणि त्याला नियंत्रणात ठेवून काम केले तर स्त्रियांना लैंगिक शोषणाला बळी पडावे लागणार नाही. उत्तान कपडे घालणे एका बाजूला आणि उत्तान कपडे घातल्याने बाई आपल्याला आमंत्रण देते आहे हे एका बाजूला. केवळ बाईने उत्तान कपडे घातल्याने ती आपल्याला आमंत्रण देते आहे असे जर एखाद्याला वाटत असेल तर त्याने डोके तपासून घेणे उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मागे एकदा कुठेतरी आणि

आत्मशून्य
गुरुवार, 08/18/2011 - 23:29 नवीन
मागे एकदा कुठेतरी आणि कुठल्यातरी संकेतस्थळावर मी असं काहीसं लिहिलं होतं की पुरूषांच्या पोटाच्या वर, वर म्हणजे बर्‍याच वर, डोकं नावाचा एक भाग असतो. त्याने विचार करून आणि त्याला नियंत्रणा
बरं मग ? तो वरचा भाग स्त्रियांमधे मिसींग आहे का ? मग उगाच स्लटवॉकच समर्थन का केलं जातयं ? जर कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही तर एखाद्या महाभागाने दोन शब्द बोलले तर त्यालाच चिकटून जाणीवपूर्वक बेशर्मी मोर्चा आयोजणे म्हणजे काय म्हणावे ?... आम्ही बेशरम न्हवतो पण तरीही थोडफार तशी कृती घडली की माझी आज्जि लगेच पूढील कविता म्हणत खिजवायची... "कोण आम्हा पूसणार.. आम्ही गटारात लोळणार". स्त्रियांवर अशी पाळी खरोखर आलीय का ? मग स्लटवॉकचं समर्थन कशाला ? तसचं बेशर्मी मोर्चांच समर्थन व या धाग्यामधे त्याचं आगमन हे मूलगी जन्मून मोठी झाल्यावर कोणते कपडे घालेल याच्याशी संबधीत असल्याने इथे घूसडणे म्हणजे धाग्याच्या मूळ विषयाची तिन_तेरा विक्षीप्त फजिती होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

प्रश्नच कुठे आला?

प्रियाली
Fri, 08/19/2011 - 00:26 नवीन
बरं मग ? तो वरचा भाग स्त्रियांमधे मिसींग आहे का ?
इथे संबंध कुठे आला स्त्रियांचा? स्त्रियांनी नियंत्रण सोडून पुरूषांवर अत्याचार केले असे कितींदा झाले?
जर कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही तर एखाद्या महाभागाने दोन शब्द बोलले तर त्यालाच चिकटून जाणीवपूर्वक बेशर्मी मोर्चा आयोजणे म्हणजे काय म्हणावे ?...
चला तुम्ही स्वतःला कावळे म्हणून घेतले ते बरे झाले.
आम्ही बेशरम न्हवतो पण तरीही थोडफार तशी कृती घडली की माझी आज्जि लगेच पूढील कविता म्हणत खिजवायची... "कोण आम्हा पूसणार.. आम्ही गटारात लोळणार". स्त्रियांवर अशी पाळी खरोखर आलीय का ? मग स्लटवॉकचं समर्थन कशाला ?
मी समर्थन केल्याचे किंवा न केल्याचे दिसले का वरल्या प्रतिसादात. शांत व्हा! इतकं तापायला काय झालं?
तसचं बेशर्मी मोर्चांच समर्थन व या धाग्यामधे त्याचं आगमन हे मूलगी जन्मून मोठी झाल्यावर कोणते कपडे घालेल याच्याशी संबधीत असल्याने इथे घूसडणे म्हणजे धाग्याच्या मूळ विषयाची तिन_तेरा विक्षीप्त फजिती होय.
मुद्दे नसले की अस्लं काहीतरी बोललं जातं असं स्पष्ट दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

शक्यतोवर अनोळखी लोकांचा एकेरीत उल्लेख करत नाही, पण तूच एवढा आदर

आत्मशून्य
Fri, 08/19/2011 - 01:55 नवीन
इथे संबंध कुठे आला स्त्रियांचा? स्त्रियांनी नियंत्रण सोडून पुरूषांवर अत्याचार केले असे कितींदा झाले?
या विशयी स्वतंत्र धागाच काढावा लागेल. काय आहे उदाहरणांची संख्या फार मोठी आहे.
चला तुम्ही स्वतःला कावळे म्हणून घेतले ते बरे झाले.
आता आपण तूम्ही-आम्ही वर आलाच आहात तर सांगतो, अहो बरे झाले म्हणजे काय ? लोकांना बरे वाटावे अशाच कृती मी सदैव करत असतो. काही वैचारीक गोंधळ असलेले कम्यूनीस्ट मला विरोध करू शकतात, पण मला विश्वास आहे त्यांनी योग्य तो अ‍ॅटीट्यूड बाळगला तर त्यांचे सर्व गैर्समज मी सहजी दूर करू शकतो. असो आता मी जे म्हटलं व ते ऐकून तूम्हाला जे बरं वाटलं त्या अनूशंगाने गाइंनी स्वतःला कोंम्बड्या समजायच्या फंदात पडू नये वा तसं वर्तनही करायचा प्रयत्न करू नये अशी अपेक्षा जर ठेवली तर काय चूकलं असे मी म्हटले तर तूम्हाला त्याचा राग येणार नाही ना ? हो आधी विचारणा आवश्यक आहे, चर्चेमधे नंतर खंड नको.
मी समर्थन केल्याचे किंवा न केल्याचे दिसले का वरल्या प्रतिसादात. शांत व्हा! इतकं तापायला काय झालं?
तूमच्या वर नाही हो जे चूकीचं समर्थन करत आहे त्यांच्यावरचा हा सात्विक संताप आहे. बाकी आपण समर्थन करत नसाल तर आपली मूकसंमतीही नाही हे कृपया समर्थन करणार्‍यांना जरा ठणकावून सांगाल काय ? असो. जागेची जी कूचंबणा होत आहे त्या नादात मी ह्या परिच्छेदापूर्वी @३_१४ विक्षिप्त अदिती असे लिहायचे विसरलो हे आठवायलाच विसरलो, लक्षात आणूदिल्याबद्दल आभारी आहे. असो आपण हा परिच्छेद दूर्लक्शीला तरी चालेल. फक्त बशर्मी मोर्चाचा विरोध करत असाल तर तो इथे त्वरीत नोंदवा ही विनंती.
मुद्दे नसले की अस्लं काहीतरी बोललं जातं असं स्पष्ट दिसतंय.
इथे मात्र फारच चूकताय तूम्ही. मी मूद्दा अत्यंत व्यवस्थीत मांडलाय समजला नसल्यास पून्हा सांगतो, बेशर्मी मोर्चांच समर्थन व या धाग्यामधे त्याचं आगमन हे मूलगी जन्मून मोठी झाल्यावर कोणते कपडे घालेल कशी वागेल याच्याशी संबधीत असल्याने मूलीला जन्म देणापूर्वीच्या चर्चेमधील धाग्यात त्याचा असा अनावश्यक उल्लेख करणे संपूर्ण अप्रस्तूत होय. हे म्हणजे मूलगा जन्मला तर मी त्याला डॉक्टरच करेन असे बापाने आधीच ठरवण्यासारखे आहे. असली असंवेदनशीलता बाळगणार्‍यांचा मी जाहीर निषेध करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

काढा की मग

प्रियाली
Fri, 08/19/2011 - 02:24 नवीन
या विशयी स्वतंत्र धागाच काढावा लागेल.
काढा की मग. नाहीतरी इथे प्रतिसाद फारच तिरपे झाल्येत. :) काढाच! माझी विनंती समजा पाहिजे असल्यास.
तूम्हाला त्याचा राग येणार नाही ना ?
मला कशाला राग यायचा? तुम्ही आधी गाई म्हणालात. कोंबड्या वगैरे समजतील हा तुमचा समज आहे माझा नाही.
बाकी आपण समर्थन करत नसाल तर आपली मूकसंमतीही नाही हे कृपया समर्थन करणार्‍यांना जरा ठणकावून सांगाल काय ?
मी समर्थन करत नाही म्हणजे माझी मूकसंमती नाही हे कशावरून? जे स्लटवॉक करू इच्छितात त्यांनी तो अवश्य करावा. माझी अजिबात ना नाही. कोणी काही केले तर माझ्या पोटात दुखत नाही.
मूलगी जन्मून मोठी झाल्यावर कोणते कपडे घालेल कशी वागेल याच्याशी संबधीत असल्याने मूलीला जन्म देणापूर्वीच्या चर्चेमधील धाग्यात त्याचा असा अनावश्यक उल्लेख करणे संपूर्ण अप्रस्तूत होय.
सदर मुद्दा मुलगी झाली तर तिच्यावर अत्याचार होतील या गृहितकापेक्षा फारच कमी अप्रस्तुत आहे असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा