*आह्वानांची ऐशीतैश**
खरं तर मी कोणतच आह्वान दिलेले नाही. मी आह्वान स्वीकारायची तयारी दाखवली यात माझा काय हेतू होता, हे निसंदिग्ध पुढे यावे यासाठी हा लेख प्रपंच.
मी आह्वान स्वीकारत नाही अशी काहींची तक्रार होती. अशा आह्वानतून कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही किंवा निघत नाही, हे लोकांच्या पुढे आणायचे होते. एक ज्योतिषी जिंकला किंवा हरला हे ज्योतिष(शास्त्रा/विद्ये) बद्दल कोणतीही विधाने करण्यास करण्यास पुरेसे नाही. विज्ञानाची कास धरणार्यांना विज्ञानाच्या चौकटीत बसणारे आह्वान तयार करता येत नाही हे यातून अधोरेखित झाले. मी पेनल्टीच्या दडपणा खाली काम करावे अशी अपेक्षा करण्या पर्यंत काही जणांची मजल गेली होती. चाचणी देणार्याने दडपणाखाली रहावे हे कोणत्या वैज्ञानिकतेला धरून आहे. आह्वाने देणारे ज्योतिषाच्या मर्यादांमध्ये त्यांचे आह्वान तयार करत नाहीत, हे कशाच द्योतक? प्रत्येक ज्योतिषी जे दावे करतात त्या दाव्याच्या अनुरोधानेच आह्वान देण्यात यायला हवं. हे दावे प्रत्येक ज्योतिषी जे तंत्र वापरतो त्या तंत्रानुसार बदलु शकतात. हाडाची ऑपरेशन्स करणार्या डॉक्टरला आपण हृदयाची शस्त्रक्रिया करायचा चॅलेंज कधी देतो का?
नारळीकर आणि त्यांच्या कंपूने केलेल्या प्रयोगाबाबत असेच म्हणता येईल.
ज्योतिषाचा उपयोग सर्वानाच होतो असं नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीना ज्योतिष उपयुकत वाटते त्यांच्याच बाबतीत ज्योतिषांचे दावे तपासायला हवेत. जे ज्योतिषी मतिमंदत्वाबद्द्ल दावे करतात त्यांच्या पुरतीच ज्योतिषाची चाचणी मर्यादित राहणार. आलेले निष्कर्ष त्या दाव्यां पुरतेच मर्यादित राहणार. अशा ज्योतिष-सेन्सेटिव्ह लोकांच्या बाबतीत पत्रिकेच्या आधारे आणि पत्रिकेचा आधार न घेता भाकिते करण्यात यावित आणि येणारे निकाल तपासायला हवेत. आणि समजा अशी सर्वंकष चाचणी घेतली तरी त्यातून जो निष्कर्ष निघेल तो तपासल्या गेलेल्या प्रमेया/गृहितका पुरताच मर्यादित राहील. म्हणजे बहुसंख्य ज्योतिषी मतिमंद्त्वाबद्दल भाकित करण्यात जर फसले, तर एव्ह्ढेच म्हणता येइल की मतिमंदत्वाचे निदान पत्रिकेच्या आधारे करता येणार नाही.
असो... आता आह्वान चाचणी इ विषय तूर्त मी माझ्यापूरते बाजूला ठेवले आहेत. सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बस्स आता
सुलेमानी किडे
वपाडाव याला माझ्या
महाशय,
वप्या गप्प आता महाशय बिएशय
नाय ना पण...
ज्योतिषा सारख्या पवित्र
का हो
अगदी हेच विचारणार होतो.
सुड्या, तिथे त्याने लिहिले
:)
आम्हाला आपलं वाटलं ते बोले
हॅ हॅ हॅ.. ह्या सगळ्याचा
चला "युयुत्सु",
या वादामूळे मार्केट मधे
का स्वतःचे हसु करुन घ्यावे
अपमान म्हणजे काय?
ठिक आहे
बरं, पुढे चालू
नायल्या, हसून हसून मेलो रे
शेपटी आहे अन त्यावर त्याला
बर
सोडतो की काय?
धरा ठेवुन माझे काय जाते
अय्या हो!!!
मला तुमच्याशी वाद घालायची काय
नका बोलू
बर
माझे एक नातेवाईक..
माझा ही ज्योतिष या विषयावर
प्रश्न
संशयात्मा विनश्यति !
घेताय का मग चॅलेंज?
या पुर्वीचे आवाहन
@नवोदित
पकाकाका
निमित्त
काका, अशा किती अमावस्या आणि
म्हणजे बहुसंख्य ज्योतिषी
युयुत्सु काका कुठे गेलेत..?
ते आता येणार्या अमावस्येचा
*आह्वानांची ऐशीतैश** असे
अर्थ?