Skip to main content

*आह्वानांची ऐशीतैश**

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 11/08/2011 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर मी कोणतच आह्वान दिलेले नाही. मी आह्वान स्वीकारायची तयारी दाखवली यात माझा काय हेतू होता, हे निसंदिग्ध पुढे यावे यासाठी हा लेख प्रपंच. मी आह्वान स्वीकारत नाही अशी काहींची तक्रार होती. अशा आह्वानतून कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही किंवा निघत नाही, हे लोकांच्या पुढे आणायचे होते. एक ज्योतिषी जिंकला किंवा हरला हे ज्योतिष(शास्त्रा/विद्ये) बद्दल कोणतीही विधाने करण्यास करण्यास पुरेसे नाही. विज्ञानाची कास धरणार्‍यांना विज्ञानाच्या चौकटीत बसणारे आह्वान तयार करता येत नाही हे यातून अधोरेखित झाले. मी पेनल्टीच्या दडपणा खाली काम करावे अशी अपेक्षा करण्या पर्यंत काही जणांची मजल गेली होती. चाचणी देणार्‍याने दडपणाखाली रहावे हे कोणत्या वैज्ञानिकतेला धरून आहे. आह्वाने देणारे ज्योतिषाच्या मर्यादांमध्ये त्यांचे आह्वान तयार करत नाहीत, हे कशाच द्योतक? प्रत्येक ज्योतिषी जे दावे करतात त्या दाव्याच्या अनुरोधानेच आह्वान देण्यात यायला हवं. हे दावे प्रत्येक ज्योतिषी जे तंत्र वापरतो त्या तंत्रानुसार बदलु शकतात. हाडाची ऑपरेशन्स करणार्‍या डॉक्टरला आपण हृदयाची शस्त्रक्रिया करायचा चॅलेंज कधी देतो का? नारळीकर आणि त्यांच्या कंपूने केलेल्या प्रयोगाबाबत असेच म्हणता येईल. ज्योतिषाचा उपयोग सर्वानाच होतो असं नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीना ज्योतिष उपयुकत वाटते त्यांच्याच बाबतीत ज्योतिषांचे दावे तपासायला हवेत. जे ज्योतिषी मतिमंदत्वाबद्द्ल दावे करतात त्यांच्या पुरतीच ज्योतिषाची चाचणी मर्यादित राहणार. आलेले निष्कर्ष त्या दाव्यां पुरतेच मर्यादित राहणार. अशा ज्योतिष-सेन्सेटिव्ह लोकांच्या बाबतीत पत्रिकेच्या आधारे आणि पत्रिकेचा आधार न घेता भाकिते करण्यात यावित आणि येणारे निकाल तपासायला हवेत. आणि समजा अशी सर्वंकष चाचणी घेतली तरी त्यातून जो निष्कर्ष निघेल तो तपासल्या गेलेल्या प्रमेया/गृहितका पुरताच मर्यादित राहील. म्हणजे बहुसंख्य ज्योतिषी मतिमंद्त्वाबद्दल भाकित करण्यात जर फसले, तर एव्ह्ढेच म्हणता येइल की मतिमंदत्वाचे निदान पत्रिकेच्या आधारे करता येणार नाही. असो... आता आह्वान चाचणी इ विषय तूर्त मी माझ्यापूरते बाजूला ठेवले आहेत. सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार!

वाचने 22606
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

In reply to by Nile

शेपटी आहे अन त्यावर त्याला काखमांजर्‍या झाल्या आहेत असे असेल आणि ते तुम्हाला
हॅहॅहॅ... शेपटीला "काखमांजर्‍या"?????????/ विद्वान आहेस्.....हाहाहा =))

एक काम करा.. ज्यांनी ज्योतिषशास्त्र बद्दल दावा केला आहे त्यांनाच विचारा ना की कुठची पुस्तके वाचु, काय काय अभ्यास करु.. त्यांनापण तेवढेच बरे वाटेल.. अपमान झाला की नाही ते तुमचे मत आहे मग ते मी का खोडुन काढु. एखाद्याला आपल्या माहिताचा असलेला गर्व चुकिचा आहे. हे माझे मत आहे तुमचे नसेल तर ठीक आहे. बाकी तुम्ही बसा आपले विचारमंथन करत..

In reply to by विशाखा राऊत

ज्यांनी ज्योतिषशास्त्र बद्दल दावा केला आहे त्यांनाच विचारा ना की कुठची पुस्तके वाचु, काय काय अभ्यास करु.. त्यांनापण तेवढेच बरे वाटेल..
अर्थातच, जरा इतिहासात खणून पहा कीती वेळा विचारले आहे ते. सोडतो की काय?
अपमान झाला की नाही ते तुमचे मत आहे मग ते मी का खोडुन काढु.
लॉजिक तुमचं आहे, म्हणजेच मत तुमचं आहे. एखाद्याचे मत चुकिचे आहे असे म्हणल्यास त्याचा अपमान होतो असे तुमचे म्हणणे आहे, आता तुम्हीच ठरवा काय ते.
एखाद्याला आपल्या माहिताचा असलेला गर्व चुकिचा आहे.
अच्छा. पण अस्तिस्त्वात नसलल्या गोष्टीचा दावा करण्यार्‍या विरोध केला तर तो त्याचा अपमान आहे. वा वा. भारीच की!
बाकी तुम्ही बसा आपले विचारमंथन करत
तुम्ही पण करा की थोडा विचार, म्हणजे मी काय म्हणतोय ते कळेल. :P

In reply to by Nile

मी जे काही लिहिले होते ते या धाग्याबद्दल आणि त्यामध्ये जे काही लिहिले त्याबद्दल होते. तुम्हांला जे काहि बोलायचे असेल ते या लेखकासोबत बोलावे. उगाच काहिहि लिहुन वाद घालणे बंद करा. बाकी काहिहि समजा आणि काहिहि विचार करत बसा.

In reply to by विशाखा राऊत

मी जे काही लिहिले होते ते या धाग्याबद्दल आणि त्यामध्ये जे काही लिहिले त्याबद्दल होते.
तुम्ही जोतिष थोतांडाबद्दल लिहले होते, जरा परत वाचून या बरं.
तुम्हांला जे काहि बोलायचे असेल ते या लेखकासोबत बोलावे.
ते फक्त मारकुट्या बायांबद्दल बोलतात, त्याविषयात आम्हाला रुची अन गती नाही.
उगाच काहिहि लिहुन वाद घालणे बंद करा.
म्हणजे आपण वाद घालतो आहोत? पण तुम्ही तर वर म्हणालात की तुम्ही वाद घालणार नाही म्हणून?
बाकी काहिहि समजा आणि काहिहि विचार करत बसा.
अय्या हो!! थांकू हं! पण मी परमिशन कधी मागितली?

In reply to by Nile

मला तुमच्याशी वाद घालायची काय तुमची ही सगळी मत वाचुन बोलायची पण इच्छा नाही आहे. तेव्हा याविषयी जे काही मत्/विचार्/वाद करयचे असेल ते संबधित धागालेखका सोबत करावे. संपादकानी ही निष्फळ चर्चा ह्या धाग्याकरुन उडवली तरी चालेल.

In reply to by विशाखा राऊत

मला तुमच्याशी वाद घालायची काय तुमची ही सगळी मत वाचुन बोलायची पण इच्छा नाही आहे.
अरे नका बोलू, आम्ही काय तुम्हाला पर्सनल इन्विटेशन थोडीचं पाठवलं होतं?
तेव्हा याविषयी जे काही मत्/विचार्/वाद करयचे असेल ते संबधित धागालेखका सोबत करावे.
परत तेच. वरचे प्रतिसाद वाचावेत.
संपादकानी ही निष्फळ चर्चा ह्या धाग्याकरुन उडवली तरी चालेल.
हे बरंय, आधी वाद घालणार नाही म्हणायचं आणि मग ह्ये प्रतिसाद टंकायचे वर हौस फिटली की संपादकांना उडवा म्हणून सांगायचं. जगू द्या की त्यांना जरा, संपादक असले म्हणून काय झालं, ती पण माणसंच आहेत!

एक काम करा.. ज्यांनी ज्योतिषशास्त्र बद्दल दावा केला आहे त्यांनाच विचारा ना की कुठची पुस्तके वाचु, काय काय अभ्यास करु.. त्यांनापण तेवढेच बरे वाटेल.. अपमान झाला की नाही ते तुमचे मत आहे मग ते मी का खोडुन काढु. एखाद्याला आपल्या माहिताचा असलेला गर्व चुकिचा आहे. हे माझे मत आहे तुमचे नसेल तर ठीक आहे. बाकी तुम्ही बसा आपले विचारमंथन करत..

आत्तापर्यंत सर्व प्रतिक्रिया वाचून मजा घेत होतो...राहवले नाही म्हणून सांगतो.. माझे एक नातेवाईक (बाबांचे काका) यांचा या विषयात प्रगल्भ अभ्यास आहे..त्यांनी मला असे काहीतरी सांगितले होते ..(पुर्णपणे आठवत नाही...) "खरा ज्योतिषी कधीच कोणाकडून पैसे घेत नाही..नाहीतर या विद्येचा अपमान होतो" ..यावर त्यांनी अजून बरेच काही सांगितले होते पण सर्व आठवत नाही...कदाचित युयूत्सूच यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.. (हे मला सांगणारे एक राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले शिक्षक आहेत आणि त्यांनी त्यांच्या ज्योतिष विद्येचा कधिच धंदा केला नाही..)

In reply to by योगी९००

माझा ही ज्योतिष या विषयावर विश्वास नव्हता, हौसे खातर नाडीपट्टी बघितली होती बस्स ( आणि अनुभव छान होता) तरीही भविष्य पाहण्याचे .. माणण्याचे काही रुचत नव्हते. पण कंपणीत एक मित्र झाला .. आणि त्याने यंत्र - रत्न आणि काय काय याच्यात मद्रास च्या युनिवर्सिटीची पिचडी/मास्टरकी मिळवली. लिहायचा मुद्दा हा आहे की. मी कधीच भविष्य न पाहणारा पण याच्याकडुन बर्याच गोष्टी शिकता आल्या पाहता आल्या. आणि विशेष म्हणजे मी, माझे मित्र च काय तो कोणाचीही फि घेत नाही.. आणि भविष्याचा उत्तम अभ्यास होउनही तो त्याचा व्यवसाय करत नाहि. मि बर्याचदा त्याला तसे कर म्हणालो पण तो बघु म्हणतो.. असो भविष्य पाहण्याचा व्यव्साय करण्याबद्दल माझे काही मत नाहि .. पण प्रत्येक गोष्टीची योग्य जागा असते ति तेथेच शोभते.

In reply to by गणेशा

भविष्याचा उत्तम अभ्यास होउनही तो त्याचा व्यवसाय करत नाहि.
याचे कारण त्याच्या स्वतःचा त्यावर पुरेसा विश्वास नाही असे असु शकेल का, याची पडताळणी करता येते का पहा.

In reply to by Nile

भविष्याचा उत्तम अभ्यास होउनही तो त्याचा व्यवसाय करत नाहि.
याचे कारण त्याच्या स्वतःचा त्यावर पुरेसा विश्वास नाही असे असु शकेल का, याची पडताळणी करता येते का पहा.
याचे कारण त्याच्या स्वतःचा त्यावर पुरेसा विश्वास नाही असे असु शकेल का, याची पडताळणी करता येते का पहा.
संशयात्मा विनश्यति !

In reply to by योगी९००

माझे एक नातेवाईक (बाबांचे काका) यांचा या विषयात प्रगल्भ अभ्यास आहे..त्यांनी मला असे काहीतरी सांगितले होते ..(पुर्णपणे आठवत नाही...)
अरे वा, मग तुम्ही घेताय का चॅलेंज?

In reply to by प्रकाश घाटपांडे

पकाकाका का का का का एवढं पाणी ओतता पालथ्या घड्यावर?

In reply to by प्रियाली

तेवढेच त्या निमित्त स्मृति. कधी कधी स्मृतिपटलावरुन आपण विरळ होउन जाउ याची भीती वाटते. अर्थात काळाच्या ओघात ते होणारच आहे. असो अवांतर- सध्या बी १२ ची गोळी चालू आहे ती घेताना त्याच्या मूळ स्त्रोताची आठवण येते. :)

म्हणजे बहुसंख्य ज्योतिषी मतिमंद्त्वाबद्दल भाकित करण्यात जर फसले, तर एव्ह्ढेच म्हणता येइल की मतिमंदत्वाचे निदान पत्रिकेच्या आधारे करता येणार नाही. पत्रीकेच्या आधारे नक्की काय काय करता येते हे संदिग्धच रहातय. पत्रीकेच्या आधारे स्पष्टपणे काय करता येते काय येत नाही या बाबत कोणीच का बोलत नाही. एखादे शास्त्र कधीच स्वतः परीपूर्णतेचा दावा करीत नाही त्यात नेहमी सुधारणा होतच असतात. नियम बनत असतात ,मोडत असतात. हाडाची ऑपरेशन्स करणार्‍या डॉक्टरला आपण हृदयाची शस्त्रक्रिया करायचा चॅलेंज कधी देतो का? तुम्ही हाडाच्या डॉक्टरचे उदाहरण दिले. हाडाच्या डॉक्टरला ( ऑर्थोपेडीक सर्जन ला) आपण काय करू शकतो हे नक्की माहीत असते. शिवाय आर्थोपेडेक वैद्यक र्‍हदयाची शस्त्रक्रीया करण्याचे चॅलेन्ज घेणारच नाही. त्याला आपल्या मर्यादांची पूर्ण जाणीव असते. एकूणातच लेखात मांडलेल्या म्हणण्याचा सूर असा दिसतो की लेखकाला कोणतीच जबाबदारी घ्यायची नाही. आपले निर्णय चुकू शकतात याचे लेखकाला भान आहे मात्र त्याची कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही हा देखील आग्रह आहे. चिकीत्सा करणाराने पैसे देण्याची तयारी दाखवली मात्र आव्हान स्वीकारणाराने त्या चिकीत्सेच्या निकालांची जबाबदारी घ्यायचीच नाही हे अजब तर्कट आहे. गिरे तो भी टांग उपर हीच वृत्ती यातून दिसून येते

In reply to by पान्डू हवालदार

ते आता येणार्‍या अमावस्येचा चार-पाच दिवस आधी उगवतील, येणारी अमावस्या कशी घातक आहे सांगायला ;)

In reply to by रामजोशी

असे लिहणार्यांचा बैलाला ******
अधोरेखित वाक्प्रचार ऐकलेला आहे, अनेकदा वापरलेलाही आहे. मात्र, त्याचा अर्थ कळलेला नाही. कोणी समजावून सांगू शकेल काय? ('घो' म्हणजे 'नवरा' अशी ऐकीव माहिती आहे. मात्र, बैलाचा नवरा म्हणजे कोण, याबद्दल कुतूहल आहे. शिवाय, बैल हा गोप्रजातीतील काही विशिष्ट प्रक्रिया केलेला पुरुष असल्याकारणाने तदानुषंगिक इतरही शंका आहेत, परंतु त्या पुन्हा कधीतरी उपस्थित करेन. तूर्तास एवढी माहिती मिळाली, तरी पुरेशी आहे. याशिवाय, 'घो'ऐवजी 'ढोल' असाही पाठभेद ऐकलेला आहे. त्याबद्दलही माहिती मिळाल्यास जाणून घ्यायला आवडेल.)