✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ज्योतिष - आह्वानकर्त्यांना एक निवेदन

य
युयुत्सु यांनी
Tue, 08/09/2011 - 13:54  ·  लेख
लेख
एक निवेदन मला मिसळपाव वर वारंवार आह्वाने देण्यात येतात आणि मी ती स्वीकारत नाही अशी पण तक्रार सारखी ऐकायला मिळते. म्हणून मी आह्वाने स्वीकारायचे ठरवले आहे. परंतु ते काही सुटसुटीत अटींच्या चौकटीत बसत असेल तरच... - आह्वानकर्त्याना बर्‍याच वेळेस आपण दिलेले देत असलेले आह्वान "योग्य" आहे की हे कळायची पण अक्कल नसते असे लक्षात आले आहे. तेव्हा अशी आह्वाने एका स्वतंत्र समितीकडून तपासण्यात यावीत. या समितीत ज्योतिषी आणि ज्योतिषनिंदक यांचा समसमान सहभाग असावा. ही समिती आह्वानांची योग्यता ठरविण्यासाठी काही कसोट्या निश्चित करेल. अशा समितीने आहवान योग्य असल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्यावरच ते आह्वान मी माझ्या अभ्यासाच्या कक्षेत येत असेल तर ते मी स्वीकारेन - मी आह्वान स्वीकारल्यावर मला प्रत्येक जन्मतारखेसाठी रू, ५००/ (रु पाचशे) एवढे आह्वानशुल्क माझ्या बॅंकेत जमा करावेत. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.या शुल्कावर योग्य तो कर भरायची माझी तयारी आहे. समितीच्या सदस्यांच्या मानधनाची व्यवस्था आह्वानकर्त्याने करावी. - दिलेल्या आह्वानातिल विदा संगणकावर जमा करण्याची व्यवस्था आह्वानकर्त्याने करायची आहे - आह्वानांतर्गत विश्लेषणासाठी लागणारी सर्व गणनसाधने आह्वानकर्त्याने उपलब्ध करून द्यायची आहेत. - समितीचे सर्व कामकाज उघड असावे. त्यांची इंटरनेटवरील एखाद्या ब्लॉगवर यथाकाल नोंद व्हावी, जेणे करून कोणती आह्वाने योग्य आहेत कोणती स्वीकारली गेली आहेत ते जनतेला समजेल. या माझ्या मूलभूत अटी आहेत. गरज पडल्यास यांना पुरवणी-अटी जोड्ण्यात येतील.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25454 वाचन

💬 प्रतिसाद (114)

प्रतिक्रिया

तोल गेला?

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 17:27 नवीन
युयुत्सुराव, तुमचा तोल गेला असे खेदाने म्हणावेसे वाटते...
माझा तोल गेला असे मला वाटत नाही. त्यांनी ्तेलाची भाषा वापरली मी मिरच्यांची वापरली. फिट्टंफाट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

फिट्टंफाट ईयत्ता कितवी?

धन्या
Tue, 08/09/2011 - 17:31 नवीन
फिट्टंफाट
ईयत्ता कितवी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

धोरण

विनायक प्रभू
Tue, 08/09/2011 - 16:35 नवीन
धोरणात बसत असेल तर माझ्या सर्व प्रतिक्रिया सखेद परत. नसेल तर बाटली चा खर्च माझा. रें गणपा बाद वे तुझे आवडते तेल कोणते? (पाकृ करता वापराबद्दल बोलतोय हो)
  • Log in or register to post comments

अवांतर

पंगा
Tue, 08/09/2011 - 16:41 नवीन
रें गणपा बाद वे तुझे आवडते तेल कोणते?
कॉड लिवर ऑइल? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

धाग्याचा खफ न करता तुमच्या

गणपा
Tue, 08/09/2011 - 16:46 नवीन
धाग्याचा खफ न करता तुमच्या खवत उत्तर दिले आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

प्रत्येकाचे ज्ञान वेगवेगळ्या

गणेशा
Tue, 08/09/2011 - 16:44 नवीन
प्रत्येकाचे ज्ञान वेगवेगळ्या गोष्टीत असते. काहींचे कलेमध्ये असते, काहींचे ज्योतिषामध्ये काहिंचे विज्ञानामध्ये. मला असे वाटते ज्या गोष्टीचे आपल्याला ज्ञान नाही त्याच गोष्टींसाठी इतरांची परिक्षा पाहण्याची आपली कुवत नाहि असे समजुन आपण वागले पाहिजे. पुढच्याच्या गोष्टी आपल्याला पटत नसेल(किंवा पुढची व्यक्ती योग्य वाटत नसेल) तर त्याकडे दुर्लक्ष करावे, हा जर कोणी आपल्याला वयक्तीक येवुन आपले म्हणणे ठासुन सांगत असेल तर वेगळी गोष्ट. पण मिपा म्हणजे स्वत:चे हक्काची जागा नाहि. त्यामुळे वयक्तिक कोणावर काही आरोप केले असतील तर त्याने प्रथम बोलावे. उगाच हा जाहिरात करतो तो जाहिरात करतो हे सांगणे हे संपादकिय मंडळींचे काम आहे इतरांचे नाही. @ युयुत्सु मला असे वाटते, आपले ज्ञान आपल्या कार्यात छान आहे, आपण जी शक्ती .. वेळ येथे उत्तरे देण्यात घालवत आहात, तोच वेळ तुम्ही तुमच्या कामात घालवला तर तो सत्कारणी लागेल. या काळात एका जरी व्यक्तीसाठी तुम्ही योग्य योगदान देवु शकला तर येथे १००० रिप्लायमध्ये जे सांगताल त्या पेक्षा जास्त आनंद मिळेल असे वाटते. आपल्या बद्दल शंका नाहि... पण . ---------- असो थांबतो. मला स्वताला भविष्याबद्दल जास्त स्वारष्य नाहि.. त्यामुळे ज्योतिषाच्या धाग्यावर जास्त काथ्याकुट कधीच करत नाहि मी.. पण मला चांगले माहित आहे की वेळ्प्रसंगी मी स्वताही ज्योतिषाचा सहारा घेतला आहे. त्यामुळे कुठल्या गोष्टींकडे किती कधी आणि का लक्ष द्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments

मला स्वताला भविष्याबद्दल

धन्या
Tue, 08/09/2011 - 16:50 नवीन
मला स्वताला भविष्याबद्दल जास्त स्वारष्य नाहि.. त्यामुळे ज्योतिषाच्या धाग्यावर जास्त काथ्याकुट कधीच करत नाहि मी.. पण मला चांगले माहित आहे की वेळ्प्रसंगी मी स्वताही ज्योतिषाचा सहारा घेतला आहे.
गणेशाभाऊ, वरच्या तीन वाक्यांमधील मधलं वाक्य काढलं की परस्परविरोधी दोन वाक्ये एका पाठोपाठ एक येतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

छान प्रतिसाद. मुद्दे पटले.

अमोल केळकर
Tue, 08/09/2011 - 16:51 नवीन
छान प्रतिसाद. मुद्दे पटले. अमोल केळकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

नाउ'ज़ द टाइम...

पंगा
Tue, 08/09/2011 - 16:54 नवीन
...फॉर ऑल गुड मेन टू कम टू द एड ऑफ देअर पार्टी? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

भिती घालणे/क्लायंट मिळवणे

चित्रा
Tue, 08/09/2011 - 19:29 नवीन
@गणेशा - युयुत्सुंची जाहिरात नक्कीच होते आहे असे वाटते. (संपादक म्हणून म्हणत नाही, सध्या सुटीवर असल्याने). लोकांना आधी भिती घालायची (अमूक पौर्णिमा अनर्थकारी आहे) आणि मग आपल्या ब्लॉगकडे बोलवायचे हा युयुत्सुंचा नेहमीचा खाक्या झाला आहे. जे अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात ते युयुत्सुंना त्यांच्या सेवेचे ग्राहक म्हणून मिळत असतील. यातून जो वैयक्तिक थेट आर्थिक फायदा त्यांना होतो आहे त्याबद्दल मिपाला कसलेही मानधन मिळत नाही किंवा युयुत्सु मिपाला ग्राहक मिळवून दिल्याचे नावापुरतेही क्रेडिट देत नाहीत. मी युयुत्सुंना जे आव्हान दिले होते त्याला उत्तर असे मिळाले http://misalpav.com/node/18744#comment-328880. यात जे तांत्रिकी कारण असल्याने माझे आव्हान ते घेत नाहीत ते नक्की काय आहे? जे सॉफ्टवेअर वापरून एवढी मोठी लिस्ट त्यांनी बनवली आहे तशी लिस्ट त्यांना मागते आहे. ती वन इन टू मेनी असली तर आत्ता दिलेली लिस्टही वन इन टू मेनी आहे. मिपाकरांचे नुसते नव्हे तर मिपाकरांच्या मित्रांचे, सुहृदांचे आणि आप्तांचे वाढदिवस त्या मोठ्याच्या मोठ्या लिस्टमध्ये आहेत. नीट पाहिले तर युयुत्सुंचे सॉफ्टवेअरच त्यांना भरपूर क्लायंट मिळवून देते आहे हे कळेल. त्यांच्या उत्तरातही काही दम नाही. त्यांच्या सॉफ्टवेअरप्रमाणे खरे तर जन्मतारखेवरून घातदिन आणि घातदिनावरून जन्मतारीख कळायला हरकत नाही. तरी युयुत्सु गंमत म्हणून हे करायला तयार आहेत आणि त्यासाठी ते आता पैसे मागत आहेत हे गंमतीचे आहे. @ युयुत्सु: >>पेशंट मेला तरउपचारांचा खर्च परत केला जातो का? आहवान स्वीकारल्यावर मला डोकंफोड करावी >>लागणार आहे. त्यांचे कॉंम्पेन्सेशन मला मिळालेच पाहिजे. हे लॉजिक कळले नाही. तुमचे 'उपचार' वैज्ञानिक आहेत किंवा काही कसोट्यांवर घासून सिद्ध झाले आहेत, रीपीटीटिव आहेत असा तुमचा दावा आहे का? आणि उत्तरासाठी डोकेफोड करण्याची काय गरज? तुमच्या प्रसिद्ध सॉफ्टवेअरमध्ये केवळ तारखा घालायच्या आणि उत्तर काढायचे एवढेच काय ते. आव्हान देणार्‍या व्यक्तीकडून पाचशे घ्यायचे याचा अर्थ त्याला ग्राहक करून घेतल्याशिवाय काही करायचे नाही. मुळात जी व्यक्ती आव्हान देते ती तुमचा ग्राहक होण्यास नकार देत असते. आधीच अशा व्यक्तीकडून पैसे काढायचे याची गंमत वाटते. इथे जाहिरात केली म्हणून आव्हानाचा प्रश्न आला. तुम्ही जाहिरात करू नका, तर आम्ही आव्हान देत नाही. इतके सगळे साधे असताना हा प्रकार म्हणजे आव्हानापासून पळून जाणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

त्यांच्या उत्तरातही काही दम

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 19:56 नवीन
त्यांच्या उत्तरातही काही दम नाही. त्यांच्या सॉफ्टवेअरप्रमाणे खरे तर जन्मतारखेवरून घातदिन आणि घातदिनावरून जन्मतारीख कळायला हरकत नाही. तरी युयुत्सु गंमत म्हणून हे करायला तयार आहेत आणि त्यासाठी ते आता पैसे मागत आहेत हे गंमतीचे आहे.
चित्रातै, तुम्ही इतकी पराकोटीची गल्लत कराल असे मला वाटले नव्हते. "समग्र ग्रंथ वाचल्यावाचून" या उक्तीची आठवण झाली. माझे सॉफ्ट्वेअर काय करते आणि काय नाही हे प्रत्यक्ष न बघता तुम्ही ही विधाने कशी काय केलीत. तसेच एक प्रयोग मी अपवाद म्हणुन "गंमत" म्हणून स्वीकारायला तयार आहे पण अनेक प्रयोग/आह्वाने मी फुकट स्वीकारावीत हे सध्या तरी मला शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

मुद्द्याचे

चित्रा
Tue, 08/09/2011 - 20:11 नवीन
सॉफ्टवेअर नसल्यावर तुम्ही भविष्य वर्तवूच शकणार नाही हे तुम्हीच मान्य केले आहे. http://www.misalpav.com/node/18744#comment-329035
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

चित्रा जी, प्रथमता आपण संपादक

गणेशा
Tue, 08/09/2011 - 20:04 नवीन
चित्रा जी, प्रथमता आपण संपादक मंडळात आहात हे माहित नव्हते( ऐकुन छान वाटले.) दूसरी गोष्ट माझे हे म्हणणे नाहियेच की ते जाहिरात करत नाहि. त्यांना संपादक मंडळ का उत्तर देत नाहि ते कळत नाही त्यामुळे मग असे वयक्तीक रोश.. रिप्लाय येत राहतात आणि मग संपुर्ण मिपा जे एकदम छान लिखानानी सजलले असते ते असल्या धाग्यात आरोप गृप यांच्या मागे लागते. बाकी मला एव्हडेच म्हनावयाचे होते. तुम्हाला व्यक्ती आवडत नाहि किंवा त्यांनी चालवलेल्या कृती तर तुम्ही त्या व्यक्तीस तसे बोला पण त्याच्या ज्ञानावर, अभ्यासावर, भले सॉफ्टवेअर असो नाहि तर काही पण पध्दतीवर विनाकारण बोलु नये. माझ्या मते व्यक्तीला शिव्या दिल्या तरी चालतात पण त्याच्या कार्यावर किंवा कलेवर्(कलाकार असला तर) आघात केला तर ती व्यक्ती कधीच शांत बसत नाहि. आपण सर्वांनी मिपाच्या सिमामध्ये राहावे हिच इच्छा होती. वयक्तीक माझे मत ( मुद्दामुन लिहितो नाहि तर विनाकारण गृपबाजी बोलतात म्हणुन स्पष्ट लिहितो) हे आहे की, युयुत्सु यांनी असे धागे टाकलेले मला अजिबात आवडत नाहि.. मी शक्यतो त्या धाग्यांवर जात नाहि आणि गेलो तरी विशेष काही लिहित नाहि.. पण संपादक मंडळ काही म्हणत नाहि तर आपण वयक्तीक लेवल ला जावुन का बोलायचे. जर आपल्याला नाहि आवडले तर तसे व्यव्स्थीत संपादक मंडळाला सांगावे. असे नसेन तर उद्या कोन्ही उठेल आणि काहि म्हणेन. (कृपया मला हे म्हणाय्चे नाहि मी खालील थ्रेड चा नियमित वाचक आहे) एखादा म्हणेन कलादालनात कायम स्वताच्या बागेतलेच फोटो देणारे धागे बंद करा. एखादा म्हणेन शेतकर्‍यांचे प्रश्न घेवुन उगाच सारखे तेच तेच लिहुन स्वताचे मत मांडणे बंद व्हावे. एखादा उठुन बोलेन रोज हा अमुक का कविता टाकतो. हे प्रश्न सांपादक मंडळाकडुन सोडवले नाहि गेले तर वातावरण खराब होते आहे. असो कोणीही माझे रिप्लाय वयक्तीक घेवु नये. आणि हा धनासाहेब. त्या ३ ओळीनंतरची चौथी ओळ पण वाचा की त्याबरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

गणेशा

चित्रा
Tue, 08/09/2011 - 20:51 नवीन
प्रथम अनेक धन्यवाद, कारण तुम्ही इथे स्पष्ट आणि खरेखुरे मनापासून आलेले लिहीले. तुमच्याप्रमाणेच मलाही या धाग्यांवर येण्याचा उत्साह नसतो. पण युयुत्सु यांनी टाकलेली मोठी लिस्ट बघून राहवले नाही. एक स्पष्टीकरण देते - ग्रहतारे यांचा अभ्यास, अगदी हवेतर जन्मवेळेचा आकाशस्थ ग्रहांचा नकाशा मांडणे चुकीचे आहे असे मी समजत नाही. माझे मत यापुढच्या फलज्योतिषासंबंधी आहे.कुंडलीत अमूक ठिकाणी हा ग्रह असला म्हणजे अमूक एक फळ मिळते असे समज लोकांमध्ये असतात. यामुळे अनेकांची लग्ने मोडली आहेत. अनेक मुलींना मंगळाच्या मुली म्हणून आयुष्यभर मन मारून लग्न न करता राहावे लागले असेल. अनेक तरुणांचे थोराड पुरुष होईपर्यंत विवाह झालेले नाहीत. आणि कुठचीतरी शांत केली की असे ग्रह सुधारतात, वेडावाकडा प्रभाव टाकत नाहीत असे समज आयुष्यभर धरून आपण किती खुजे आयुष्य जगत राहतो. किती ठिकाणी स्वतःला बंदिस्त करून घेत असतो. हे सर्व लक्षात घेतले तर कळेल ही कला महत्वाची नाही.कुंडली मांडण्याइतपतच मदत घेतली तर वेगळे आहे, पण पुढचे फळ सांगून आपण मुले जन्मल्यापासून त्यांना कुठच्यातरी दूरस्थ ग्रहांच्या विळख्यात अडकवून टाकतो, त्यांचे आयुष्य खुलण्याआधीच भितीने दाबून टाकतो. युयुत्सुंच्या कलेचा उपयोग अमूक तारीक किती सुखाची आहे हे सांगायला ते कधी का करत नाहीत असा विचार करून पहा. ते असे करत नाहीत याचे कारणभितीपोटी ग्राहक मिळतात. सुखात असताना कसले आले आहेत ग्राहक?* (*नंतर जोडलेली टीपः युयुत्सु यांनी शुभकारी अमावस्येबद्दलही लिहीले आहे. पण तेथे त्यांना ग्राहक मिळवण्यासाठी थेट लिहावे लागलेले आहे. http://misalpav.com/node/15999 येथे "पैकी कुणाला जन्मपत्रिकेचे एबर्टिनप्रणित तंत्राने विष्लेषण करून हवे असेल तर माझ्याशी ई-मेल (**)वर संपर्क साधावा. हे विश्लेषण फक्त इंग्लिश मध्ये पुढील काही दिवस माझ्या ब्लॉगच्या वाचकाना नि:शुल्क करून मिळेल. काही विशिष्ट समस्यांसाठी मार्गदर्शन हवे असल्यास त्यासाठी शुल्क भरावे लागेल." असे म्हटलेले दिसले. ) तुम्ही जे काही म्हटले आहे - उदा. बागेतले फोटो, कविता, या सर्व कला, एक्स्प्रेशन आहेत. त्या मनाला आनंद देतात, आपली जगाकडे बघण्याची बुद्धी विकसित करतात. त्यातून जाहिरात झाली तरी म्हणूनच मिपावरील कोणी फारसा आक्षेप घेतलेला दिसणार नाही. युयुत्सु यांच्या या लेखांना कलेचा आविष्कार म्हणवत नाही. ते कधी आकाशस्थ ग्रहांचा नकाशा कसा तयार करायचा यावरून लेख टाकतात का? त्यांची खरी कला तेव्हा दिसेल जेव्हा ते काही शिकवतील, नुसतीच भिती घालणार नाहीत. सॉफ्टवेअरबद्दल लिहीले कारण ते जे न्यूरल नेटवर्क वगैरे लिहीत आहेत ते लोकांना आकर्षित करून घेण्याचे उद्योग आहेत. न्यूरल नेटवर्क हे या फलज्योतिषासाठी कसे वापरतात, कसले ऑप्टिमायजेशन करतात हे सगळे त्यांनी जरूर सांगावे, तर त्यांची ही कला आहे हे मी मान्य करेन. असो. बाकी मी अधिक लिहीत नाही. मला वातावरण गढूळ करण्याची इच्छा नाही. गैरसमज नका करून घेऊ. आणि तुम्ही-मी म्हटले म्हणून युयुत्सु लेख लिहायचे थांबवणार आहेत का? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

अनुमोदन - जाहिरात आहे

धनंजय
Tue, 08/09/2011 - 22:14 नवीन
सदस्य युयुत्सु यांच्याकडून जाहिरात होते आहे, आणि मिसळपावावर होऊ नये याबाबत अनुमोदन. वरील मुद्द्यांबाबत चित्रा यांचे समर्थन करतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

सामना हरणार हो आता....

वपाडाव
Tue, 08/09/2011 - 17:08 नवीन
आज युयुत्सुंची हालत १७५(१५४) चेंडुत अशी काहीशी होणार असं दिस्तंय.... पण तरीही सामना ऑसीच जिंकतील... काय म्हंता ??? वाकडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.....
  • Log in or register to post comments

व्हॉल्युम कम कर पप्पा जग जायेगा!!

सहज
Tue, 08/09/2011 - 17:21 नवीन
नेहमीचेच गाणे आज जोरात आहे इतकेच मोहे आयी न जग की लाज मै इतना जोरसे नाची आज के घुंगरु टूट गये! http://youtu.be/nx-8lLwrqSY
  • Log in or register to post comments

सहजराव, पायात घुंगरू नाहीच

धन्या
Tue, 08/09/2011 - 17:29 नवीन
सहजराव, पायात घुंगरू नाहीच आहेत. मैं नाचू बिन पायल घुंघरू टूट गये तो क्या? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अरे रे !

परिकथेतील राजकुमार
Tue, 08/09/2011 - 17:50 नवीन
युयुत्सुंना कॉर्नर करण्याचा प्रयत्न ! निषेध !! युयुत्सु काका 'कुणी वंदा कुणी निंदा....' असे म्हणत तुम्ही तुमचे कार्य चालु ठेवा बरे. उगाच शब्दानी शब्द कशाला वाढवायचा ? तुम्ही सगळ्यांचे एकाचवेळी समाधान करु शकणार नाही हे तर सत्य आहे ना ? मग कशाला विनाकारण वादाल वाद वाढवायचा ? एकदा सष्ट शब्दात सांगायचे. लोक पटवून घेतील नाहीतर तुमच्या सामर्थ्याची टिंगल तरी करतील. जे टिंगल करतील त्यांना करु द्या. योग्य वेळेची वाट बघा :)
  • Log in or register to post comments

परा, तुमचा प्रतिसाद आवडला. पण

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 18:00 नवीन
परा, तुमचा प्रतिसाद आवडला. पण काय आहे की आह्वान देण ही एक गंभीर गोष्ट असा वी असं मला वाटतं. उगीच कुणिही बेछुट आरोप करावेत हे मला मान्य नाही. मला मात्र ही चर्चा ऐतिहासिक ठरेल असे मला वाटते
  • Log in or register to post comments

परा, तुमचा प्रतिसाद

परिकथेतील राजकुमार
Tue, 08/09/2011 - 18:20 नवीन
परा, तुमचा प्रतिसाद आवडला.
धन्यवाद :)
पण काय आहे की आह्वान देण ही एक गंभीर गोष्ट असा वी असं मला वाटतं. उगीच कुणिही बेछुट आरोप करावेत हे मला मान्य नाही.
कुठल्या गोष्टीला आव्हान मानायचे आणि कुठल्याला आरोप हे शेवटी आपल्यावरच नसते का? एकदा का चर्चा वैयक्तिक पातळीवर घसरली की मग धाग्याचा खप आणि जुने स्कोर सेटल करण्याचे नंदनवन ह्याशिवाय तुमच्या हातात काही पडणार नाही. मुळात तुम्ही तुमचे अभ्यासू मत / भविष्य हे जे इथे मांडता ते त्या गोष्टीवर अथवा तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवणार्‍यांसाठी असते. त्यातून त्यांचा काही फायदा व्हावा आणि त्यांनी तुमच्याशी संपर्क साधुन अजुन काही मदत मागीतल्यास तुमचा आर्थिक फायदा व्हावा असे साधे सोपे गणित ह्यामागे आहे. असे असताना आव्हान किंवा आरोप आलेच कुठे मध्ये ? क्षणभर आपण तुम्हाला दुकानदार आणि तुमच्या भविष्याला वस्तु समजु. अशावेळी ह्याला वस्तुची किंमत, उपयोग, सामर्थ्य, फायदा इ. पटले तो पुन्हा पुन्हा येणार आणि इतरांना देखील सांगणार. तुम्हाला त्रास करुन घ्यायची गरजच नाहीये. आणि ज्यांना ह्या वस्तुच्या विषयी विश्वासच नाहीये त्यांच्याशी वाद घालुन उपयोगच नाहीये. ना तुमचा काही फायदा आहे ना त्यांचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

परा, तुमचा प्रतिसाद आवडला. पण

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 18:00 नवीन
परा, तुमचा प्रतिसाद आवडला. पण काय आहे की आह्वान देण ही एक गंभीर गोष्ट असा वी असं मला वाटतं. उगीच कुणिही बेछुट आरोप करावेत हे मला मान्य नाही. मला मात्र ही चर्चा ऐतिहासिक ठरेल असे वाटते
  • Log in or register to post comments

तुमचं '' हे'' आव्हान हींमत

अत्रुप्त आत्मा
Tue, 08/09/2011 - 18:26 नवीन
तुमचं '' हे'' आव्हान हींमत असेल तर महाराष्ट्र अंधःश्रद्धा निर्मूलन समितीला तुंम्हीच द्या...आणी वरील काही प्रतिक्रीयांमधील तुमच्या म्हणण्या प्रमाणे अंनीसनी हे आव्हान जगातल्या सगळ्या ज्योतिषांना ऑल रेडी देउनच ठेवलेलं आहे...तेंव्हा त्यांनी तुंम्हाला आव्हानाचा सामुदाईक नारळ कधीच देउन ठेवलाय...तेंव्हा आता तुमचीच जबाबदारी आहे,तिकडं जाण्याची.उगीच आमची अक्क्ल काढायच्या फंदात पडू नका. किंवा आपल्या मिपाचेच १ सदस्य श्री.प्रकाश घाटपांडे यांच्या ब्लॉगवर जा. म्हणजे कळेल तुंम्ही कशाचं समर्थन करताय ते. किंवा नरेंद्र दाभोलकरांचं श्रद्धा/अंधःश्रध्दा हे पुस्तक वाचा... '' आह्वानकर्त्याना बर्‍याच वेळेस आपण दिलेले देत असलेले आह्वान "योग्य" आहे की हे कळायची पण अक्कल नसते असे लक्षात आले आहे. तेव्हा अशी आह्वाने एका स्वतंत्र समितीकडून तपासण्यात यावीत. या समितीत ज्योतिषी आणि ज्योतिषनिंदक यांचा समसमान सहभाग असावा. ही समिती आह्वानांची योग्यता ठरविण्यासाठी काही कसोट्या निश्चित करेल. अशा समितीने आहवान योग्य असल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्यावरच ते आह्वान मी माझ्या अभ्यासाच्या कक्षेत येत असेल तर ते मी स्वीकारेन''...इती युयुत्सु... आंम्ही आव्हान करते आहोतच,पण करवीते तुंम्हीच आहात हे नीट लक्षात ठेवा.आणी आधी तुंम्ही भविष्य म्हणून जी जी माण्डणी करताय, ती बेअक्कल आहे हे लक्षात घ्या. आणी तुंम्हाला आव्हान देणाय्रा समीतीत तुमचे लोक कशाला? हे म्हणजे गुन्हे नियंत्रण समीतीत न्यायालयानी कलम ठरवायला चोरांना सहभागी करुन घेण्यासारखं आहे...जो बिनधास्त आव्हान स्वीकारणारा असेल तो असली कुडमुडी भाषा वापरणार नाही...बाकी तुमच्या अभ्यासाच्या क्क्षेत आंम्ही तुंम्हाला आव्हान आणुन द्यायच...म्हनजे शत्रूला तुंम्ही रनगाड्याचे गोळे माझ्या जवळ द्या,आणी मला मारून दाखवा म्हणण्या सारखच आहे... तुंम्ही जी जी भाकीतं वर्तवता ती खरी येण्यामागे फक्त एकच कारण आहे.लॉ ओफ प्रोबीब्लीटी...संभाव्यता शास्त्र...किंबहुना जे खरं होण्याचे जास्तीत जास्त चानसेस आहेत अश्याच गोष्टी तुंम्ही ज्योतिष शास्त्राच्या नावाखाली सांगत असता,,,त्यात तुमच्या शास्त्राची कर्तबगारी ''चलाख भाषा'' या पलीकडे काहीही नाही... आणी सर्वात महत्वाचं ---तुमच्या इच्छेप्रमाणे मी शाम मानव यांच्याशी अताच बोललो आहे...१५ तारखे नंतर ते पुण्यात येणार आहेत...तेंव्हा तुंम्ही आव्हान स्वीकारणार कुठे ती जागा याच धाग्यावर मला कळवा...
  • Log in or register to post comments

पराग दिवेकर यांस आह्वान कोण

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 19:01 नवीन
पराग दिवेकर यांस आह्वान कोण कोणाला देतय याची तुम्ही बरीच गल्लत केली आहे. त्यामुळे तुमच्या प्रतिसादाला उत्तर द्यायचे की नाही असा प्रश्न पडला आहे. अंनिस च्या कुणाची सावली पण मी स्वत:च्या अंगावर पडू देणार नाही. ते लोक चर्चा किती "मोकळेपणाने" करतात हे काही वर्षांपूर्वी याची देही याची डोळा अनुभवले आहे. तेव्हा गरज असेल तर ते माझ्याकडे येतील मी त्यांच्या कडे कशाला जाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अंनीसच्या कुणाची सावलीपण....

अत्रुप्त आत्मा
Tue, 08/09/2011 - 21:43 नवीन
यालाच म्हणतात पळकाढू...असो...ठीक आहे माझी गल्लत झाली...तुमचा मोबॉईल क्रमांक व्यनी करा.आंम्हीच तुमच्या पर्यंत येऊ...का हेही तुमच्या शास्त्रात बसत नाही तेही कळवा...म्हणजे विषयच मिटेल...बाकी मोबॉईल क्रमांक द्यायच आव्हान स्वीकाराल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

मोबाईल देउ शकत नाही. पण इमेल

युयुत्सु
Wed, 08/10/2011 - 08:51 नवीन
मोबाईल देउ शकत नाही. पण इमेल देउन ठेवतो... म्हणजे सर्व नोंदी व्यवस्थित राहतील. इमेल upadhye.rajeev@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मी ५०० रू देऊन एका जन्म

आत्मशून्य
Tue, 08/09/2011 - 19:02 नवीन
मी ५०० रू देऊन एका जन्म तारखेबाबत आव्हान द्यायला तयार आहे पण जर त्याबाबत भूतकाळ व भविष्य व इतर माहीती अचूक वर्तवण्यात चूक झाली तर ०) मी कोणत्याही परीस्थीती आपल्याला दीलेली ५०० रूपये वर्गणी परत मागणार नाही. १) मला झालेल्या मनस्तापाबद्दल रू ७०० भूर्दंड भरावा लागेल . २) यापूढे सदरील शास्त्र (ज्याचा काही आपण अभ्यास करता ते) याचा कधीही व्यावसायीक उपयोग न करण्याची कायदेशीर शपथ घ्यावी लागेल, व या शास्त्राच्या अभ्यासातून निर्माण होणार्‍या सर्व भौतीक लाभांवर पाणी सोडावे लागेल.( पटत असेल तर सदरील गोश्ट कायदेशीर व्याख्येत बसवूया नीम्या नीम्या खर्चाने) ३) रूपये ८०,००० फक्त एखाद्या समाजसेवी संस्थेला बेनामी दान करावे लागतील (शक्य नसल्यास हे दान मिसळपाव.कॉम नावाने करावे लागेल). व संस्था कोनती असावी याबाबत मान्यवरांचे विचार व कौल याद्वारे निर्णय घेण्यात येइल.
  • Log in or register to post comments

मन:स्ताप झाला तर डॉक्टर पैसे

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 19:10 नवीन
मन:स्ताप झाला तर डॉक्टर पैसे परत देतो का? जो पर्यंत वैद्यकीय व्यावसायिक असे पैसे परत देत नाहीत तोपर्यंत असे मी प्रॉमिस मी पण देउ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

डॉक्टर नाटक्या असेल, तर

आत्मशून्य
Tue, 08/09/2011 - 19:21 नवीन
डॉक्टर नाटक्या असेल, तर त्याला अद्दल घडवायची जाब विचारायची व नूकसान भरपाइ मागायची सोय कायद्यात आहे. तूम्ही कोण ? कायाद्यासमोर सगळे समान, विसरू नका, तूमच्या कोणत्याही घटनाबाह्य अटी मी स्विकारणार नाही. कायद्यचा/न्यायालयाचा मान ठेवा. जर तूम्ही मला मनस्ताप दीला नाहीत तर तूम्हाला मिळालेल्या पैशाला (रू ५००) टॅक्स व्यतीरीक्त आरकीमीडीजचा बापही हात लावू शकणार नाही. निश्चींत रहा, पण जर कोणी तूम्हाला रू ५०० देऊन विकतच दूखण दारी आणेल अशी अपेक्शा ठेवत असाल तर तूम्ही नक्किच चूकताय. याला आव्हान न्हवे स्वार्थीपणा म्हणतात. तूम्ही डोक्टरच काय डेंटीस्टही वा कंपाऊंडरही म्हणू शकणार नाही असे आव्हान देत बसलात तर....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

हे बघा आत्मशून्य, तुम्ही

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 19:44 नवीन
हे बघा आत्मशून्य, तुम्ही घटनेच्या चवकटीची गोष्ट काढलीत म्हणुन सांगतो. तुमच्या घटनाबाह्य अटी मी मान्य कराव्यात असे तुम्हाला कसे वाटते. वर अनेक जणानी मला क्लिनिकल ट्रायलचे उदाहरण दिले. अशा ट्रायल मध्ये तुम्ही भाग घेतला आणि तुम्हाला मनस्ताप किंवा इतर त्रास झाला तर कोणतीही भरपाई (माझ्या माहिती प्रमाणे मिळत नाही). तुम्हाला ज्योतिषाची ट्रायल तर घ्यायची आणि मनस्ताप स्वीकारायची तयारी नाही हे कसे काय ते कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

क्लिनीकल ट्रायल....

आत्मशून्य
Tue, 08/09/2011 - 19:56 नवीन
ते ऊदाहरण मी दिले आहे का ? अथवा माझ्या प्रमाणे वरील अनेक जणांनी तूमच्या मूळ अटी न मोडता आव्हान दीले आहे का ? मग त्यांची उदाहरणे माझ्यावर का लादताय ? यूयूत्सूराव एक मीपाकर म्हणून आपल्यामधे जो बंध आहे त्याचा मान राखून मी तूम्हाला रू २०० ची रोख सवलत देतो. जर मला मनस्ताप झाला तर मी केवळ रू५००चे परत घेइन पण इतर कोणत्याही अटी आता बदलायला लावू नका. मी तूमच्या मूळ अटी कोठेही मोडल्या नसताना तूम्ही माझ्या पण तूमच्या अटींना पूरक अशा अटीमधे दूरूस्ती कशाला दाखवत आहात ? तूम्हाला भिती वाटते काय की खोटे ठराल म्हणून ? तसं असेल तर स्पश्ट बोला, मी अटी घालतोय कारण मला शंका आहेत की मी देलेले आव्हान मला जिंकता येइल की नाही याबाबत. पण तूमचं तर तसं नाहीये ना? तूम्ही इतक्या वर्षांचे अभ्यासक आहात स्वतःवर ठाम आहात मग आव्हानातील उसन अवसान आता आत्मविश्वासामधे बदललेले दीसून यासाठी प्राणांची बाजी देखील लावायला बिंधास्त तयार व्हा हो..... कूठे घटनाबाह्यता वगैरे तपासायचा भित्रेपणा दाखवताय ? तूमच्या माझ्यात तेव्हडा तरे फरक ठेवा की राव ? जर तूम्ही जिंकणारच आहात तर हारल्यानंतर मी मसणात जाइन असे सूध्दा कबूल करायला फार फरक पडतो काय ? बघा बूवा ... तिन्हीलोक आव्हानाने भरून जाऊदेत तूमचे भविष्य खरे ठर्ण्यासाठी कसोटी होऊ दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

आत्मशून्य, तुमच्या या

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 20:03 नवीन
आत्मशून्य, तुमच्या या मुद्द्यांना मी उद्या उत्तरे देईन. आता फॅमिली टाईम चालू झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

बास झालं बालीश कारण देऊन पळ

आत्मशून्य
Wed, 08/10/2011 - 10:16 नवीन
बास झालं बालीश कारण देऊन पळ काढणं, आता रिंगणात उतरा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

बास झालं बालीश कारण देऊन पळ

युयुत्सु
Wed, 08/10/2011 - 10:40 नवीन
बास झालं बालीश कारण देऊन पळ काढणं, आता रिंगणात उतरा...
जी व्यक्ती माझ्या वैयक्तिक प्राधान्यक्रमाचा आदर ठेवू शकत नाही, त्या व्यक्तीचे आह्वान मी का स्वीकारावे असा संभ्रम माझ्या मनात निर्माण झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

हे पार्था मायेच्या पाशातून

आत्मशून्य
Wed, 08/10/2011 - 10:47 नवीन
हे पार्था मायेच्या पाशातून स्वतःला मूक्त कर आणी कर्तव्याला सामोरे जा. कारण बालीश कारणांची रांग लावून मैदानातून पळ काढणे तूझ्यासारख्या नरोत्तमाला शोभत नाही. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

मी गीता मानत नाही

युयुत्सु
Wed, 08/10/2011 - 11:12 नवीन
मी गीता मानत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

मग तूमच्या मिपा प्रोफाइलमधे

आत्मशून्य
Wed, 08/10/2011 - 11:22 नवीन
मग तूमच्या मिपा प्रोफाइलमधे पूढील ओळी चिकटवायचे काय प्रयोजन ? नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः| मूढोयंनाभिजानाति लोकः मामजमव्ययम् || भ. गी. योगमायेने वेढला असल्यामुळे माझे खरे स्वरुप कुणालाच सहसा कळत नाही. मी जन्म घेत नाही आणि नाश ही पावत नाही हे मूर्ख लोकाना हे समजत नाही. ________ आता लगेच प्रोफाइल एडीट करून वरील ओळी बदलू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

राव तुम्ही हा गीतेचा श्लोक

धन्या
Wed, 08/10/2011 - 11:26 नवीन
राव तुम्ही हा गीतेचा श्लोक आहे एव्ह्ढंच पाहीलंत. जरा अर्थही पाहा की त्या श्लोकाचा. ... हे बेअक्कल लोक मला ओळखत नाहीत, ते मलाच जन्म मरणाला कारणीभूत समजतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

जाउदे कोणाचा दोष नाहीये २०

आत्मशून्य
Wed, 08/10/2011 - 11:33 नवीन
जाउदे कोणाचा दोष नाहीये २० अंश ३६ मि.वर होणारी ही पौर्णिमाच अत्यंत घाणेरडी आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मी गीता मानत नाही. कधीतरी

धन्या
Wed, 08/10/2011 - 11:18 नवीन
मी गीता मानत नाही.
कधीतरी थोडासा रुचीबदल म्हणून यावर एक लेख लिहू शकाल का? मोहमायेच्या पलिकडे जाऊन डो़क्याला कुठल्याही प्रकारचा शॉट लावून न घेता चिल पिल घेत आयुष्य कसं जगावं हे सांगणारी गीता आपण का मानत नाही हे जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

या पूर्वी श्रीकृष्णाची चूक

युयुत्सु
Wed, 08/10/2011 - 11:29 नवीन
या पूर्वी श्रीकृष्णाची चूक असे दोन लेख लिहीले आहेत. माझ्या ब्ल्~ओग वर ते पहावेत. अरेरे परत जाहिरात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हरकत नाही... शक्य असेल तर खरड

धन्या
Wed, 08/10/2011 - 11:40 नवीन
हरकत नाही... शक्य असेल तर खरड किंवा व्यनिमध्ये दुवा दया... मी गीता मानत नाही असे तुम्ही म्हणत असूनही तुमच्या मिपा व्यक्तिचित्रामध्ये गीतेमधील श्लोक लावला आहे त्याबद्द्ल पुढे कधीतरी आपले मत जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

मी गीता मानत नाही असे तुम्ही

आत्मशून्य
Wed, 08/10/2011 - 11:51 नवीन
मी गीता मानत नाही असे तुम्ही म्हणत असूनही तुमच्या मिपा व्यक्तिचित्रामध्ये गीतेमधील श्लोक लावला आहे त्याबद्द्ल पुढे कधीतरी आपले मत जाणून घ्यायला आवडेल.
ते सांगतील तेव्हां सागतील, पण याबाबतीत मी माझे मत सांगू का ? @ यूयूत्सू
या पूर्वी श्रीकृष्णाची चूक असे दोन लेख लिहीले आहेत. माझ्या ब्ल्~ओग वर ते पहावेत. अरेरे परत जाहिरात.
प्लीज तूमच्या ब्ल्~ओग वर श्रीकृष्णानं यूध्दाला प्रारंभ करण्यापूर्वी तूमच्या आमावस्या पोर्णीमेचा सल्ला मानला नाही असं काही तूम्ही लीहलं नसावं अशी अपेक्शा आहे, हो कारण उगाच का तूम्ही त्याने सांगीतलेला श्लोक प्रोफाइलमधे मीरवाता व वरती मी गीता मानत नाही असे छातेठोकपणे सांगाता ? बाकी असो जर त्या ब्लोगवरील कथेचा वापर करून तूमचा पैसा कमवायचा डाव असेल तर त्या ब्लोगच्या जाहीरातबाजी बद्दल तूमचा त्रीवार धीक्कार करेन. असो... वेगळा धागा काडू त्याबाबत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आत्म्शुन्यराव, जरा दमाने

धन्या
Wed, 08/10/2011 - 11:56 नवीन
आत्म्शुन्यराव, जरा दमाने घ्यावे अशी नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

हा हा हा

परिकथेतील राजकुमार
Tue, 08/09/2011 - 19:13 नवीन
फक्त एक शंका :-
यापूढे सदरील शास्त्र (ज्याचा काही आपण अभ्यास करता ते) याचा कधीही व्यावसायीक उपयोग न करण्याची कायदेशीर शपथ घ्यावी लागेल, व या शास्त्राच्या अभ्यासातून निर्माण होणार्‍या सर्व भौतीक लाभांवर पाणी सोडावे लागेल.( पटत असेल तर सदरील गोश्ट कायदेशीर व्याख्येत बसवूया नीम्या नीम्या खर्चाने)
हे सर्व वेधशाळेच्या बाबतीत देखील लागू केले तर ? ;) त्यांचे तर सगळेच अंदाज / आडाखे कायम चुकतच असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

युयुत्सु यांस

तिमा
Tue, 08/09/2011 - 19:15 नवीन
ज्योतिष, नाडीशास्त्र ह्या विषयांवर कुणी आव्हान देऊ नये व कुणी घेऊ नये असे माझे मत आहे. ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आलेले असतात ते विश्वास ठेवतात, बाकीचे ठेवत नाहीत. या देशात लोकशाही आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आणि मिपासारख्या सुजाण सदस्यांच्या संस्थळावर हे घडू नये असे वाटते. कारण तात्विक वादावरुन वैयक्तिक पातळीवर येणे म्हणजे आपण सर्वांनीच आपल्या आवडत्या मिपाची पातळी खाली आणण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

+१

शुचि
Tue, 08/09/2011 - 19:21 नवीन
सुंदर प्रतिसाद. ________________ पण सर्वांनाचह तसं वाटत नाही. स्वतःचं मत दुसर्‍यावर थोपलं नाही तर जग कसं चालणार? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

सहमत... हा धागा तात्विक

धन्या
Tue, 08/09/2011 - 19:25 नवीन
सहमत... हा धागा तात्विक वादावरुन वैयक्तिक पातळीवर येतोय हे लक्षात येताच तसे दोन्ही बाजूंच्या निदर्शनास आणून आम्ही वाचनमात्र झालो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

ज्योतिष, नाडीशास्त्र ह्या

आत्मशून्य
Tue, 08/09/2011 - 19:27 नवीन
ज्योतिष, नाडीशास्त्र ह्या विषयांवर कुणी आव्हान देऊ नये व कुणी घेऊ नये असे माझे मत आहे
अत्यंत चूकीच मत वाटतयं. कारण हा एखद्या व्यक्तीच्या अधीकाराचा न्हवे तर एखाद्या शास्त्राच्या अचूकतेचा मामला आहे. इथे यूयूत्सूच्यां जागी बराक ओबामा जरी असते तरी आव्हान असेच दीले पाहीजे. कारण ही व्यक्तीच्या वैयक्तीक नैपूण्याची कसोटी न्हवे की ज्यामधे एखादा तेंडूलकर निपजावा तर एखादा रोहन गावस्कर.... हे जर खरचं शास्त्र आहे तर इथे यूयूत्सू असो वा शिल्पा शिरोडकर... शास्त्रातून प्रेडीक्षन हे अचूकच येणार असले पाहीजे. ज्याचा त्याचा अनूभव हे गोश्ट शास्त्राला/विज्ञानाला लागू पडत नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

तिरशिंगराव... नाडी नको

शाहिर
Tue, 08/09/2011 - 19:31 नवीन
नाडी मध्ये पाय गुंतवू नका !! अवघड जागा आहे ती मि पा वरची ..धागा हजारी होइल .. नाडी समर्थक विरोधक गरळ "ओका" यला सुरुवात करतिल.. युयुत्सु चा आव्हान / प्रति आव्हान सम्पु दे ..मग नाडी ला हात घालू ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा