✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ज्योतिष - आह्वानकर्त्यांना एक निवेदन

य
युयुत्सु यांनी
Tue, 08/09/2011 - 13:54  ·  लेख
लेख
एक निवेदन मला मिसळपाव वर वारंवार आह्वाने देण्यात येतात आणि मी ती स्वीकारत नाही अशी पण तक्रार सारखी ऐकायला मिळते. म्हणून मी आह्वाने स्वीकारायचे ठरवले आहे. परंतु ते काही सुटसुटीत अटींच्या चौकटीत बसत असेल तरच... - आह्वानकर्त्याना बर्‍याच वेळेस आपण दिलेले देत असलेले आह्वान "योग्य" आहे की हे कळायची पण अक्कल नसते असे लक्षात आले आहे. तेव्हा अशी आह्वाने एका स्वतंत्र समितीकडून तपासण्यात यावीत. या समितीत ज्योतिषी आणि ज्योतिषनिंदक यांचा समसमान सहभाग असावा. ही समिती आह्वानांची योग्यता ठरविण्यासाठी काही कसोट्या निश्चित करेल. अशा समितीने आहवान योग्य असल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्यावरच ते आह्वान मी माझ्या अभ्यासाच्या कक्षेत येत असेल तर ते मी स्वीकारेन - मी आह्वान स्वीकारल्यावर मला प्रत्येक जन्मतारखेसाठी रू, ५००/ (रु पाचशे) एवढे आह्वानशुल्क माझ्या बॅंकेत जमा करावेत. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.या शुल्कावर योग्य तो कर भरायची माझी तयारी आहे. समितीच्या सदस्यांच्या मानधनाची व्यवस्था आह्वानकर्त्याने करावी. - दिलेल्या आह्वानातिल विदा संगणकावर जमा करण्याची व्यवस्था आह्वानकर्त्याने करायची आहे - आह्वानांतर्गत विश्लेषणासाठी लागणारी सर्व गणनसाधने आह्वानकर्त्याने उपलब्ध करून द्यायची आहेत. - समितीचे सर्व कामकाज उघड असावे. त्यांची इंटरनेटवरील एखाद्या ब्लॉगवर यथाकाल नोंद व्हावी, जेणे करून कोणती आह्वाने योग्य आहेत कोणती स्वीकारली गेली आहेत ते जनतेला समजेल. या माझ्या मूलभूत अटी आहेत. गरज पडल्यास यांना पुरवणी-अटी जोड्ण्यात येतील.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25454 वाचन

💬 प्रतिसाद (114)

प्रतिक्रिया

हम्म

सुनील
Tue, 08/09/2011 - 14:15 नवीन
निकष साधारणतः असे - तुम्हाला व्यक्तीची जन्मतातीख्, जन्मवेळ आणि ठिकाण सांगितले जाईल. त्यावरून तुम्हाला पुढील बाबी सांगायच्या आहेत - १) सदर व्यक्ती स्त्री आहे का पुरुष २) सदर व्य्क्ती जिवंत आहे का मृत ३) सदर व्यक्ती अविवाहित आहे/होती का विवाहीत ४) सदर व्यक्तीस स्वतःची अपत्ये होती का नाही ५) ..... (इतरांनी यादीत भर टाकावी. किमान १० प्रश्न तरी व्हावेत) असे १० व्यक्तींबाबत करावे. थोडक्यात एकूण १०० प्रश्न (१० x १०). त्यावरून यशाची टक्केवारी काढता येईल.
  • Log in or register to post comments

त्या यशाच्या टक्केवारीवरून

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 14:56 नवीन
त्या यशाच्या टक्केवारीवरून तुम्ही काय ठरवणार?
  • Log in or register to post comments

बरोबर आहे.. ज्यांच्या बाबतीत

गणपा
Tue, 08/09/2011 - 15:06 नवीन
बरोबर आहे.. ज्यांच्या बाबतीत अंदाज चुकतील त्यांचे पैसे बुडायचेच. पण ज्यांच्या बाबतीत अंदाज बरोबर येतील त्यांना समाधान मिळेल की जोतिष्य हे थोतांड नव्हे.... पण तुम्हाला काय मिळणार सुनिलकाका? बुडीतखात्यावाल्यांच बहुतेक त्या लिष्ट मध्ये नाव आलं असेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

दहापैकी पाच वा जास्त उत्तरे चुकली तर पेनल्टी म्हणून किती परत?

सुधीर काळे
Tue, 08/09/2011 - 19:06 नवीन
दहापैकी पाच किंवा जास्त उत्तरे चुकली तर पेनल्टी म्हणून ५०,००० रु. परत दिले पाहिजेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

आव्हान शुल्क वगैरे मान्य आहे

विजुभाऊ
Wed, 08/10/2011 - 12:09 नवीन
आव्हान शुल्क वगैरे मान्य आहे मात्र जर अंदाज चुकले तर काय या बद्दल कोणीच काही बोलत नाही. अंदाज बरोबर आले तर विचारणाराने भविष्य वगैरे शास्त्र आहे यावर विष्वास बसेल मात्र अंदाज चुकले तर भविष्य सांगणारा हा व्यवसाय सोडून देईल आणि भविष्य सांगणे वगैरे निव्वळ थोताम्ड असते असे चार जणांना सांगेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

व्यवसाय सोडणे वगैरेची जरुर

गवि
Wed, 08/10/2011 - 12:13 नवीन
व्यवसाय सोडणे वगैरेची जरुर वाटत नाही. निदान काय ते स्पष्ट होण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले जाईल हेसुद्धा थोडे नाही. त्या निकालातून येणारे तथ्य पाहून लोकच ठरवतील काय मानायचे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

गवि,

आत्मशून्य
Wed, 08/10/2011 - 12:39 नवीन
हे आव्हांन लोकांनी दीले असल्याने ते स्विकारणार्‍या व्यक्तीला जर ते झेपलं नाही तर पेनल्टीची सोय असलीच पाहीजे. आव्हान स्विकारणार्‍या व्यक्तीच्या कश्टाचा योग्य मोबदला देऊ पण त्याबरोबरच सदरील व्यक्तीवरही कोणते तरी दडपण आवश्यक आहे नाही तर सदरील आव्हान स्विकारत बसणे व पैसे कमवणे हा पोरकटपणाचा खेळ बनेल. खरे तर एखादी गोश्ट आव्हान असेल तर आर्थीक लाभ हा केवळ जिंकणार्‍याच्या बाजूने असावा , हारणार्‍याने स्पर्धा केल्याबद्दल पैसा मीळावा अशी अवास्तव मागणी ठेऊ नये .
त्या निकालातून येणारे तथ्य पाहून लोकच ठरवतील काय मानायचे ते.
लोकानी आताही ठरवले आहेच काय मानायचे आहे ते मग आता यूयूत्सूनां हारण्यासाठी पैसा का द्यावा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

निव्व्ळ मूर्खपणा!

बाळकराम
Wed, 08/10/2011 - 01:36 नवीन
युयुत्सुंच्या ह्या अटींवरून असे वाटते की हे गृहस्थ काय ज्योतिष-बितिष सांगतात म्हणजे लोकांवर लई उपकार करतात! "ह्या अटी मान्य नसतील तर पुरवणी अटी आहेत" वगैरे- एकदम माजोरडी भाषा आहे!! लोक काय ह्याला सीरियसली घेत बसलेत, राव?! "यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल." हेच ज्यांचं तत्त्वज्ञान आहे त्यांच्यासाठी कशाला वेळ फुकट घालवायचा म्हणतो मी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

झाले का?

विनायक प्रभू
Tue, 08/09/2011 - 15:01 नवीन
बघा सुनील भौ निघाला की नाही तुमची अक्कल?
  • Log in or register to post comments

आह्वानशुल्क

प्रियाली
Tue, 08/09/2011 - 15:08 नवीन
योग्य ठिकाणी आह्वानशुल्क मागितलेत. इतर काही नाही तरी तुमचे बँक बॅलन्स भक्कम होईल असे माझे भाकित आहे. ;)
  • Log in or register to post comments

शुल्क

विनायक प्रभू
Tue, 08/09/2011 - 15:11 नवीन
शुल्क भरणारे बिन अकलेचे आहेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
  • Log in or register to post comments

मी आह्वान स्वीकारल्यावर मला

धन्या
Tue, 08/09/2011 - 15:14 नवीन
मी आह्वान स्वीकारल्यावर मला प्रत्येक जन्मतारखेसाठी रू, ५००/ (रु पाचशे) एवढे आह्वानशुल्क माझ्या बॅंकेत जमा करावेत. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
हेच वदवून घेण्यासाठी देवा, केला अट्टाहास :) बाकी आम्ही अंमळ वायझेडच असल्यामुळे आपण दिलेले देत असलेले आह्वान "योग्य" आहे की हे कळायची पण आम्हाला अक्कल नाही. त्यामुळे आम्ही इथेच थांबतो. तेव्हढं आमच्या कमिशनचं बघा. नाही म्हणायला यात आम्हीही तुम्हाला विरोध करुन का होईना पण मदतच केली आहे. ;)
  • Log in or register to post comments

त्यामुळे आम्ही इथेच

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 15:22 नवीन
त्यामुळे आम्ही इथेच थांबतो.
धन्यवाद
तेव्हढं आमच्या कमिशनचं बघा.
जरूर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

त्यामुळे आम्ही इथेच

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 15:23 नवीन
त्यामुळे आम्ही इथेच थांबतो.
धन्यवाद
तेव्हढं आमच्या कमिशनचं बघा.
जरूर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आव्हानशुल्क हा प्रकार विचित्र

गवि
Tue, 08/09/2011 - 15:23 नवीन
आव्हानशुल्क हा प्रकार विचित्र वाटला. ते कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही हे पण. आव्हान / टक्केवारी / उपयुक्तता वगैरे सर्व बाजूला ठेवून एक पद्धतशीर ट्रायल म्हणून पाहता येईल का? यात एकच ज्योतिषतज्ञ असून उपयोग नाही. ट्रायल अशी व्हावी की त्यात या पद्धतीची सेन्सिटिव्हिटी / स्पेसिफिसिटी / रीप्रोड्युसेबिलिटी / क्रॉस ट्रायल असे सर्व आले पाहिजे. ज्योतिषविरोधक आणि ज्योतिषसमर्थक अशा प्रकारच्या तटबंदींनी ते व्हायचे नाही. दोन वेगळे ज्योतिषी. दोन असंबंधित वेगळे मनुष्यगट (एकाच प्रमाणित संख्येइतके उदा. १०, स्त्री पुरुष एकसमान संख्येने. वयाबाबत रँडम डिस्ट्रिब्युशन पण ज्योतिष्यांना माहीत नसलेले. पूर्ण अनामिक.) -इनपुट म्हणून दिले जाणारे स्टँडर्ड पॅरामीटर्स (जन्मतारीख, वेळ, ठिकाण, अक्षांश, रेखांश आणि काही आवश्यक असल्यास ते..पण आधी ठरवून घेतलेले आणि निश्चित फॉर्मॅटमधे) -आउटपुट म्हणून ज्योतिष्यांकडून येणारे स्टँडर्ड पॅरामीटर्स (मृत्यूचे स्टेटस, विवाहित स्टेटस (हे जन्मतारखेवरुन बर्‍यापैकी ओळखण्यासारखे असते, चाळिशीपुढेही अविवाहित राहणे दुर्मिळ आहे. त्यामुळे वेगळा पॅरामीटर घेता येईल..), नोकरी धंद्याविषयी माहिती, परदेशगमन, शारिरिक स्वास्थ्याविषयी इतिहास आणि स्थिती इत्यादि.. ठरवून घेतलेले) दहा जणांचा एक गट एका ज्योतिष्याकडून तपासला जाईल. मग तोच गट दुसर्‍या ज्योतिष्याकडून तपासला जाईल. यापैकी निम्मे (पाच) लोक प्रत्येक गटातून फॉल्स पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह टाळण्या/तपासण्यासाठी आपली जन्मतारीख चुकीची देतील किंवा एकमेकांची देतील. खरेच गांभीर्याने ट्रायल घेण्याची असल्यास तशी नीट घेता येईल. पण घेणार्‍याने किंवा देणार्‍याने कोणीच आपण आव्हान देऊन किंवा स्वीकारून फार मोठे आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी करतो आहोत अशा अ‍ॅटिट्यूडने करता कामा नये. आपल्या मार्गावर आपला विश्वास आहे आणि त्याला एक प्रमाणीकरण मिळावे म्हणून करायचे असेल तर त्यात अर्थ आहे.
  • Log in or register to post comments

ते कोणत्याही परिस्थितीत परत

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 15:29 नवीन
ते कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही हे पण.
पेशंट मेला तरउपचारांचा खर्च परत केला जातो का? आहवान स्वीकारल्यावर मला डोकंफोड करावी लागणार आहे. त्यांचे कॉंम्पेन्सेशन मला मिळालेच पाहिजे.
  • Log in or register to post comments

मुद्दा प्रथमदर्शनी

गवि
Tue, 08/09/2011 - 15:39 नवीन
मुद्दा प्रथमदर्शनी पटण्यासारखा. पण तेच उदाहरण पुढे नेऊन म्हणतो की क्लिनिकल ट्रायल्स (उंदीर किंवा मनुष्य कोणावरही) करताना फक्त एमओयूसदृश काही केले जाते. पेशंटकडून ट्रायलच्या औषधाचे पैसे किंवा शुल्क घेतले जात नाही, किंवा पेशंट्सही क्लिनिकल ट्रायलमधे भाग घ्यायला मिळावा / मिळाला म्हणून काही रक्कम भरत नाहीत. संशोधकाच्या बाजूने औषधाची जेन्युइनिटी सिद्ध झाल्यावर होणारे भावी उत्पन्न त्याठिकाणी धरलेले असते , पेशंटच्या बाजूने या उपायाने काही बरे झाले तर चांगले, त्याबदल्यात या परिक्षण न झालेल्या औषधाची रिस्क घ्यायला मी तयार आहे, अशी विचारपद्धती असते. ज्योतिषविषयक अशा "परीक्षा", "आव्हाने" यांच्या चर्च्या खूप झाल्या आहेत. तुम्ही अशी स्पष्ट कसोटी करून त्यातले तत्व सिद्ध केलेत तर नीट प्रसिद्धी देऊन तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल (एक व्यवसाय म्हणून हवा असल्यास. हा व्यवसाय आहे हे तर तुमच्या शुल्काच्या अपेक्षेवरुन स्पष्टच आहे.) पण अशी टेस्ट घेताना स्वतःच्या अनेक अटी घालणे आणि त्यातून टेस्ट अवघड करणे हे नक्कीच आपल्या पद्धतीविषयी खात्री नसल्याचे लक्षण आहे. समजा अगदी काटेकोर गणिती सिद्धता नाही झाली तरी निदान प्रमाणित एरर काय आहे ती तरी कळेल..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

पेशंटकडून ट्रायलच्या औषधाचे

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 15:48 नवीन
पेशंटकडून ट्रायलच्या औषधाचे पैसे किंवा शुल्क घेतले जात नाही,
मी आह्वानकर्त्याकडुन शुल्क मागत आहे. जातका कडुन नाही. क्लिनीकल ट्रायल कोणी चॅरीटी म्हणून करत नाहित. करणारे त्यांचा मोबदला घेतातच. शिवाय एकतर्फी अटी कोणता व्यावसायिक घालत नाही? मीच काय पाप केलं आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

केला जातो

बाळकराम
Wed, 08/10/2011 - 01:44 नवीन
होय केला जातो- डॉक्टर ची चूक आहे असं सिद्ध झालं तर! बाकी मेडिकल सायन्स आणि ज्योतिषी थोतांड याची तुलना तुम्ही कुठल्या आधारावर केलीत? तुम्ही ज्योतिष चुकल्यावर पैसे परत करता का? जर करत नसाल- आणि ते ही भोन्दूगिरी करून- तर मेडिकल शास्त्राकडून ही अपेक्षा कशासाठी करता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

डॉक्टर

विनायक प्रभू
Tue, 08/09/2011 - 15:34 नवीन
डॉक्टर आपल्या स्पेशलायझन ची मिपा वर जाहिरात करत नाही.
  • Log in or register to post comments

डॉक्टर आपल्या स्पेशलायझन ची

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 15:41 नवीन
डॉक्टर आपल्या स्पेशलायझन ची मिपा वर जाहिरात करत नाही.
ते मिपावर जाहिरात करत नाहित हा त्यांचा प्रश्न आहे. पण ते जाहिरातच करत नाहीत असे म्हणायचे असेल तर मात्र माझा त्याला आक्षेप आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

काका, ज्योतिषशास्त्रात काही

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 08/09/2011 - 15:52 नवीन
काका, ज्योतिषशास्त्रात काही अर्थ आहे हे सिद्ध होणे ही आव्हानकर्त्याची गरज नाही, असलीच तर तुमची गरज आहे. त्यामुळे सर्व भुर्दंड त्याने भरायचा हे जरा अजबच आहे. एकूणच कुणी तयार होणार नाहीत अशा अटी घालू आणि मग "मी आव्हान स्वीकारायला तयार होतो, कुणी पुढे आले नाही" असा युक्तिवाद करायला आपण मोकळे राहू अशी विचारसरणी दिसते.
  • Log in or register to post comments

+१

पंगा
Tue, 08/09/2011 - 16:09 नवीन
नेमके. (माझे टंकनश्रम वाचवल्याबद्दल, इ. इ.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

असलीच तर तुमची गरज आहे. ही

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 16:12 नवीन
असलीच तर तुमची गरज आहे.
ही माझी गरज आहे हे तुम्ही परस्पर कसे ठरवलेत? मला त री काहीही सिद्ध करायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

>>ही माझी गरज आहे हे तुम्ही

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 08/09/2011 - 17:38 नवीन
>>ही माझी गरज आहे हे तुम्ही परस्पर कसे ठरवलेत? मला माहित असलेली माहिती आणि थोडासा तर्क यावरून खालील प्रमाणे १) तुम्हाला ज्योतिषशास्त्रात गती आहे आणि तुम्ही त्यासाठी लोकांकडून मानधन घेऊन त्यांना माहिती / सेवा देता २) अनेक लोकांचा ज्योतिषावर विश्वास नाही म्हणून ते त्याच्या वाटेला जात नाहीस (शिवाय प्रसंगी -ve पब्लिसिटी पण करतात) ३) ज्योतिषशास्त्रात तथ्य आहे हे सिद्ध झाले तर वरीलपैकी काही / अनेक जण या सेवांचा लाभ घेऊ इच्छितील. ४) त्यामुळे ज्योतिषशास्त्रात गती असणाऱ्यांची मागणी वाढेल. ५) मुद्दा १ आणि मुद्दा ४ यांची सांगड घातली असता, तुमचा फायदा होईल असे कळते. ६) म्हणून असलीच तर ही तुमची गरज आहे. >>मला तरी काहीही सिद्ध करायची गरज नाही. मग धागा काढायचे प्रयोजन काय होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

धागा काढायचे प्रयोजन काय होते?

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 17:50 नवीन
या प्रश्नाचे उत्तर मूळ मजकूर वाचलात तर मिळायला हरकत नाही. बाकी तुमचं तर्कशास्त्र कवीच्या कल्पनाशक्तीपेक्षा अजब आहे एव्हढच म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

>>या प्रश्नाचे उत्तर मूळ

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 08/09/2011 - 19:06 नवीन
>>या प्रश्नाचे उत्तर मूळ मजकूर वाचलात तर मिळायला हरकत नाही तुम्ही म्हणालात म्हणून परत एकदा धागा वाचला. खालील एक वाक्य वरील संदर्भात लागू पडते. पुढे अटी सुरु होतात. "मला मिसळपाव वर वारंवार आह्वाने देण्यात येतात आणि मी ती स्वीकारत नाही अशी पण तक्रार सारखी ऐकायला मिळते. म्हणून मी आह्वाने स्वीकारायचे ठरवले आहे." १) इथे मला खालील गोष्टी कळल्या. तुम्ही आव्हाने स्वीकारत नाहीत हि तुमच्या विरुद्ध सर्वसाधारण तक्रार आहे. २) अशी तक्रार आपल्याविरुद्ध व्हावी हे तुम्हाला खटकले (कृपा करून खटकले नाही म्हणू नका). ३) ही तक्रार मुळातूनच रद्दबातल करावी म्हणून तुम्ही आव्हान स्वीकारायचे ठरवेल आहे. इथे तक्रार होते तुमच्या विरुद्ध, ते खटकते तुम्हाला, म्हणून तुम्हीच आव्हान स्वीकारता आहात. मग हे आव्हान स्वीकारणे ही तुमची गरज का नाही? तुम्ही समाजसेवा म्हणून तर नक्की करत नाही आहात (तसे असते तर फुकट केले असतेत किमान) >>बाकी तुमचं तर्कशास्त्र कवीच्या कल्पनाशक्तीपेक्षा अजब आहे एव्हढच म्हणेन तर्कशास्त्र आमचे नाही हो. कालिजात शिकवले होते. १२वी ला. कला आणि विज्ञान दोन्ही शाखांना शिकवतात. तुम्हाला पण शिकवले असेलच की. नसेल तर व्यनी करा, मी शिकवतो, ते पण फुकट, ५०० पैसे पण नाही घेणार. बाकी कवी होण्याचे म्हणाल तर इच्छा खूप होती, पण माझ्या पत्रिकेत कवी होण्याचा योग नाही असे एकाने सांगितले, म्हणून नाही होऊ शकलो. ;-) तळटीप :- मी पराकोटीचा विज्ञाननिष्ठ नाही आणि १००% पत्रिका द्वेष्टा पण नाही. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

श्री मेहेंदळे अशी तक्रार

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 19:27 नवीन
श्री मेहेंदळे
अशी तक्रार आपल्याविरुद्ध व्हावी हे तुम्हाला खटकले
ही परत एक कवि-कल्पना
३) ही तक्रार मुळातूनच रद्दबातल करावी म्हणून तुम्ही आव्हान स्वीकारायचे ठरवेल आहे.
ही दूसरी कविकल्पना मी आह्वान स्वीकारायचे ठरवले (विशिष्ट चवकटीत) एव्हढेच यातले सत्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

तर्कशास्त्र!

बाळकराम
Wed, 08/10/2011 - 01:48 नवीन
युयुत्सु साहेब, तुमचं तर तर्कशास्त्रच गंडलं आहे राव! आणि तरी लोकाना गंडवण्याची कामं करता!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

ओ युयुत्सु

भारी समर्थ
Tue, 08/09/2011 - 15:55 नवीन
ओ युयुत्सु, त्या श्याम मानवांनी लाखांचं आव्हान दिलंय. तिकडे जाऊन करा काय खरं-खोटं ते. इकडे उगाच अ.श.पु.प्र. करू नका. त्यांचे आव्हान स्विकारून व त्यानंतर हरवून त्यांना गप्प करा मग इकडचे ’बेअक्कल’ लोक तुमच्यासारख्या ’अक्कलवान’ लोकांची पूजाच बांधतील. अवांतर: ते श्याम मानव डिपॉझिट वगैरे काही चार्ज करत नाहीत बहूतेक. भारी समर्थ
  • Log in or register to post comments

त्या श्याम मानवांनी लाखांचं

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 16:01 नवीन
त्या श्याम मानवांनी लाखांचं आव्हान दिलंय
श्याम मानवांना माझ्या अटी मान्य असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारी समर्थ

काय राव उपाध्ये काका?

भारी समर्थ
Tue, 08/09/2011 - 16:25 नवीन
सत्य आणि शास्त्र हे निर्विवाद असतात असं ऐकलं होतं. आणि तुम्हाला ज्योतिष हे शास्त्र आहे ह्याची पूर्ण खात्री आहे ना, मग तुम्ही का नाही त्यांना अप्रोच करत राव. शिवाय तुमच्या काय अटी आहेत ते तरी कळू द्या. आणि एवढाच तुमच्या शास्त्रावर तुमचा विश्वास आहे ना, तर मग एक कराच काका. श्याम मानवांची फेसबुक प्रोफाईल आहे. त्यावर तुमच्या अटींसह त्यांना आव्हान स्विकारल्याबद्दल सुचित करा. आणि काय ती प्रोग्रेस आहे त्याची अपडेट देत र्‍हावा. इकडे मानवांएवढे निष्णात ’ज्योतिष-किलर’ नसावेत बहुदा. अवांतर: तुमची प्रोफाईल पाहिली. ’आयआयटीयन’ जोतिष? काय राव उपाध्ये काका? भारी समर्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

शिवाय तुमच्या काय अटी आहेत ते

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 16:47 नवीन
शिवाय तुमच्या काय अटी आहेत ते तरी कळू द्या
इतक रामायण झालं तरी रामाची सीता कोण म्हणून विचारता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारी समर्थ

सत्य आणि शास्त्र हे निर्विवाद

धन्या
Tue, 08/09/2011 - 17:17 नवीन
सत्य आणि शास्त्र हे निर्विवाद असतात असं ऐकलं होतं. आणि तुम्हाला ज्योतिष हे शास्त्र आहे ह्याची पूर्ण खात्री आहे ना, मग तुम्ही का नाही त्यांना अप्रोच करत राव. शिवाय तुमच्या काय अटी आहेत ते तरी कळू द्या.
तुमच्या अटी काय आहेत हे शाम मानवांना कळू दया असे त्यांना म्हणायचे असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

तुमच्या अटी काय आहेत हे शाम

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 17:23 नवीन
तुमच्या अटी काय आहेत हे शाम मानवांना कळू दया असे त्यांना म्हणायचे असावे.
श्याम मानवांचा ज्याना कळवळा आहे त्यांनी हे कष्ट घ्यायला काहीच हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

पुरवणी सीता

भारी समर्थ
Tue, 08/09/2011 - 17:35 नवीन
या माझ्या मूलभूत अटी आहेत. गरज पडल्यास यांना पुरवणी-अटी जोड्ण्यात येतील.
ही पुरवणी सीता कवा भाइर काडणार? आणि श्याम मानवांच्या प्रोफाइलवर जाऊन आव्हान केव्हा स्विकारणार ते बोला काका. कारण कसं आहे ना, इकडे पैसे वगैरे भरून तुम्हाला खोटं वगैरे पाडण्या च्या फंदात कोणी पडेल असं वाटत नाही. मानवांचं आव्हान तुम्ही स्विकारलत ना, की दुधाचं दुध आन् पाण्याचं पाणी होईल. आणि मी तुमच्यापेक्षा वयाने बराच लहान असल्याने मला अरे-तुरे केल्यास माझी हरकत नाही. जमल्यास खालील दुवे पाहून आपल्या प्रतिक्रिया संबंधितांकडे जरूर कळवाव्यात. १ २ बाकीही बरंच आहे. पण तुर्तास एवढच. भारी समर्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

डॉक्टर

विनायक प्रभू
Tue, 08/09/2011 - 15:56 नवीन
मिपावर जाहिरात करत नाहीत आणि त्याचा आर्थिक फायदा घेत नाहीत. बाहेर काय करतात ह्याच्याशी मला काहीही देणे घेणे नाही. तुम्ही तशी सुरवाती पासुन करताहात हा आक्षेप आहे. त्या बाबत तुम्ही सोयिस्कर मौन बाळगत आहात यूयूस्तू राव.
  • Log in or register to post comments

मी माझा सल्ला मागायला या असे

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 16:06 नवीन
मी माझा सल्ला मागायला या असे मिपावर कधिही म्हटल्याचे आठवत नाही. असे अ सताना मी जाहिरात केलि असे कसे म्हणता तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

अरे देवा

विनायक प्रभू
Tue, 08/09/2011 - 16:24 नवीन
आणखीन एक जिलेबी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

असलीच तर तुमची गरज आहे. ही

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 15:56 नवीन
असलीच तर तुमची गरज आहे.
ही माझी गरज आहे हे तुम्ही परस्पर कसे ठरवलेत? मला त री काहीही सिद्ध करायची गरज नाही.
  • Log in or register to post comments

त्याचप्रमाणे...

पंगा
Tue, 08/09/2011 - 16:22 नवीन
...आपल्या ज्योतिषविषयक सेवेची गरज येथे कोणालाच आहे, असे वाटत नाही. सबब, (गरज असल्यास) आपल्या तेलाच्या बाटलीचा खर्च आपणच उचलावा, आणि (आपले नाही तरी आपल्या ज्योतिषविषयक लेखांचे) प्रस्थान येथून हलवावे, हे उत्तम, असे सुचवावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

असहमत

गणपा
Tue, 08/09/2011 - 16:30 नवीन
का म्हणुन युयुत्सुंनी त्यांचे इथले लेखन हलवावे? जर कुणाला पटत नसेल तर त्यांनी त्यांच्या धाग्यांना प्रतिसाद देउ नयेत. जर त्यांच लेखन मिपाच्या धोरणांत बसत नसेल तर त्या बाबतीत सर्वाधिकार संम आणि संचा यांचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

मत

पंगा
Tue, 08/09/2011 - 16:32 नवीन
असे सुचवावेसे वाटते.
बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

पंगा यांचे विधान आधीच्या

गवि
Tue, 08/09/2011 - 16:34 नवीन
पंगा यांचे विधान आधीच्या संवादाच्या संदर्भाने ओघात आलेले असावे असे मला वाटते. .. "असलीच तर तुम्हाला आहे" "मला सिद्ध करण्याची गरज नाही" तर मग "..त्याचप्रमाणे..." मला वाटते त्यांना ते विधान इफ देन स्वरुपात म्हणायचे असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

धन्यवाद

पंगा
Tue, 08/09/2011 - 16:43 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

वैचारीक अध:पतन

धन्या
Tue, 08/09/2011 - 17:04 नवीन
अरेरे पंगाशेठ, तुमचं वैचारीक अधःपतन होतंय... ही वैचारीक, तात्विक चर्चा आहे... त्यामुळे ती कोणत्याही परिस्थीतीत वैयक्तिक होऊ नये असे आम्हांस वाटते. त्यांनी त्यांच्या अकलेप्रमाणे आपली अक्कल काढली म्हणून आपण का त्यांच्याच पातळीवर जाऊन त्यांचे लेखन काढण्यास सुचवावे? त्यांनी गाय कापली म्हणून आपण का वासरास कापावे? असो. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

प्रकाटाआ

पंगा
Tue, 08/09/2011 - 17:12 नवीन
दुआकाटा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

पुन्हा अवांतर

पंगा
Tue, 08/09/2011 - 17:10 नवीन
त्यांनी गाय कापली म्हणून आपण का वासरास कापावे?
कारण आम्हालाही ष्टेक आवडते म्हणून. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

पंडित गागाभट्ट मिरच्या

युयुत्सु
Tue, 08/09/2011 - 16:33 नवीन
पंडित गागाभट्ट
मिरच्या झोंबल्या म्हणायच्या
  • Log in or register to post comments

अरेरे...

धन्या
Tue, 08/09/2011 - 17:06 नवीन
युयुत्सुराव, तुमचा तोल गेला असे खेदाने म्हणावेसे वाटते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा