✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रेव्ह पार्टी तोडल्यावर...

५
५० फक्त यांनी
Sat, 07/30/2011 - 08:42  ·  लेख
लेख
काल रात्री पुण्याजवळ्च एका विवक्षित ठिकाणी एका रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, काही विशिष्ट आधुनिक दळणवळणाच्या साधनांचा उपयोग करुन केलेल्या या आयोजनाची खबर काही धडाडीच्या कार्यकर्त्यांना लागल्यावर लगेच ती पार्टी तोडण्याचा निर्णय घेण्यात आला, यासाठी काही अतिविशिष्ट कायदा सुव्यवस्था अंमलबजावणी गटांची मदत घेण्यात आली त्याचा हा रिपोर्ट. पहिले काही फोटो, रेव्ह पार्टीच्या स्थळावर कॅमेरा बॅगेत लपवुन काढलेले आहेत. अविकासुअंगचे तरुण अधिकारी त्या स्थळी आल्यावर रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्या सर्वांना हाकलुन काढल्यावर स्थळाची कसुन तपासणी करताना अविकासुअंगचे अधिकारी सदर कार्यवाही पुर्ण झाल्यवर अविकासुअंगच्या वरिष्ठ अधिका-यांनी त्यांच्या विशेष अधिकारांचा वापर करुन सर्व सहभागी सदस्यांना श्रमपरिहाराचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी मा. सा.सु. सौरभ, मा. अप्पा व तडफदार अधिकारी श्री. वपाडाव नविनच गटात प्रवेश मिळालेले तरुण अधिकारी अजाणतेपणी कसे चुकीचे वागतात या बद्दल वरिष्ठ अधिकारी मा. अप्पा मार्गदर्शन करताना पुढील दोन फोटो, पहिला चुकीचा दुसरा मार्गदर्शनाचा मा. वल्ली व आयोजक -५० फक्त यांच्या सह एका फोटोत जागा मिळवण्याचा विक्रम करणारे धनाजीराव आणि वरचा फोतो महत्प्रयासाने काढणारे मा. मनराव. रिकाम्या डिशांकडे पाहु नका तो कर्तव्याचाच एक भाग आहे. श्रमपरिहार संपल्यानंतर आयोजकांच्या विनंतीनुसार अविकासुअंगच्या अधिका-यांनी एकत्र फोटो दिले, सदर फोटो आयोजक पुढील सर्व पार्टीच्या ठिकाणी फ्रेम करुन लावणार आहेत असे समजते. या ठिकाणी श्री. पराग दिवेकर, कमरेला मागे लावलेले पिस्तुल हुरहुर वाटल्यावर कसे लगेच काढावे याचे प्रात्याक्षिक करुन दाखवत आहेत. पुढच्या तीन फोटोतील व्यक्ती कोण आहेत ओळखल्यास आयोजकांच्या कडुन विशेष बक्षिस देण्यात येईल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राहती जागा
जीवनमान
राहणी
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
6506 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

धागा व्रुत्तांतासह आल्यावर कसं बरं वाटलं...

अत्रुप्त आत्मा
Sat, 07/30/2011 - 09:37 नवीन
कुरंकूरं.........असते हीचं खरी ... बंदुक काढुन कुणाला मी देतोय...धुरी........... ठ्ठो...........ठ्ठो..............ठ्ठो....;) ;-) :wink: तुमची माझ्झी दोस्ती साय्रा दुनीयेला कळू दे राहू मस्त बिनधास्त....(बाकीची)दुनीया सारी टळू दे;) ;-) :wink: :) :-) :smile:
  • Log in or register to post comments

झकास वृत्तांत मजा केलीत

स्पा
Sat, 07/30/2011 - 09:41 नवीन
झकास वृत्तांत मजा केलीत लेको... अवांतर : अप्पा जोगळेकरांच्या हातात मिरीन्डाचा ग्लास पाहुल अमळ मौज वाटली ;)
  • Log in or register to post comments

''अवांतर : अप्पा

५० फक्त
Sat, 07/30/2011 - 10:57 नवीन
''अवांतर : अप्पा जोगळेकरांच्या हातात मिरीन्डाचा ग्लास पाहुल अमळ मौज वाटल'''' - फोटो शॉप फोटो शॉप म्हणतात त्याला.
  • Log in or register to post comments

- फोटो शॉप फोटो शॉप म्हणतात

अप्पा जोगळेकर
Sun, 07/31/2011 - 08:30 नवीन
- फोटो शॉप फोटो शॉप म्हणतात त्याला. कशाला मेहनत घेतलीत ? नाहीतरी ब्लेन्डर्स प्राईडची बाटली आणि श्वेतदंडिका दिसतेच आहे की फोटोमधे ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

सही आहे. धमाल केलीत म्हणायची.

मृत्युन्जय
Sat, 07/30/2011 - 11:18 नवीन
सही आहे. धमाल केलीत म्हणायची. पुण्यात एका दिवशी २-२ कट्टे झाले म्हणायचे. उत्तम आहे.
  • Log in or register to post comments

२ कट्टे होणारच ना?

मी-सौरभ
Sun, 07/31/2011 - 17:05 नवीन
आतले आणि बाहेरचे हा मुद्दा चिरंतन आहे... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

>>>>आतले आणि बाहेरचे हा

प्यारे१
Mon, 08/01/2011 - 10:59 नवीन
>>>>आतले आणि बाहेरचे हा मुद्दा चिरंतन आहे... मुद्दा काही कळाला नाही हो. जरा इस्कटुन सांगाल काय? आतले आणि बाहेरचे म्हणजे नेमके कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

मला पण हाच प्रश्न पडला! सांगा

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/01/2011 - 13:19 नवीन
मला पण हाच प्रश्न पडला! सांगा भौ!
आतले आणि बाहेरचे हा मुद्दा चिरंतन आहे...
रच्याकने, कोणाकोणाला कळवलं होतंत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कट्ट्याला जमलेली मंडळी बघता

सूड
Mon, 08/01/2011 - 13:44 नवीन
कट्ट्याला जमलेली मंडळी बघता यातलं कोणी बाहेरचं असेल अशी पुसटसुद्धा शक्यता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तरीही बाहेरचे म्हणजे कोण हे

आत्मशून्य
Mon, 08/01/2011 - 15:09 नवीन
तरीही बाहेरचे म्हणजे कोण हे तर कळूदे ? का बाहेरचे म्हनजे पल्याड गाव वाले असं गृहीत धरायच ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कट्ट्याला जमलेली मंडळी बघता

इंटरनेटस्नेही
Tue, 08/02/2011 - 01:02 नवीन
कट्ट्याला जमलेली मंडळी बघता यातलं कोणी बाहेरचं असेल अशी पुसटसुद्धा शक्यता नाही. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

यात हसण्यासारखं काय आहे

मनराव
Tue, 08/02/2011 - 12:36 नवीन
यात हसण्यासारखं काय आहे ............. :o
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

;)

आत्मशून्य
Wed, 08/03/2011 - 01:25 नवीन
इनो मागायची ती पध्दत आहे बहूतेक इंट्याची ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव

व्यनि करा, अर्थ सांगतो.

इंटरनेटस्नेही
Wed, 08/03/2011 - 02:04 नवीन
यात हसण्यासारखं काय आहे .............
बाहेरचं या शब्दाचा अर्थ जाणुन घेण्यसाठी व्यनि करा, माननीय मनराव, आत्मशून्य! तुम्हाला खरंच याचा अर्थ माहित नाही असं वाटंत तर नाही पण तरीदेखील खरंच माहित नसेल अर्थ तर करुन टाका व्यनि, तो शब्द इथे ज्या संर्दभात सुडने वापरला आहे ते सांगुनच टाकतो तुम्हाला! :) - शब्दप्रभू, इंट्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव

काय हे?

मी-सौरभ
Wed, 08/03/2011 - 20:10 नवीन
अहो पुण्यात दोन कट्टे झाले एकाच दिवशी. त्यत सहभागी झालेली व्यक्तिमत्व याचा तौलानिक अभ्यास करता तुम्हाला आत्ले आणि बाहेरचे हा भेद कळेल अशी अपेक्षा आहे...:) कळत नसल्यास मी जास्त समजवू शकणार नाही. धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आयला, दंगा केलात तर.... ५०

प्यारे१
Sat, 07/30/2011 - 11:28 नवीन
आयला, दंगा केलात तर.... ५० फक्त ला सांगितल्याप्रमाणे जमलंच नाही यायला. बघू पुढच्या गटारीला नक्की. ;)
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो !

मालोजीराव
Wed, 08/03/2011 - 18:40 नवीन
आयला, दंगा केलात तर.... ५० फक्त ला सांगितल्याप्रमाणे जमलंच नाही यायला.
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

गटारी लय जोरात साजरी केलीत

किसन शिंदे
Sat, 07/30/2011 - 12:42 नवीन
गटारी लय जोरात साजरी केलीत जणू...मजाये ब्वॉ तुमची. अवांतर : यातला राजा भिकारी कोण? वर्षभर प्रसिध्द नारायणाचे व्रत करणारा. ;)
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Sat, 07/30/2011 - 12:46 नवीन
=))
  • Log in or register to post comments

झक्कास रे

प्रचेतस
Sat, 07/30/2011 - 14:30 नवीन
सही वृत्तांत टाकलास रे भिडू. वपाडाव व आत्मशून्य नेहमीप्रमाणेच भिजत भिजत आलेले होते व इतरांची वाट बघत ताटकळत बसले होते. धनाजीराव पण लवकरच आलेले असूनही त्यांचा वपा व आशू यांच्याशी पूर्वपरिचय नसल्याने ते वेगवेगळे असे उभे असलेले दिसले. ५० फक्त त्यांच्या कुटंबातील एका नविन सदस्याला घेउन आले होते. कट्ट्याच्या निमित्ताने पराग दिवेकर व धनाजीराव या दोन नविन मिपाकरांची ओळख झाली व सुहृदांच्या संख्येत आणखी भर पडली. पुढचा कट्टा लवकरच दिल्ली किचन (वपाडाव रेकमंडेड) किंवा शाहजी पराठा (५० फक्त रेकमंडेड) येथे करण्याचे ठरवण्यात येत आहे. इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवतो व आजच्या ठाणे कट्ट्याला शुभेच्छा देतो. जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
  • Log in or register to post comments

टाळ्या..SSSSSSSSSSS

मनराव
Tue, 08/02/2011 - 12:38 नवीन
टाळ्या..SSSSSSSSSSS
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चांगलंय

स्मिता.
Sat, 07/30/2011 - 14:48 नवीन
अरे वा! पुण्यात एकावर एक कट्टे होत आहेत. छानच! हे कट्ट्यांचे धागे बघून मुंबई-पुणेकरांवर जळजळ होतेय आता :(
  • Log in or register to post comments

अरे देवा! मी खरी रेव्ह पार्टी

रेवती
Sun, 07/31/2011 - 08:52 नवीन
अरे देवा! मी खरी रेव्ह पार्टी समजत होते. कट्टा वृत्तांत होता हे बाकी प्रतिसादांवरून समजले.
  • Log in or register to post comments

:)

आत्मशून्य
Sun, 07/31/2011 - 15:09 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अरे व्वा ! हा छुपा रुस्तुम

पियुशा
Sun, 07/31/2011 - 15:34 नवीन
अरे व्वा ! हा छुपा रुस्तुम कट्टा छान झाला कि वो :)
  • Log in or register to post comments

अविकासुअंगचे तरुण

आत्मशून्य
Sun, 07/31/2011 - 15:59 नवीन
अविकासुअंगचे तरुण अधिकारी.... रिकाम्या डिशांकडे पाहु नका तो कर्तव्याचाच एक भाग आहे. ..... कमरेला मागे लावलेले पिस्तुल हुरहुर वाटल्यावर कसे लगेच काढावे....
हॅहॅहॅ @ parag p divekar चारोळी मस्तच.. ठो. ठो. ठो .
  • Log in or register to post comments

+१

इंटरनेटस्नेही
Mon, 08/01/2011 - 04:15 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

झकास....

मन१
Sun, 07/31/2011 - 19:31 नवीन
मस्त रे
  • Log in or register to post comments

भारी रे!!!! असेच कट्टे करा.

प्रभो
Mon, 08/01/2011 - 09:16 नवीन
भारी रे!!!! असेच कट्टे करा.
  • Log in or register to post comments

वा! वा!! खानपान व्यवस्थित

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/01/2011 - 13:17 नवीन
वा! वा!! खानपान व्यवस्थित झालेलं दिसतंय!
  • Log in or register to post comments

फटू आणि वृत्तांत दोन्ही छान

सूड
Mon, 08/01/2011 - 13:33 नवीन
फटू आणि वृत्तांत दोन्ही छान !!
  • Log in or register to post comments

वृत्तांत आवडला! फोटो तर एकदम

इंटरनेटस्नेही
Tue, 08/02/2011 - 03:39 नवीन
वृत्तांत आवडला! फोटो तर एकदम 'जगात भारी' आले आहेत!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा