✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नवीन सदस्यांप्रति जून्या सदस्यांचे वर्तन.

न
नीलकांत यांनी
गुरुवार, 06/09/2011 - 18:19  ·  लेख
लेख
नमस्कार, आज मिसळपाववर येणार्‍या नवीन सदस्यांच्या अडचणी आणि त्याबाबत जूण्या सदस्यांचे वर्तन यावर चर्चा करावी म्हणून हा लेख आहे. असे साधारण निरीक्षण आहे की नवीन लोक साधारण ६ महिने ते १ वर्ष केवळ वाचनमात्र अवस्थेत असतात. त्यानंतर कधीतरी ते सदस्यं होतात. ते झाल्यावर सुध्दा प्रतिक्रिया लिहीण्यापासून ते लेख लिहीण्यापर्यंतचा प्रवास नवीन सदस्यासाठी जरा अडचणीचाच असतो. त्यामुळे हा प्रवाह जरा हळू चालतो. असं सगळं करून एखादा नवीन सदस्यं जेव्हा एखादा लेख लिहीतो तेव्हा तो पहिलाच लेख खूपच चांगला व्हावा किंवा अतिशय मुद्देसुद वगैरे व्हावा अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं वाटतं. मग अश्या वेळी काही लोक त्यांना सांभाळून घेऊन पुढील लेखनास शुभेच्छा (पुलेशु) देतात तर काही लोक त्यांना चुकीच्या प्रतिक्रिया देतात. ह्या चुकीच्या प्रतिक्रियांमुळे त्या लेखकाचा लेखन करण्याचा उत्साह मारल्या जातो. ही नकारात्मक प्रतिक्रिया देणारे लोक आपला स्वत:चा सुरूवातीचा काळ विसरले आहेत की काय अशी शंका येते. प्रत्येक लेखावर चांगलेच लिहा असं मला म्हणायचे नाहीये. मला एवढेच म्हणायचे आहे की जे लोक नवीन आहेत, नुकतेच लिहायला लागले आहेत त्यांनी चांगलं लिहावं, उत्तम लिहावं यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि पुढील लेख यापेक्षा चांगला येईल अशी मदत करावी ते राहीलंच. काही लोकांच्या प्रतिक्रिया एवढ्या अंगावर जाणार्‍या असतात की तो लेखक/लेखीका पुन्हा काही लिहीण्याचा प्रयत्नच करत नाही. हे टाळता येऊ शकतं का? तर नक्कीच टाळता येतं. एखादा लेखक नवीन आहे तर त्याला त्याचे लेखन कसे सुधारावे याबद्दल मदत करा. काही प्रतिक्रिया असतील तर तो नवीन असे पर्यंत त्याला जरा सांभाळून घ्या. तो लेखक येथे जरा स्थिर स्थावर होऊ द्या आणि मग त्याच्या पुढील लेखांवर काय हव्या त्या प्रतिक्रिया द्या. म्हणजे तो लेखक बर्‍यापैकी येथील वातावरणाशी समरस झालेला असेल. आणि आपले मत उत्तम मांडू शकेल. नवीन लेखकाने लिहीलेल्या लेखनाची चेष्टा करणे, त्याचा हिरमोड होईल अश्या प्रतिक्रिया देणे टाळावे अशी विनंती सर्वांना करीत आहे. काही लोक वारंवार असे करतांना दिसत आहे. या कारणांने त्यांच्यावर कारवाईसुध्दा होऊ शकते हे लक्षात घ्यावे. सर्वांनी सोबत राहून मिपा पुढे नेऊया. मात्र काही लोकांना मिपा म्हणजे नवीन लोकांना त्रास देण्याची जागा आहे असं वाटत असेल तर यापुढे याबाबत कडक कारवाई होईल हे लक्षात घ्या. याचा अर्थ मिपा नवीन लोकांकडून निघणारे एका ओळीचे धागे किंवा ऑरकुट सारख्या गप्पांचे धागे चालवून घेईल असे नाही. माझा रोख केवळ नवीन लोकांना लिहीतं करावं आणि त्यांनी चांगलं लिहायला लागावं यासाठी जूण्या लोकांनी प्रयत्न करावे अशी विनंती करावी एवढाच आहे. कृपया याकडे लक्ष द्यावे. नवीन लोकांनी निश्चिंतपणे लिहायला लागा. हे सार्वजनीक संकेतस्थळ आहे त्यामुळे आपल्या लिखाणावर चांगल्या वाईट दोन्ही प्रतिक्रिया येतील हे गृहीत धरा. खरं तर त्यातच मजा आहे. मात्र कुणी उगाचच अती करून वाईटच प्रतिक्रिया देत असेल तर संपादक मंडळ त्याची काळजी घेईल. - नीलकांत
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
माहिती

प्रतिक्रिया द्या
23597 वाचन

💬 प्रतिसाद (102)

प्रतिक्रिया

भले!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/09/2011 - 18:29 नवीन
भले!
  • Log in or register to post comments

संपुर्ण अनुमोदन! आणि

धमाल मुलगा
गुरुवार, 06/09/2011 - 18:34 नवीन
संपुर्ण अनुमोदन! आणि नवसदस्यांना मदतीचे आश्वासनही देतो. तसं नेहमी शक्य तितका हा प्रयत्न करणं चालू असतंच. तरीही सदरहू प्रकटनाच्या उत्तरादाखल पुनरुच्चार करतो आहे. एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ :)
  • Log in or register to post comments

पुलेशु !

सुहास..
गुरुवार, 06/09/2011 - 19:07 नवीन
पुलेशु ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हेच म्हणतो

आनंदयात्री
गुरुवार, 06/09/2011 - 20:02 नवीन
हेच म्हणतो. बर्‍याच दिवसांपासुन ह्या गोष्टी बोचतात. याबद्दल खासगीत तसेच जाहिर बोललोही आहे आणि त्यासाठी मित्रांचा रोषही पत्कारला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

नवीन लेखकाने लिहीलेल्या

माझीही शॅम्पेन
गुरुवार, 06/09/2011 - 18:38 नवीन
नवीन लेखकाने लिहीलेल्या लेखनाची चेष्टा करणे, त्याचा हिरमोड होईल अश्या प्रतिक्रिया देणे टाळावे अशी विनंती सर्वांना करीत आहे. काही लोक वारंवार असे करतांना दिसत आहे. या कारणांने त्यांच्यावर कारवाईसुध्दा होऊ शकते हे लक्षात घ्यावे. सर्वांनी सोबत राहून मिपा पुढे नेऊया. मात्र काही लोकांना मिपा म्हणजे नवीन लोकांना त्रास देण्याची जागा आहे असं वाटत असेल तर यापुढे याबाबत कडक कारवाई होईल हे लक्षात घ्या.
हे विशेष आवडल , बाकी सर्व भा.पो. धन्यवाद !!
  • Log in or register to post comments

सहमत आणी ह्या विषयाला हात

निनाद मुक्काम …
Sat, 06/11/2011 - 12:24 नवीन
सहमत आणी ह्या विषयाला हात घातल्याबद्दल नीलकांत ह्यांचे आभार . आपण मिपावर दीर्घकाळ आहोत व आपला कंपू जमला आहे .म्हणून नवीन सदस्यांवर तोंडसुख घेणे केव्हाही चूक .किंबहुना ह्या मागे एक उद्देश असाही असेन की दर दिवसाला अनेक नवीन सदस्य मिपावर येतात .अर्थात बरेच जण अनेक काळ एकतर मुकवाचक असतात .किंवा एखादी प्रतिक्रिया देत असतात .तेव्हा एका नवीन सदस्याला टार्गेट केले.कि तर बाकीच्या नव सभासदांना एक गर्भित इशारा मिळतो. '' आमच्या पासून जपून म्हणजे एक तर आमच्या लिखाणाला बळेबळे चांगले म्हणा, किमान पक्षी वाईट म्हणून नका .नाहीतर गाठ फक्त माझ्याशी नाही तर माझ्या संपूर्ण कंपूशी आहे .'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

सहमत आणि विषयात हात

टारझन
Sat, 06/11/2011 - 12:34 नवीन
.अगदी सहमत.आणि खुलासेवार लिहील्या बद्दल जर्मनांचे आभार. आपण मिपावर दिर्घकाळ आहोत व आपण मराठी आहोत. म्हणुन मराठी भाषेचा रेप करने केंव्हाही चुक .किंबहुना ह्या मागे एक उद्देश असाही असेन की दर दिवसाला अनेक नविन प्रकारच्या व्याकरण चुका मला करता येतात. अर्थात बरेच जण त्याला इग्नोर करतात. किंवा एखादी प्रतिक्रीया देउन समजावण्याचा प्रयत्न करतात. तेंव्हा एकदा समजुन सांगितले.कि तर बाकीच्या चुका टाळण्याचा एक गर्भित इशारा मिळतो."आम्हाला समजुन सांगु नका एक तर आमच्या कसल्याही प्रकारच्या लिखाणाला बळेबळे चांगले म्हणा,किमान पक्षी वाईट म्हणु नका. नाही तर मी स्वत:ला फार स्पेषल समजिन आणि कंपु मिळुन माला टार्गेट करतो असे गावभर ओरडत फिरेन .' मी कुठेही डॉटतो,त्या डॉट ला नविन लाईन वर फेकतो. पण सुधरत मात्र नाही ! प्रत्येक मिपाकर जरा जुणा झाल्यावर थोडासा शहाणा होतो; पण ते दुसर्‍यांनी दिलेल्या सल्ल्यांनी नाही , तर स्वत:च चढवुन घेतलेल्या कारणांनी ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

अगदी सहमत.आणि खुलासेवार लिहील्या बद्दल णीलकाण्टचे आभार.

गेंडा
Tue, 06/14/2011 - 09:53 नवीन
अगदी सहमत.आणि खुलासेवार लिहील्या बद्दल णीलकाण्टचेसुध्दा आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

सहमत आणी ह्या विषयाला हात

परिकथेतील राजकुमार
Sat, 06/11/2011 - 13:35 नवीन
सहमत आणी ह्या विषयाला हात घातल्याबद्दल टारझन ह्यांचे आभार . आपण मिपावर परदेशस्थ आहोत व आपला मेंदू गंजला आहे .म्हणून जुन्या सदस्यांवर तोंडसुख घेणे केव्हाही चूक .किंबहुना ह्या मागे एक उद्देश असाही असेन की दर दिवसाला काही सदस्य त्यासाठीचस् मिपावर येतात .अर्थात बरेच जण अनेक काळ एकतर मुकवाचक असतात .किंवा एखादी प्रतिक्रिया देत असतात कारण ते स्वतःला दिडशहाणे समजत नसतात. जुन्या सदस्याला टार्गेट केले आणि त्याच्या नावाने धागे किंवा गळे काढले की इतर जुन्या सभासदांना एक गर्भित इशारा मिळतो. '' आमच्या पासून जपून म्हणजे एक तर आमच्या फालतु + रटाळ + स्वतःची लाल करणार्‍या + मराठीवर बलात्कार करणार्‍या लिखाणाला बळेबळे चांगले म्हणा, किमान पक्षी वाईट म्हणून नका .नाहीतर गाठ फक्त माझ्याशी नाही तर माझ्या मुक्काम पोस्ट च्या पारायणाशी + माझ्या तुम्हाला येणार्‍या भिकार खरडींशी किंवा मग मी जाहिर धागा काढून गाळणार्‍या मगरीच्या अश्रुंशी आहे .' मुर्ख चुकतात, त्या चुकीविषयी ऎकतात, पण शिकत मात्र नाही ! प्रत्येक मनुष्य सदस्यत्वाच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुस-याच्या उडालेल्या सदस्यत्वाने नाही, तर स्वत:ला बसलेल्या लाथेनी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

लेखकाशी सहमत. लोकांकडून

रेवती
गुरुवार, 06/09/2011 - 18:38 नवीन
लेखकाशी सहमत. लोकांकडून निघणारे एका ओळीचे धागे तसंच मिपावर आपल्या आगमानाचे धागे काढणं ही थांबवा. आधी लेखांवर प्रतिक्रिया देवून ओळखी तर करून घ्या असं सांगावसं वाट्टं.
  • Log in or register to post comments

रेवतीताईंशी सहमत. नवीन

मृत्युन्जय
गुरुवार, 06/09/2011 - 18:47 नवीन
रेवतीताईंशी सहमत. नवीन लेखकांनी आल्याआल्या लगेच लेखनच पाडायला सुरुवात केली की कुठेतरी कडकड प्रतिक्रिया दिली जाते. त्या ऐवजी आधी वाचनमात्र मग प्रतिसाद मात्र आणि खरडमात्र होउन नंतर लेख पाडले तर कदाचित हा प्रॉब्लेम येणार नाही. अर्थात नीलकांतची सुचना मान्य. एकदम अंगावर जाणार्‍या प्रतिक्रिया देणे चुकीचे आहे. माझ्याकडुन असे आजवर झाले असल्यास यापुढे आधिक काळजी घेइन. अवांतर; हा प्रतिसाद मी मिपावर ज्येष्ठ आहे हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न देखील आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सहमत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/09/2011 - 18:58 नवीन
लेखकाच्या विचारांशी सहमत. एकोळीचे धागे, फाल्तू कौलं, आगमनाचे धागे, सदस्यांचे वाढदिवसाचे धागे, (जयंती-पुण्यतिथीचे भरपूर माहितीवजा असलेले लेखन सोडून ) केवळ प्रणामाचे धागे, काय बोलू शब्दच नाही असे म्हणून छायाचित्राला टाकून येणारे धागे, कै च्या कै प्रतिसाद, हिशेब चुकते करणारे प्रतिसाद, हे सर्व खरडफळ्यावर जाऊ द्या....! नवीन लिहिणा-यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, याच्याशी सहमत.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सहमत

विकास
गुरुवार, 06/09/2011 - 19:09 नवीन
नीलकांत यांच्या लेखातील मताशी आणि बिरुटेसरांच्या प्रतिक्रियेतील मताशी पूर्ण सहमत! दोघांना पुलेशु! ;) (ह.घ्या रे बाबांनो!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

(No subject)

जेपी
Fri, 01/03/2014 - 14:09 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

सूड
गुरुवार, 06/09/2011 - 19:03 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अनुमोदन

विशाखा राऊत
गुरुवार, 06/09/2011 - 18:39 नवीन
+१
  • Log in or register to post comments

पटले!

स्वैर परी
गुरुवार, 06/09/2011 - 18:43 नवीन
नीलकांत चे म्हणणे पटले. नवीन सदस्यांच्या लेखांवर उत्साहवर्धक प्रतिक्रिया दिल्यास त्यांचा लिखाणाचा हुरुप वाढेल. त्याना सांभाळुन घेणे हे जुन्या सदस्यांकडुन अपेक्षित आहे!
  • Log in or register to post comments

नवीन सदस्यांची एवढी काळजी

जगड्या
गुरुवार, 06/09/2011 - 18:47 नवीन
नवीन सदस्यांची एवढी काळजी घेणारे दुसरे संकेतस्थळ पाहण्यात नाही. याबद्दल नीलकांत आणि इतर मिपा करांचे धन्यवाद.
  • Log in or register to post comments

पूर्णत: सहमत. रेवती यांचा

गंगाधर मुटे
गुरुवार, 06/09/2011 - 18:54 नवीन
पूर्णत: सहमत. रेवती यांचा प्रतिसादही महत्वाचा आहे. :)
  • Log in or register to post comments

नवीन लेखकाने लिहीलेल्या

विसोबा खेचर
गुरुवार, 06/09/2011 - 19:14 नवीन
नवीन लेखकाने लिहीलेल्या लेखनाची चेष्टा करणे, त्याचा हिरमोड होईल अश्या प्रतिक्रिया देणे टाळावे अशी विनंती सर्वांना करीत आहे.
सहमत रे नीलकांता.. तात्या.
  • Log in or register to post comments

नीलकांतची सुचना मान्य. एकदम

५० फक्त
गुरुवार, 06/09/2011 - 19:17 नवीन
नीलकांतची सुचना मान्य. एकदम अंगावर जाणार्‍या प्रतिक्रिया देणे चुकीचे आहे. माझ्याकडुन असे आजवर झाले असल्यास यापुढे आधिक काळजी घेइन.
  • Log in or register to post comments

नीलकांतची सुचना मान्य. एकदम

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/09/2011 - 20:06 नवीन
नीलकांतची सुचना मान्य. एकदम अंगावर जाणार्‍या प्रतिक्रिया देणे चुकीचे आहे. माझ्याकडुन असे आजवर झाले असल्यास यापुढे आधिक काळजी घेइन.
हेच बोल्तो. असे घडले असल्यास मी देखील नक्की काळजी घेईनच. मुळात असे घडले असल्यास ह्या धाग्याच्या निमित्ताने सदर लेखकांची माफि देखील मागतो. आता जाता जाता नीलकांत ह्यांना काही सुचवावेसे वाटते :- १) नविन लेखकांच्या बरोबरच जुन्या लेखकांनी देखील आपल्या दोन लेखात किती अंतर ठेवावे ह्याची स्पष्ट सूचना देण्याची वेळ आली आहे असे वाटते. 'हळुहळु समजतील, लक्षात घेतील' असे वाटणे चुकीचे आहे असे वाटते. २) अनेक नवे लेखक / सदस्य हे ब्लॉगधारक असतात. मिपाचे व्यासपीठ मिळाल्याबरोब्बर ते रोज २/४ लेख ब्लॉगवरुन सरळ उचलुन आणतात आणि इथे रतिब चालु करतात. ३) काही नविनच नव्हे तर जुने सदस्य देखील त्यांच्या धाग्यावर आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेवर स्वतःची एक प्रतिक्रीया (ती देखील धागा खाली खाली निघाला की ) देऊन धागे वार आणत असतात. ह्या प्रकारामुळे इतर लेखनावर अन्याय होत नाही का? ४) अनेक सदस्य हे इथे केवळ स्वतःचे लेखन प्रकाशीत करण्यापुरते येतात. इतर कोणाच्याही धाग्यांवर त्यांचा वावर दिसत नाही. हे 'वाटचाल' पाहून देखील लक्षात येतेच. त्यांच्या बाबतीत काय धोरण ठरवता येईल ? ५) कित्येकदा उचलुन आणलेल्या कविता / लेखनाखाली त्याविषयी पुरावे देऊन देखील कारवाई होताना दिसत नाही. अर्थात संपादकांच्या व्यस्ततेचा आदर आहेच. सध्या येवढेच सुचत आहे आणि कावेरी हाका मारते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

बरोबर आहे

आनंदयात्री
गुरुवार, 06/09/2011 - 20:25 नवीन
बरोबर आहे. पण हे जरी खरे असले तरी जनरली ज्या पद्धतीने या लेखकांचा पाणउतारा होतो ते फारच टोचते. मिपावर येण्याचे इथे लिखाण करण्याचे आमंत्रण दिल्यावर 'इथले क्राउड कल्चर्ड नाही' असे सांगुन वर उदाहरणादाखल दोन-चार प्रतिसादांच्या लिंक तोंडावर मारल्या गेल्या होत्या. अश्या अनेकांच्या तक्रारी असाव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

एकदम बराबर ... भाऊ

प्रशांत
गुरुवार, 06/09/2011 - 22:09 नवीन
एकदम बराबर ... भाऊ +++++
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

मुद्दा क्र.

गवि
Fri, 06/10/2011 - 11:13 नवीन
मुद्दा क्रमांक १ आणि ३ शी सहमत आहे. नवीन लिखाण सुरु केले तेव्हा मीही या गोष्टी नकळत केल्या. त्याबद्दल सूचना आल्यावर नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून काहीसा अस्वस्थही झालो आणि त्यामुळेच त्यावर विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हतो. नंतर हळूहळू मिपाची रचना उलगडली तसे हे मुद्दे योग्यच आहेत हे स्वतःहून कळलं. मला मिपावर फार मोठ्या प्रमाणावर कौतुक मिळाले. बर्‍याचशा प्रतिक्रिया लेखन आवडल्याच्याच असतात. पण इतके होऊनही माझ्या शेवटच्या पोस्टवर टुकार असल्याची टीका आलीच आहे. अशा वेळी परा यांनी पूर्वी म्हटलेले एक वचन मी लक्षात ठेवतो: "तीस चाळीस चांगल्या प्रतिक्रियांनंतर एक प्रतिकूल प्रतिक्रिया आल्याने लेखक खचत असेल तर दोष लेखकाकडे जातो.." तेव्हा या कारणाने लिखाण थांबवावे असे अजिबात नव्हे. उलट त्यातला योग्य भाग स्वीकारुन आणि न पटणारे सोडून आपले लेखन चालूच ठेवावे असा सल्ला नवीन मेंबरांना द्यावासा वाटतो. मिपा हा मित्रांचा कट्टा आहे. त्यात असल्या गोष्टी होतच असतात. आता पहा ना.. माझ्या मिपावरच्या सुरुवातीच्या काळात पराभाऊंच्या टीकेमुळे माझ्या लेखनाच्या सुरुवातीसच काहीसा तणाव झाला खरा पण आम्ही सांगलीहून त्यांजसाठी आठवणीने भडंग आणून त्यांच्याशी दिलजमाई केली. ;) (देतो देतो पराभाऊ..थांबा जरा.. ;) ) त्यांनी मात्र आम्हास पुण्यात मस्तानी पाजली नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पण आम्ही सांगलीहून त्यांजसाठी

मृत्युन्जय
Fri, 06/10/2011 - 11:16 नवीन
पण आम्ही सांगलीहून त्यांजसाठी आठवणीने भडंग आणून त्यांच्याशी दिलजमाई केली. गविंवर टीका सुरु करावी म्हणतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवीचे लेखन खुप खुप खराब

नरेशकुमार
Fri, 06/10/2011 - 15:34 नवीन
गवीचे लेखन खुप खुप खराब असते. गवि लई लई वाईट्ट. दुश्ट. . . . आता मला पन भेळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नकु..

गवि
Fri, 06/10/2011 - 15:37 नवीन
डीटेल पत्ता व्यनि करा. पाठवतो.. येत्या काही दिवसात. एकदम ताजे मागवून..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

बर्‍याच अंशी शमत आहे. शिवाय

मृत्युन्जय
Fri, 06/10/2011 - 11:20 नवीन
बर्‍याच अंशी शमत आहे. शिवाय काही लोक अक्षरशः प्रत्येकाच्या खरडवहीत जाउन प्रतिक्रियांचा जोगवा मागताना दिसतात. त्यांच्याविषयी तिडीक येते. अश्याने खर्‍या प्रतिक्रिया कधीच मिळायच्या नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सहमत. अगदी १०१% सहमत.. वैताग

शिल्पा ब
Fri, 06/10/2011 - 11:27 नवीन
सहमत. अगदी १०१% सहमत.. वैताग मेला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

कोण करत अस?

गोगोल
Fri, 06/10/2011 - 17:29 नवीन
सांगा ना सांगा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सहमत.

आनंद
गुरुवार, 06/09/2011 - 19:50 नवीन
आणि वरती " ण " का आलाय ते ही लक्षात आल.
  • Log in or register to post comments

सहमत आहे. पण ज्या 'जुण्या'

अलख निरंजन
गुरुवार, 06/09/2011 - 20:21 नवीन
सहमत आहे. पण ज्या 'जुण्या' सदस्यांणा उद्देशुन हे णिवेदण आहे त्या जुण्या सदस्यांची प्रतिक्रिया कुठाय?
  • Log in or register to post comments

कित्ती बै काळजी तुम्हाला

टारझन
गुरुवार, 06/09/2011 - 20:33 नवीन
कित्ती बै काळजी तुम्हाला बाकी सदस्यांच्या प्रतिक्रीयांची :) मी तर अलख निरंजन यांची मिसळपाव वरील लेखांचा फॅण आहे ... किती मोलाचं योगदान आहे त्यांच :) ध्यनु धन्यु :) बाकी एकट्यासाठी णिवेदण आहे होय हे ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अलख निरंजन

उत्तम लिहीले आहे.

टारझन
गुरुवार, 06/09/2011 - 20:27 नवीन
सहमत आहे . आणि लेखकांना माझ्या कडुन जास्तित जास्त प्रोत्साहन मिळेल याची काळजी घेतल्या जाईल.
  • Log in or register to post comments

हे

विकास
गुरुवार, 06/09/2011 - 21:42 नवीन
लेखकांना माझ्या कडुन जास्तित जास्त प्रोत्साहन मिळेल याची काळजी घेतल्या जाईल. हे आश्वासन आहे का धमकी? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हा हा हा

टारझन
गुरुवार, 06/09/2011 - 22:13 नवीन
थोडा बदल ... "नविन लेखकांना " प्रोत्साहन दिल्या जाईल :) बाकी काही जुणे जाणते रिटायर झालेले, दळणदळु लेखक .. डोक्याला विट येईतो एकाच विषयावर कितीही टिका झाली तरी वैचारिक मलबद्धकोष्टिक लिहीतात .. त्यांना मात्र प्रोत्साहनाची गरज नाही .. किंवा टिके ने ते डिस्करेजही होत नाहीत .. आणि निलकांतच्या निवेदनात त्यांच्याविषयी काही भाष्यही नाही .. त्यांना नॉर्मलंच उत्तरं देऊ :) बाकी टिका करण्यावर निलकांत यांची बंदी नाही :) मिसळपाव चा उत्कर्ष व्हावा असे आम्हाला पुर्वीपासुन वाटत आले आहे , ह्याविषयी कोणाला दुमत असल्यास कळवावे :) सहकार्य पुर्वी पासुन होते त्यामुळे नव्याने आहे असे सांगणे जरुरी नाही :) बाकी धमकी की अश्वासन .. पब्लिक ला जे समजायचं तेच समजते ,, मग आपले शब्द का खर्ची करा ? :) - धमकीवडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

टिका आणि प्रयोजन

नीलकांत
गुरुवार, 06/09/2011 - 23:05 नवीन
कुणावरही टिका करण्यासाठी काही प्रयोजन आवश्यक आहे.कायमच टिका योग्य नाही. आणि त्यायोगे होणारं नकारात्मक वातावरण सुध्दा चांगलं नाही. नीलकांतचं व्यक्तिगत मत काय यापेक्षा मिसळपाव अधिकाधीक समृध्द कशाने होईल हे महत्वाचं. त्यामुळे टारझन कडून येत्या काळत अनेक चांगले लेख अपेक्षीत आहे तसेच अनेक सदस्यांना सकारात्मक प्रतिक्रिया देऊन प्रोत्साहित करताना सुध्दा बघायचे आहे. थोडक्यात काय तर मिपाचा उत्कर्ष व्हावा ही जी मनात सुप्त असलेली भावना आहे ती प्रत्यक्षात यावी आणि त्यासाठी थोडे प्रत्यक्ष काम सुध्दा व्हावे अशी माफक अपेक्षा आहे. अशीच अन्य प्रतिक्रियामात्र सदस्यांकडून सुध्दा अपेक्षा आहे की केवळ प्रतिक्रियांत आपली प्रतिभा दाखवून समोरच्याची अडवणूक करण्याचे एककलमी कार्य न करता लेख लिहा आणि शक्य तेवढ्यावेळ सकारात्मक चर्चा घडवून आणा ही विनंती. - नीलकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

१. लेख लिहुच लिहु .. (

टारझन
गुरुवार, 06/09/2011 - 23:19 नवीन
१. लेख लिहुच लिहु .. ( लिहीलेले आहेतही ) २. टिका लेखनावर असल्यास हरकत नकोय ही विनंती . लेखकावर व्यक्तिगत , जाति / शारिरिक किंवा अजुन पर्सनल टीका होत असेल तर आक्षेप ठिकंच . लेखनावरील टिके वर सुट मिळावी. ३. उठसुठ पाककृती .. चार ओळींच्या कविता , एकोळी धागे. .. किंवा फुसके काथ्याकुट .. ह्यांच्यावर बोटसुख घेण्यास थोडी सुट हवी. ( नविन सदस्यांनी केल्या तर समजु शकतो , अलिकडे जानेमाने आद्य लोकंही नवे धागे काढतात ते बघुन शरम वाटते :) ) ४. धोरण कडक ठेवल्यास "बापमेल्या सारखे सुतकी"* चेहरे करुन बसल्याचे फिलिंग संस्थळावर येईल असे वाटते . * : संस्थापक लिखीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

+१

सुधीर काळे
गुरुवार, 06/09/2011 - 20:43 नवीन
नीलकांत-जी, संपूर्ण सहमत. कांहीं चांगले लिहिण्यासारखे नसेल तर गप्प रहावे, कमीत कमी कुचेष्टा तरी करू नये. हा लेख प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एक reminder म्हणून पुनःप्रकाशित करावा असेच वाटते!
  • Log in or register to post comments

हा लेख प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एक reminder म्हणून..

सुधीर१३७
गुरुवार, 06/09/2011 - 21:47 नवीन
>>>>>हा लेख प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एक reminder म्हणून पुनःप्रकाशित करावा असेच वाटते! ...........पण महिनाअखेरला विसरले जाईल, त्याचे काय?............. :wink:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

सहमत आहे. चेष्टा /टीका/मस्करी

विजुभाऊ
गुरुवार, 06/09/2011 - 20:57 नवीन
सहमत आहे. चेष्टा /टीका/मस्करी ही सर्व सदस्यांच्या बाबतीत होत असते. मात्र कोणत्याही सदस्यांच्या बाबतीत ते मुद्दाम होऊन केली जात असेल तर मात्र ते चुकीचे आहे. नव्या सदस्याना मुद्दाम होऊन कोणी त्रास देत असेल असे वाटत नाही. जुने सदस्य त्याबाबतीत थोडे निर्ढावतात . इथले सदस्य थोडे थट्टेखोर आहेत खरे. नव्या सदस्याना रुळायला वेळ जाईल हे खरे
  • Log in or register to post comments

सहमत

सुधीर१३७
गुरुवार, 06/09/2011 - 21:48 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

आन्ना

ईन्टरफेल
गुरुवार, 06/09/2011 - 21:20 नवीन
आपल्याला जास्त काहि समजत नाहि तवा तुमि म्हनताल ति पुर्व दिशा आमाला काय ? वाचायच आहे एक मिसळपाव वाचक
  • Log in or register to post comments

पटले...

कौशी
गुरुवार, 06/09/2011 - 21:27 नवीन
अगदी बरोबर निलकान्त....सहमत आहे
  • Log in or register to post comments

सहमत ...

छोटा डॉन
गुरुवार, 06/09/2011 - 21:30 नवीन
असहमत होण्यासारखे काही असेल असे वाटत नाही. योग्य वेळी नेमके सांगणारे मनोगत आले ह्याचा आनंद वाटला, सर्वांनाच फायदा होईल व खास करुन नव्या सदस्यांना निश्चितच मदत होईल असे वाटते. सहकार्य आहेच :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

अगदीच....

इरसाल
गुरुवार, 06/09/2011 - 21:42 नवीन
नीलकांत साहेबांशी सहमत. विजुभौंनी दिलेल्या पाठींब्या नंतरही ह्याच कारण साठी लेख टाकायची हिम्मत झाली नाही म्हणून आतापर्यंत फक्त पाकृवरच भागवलेय.
  • Log in or register to post comments

सहमत आहेच!

पैसा
गुरुवार, 06/09/2011 - 21:50 नवीन
मला एक गोष्ट कळत नाही, मी नवीन सदस्य आहे की जुनी? म्हणजे मी नेमक्या कोणत्या बाजूला आहे? नवीन सदस्याना प्रोत्साहन द्यावं ही गोष्ट नक्कीच जाणीवपूर्वक केली पाहिजे. आणि बहुतेक वेळा ती इथे होते सुद्धा. मी मिसळपाववर आल्यापासून यशवंत कुलकर्णी, गगनविहारी यांच्यासारखे काही चांगले लिहिणारे नवीन सदस्य इथे आले. आणि सर्वानीच त्यांचं छान स्वागत केलं होतं. मी जेवढं काही लिहिलंय त्यावरही रॅगिंग म्हणण्यासारखं कधी काही झालं नाही. :) हे माझं नशीबच! पण नवीन सदस्यांकडून कोणत्या चुका होतात हे त्याना न दुखवता सांगण्याचं काम बिपिन कार्यकर्तेंसारखे काहीजण करत असतात. तसंच मी पण माझ्यापेक्षा नव्या सदस्याना जमेल तेवढी मदत माझ्याकडून करत असते. जर एखाद्याचं लिखाण मला आवडलं नाही तर तिथे काही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही, पण प्रत्येकजण वेगवेगळ्या स्वभावाचा असतो, त्यामुळे कधीकधी या जुन्या सदस्याला सामान्य वाटणारी, पण नव्या सदस्याला जरा जास्त वाटेल अशी चेष्टामस्करी कोणा जुन्या सदस्याकडून होते, हळूहळू नवीन सदस्य इथे रुळतात आणि तेही या मस्करीत सामील होतात. हे पूर्णपणे थांबणं शक्य नाही. पण वेळोवेळी अशा खोडकर सदस्याना जागेवर आणायचं काम जुने सदस्यच करत असतात. फक्त सगळ्यानीच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा हे श्रेयस्कर!
  • Log in or register to post comments

कोणी का असेना

Nile
गुरुवार, 06/09/2011 - 23:23 नवीन
आम्ही प्रतिसाद देताना नवा का जुना हे बघत नाही. कोणालाही प्रामाणिक प्रतिक्रीया देणं खोटी प्रोत्साहनपर प्रतिक्रीया देण्यापेक्षा मला जास्त महत्त्वाचं वाटतं. प्रामाणिक प्रतिक्रीयेमध्ये आवश्यकतेनुसार प्रोत्साहनही देण्याचा प्रयत्न असतो हे वे.सां.न.
  • Log in or register to post comments

एंट्रीलाच मदत...

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/09/2011 - 23:31 नवीन
मला येऊन जेमतेम १ महिनाच झाला आहे...तेंव्हा मला मराठीत अजिबात टाईप करता येत नव्हतं.आणी युयुत्सू यांनी ज्योतिष भाकित वर्तवल,आणी मलाही शांत बसवेना...मी सरळ ईंग्रजी लीपीत आव्हान टाकलं...त्याच्यावरही चित्रविचित्र प्रतिक्रीया आल्या...पण तेवढ्यात कोणीतरी ते देवनागरीत टाईप करुन मला बहुमोल मदत केली...त्या क्षणी मला मी योग्यठिकाणी वर्णी लावल्याचा आनंद झाला...नंतर मी मराठित टाईप करु लागलो व त्यातलीही प्राथमिक मदत अनेकांनी केली.आजचा वरील लेखही खुप सपोर्टिव्ह वाटतो आहे...त्यामुळे मला नविन काही लिहिताना बिनधास्त पणे लिहिता येईल...धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा