नखरा नाही इतका बरा
नखरा नाही इतका बरा
वेडं होईल कुणीही तुझ्या डोईचा गजरा पाहून
नखरा नाही इतका बरा ठेव हातचं थोडं राखून ||धृ||
अगदी सकाळी इतकी सजली
नाही कसर तू ठेवली कसली
मोगर्याची फुले वेणीत माळली
सुगंधी मन माझे कसे ठेवू मी झाकून ||१||
कुणी रंभा म्हणू की अप्सरा स्वर्गाची
तूला बघताच होई तगमग जीवाची
दागदागीने घालून रस्त्याने चालली
मागे नको ग पाहू अशी मान वळवून ||२||
तुझ्या नजरेला माझी नजर भिडली
पिवळ्या केवडी रंगानं जादू केली
प्रित दोन जीवांची जुळू लागली
नको झुरवू आता दुर उभी राहून ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२०/०५/२०११
व्वाहवा व्वाहवा
झकास लावणी!
मोगरा फुलला ! - (मोगराधारी)
अजून येऊ द्या.
लै भारी!
क्.ड्.क.
.....नखरा नाही इतका बरा .....
.....नखरा नाही इतका बरा .....
तिसरा फोटो पाहून अंमळ हळवा