गजर (Journey of the soul)
गजर (Journey of the soul)
लेखक-दिगदर्शक : अजित भैरवकर
कलाकार : चिन्मय मांडलेकर, सुखदा यश, एडवर्ड, सुहास शिरसाट
---
१८ दिवस चालणारी पंढरीची वारी आणि ज्ञानेश्वरीचे १८ अध्याय यांचा योग्य संगम (नाविन्यपुर्ण विचार) मला खुपच आवडला .. या एका कल्पनेसाठीच लेखकाला सलाम, अजोड परिश्रम.. वारीच्या खरा अनुभव .. खर्या वारीमध्ये १८ दिवस केलेले शुटींग.. वारीतील प्रसंग.. रिंगण आणि इतर प्रथा... आणि एका माणसाच्या जीवनात वारीमुळे होणारा योग्य बदल हे ह्या सिनेमाच्या मुख्य बाजु वाटतात ..
त्यातच वारीतल्या शेतकर्यांच्या थोड्याश्या कहाण्या.. शेतकर्यांबद्दल टाकण्यात येणारा थोडासा प्रकाश ( हा पुरेसा नाही हे माहित आहे.. पण तो पर्यत्न आवडला.. )विशेष करुन घरच्या परिस्थीतीला .. तेथे आपली गरज असतानाही अखंड हरिनामाचा गजर करण्यासाठी आलेले शेतकरी त्यांचे भाव.. त्यांचे मन छान पद्धतीने टिपले आहेत.
कॅमेरामॅन कोण असेन त्याने अतिशय सच्चे भाव टिपले आहेत वारकर्यांचे.
एका डोक्युमेंटरी होउ शकत असलेल्या विषयाला चित्ररुप आणताना .. आयुष्यात अर्जुनाप्रमाणे गोंधळलेला नायकामध्ये (पार्थ)या वारीमुळे झालेला परिणाम .. वारीतील लोकांच्या जगण्याचे .. आयुष्याचे ध्येय म्हणजे काय हे कळुन आपल्या घरातील पुर्वीपासुनच्या वारीच्या प्रथेबद्दल बोलतानाचा नायक उत्तम -
नेत्रदान.. शेतकरी समश्या.. या सामाजिक गोष्टीही जाता जाता वारीमध्ये दाखवुन, देण्यात येणारा सामाजिक संदेश मस्तच.
एडवर्ड मार्फत घेतलेले फोटो खरेच पाहण्यासारखे आहेत पिक्चर मध्ये..
एक अप्रतिम सुखद अनुभव होता पिक्चर पाहताना... छान वाटले .. वारीचा रीअल टच खरेच रीअल पणा देतात
आणि मी ही वारीला जाणार, तेथील अनुभव.. एकमेकांमध्ये अनोळखी असुनही वारकरी या एकाच नात्यात गुंतणार हे मनाशी पक्के झाले आहे.. पिक्चर पाहताना ही स्वताला वारीत असल्या सारखेच वाटत होते ...
अवांतर : (निगेटीव्ह)
तार्यांचे बेट आणि बालगंधर्व या दोन्ही जबरदस्त फिल्म मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.. आणि बालगंधर्व या सिनेमामुळे कदाचीत "गजर" झाकोळला ही गेला.. मी ही बालगंधर्व साठी गेलो होतो आणि "गजर" लागला होता म्हणुन पाहिला..
येव्हडा छान चित्रपट पण या दोन्ही बड्या चित्रपटांमध्ये उगाच प्रदर्शित झाला असे वाटले ..
नायिका नविनच आहे.. मला तरी अभिनय आवडला नाही तिचा..
पण औद्या मस्त साकरला गेला आहे ..आवडला एकदम.
सिनेमा तांत्रिक दृष्ट्या आणि अजुन बर्याचश्या भागात आनखिन उत्कृष्ट करता आला असता असे वाटले.. पहिला भाग हिंदीमिश्रित मराठी मुळे थोडा स्लो वाटला..आणि वारीच्या विषयात ही 'live-in relationship' मध्ये दाखवलेले नायक्-नायिका आवडले नाहित, पहिला भाग आवडला नाही.. (पण 'live-in relationship' मुळे नविन होतकरु कलाकाराची दयनिय स्थीती दाखवण्यास त्यामुळे कदाचीत मदत झाली असे वाटले)... दूसरा भाग उत्तम ग्रेट पहावाच असा आहे ..
गजर.. माउलीचा.. आणि माउली - माउली - माउली ऐकायला मस्त वाटले .. तरीही "झेंडा" सारखे आनखिन एखादेतरी उत्कृष्ट गाणे हवेच होते असे वाटले..
काहीही असले तरी सिनेमा खरेच पहाण्यासारखा आहे.. व्यवस्थीत लक्ष दिले तर ज्ञानेश्वरीच्या १८ अध्यायाप्रमाणे आपल्यात ही थोडा जरी बदल झाला तरी जन्माचे सार्थक आहे..
अतिअवांतर :
चित्रपट परिक्षण हे मी कधीच लिहिलेले नाही, त्यामुळे व्यवस्थीत पात्रानुसार काय घडते हे कसे लिहायचे हे न कळल्याने येथे चु.भु.दे.घे....
हे परिक्षण ही लिहिणार नव्हतोच.. पण तार्यांचे बेट आणि अगदी मिपावर ही "बालगंधर्व" सुपरहिट ठरल्यामुळे अजुन एक मराठी उत्कृष्ट-वेगळ्या विषयावरील ( पहिल्यांदाच वारीवर निर्मित झालेला सिनेमा) "गजर" चा कोणाला विसर पडु नये म्हणुन हा लेख. गजर बद्दल लिहिण्यापेक्षा-- गजर साठी लिहिलेला हा माध्यमवेध ...
प्रतिक्रिया
मस्त रे
मल्टीप्लेक्स प्रेक्षक ?
एकदा तरी पहाच
प्रथेप्रमाणे
यशस्वी
छान गजर, म्हणजे परीक्षण
छान