✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सत्य साईबाबांचे नावच गूढ

म
माझीही शॅम्पेन यांनी
Mon, 04/25/2011 - 08:22  ·  लेख
लेख
नुकताच सत्य साईबाबांचे निधन झाले ८६ वर्षाच्या महापुरुषचा चमत्कारी बाबचा अंत झाला १९४० साली त्यानी स्वता:ला आपण साईबाबांचे अवतार आहोत अस जाहीर केल. १९५४ साली पुत्तपर्थि येथे त्यानी पाहिल हॉस्पिटल काढल , पुढे अनेक ठिकाणी त्यानी कॉलेज , हॉस्पिटलस आणि यूनिवर्सिटी काढल्या. त्यानी कोट्यावधीची माया गोळा केली ( अर्थात बरीच संपत्ती वरील मार्गांनी चांगल्या कामासाठी वापरली सुध्धा) जागो जागी त्याचे देवसमान / तर देवंसोबत फोटो लावले पाहिले आहेत ( खास करून उडुपी हॉटेलात) चेपु आणि ट्विटर वर सध्या त्यांच्या संदेशाची रिघ लागली आहे आता दुसरी बाजू , नरेंद्र दाभोळकर / अनिस नि अंध-स्रद्धा निर्मूलनची सीडि मधे ते कसे हाथसफाई करून लोकाना फसवतात त्याचे विश्लेषण केल आहे , एका प्रसंगात स्वत शंकरराव चव्हाण ह्याच्या उपस्थितीत हे घडला आहे (पुढे त्यांचाच मुलाने ह्या बाबाना बोलावून त्याच्या पायाचे तीर्थ प्राशां केल होत) आता ह्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत , जाणकारणी थोडा प्रकाश टाकावा. १. जे सर्व-सामन्यना कळू शकते (जादू टोणा वैइगरे) ते ह्या सेलेब्रेटीना कळता कामा नये ? ह्याचा त्याना गुरु मानण्याचा उद्देश काय ? सचिन जे काही करतो आहे (उपास , अबोला वै.) ते माझ्या डोक्यापलीकडचे आहे २. ४० हजार करोड ची संपत्ती कशी गोळा केली असावी , त्याच्या ट्रस्ट वर संबधित सरकारने कधीच लक्ष दिल नाही का. तसेक त्यांच्या पश्यात त्याची मालकी वैइगरे हे विषय सोडुनच द्या ३. त्याना इतक्या लोकनी गुरू-स्थानी / देव-स्थानी मानया सारखी नक्की कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने त्याना स्पिरिचुयल गुरू वै संबोधल आहे. कित्येक करोड (किवा) लाख लोक त्याची अनुयायी व्हावेत अस नक्की काय झाल असाव ? (सदर लेख त्याच्यावर टीका करण्यासाठी लिहिला नाहीए , तस वाटल्यास संपादक मंडळानी लेख उडवून टाकावा अशी विनाती) ---------------------- माझीही शॅम्पेन
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
55440 वाचन

💬 प्रतिसाद (105)

प्रतिक्रिया

शंका

पंगा
Mon, 04/25/2011 - 18:40 नवीन
असे काही बघितले की सगळ्यात आधी 'ज्यानी आयुष्यात एकही पाप केले नाही, त्यानी पहिला दगड मारावा' ह्या कथेची आठवण होते
माझ्या समजुतीकरिता विचारतो. सध्या तावातावाने ह्या धाग्यावर बाबांच्या नावाने बोंबा ठोकणारे, त्यांच्या हातचलाखीचे पितळ 'वैग्रे' उघडे पाडणारे जे आहेत, ते (बाबांच्या हयातीत किंवा अन्यथा) स्वतःसुद्धा (कमीअधिक प्रमाणात) हातचलाखीचा धंदा करीत होते, असा काही आपला दावा आहे काय? असल्यास, त्याकरिता आधार काय असावा बरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

>>आणि हो एक विचारायचे

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 04/26/2011 - 12:48 नवीन
>>आणि हो एक विचारायचे राहिलेच. सध्या तावातावाने ह्या धाग्यावर बाबांच्या नावाने बोंबा ठोकणारे, त्यांच्या हातचलाखीचे पितळ वैग्रे उघडे पाडणारे बाबांच्या हयातीत काय करत होते? गेला बाजार त्यांनी आंतरजालावर एखादा लेख लिहून बाबांच्या भक्तांना सावध करण्याचा प्रयत्न तरी केला काय ? हे सर्व आरोप जुने आहेत. मी स्वतः यातील काही गोष्टी अंधश्रद्धा निर्मुलनच्या कार्यकर्त्यांकडून खूप जुन्या काळी ऐकलेल्या आठवतात. ज्या काळी आंतरजाल अस्तित्वात नव्हते तेव्हापासून चालू आहे. "बोंबा" ठोकणारे जुन्या काळापासून ठोकत आहेत, काही जणांनी त्या ऐकल्या नसतील तर त्याला "बोंबा" ठोकणारे काय करणार? तात्पर्य :- एखादी गोष्ट आपल्याला माहित नसते तेव्हा ती अस्तित्वात नसते असे नाही. >>हे थोर विचारवंत आता बाबांचे खरे रुप जगासमोर आणतील आणि मग स्वतः थोडा फार खर्च उचलुन बाबांची रुग्णसेवा पुढे नेतील अशी अपेक्षा. अवांतर :- असे काही बघितले की सगळ्यात आधी 'ज्यानी आयुष्यात एकही पाप केले नाही, त्यानी पहिला दगड मारावा' ह्या कथेची आठवण होते कुणी सांगावे, आरोप करणाऱ्यातले काही जण तरी त्यांच्या परीने आणि कुठेही गाजावाजा न करता करत असतीलही अशी मदत. ते करत नाहीत असे गृहीत का धरावे ? (तुमच्या अवांतर वाक्यातून तसे प्रतीत होते आहे.) तात्पर्य :- वरचेच ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मेहेंदळे आजोबा तुम्हाला पाचर

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/27/2011 - 14:33 नवीन
मेहेंदळे आजोबा तुम्हाला पाचर दिसले की शेपटीने त्याच्याशी खेळायची सवयच आहे का हो ? Image removed. Image removed. Image removed. Image removed. तुमच्या अगाध ज्ञानाविषयी कट्ट्याच्या दुसर्‍याच दिवशी समजल्याने तुम्हाला प्रतिउत्तर करायचे नाही असे मनोमन ठरवले होते. पण साला आमचा किडा पण गप्प बसेना म्हणुन उत्तर देत आहे.
हे सर्व आरोप जुने आहेत. मी स्वतः यातील काही गोष्टी अंधश्रद्धा निर्मुलनच्या कार्यकर्त्यांकडून खूप जुन्या काळी ऐकलेल्या आठवतात. ज्या काळी आंतरजाल अस्तित्वात नव्हते तेव्हापासून चालू आहे. "बोंबा" ठोकणारे जुन्या काळापासून ठोकत आहेत, काही जणांनी त्या ऐकल्या नसतील तर त्याला "बोंबा" ठोकणारे काय करणार? तात्पर्य :- एखादी गोष्ट आपल्याला माहित नसते तेव्हा ती अस्तित्वात नसते असे नाही.
येवढे बिनकामाचे अगाध ज्ञान, त्यातील अंधश्रद्धा निर्मुलनचे कार्यकर्ते वैग्रे फालतु तपशील टंकण्याच्या आधी पक्त :-
आणि हो एक विचारायचे राहिलेच. सध्या तावातावाने ह्या धाग्यावर बाबांच्या नावाने बोंबा ठोकणारे, त्यांच्या हातचलाखीचे पितळ वैग्रे उघडे पाडणारे बाबांच्या हयातीत काय करत होते? गेला बाजार त्यांनी आंतरजालावर एखादा लेख लिहून बाबांच्या भक्तांना सावध करण्याचा प्रयत्न तरी केला काय ?
हे अधोरेखीत शब्द वाचले किंवा समजावुन घेतले असतेत तर किती बरे झाले असते :) पण काय आहे ना, जुने स्कोर सेटल करायची इतकी घाई झालेली असते की काय लिहिले आहे ते निट न वाचताच त्याच्या विरुद्ध लिहिण्याची घाई... असो... ह्यापुढे तुमच्या लेखनाची दखल घेईनच असे नाही (फालतु वेळ असेल तर आणि सविता भाभी अपडेट झाले नसेल तर धागा उघडीन पुन्हा कदाचित). त्यामुळे उगाच रागारागाने, संतापाने अजुन हातभर ज्ञान टंकु नका. उगाच टंकनाचे कष्ट वाया. ;) सत्य साई तुम्हाला बुद्धी देवोत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हा हा हा

आनंदयात्री
गुरुवार, 04/28/2011 - 00:03 नवीन
हा हा हा !!! हलकट आहेस .. बाकी पराशी सहमत आहे. अगदी योग्य दृष्टिकोण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

>>मेहेंदळे आजोबा तुम्हाला

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 04/28/2011 - 16:48 नवीन
>>मेहेंदळे आजोबा तुम्हाला पाचर दिसले की शेपटीने त्याच्याशी खेळायची सवयच आहे का हो ? नाही. नाठाळांची शेपटी दिसली की तिला अडकवण्याची सवय आहे. तुम्हाला अनुभव आला आहेच. विसरला असाल तर स्वतःची शेपटी निरखून बघा. >>तुमच्या अगाध ज्ञानाविषयी कट्ट्याच्या दुसर्‍याच दिवशी समजल्याने तुम्हाला प्रतिउत्तर करायचे नाही असे मनोमन ठरवले होते. पण साला आमचा किडा पण गप्प बसेना म्हणुन उत्तर देत आहे. अरेच्या !!! वृत्तांतात तर आमच्या अगाध ज्ञानाविषयी काही आले नव्हते. हेरखाते आहे तुमचे की नुसताच कल्पनाविलास ?? बाकी लोकमान्य टिळक म्हणून गेलेच आहेत की दिडकीची भांग घेतली की वाट्टेल तितक्या कल्पना सुचतात. तेव्हा, तुमचे चालू द्या... >>हे अधोरेखीत शब्द वाचले किंवा समजावुन घेतले असतेत तर किती बरे झाले असते >>गेला बाजार त्यांनी आंतरजालावर एखादा लेख लिहून बाबांच्या भक्तांना सावध करण्याचा प्रयत्न तरी केला काय ? कूपकथेतील मंडूककुमार साहेब, तुम्ही वाचता तितकेच जाल नाही आहे हो. थोडा शोध घ्या, बुवाबाजी या विषयावर ५०-१०० धागे येऊन गेले आहेत. तुमच्या कडे रिकामा वेळ बराच असतो असे दिसते. तेव्हा त्याचा सदुपयोग करून ते धागे वाचा आणि "अभ्यास वाढवा". इथले कमी पडले तर उपक्रमावर पण बरेच आहेत. आता इथे ५-१० ओळींचा प्रतिसाद लिहिणाऱ्यानेच आधी सत्यसाईबाबावरच लिहिले पाहिजे असा तुमचा आग्रह असेल तर गोष्ट वेगळी. तरीही ज्यांनी ज्यांनी अशा "बोंबा ठोकल्या", त्यातल्या कुणीच आधी काही लिहिले नव्हते असा तर्क नाही काढता येत. (माफ करा, चुकलो, तुम्हाला चक्क तर्कशुद्ध विचार करायला सांगतो आहे. सॉरी हं.) बाकी, जमले तर खाली Nile यांनी दिलेला प्रतिसाद पण वाचा. स्कोर "वैग्रे" बद्दल उत्तर मागे दिले होते. ते "पक्त" पुन्हा वाचा. >>ह्यापुढे तुमच्या लेखनाची दखल घेईनच असे नाही. नका घेऊ, झेपत नाही तुम्हाला. >>सत्य साई तुम्हाला बुद्धी देवोत =)) ओरिजिनल देवाने मला दिली तेवढी बुद्धी पुरेशी आहे. सत्य साईने दिलेल्या बुद्धीचा स्पेसिमेन तुम्ही असाल तर.... बापरे... मुळीच नको. आजचा श्लोक :- आधीच मर्कट तशातची मद्य प्याला.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

कै च्या कै

Nile
Tue, 04/26/2011 - 01:48 नवीन
सध्या तावातावाने ह्या धाग्यावर बाबांच्या नावाने बोंबा ठोकणारे, त्यांच्या हातचलाखीचे पितळ वैग्रे उघडे पाडणारे बाबांच्या हयातीत काय करत होते? गेला बाजार त्यांनी आंतरजालावर एखादा लेख लिहून बाबांच्या भक्तांना सावध करण्याचा प्रयत्न तरी केला काय ? हे थोर विचारवंत आता बाबांचे खरे रुप जगासमोर आणतील आणि मग स्वतः थोडा फार खर्च उचलुन बाबांची रुग्णसेवा पुढे नेतील अशी अपेक्षा.
बाबांच्या हयातीत अनेकदा टिका वगैरे झाली आहे हे वरती मेहेंदळ्यांनी लिहले आहेच. पण ह्या मुद्द्याचे इथे कारण काय? पुर्वी समजा इथे बोंब ठोकणार्‍यांपैकी एखाद्याने काही केले नसेल म्हणून इथे करु नये असे कुठल्या धर्मग्रंथात लिहले आहे काय? मुळात धाग्याचा अन लेखकाचा उद्देशच चर्चा करणे हा आहे हे असताना, तसे व्यासपीठ उभे केले असताना पुर्वी काय केले हे विचारणे अस्थायी आहे. शिवाय आंतरजालावर एखादा लेख लिहणे म्हणजेच काहीतरी करणे नाही. अश्या भोंदु बाबांबाबत आपल्या घरातल्यांनाही सावध करणे म्हणजे कामगीरीच आहे. आणि रुग्णसेवाच केली पाहिजे असे नाही. अश्या भोंदूंपासून लोकांना सावध करणे हे ही महत्त्वाचे कार्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

किंचित दुरुस्ती

पंगा
Tue, 04/26/2011 - 02:12 नवीन
पुर्वी काय केले हे विचारणे अस्थायी आहे.
'अस्थायी' नव्हे. 'अस्थानी'. 'अस्थानी' बोले तो, out of place. 'अस्थायी' बोले तो, unstable. अर्थाचा अनर्थ होतो, म्हणून ही सुचवण. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

धन्यवाद.

Nile
Tue, 04/26/2011 - 02:17 नवीन
गलती से मिश्टेक हो गया. चुक सुधारल्या बद्दल धन्यवाद. स्वगतः च्यायला शाळेत नीट मराठी शिकलो असतो तर.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

पंगा, चांगलेच मराठी बोलायला

पाषाणभेद
Tue, 04/26/2011 - 02:26 नवीन
पंगा, चांगलेच मराठी बोलायला लागला रे बाबा तू आता. अचूक दुरूस्ती करायलाही लागला आताशा. प्रगती उत्तम आहे. कोणत्या मास्तरांची शिकवणी लावली? बाकी चालू दे. चर्चा भन्नाट चालली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

चेपु आणि ट्विटर वर सध्या

अमोल केळकर
Mon, 04/25/2011 - 15:32 नवीन
चेपु आणि ट्विटर वर सध्या त्यांच्या संदेशाची रिघ लागली आहे यातील चेपु म्हणजे काय ? :( अमोल केळकर
  • Log in or register to post comments

थोबाडवही

गवि
Mon, 04/25/2011 - 15:35 नवीन
असावी बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

-

अमोल केळकर
Mon, 04/25/2011 - 15:44 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आमचा देवच या भोंदुगीरीच्या

गणपा
Mon, 04/25/2011 - 16:00 नवीन
आमचा देवच या भोंदुगीरीच्या जाळात अडललेला पाहुन अतिव यातना झाल्या. बाकी आपला शिर्डिचे साईबाबा आणि संत गाडगेबाबा सोडले तर अन्य कुठल्याच बाबा, भाई,माई, माता, माँ वर विश्वास नाही.
  • Log in or register to post comments

आमचा देवच या भोंदुगीरीच्या

टारझन
Mon, 04/25/2011 - 16:02 नवीन
आमचा देवच या भोंदुगीरीच्या जाळात अडललेला पाहुन अतिव यातना झाल्या.
आपण आपल्या देवाला फक्त क्रिकेट फिल्ड पुरते लिमिटेड ठेवले आणि त्याच्या वैयक्तिक जिवनात माणुस म्हणुन पाहिल्यास यातना कमी होऊ शकतात. :)
बाकी आपला एक शिर्डिचे साईबाबा सोडले तर अन्य कुठल्याच बाबा, भाई,माई, माता, माँ वर विश्वास नाही.
बास , अजुन काही बोलणे नाही :) - सत्यसाई हेयर कटिंग सैलुन आमचे कडे विविध प्रकारचे केस पिंजुन मिळतील. मुंज व दहाव्याच्या ऑर्डरी स्विकारतो . पत्ता : पिंपळाच्या झाडाखाली , गटरीच्यावर , झिपरे चाळ , अस्वलगल्ली , मेंढरपाल (पश्चिम)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आपण आपल्या देवाला फक्त

गणपा
Mon, 04/25/2011 - 16:47 नवीन
आपण आपल्या देवाला फक्त क्रिकेट फिल्ड पुरते लिमिटेड ठेवले आणि त्याच्या वैयक्तिक जिवनात माणुस म्हणुन पाहिल्यास यातना कमी होऊ शकतात.
खरयं टार्‍या तुझं. पण काये ना या नावा भवतीच वलयंच अस आहे की त्याला क्रिकेट फिल्ड पुरते लिमिटेड ठेवणं जड जातं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अतिअवांतर शंका

पंगा
Mon, 04/25/2011 - 18:44 नवीन
मुंज व दहाव्याच्या ऑर्डरी स्विकारतो .
मुंजीला आणि दहाव्याला केस पिंजू कधीपासून लागले? की हा पुण्यातले सायकलरिपेरवाले सहसा ष्टोदुरुस्तीचीही कामे करतात (/ करत असत), तशातला काही प्रकार आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मुंजीला आणि दहाव्याला केस

माझीही शॅम्पेन
Tue, 04/26/2011 - 05:56 नवीन
मुंजीला आणि दहाव्याला केस पिंजू कधीपासून लागले? की हा पुण्यातले सायकलरिपेरवाले सहसा ष्टोदुरुस्तीचीही कामे करतात (/ करत असत), तशातला काही प्रकार आहे?
पार खपलो ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

हा विनोद

आनंदयात्री
गुरुवार, 04/28/2011 - 00:09 नवीन
>>की हा पुण्यातले सायकलरिपेरवाले सहसा ष्टोदुरुस्तीचीही कामे करतात (/ करत असत), तशातला काही प्रकार आहे? जर (हा विनोद असेल तर) { प्रतिसाद.टंका ("हा हा हा ... पंगाशेठशी नाईलाजाने सहमत."); } (वरचा स्युडो कोड कंपाईल होईल याची ग्यारंटी नाही, कृपया त्यावरुन हात धुवुन मागे लागु नये.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

आमचा देवच या भोंदुगीरीच्या

गणेशा
Mon, 04/25/2011 - 16:37 नवीन
आमचा देवच या भोंदुगीरीच्या जाळात अडललेला पाहुन अतिव यातना झाल्या.
तुमचा देव .. सचिन ? काही प्रश्न पडलेत मला .. मला ही सचिन खुप आवडतो .. त्याचे डेडीकेशन .. डाउन टु अर्थ आचार्-विचार .. खेळ .. आनि इतर .. पण म्हणुन जर त्याला देव म्हणत असताल तर असेच इतर लाखो लोग कोणाला तरी बाबा महाराज .. गुरु असे त्यांना वाटत असलेल्या आपुलकीने मानत असतील तर .. त्यांची कारणे काहीही असु शकतात.. फक्त चमत्कार असेच कारण नसु ही शकेल . म्हणजे आपला तो देव .. बाकीच्यांचा तो राक्षस अशी नविन म्हण प्रस्थापित होउ शकते आहे असे वाटते .... असो .. सत्य साईबाबा ह्यांच्या बद्दल मला तरी ते मरे पर्यंत काहीच जास्त माहिती नव्हते.. त्यामुळे आता न्युज वर किंवा येथे कोणी काहीही बोलले (चांगले -वाईट) त्याकडे मी तरी दुरक्ष करत आहे... कारण त्याचा आता काहीच फायदा नाहिये ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आमचा देवच या भोंदुगीरीच्या

गणेशा
Mon, 04/25/2011 - 16:37 नवीन
आमचा देवच या भोंदुगीरीच्या जाळात अडललेला पाहुन अतिव यातना झाल्या.
तुमचा देव .. सचिन ? काही प्रश्न पडलेत मला .. मला ही सचिन खुप आवडतो .. त्याचे डेडीकेशन .. डाउन टु अर्थ आचार्-विचार .. खेळ .. आनि इतर .. पण म्हणुन जर त्याला देव म्हणत असताल तर असेच इतर लाखो लोग कोणाला तरी बाबा महाराज .. गुरु असे त्यांना वाटत असलेल्या आपुलकीने मानत असतील तर .. त्यांची कारणे काहीही असु शकतात.. फक्त चमत्कार असेच कारण नसु ही शकेल . म्हणजे आपला तो देव .. बाकीच्यांचा तो राक्षस अशी नविन म्हण प्रस्थापित होउ शकते आहे असे वाटते .... असो .. सत्य साईबाबा ह्यांच्या बद्दल मला तरी ते मरे पर्यंत काहीच जास्त माहिती नव्हते.. त्यामुळे आता न्युज वर किंवा येथे कोणी काहीही बोलले (चांगले -वाईट) त्याकडे मी तरी दुरक्ष करत आहे... कारण त्याचा आता काहीच फायदा नाहिये ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

बा गणेशा, खाली स्पावड्याला

गणपा
Mon, 04/25/2011 - 17:04 नवीन
बा गणेशा, खाली स्पावड्याला दिलेलं उत्तर वाच. बाकी सचिन ने कसलेसे चमत्कार करुन कुणाला लुबाडल्याच ऐकिवात नाही. उलट अधुन मधुन त्याचा मदतीचा हात कसा सुटतो ह्या बातम्या ऐकल्या आहेत. असो, जर नकळत कुणाच्या बाबाच्या लंगोटी/धोतराच्या कासोट्याला हात घातला असेल तर क्षमस्व. या धाग्यावर उगाच आवांतर नको. खवत स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

प्र.का.टा.आ.

गणेशा
Mon, 04/25/2011 - 16:50 नवीन
प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

गंपाशी सहमत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/25/2011 - 20:19 नवीन
आमचा देवच या भोंदुगीरीच्या जाळात अडललेला पाहुन अतिव यातना झाल्या. गणपाशी सहमत आहे. मला तर उगाच मानसिक त्रास झाला. बाकी, सचिन एक हाडामासाचा माणूस आहे आणि त्याच्या स्वत:च्या अशा काही श्रद्धा- भावना आहेत याच्याशी सहमत होता येईल. पण कालच्या घटनेने सचिनने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, नाष्टा केला नाही, आणि आज सच्याला रडतांना पाहून [सच्यानं रडू नये असे म्हणायचं नाही. पण, हवेत हात फिरवून सोन्याची लॉकेटं काढणार्‍या माणसासाठी इतकं भाविनक व्हावं. ] सालं आपलं वेडं क्रिकेट प्रेम आवरलं पाहिजे असं वाटायला लागलं आहे. :( भविष्यात सच्या असा म्हणाला की, माझा स्क्वेअर कट, पुल,स्ट्रेट ड्राईव्ह, थर्डमॅनच्या खेळाडूच्या डोक्यावरुन मारलेला सिक्स, पॅडल स्वीप, आणि क्रिकेटच्या पुस्तकात नसलेले फटक्यांची प्रेरणा 'बाबा'च आहेत असे म्हटले तर मी काहीही वाटून घेणार नाही. :( अवांतर : पुट्टापर्थीच्या या राजूबाबानं जाता-जाता लै प्रॉब्लेम वाढवून ठेवले आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

सालं आपलं वेडं क्रिकेट प्रेम

वपाडाव
Wed, 04/27/2011 - 16:20 नवीन
सालं आपलं वेडं क्रिकेट प्रेम आवरलं पाहिजे असं वाटायला लागलं आहे.
अगदी बरोब्बर.. मैदानाबाहेर तो एक व्यक्तिमत्व म्हणुन त्याच्या विचारांना स्थान देण्याची गरज आहे असे वाट्टे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

-१

स्पा
Mon, 04/25/2011 - 16:05 नवीन
बाकी आपला शिर्डिचे साईबाबा आणि संत गाडगेबाबा सोडले तर अन्य कुठल्याच बाबा, भाई,माई, माता, माँ वर विश्वास नाही. गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, अक्कलकोटचे स्वामीसमर्थ महाराज हे पण भोन्दुच होते म्हणायचे
  • Log in or register to post comments

गजानन महाराज, गोंदवलेकर

टारझन
Mon, 04/25/2011 - 16:11 नवीन
गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, अक्कलकोटचे स्वामीसमर्थ महाराज हे पण भोन्दुच होते म्हणायचे
अमेरिकेट शरिरभर टॅटू काढुन हार्ले डेव्हिडसन वर आर्धे कलिंगड घालुन फिरणारांना गोंदवलेकर महाराज म्हणतात , ते कधी पासुन नॉन भोंदु झाले ? :) अधिक प्रकाश संपादिकेने टाकावा ;) बाकी गजानन म्हाराज म्हणजे तेच का , दिगंबर अवस्थेत चिलीम ओढणारे ? त्यांनी त्यांच्या वर्तनातुन व्यसनं करण्याचा संदेश दिल्यामुळे मला ते आवडत नाहीत. बाकी स्वामीसमर्थ लोकांना शिवीगाळ करायचे , उद्धट बोलायचे असे ऐकुन आहे . अर्थात कोणाच्या भावना दुखवने हा हेतु नसला तरी काही ऐकीव फॅक्ट्स उघड कराव्याश्या वाटल्या :) आणि मुद्दान सत्यसाईबाबाच्या धाग्यावर बाकी श्रद्धास्थाने घुसवणार्‍या मोन आगाशेचे कौतिक वाटले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

टारझन राव, तुमच्या

किसन शिंदे
Mon, 04/25/2011 - 17:05 नवीन
टारझन राव, तुमच्या प्रतिक्रियेमुळे नुकत्याच ढकलपत्रातून आलेल्या एका खळबळजनक लेखाची आठवण झाली. हवा असल्यास पाठवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मलाही पाठवुन सोडा की...

शैलेन्द्र
Wed, 04/27/2011 - 23:44 नवीन
मलाही पाठवुन सोडा की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

तु ज्यांना गोंदवलेकर म्हणतोस

मृत्युन्जय
Mon, 04/25/2011 - 17:21 नवीन
तु ज्यांना गोंदवलेकर म्हणतोस ते महाराज नाहीत आणि स्पावड्या म्हणतो ते भोंदु नाहीत. बाकी तुमचे चालु द्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

सहमत आहे. इतकंच म्हणतो.

llपुण्याचे पेशवेll
Tue, 04/26/2011 - 18:53 नवीन
सहमत आहे. इतकंच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

गजानन महाराज, गोंदवलेकर

गणपा
Mon, 04/25/2011 - 16:31 नवीन
गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, अक्कलकोटचे स्वामीसमर्थ महाराज हे पण भोन्दुच होते म्हणायचे
स्पावड्या माझं वाक्य पुन्हा एकदा नीट वाच बरं. बाकी आपला * शिर्डिचे साईबाबा आणि संत गाडगेबाबा सोडले तर अन्य कुठल्याच बाबा, भाई,माई, माता, माँ वर विश्वास नाही. *इथे हा शब्द स्वतःबद्दल आदरार्थी बहुवचन म्हणुन वापरलाय. (आता इतर कुणी आदर देत नसला म्हणुन स्वतः पण देउ नये की काय ? ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बाबा - सन्त - महात्मा - भोन्दू - देव - नो मोअर प्लीज

Dr Santosh Jalukar
Mon, 04/25/2011 - 16:58 नवीन
आपले तेह्तीस कोटि देव काय कमी अहेत? नवे नवे बाबा मन्ड्ली कशाला हवेत? श्रद्धेने देव भक्ति करा, तेच खूप अहे. सन्त ज्ञानेश्वर, तुकाराम अहेत ना. उद्या मी पण असेच कहितरि बाबा म्हणून प्रसिद्धि च्या मगे लागू शकतो. ह्याला अन्त नाही....कुठे तरि शेवट झालाच पहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बाकी चालु द्या

वेताळ
Mon, 04/25/2011 - 19:48 नवीन
सत्य साई स्वःता देव होते असे त्यानी जाहिर केले असताना देखिल त्यांचे हरामखोर भक्त त्याना बर वाटावे म्हणुन इतर देवांची प्रार्थना करत होते,त्यामुळे सत्यसाइबाबानी देह त्याग केला.ही अंतर्गत गोट्यातील बातमी आहे. स्वामी समर्थ हे शिवराळ होते हे सत्य आहे कारण विनाकारण लोक त्याच्या भोवती जमा होवुन त्याना उगाचच पिडत असत. समर्थानी पैसे जमा करुन कधीच कोठे आश्रम किंवा वाडा बांधला नाही. एक लंगोट सोडली तरी त्यानी काहीच जवळ बाळगले नाही.त्याच्याशी तुलना पाहुन वाईट वाटले.
  • Log in or register to post comments

ही अंतर्गत गोट्यातील बातमी

माझीही शॅम्पेन
Tue, 04/26/2011 - 06:02 नवीन
ही अंतर्गत गोट्यातील बातमी आहे
हरे राम ! राम राम हरे हरे ! कोण कुठूनप्राण-त्याग करेल ते काही सांगता येत नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

=)) फुटलो

गणपा
Tue, 04/26/2011 - 06:15 नवीन
=)) फुटलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

चुकुन "फुटल्या " असे वाचले

टारझन
Tue, 04/26/2011 - 13:01 नवीन
चुकुन "फुटल्या " असे वाचले =)) =)) - सट्टा साईबाबा वर्गणी देण्यासाठी खरडवहीचा वापर करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

थोडी उकल

रमताराम
Mon, 04/25/2011 - 21:02 नवीन
ढिस्क्लेमरः आपण सत्यसाईबाबाच काय कोणत्याच बाबाचा वा देवाचा भक्त नाही. इथे एक सूर असा दिसतो आहे की चमत्कार हे खोटे असल्याने बाबाही खोटा आहे. हा तर्क थोडा फसतो आहे असे आमचे मत आहे. चमत्कार ही हातचलाखी असेल म्हणून सोडून देऊ. पण केवळ त्यांच्या चमत्कारांना भुलून एवढी प्रचंड भक्तगणांची संख्या त्यांच्यामागे जाईल हे म्हणणे धाडसाचे आहे. ती हातचलाखी कदाचित मार्केटिंग गिमिक असू शकेल पण केवळ तेवढ्यानेच माणूस एवढा बडा अध्यात्मिक गुरू होते म्हणणे अंमळ अतिशयोक्ती करणारे ठरेल आणि बहुसंख्य सेलेब्रिटी भगतगण डोक्याने एखाद्या अशिक्षित माणसाच्या पातळीवर आहेत असे म्हटल्यासारखे होईल. हा त्यांच्यावर अन्याय आहे असे मला वाटते. तात्पर्य, त्या चमत्कारापलिकडे असे काय होते की ज्यामुळे हा माणूस एवढा मोठा झाला याचे उत्तर प्रथम द्यावे लागेल, मग ते योग्य/अयोग्य, नैतिक/अनैतिक आहे याबाबत चर्चा करता येईल. थोडक्यात त्यांची शिकवण काय होती, तिचा गाभा काय होता, ते अध्यात्मिक अनुभूती कोणत्या मार्गाने साध्य करू पहात होते, त्यांचे मार्ग कोणते होते हे प्रथम पहावे लागेल. त्याचे मूल्यमापन करूनच त्यांच्या मोठेपणाबद्दल अथवा खोटेपणाबद्दल निश्चित विधान करणे योग्य ठरेल. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सवलती वगैरेंबद्दल परस्परविरोधी विधाने ऐकण्यात आली आहेत. वर एका हत्येचा आरोपही आला आहे. (असाच आरोप एका शंकराचार्यांवर आहे अशी आमची माहिती आहे.) त्यावरून कदाचित एक माणूस म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रश्नचिन्ह नक्कीच लावता येईल. परंतु त्यांचे अध्यात्मिक गुरू म्हणून असलेले स्थान त्यामुळे बाधित होत नाही, शंकराचार्यांचेही नाही वा सत्यसाईबाबांचेही. त्यासाठी त्यांच्या शिकवणीतील विसंगती, घातक मूल्ये इ. बाबत सप्रमाण विधाने यायला हवीत. तरच ते स्थान डळमळीत होईल. आणि आतापर्यंत आलेल्या प्रतिसादात अशा प्रकारचे मूल्यमापन मला दिसले नाही. ढिस्क्लेमर २: मला स्वत:ला सत्यसाईबाबांच्या शिकवणुकीबाबत काडीचीही माहिती नसल्याने त्याबाबत काहीही विधान करण्यास मी 'इलिजिबल' आहे असे मला वाटत नाही. परंतु त्यांचे तथाकथित चमत्कार हे हातचलाखीचे प्रकार होते यावर - समोर आलेले पुरावे पुरेसे वाटल्याने - माझा विश्वास आहे.
  • Log in or register to post comments

काही मुद्दे

Nile
Tue, 04/26/2011 - 01:43 नवीन
सुरुवात अशा हातचलाखीने झालेली असु शकते. सुरुवात करताना लोकांना चमत्काराने भुलवुन एकदा पंथ गोळा झाला की मग तो वाढवणे म्हणजे व्यवस्थापन स्कील. त्यामुळे चमत्कार करण्याचे दावे महत्त्वाचे आहेत असे मला वाटते. (घासू गुर्जींनी यावर मागे लेखात सविस्तर चर्चा केली होती.) अर्थात ते चमत्कार जाहीररीत्या करतात हे माहितच असेल, म्हणजे चमत्कार हे शस्त्र ते प्रसार प्रचाराकरता वापरतात हे नाकारता येणार नाही. त्यांचा इंटरनेटवर शोध घेतला असता ४-५ 'ओळखींमध्ये' पहिल्या तीनात त्यांच्या चमत्काराचा उल्लेख आहे. म्हणजे ते चमत्कारा करता (मुळे सुद्धा) ओळखले जातात हे नाकारता येणार नाही. मुळात बाबा जर मोठे अध्यात्मिक (की फिद्यात्मिक) असतील तर त्यांना अशा खालच्या दर्जाची हातचलाखी करण्याचे कारण काय असा प्रश्न का विचारु नये? एखादी व्यक्ती फ्रॉड करत असेल तर तिच्या इतर कृत्यांवर संशय येणे सहाजिकच आहे. त्याशिवाय बाबांवर फार पूर्वीपासुन आरोप आहेत. यु ट्युबवर त्याची बहुतेक तासाभराची डॉक्यु मिळेल, त्याशिवायही अनेक लेख/आर्टिकल्स शोध घेउन मिळतील. बाबांनी लहानमुलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप सुद्धा त्यांच्यावर आहेत. वरती किडनी वगैरे आरोपही झाले आहेत. इतकी संपत्ती असलेल्या बाबा लोकांना भारतात सदर प्रकरणे दडपणे अवघड नाही. (यावरुन आठवले, नित्यानंद स्वामींची दाक्षिणात्य नटीबरोबर त्याच्या शयनगृहात केलेल्या शृंगाराच्या कहाणीचे पुढे काय झाले? सहजच शोध घेता असे दिसते की नित्यानंद ज्ञानपीठाच्या लोकांनी त्या व्हिडीओचे कॉपीराईट सांगून जवळजवळ संपूर्ण इंटरनेटावरुन तो व्हिडीओ काढून टाकला आहे. युट्युब प्लेअरचा एकही व्हिडीओ दिसत नाही. असे असता, सचिन इतर राजकिय नेत्यांनी पब्लिकली तरी त्यांचे भक्त असल्याचे दाखवू सूद्धा नये, अशाने त्यांचे महत्त्वच वाढते. सचिन वैयक्तिक जीवनात अंधश्रद्धाळू आहे हे सर्वांना माहित आहे, त्याच्या आणी खेळाचा काही संबंध नाही, पण "इफ यु आर अ पब्लिक पर्सन यु डोन्ट हॅव अ प्राईव्हेट लाईफ".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

किंचित अवांतर मुद्दा

पंगा
Tue, 04/26/2011 - 16:05 नवीन
मुळात बाबा जर मोठे अध्यात्मिक (की फिद्यात्मिक) असतील तर त्यांना अशा खालच्या दर्जाची हातचलाखी करण्याचे कारण काय असा प्रश्न का विचारु नये? एखादी व्यक्ती फ्रॉड करत असेल तर तिच्या इतर कृत्यांवर संशय येणे सहाजिकच आहे.
कल्पना नाही. येशूच्या खात्यावरदेखील लोकांना हस्तस्पर्श करून बरे करणे, बुधल्यातील पाण्याची हस्तस्पर्शाने दारू* करणे, वगैरे 'चमत्कार' दर्ज आहेत. * मागे पुण्यात 'पेट्रोलमधील एथॅनोलमुळे टाकीत पाणी साचते' वगैरे दावे झाल्याचे ऐकले होते, त्या एथॅनोलचे मूळ 'असले' काही असावे काय, अशी शंका येऊ लागते. (प्रतिसादाच्या उर्वरित भागाशी सहमत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मेलं झिपरं तिच्यायचं एकदाच ..

Nile
Tue, 04/26/2011 - 01:56 नवीन
मेलं झिपरं तिच्यायचं एकदाच .. बरी सुटका झाली .. त्याचं तोंड पाहिलं की मेंढराची आठवण यायची =))
आमची प्रतिक्रीया अशीच आहे. खरं फार लवकर मरायला हवा होता पण मेला एकदाचा. आम्हीतर तो सुदिन साजरा केला.
  • Log in or register to post comments

९०% मते सत्यसाईबाबा देव

पाषाणभेद
Tue, 04/26/2011 - 02:07 नवीन
९०% मते सत्यसाईबाबा देव नव्हते असे आहेत. आज मला अशा मतांचा आग्रह असणार्‍या मिपाचा सभासद असण्याचा आनंद होतो आहे. त्यांना मिळणार्‍या दानातून त्यांनी हॉस्पीटल्स काढली, हे केले, ते केले. अरे ते सारे मोठ्या लोकांनी दिलेल्या पैशातून केले ना? हे सारे करतांना एवढी संप्पती मागे कशी राहीली? तिचा विनीयोग कसा केला नाही? वर गणपा म्हटला तेच खरे. सत्यसाईबाबा गेल्यानंतर रडणार्‍यांचे मगरीचे अशृ आहेत असे वाटते.
  • Log in or register to post comments

रोचक लेख.

आत्मशून्य
Tue, 04/26/2011 - 02:14 नवीन
प्रतीक्रीया पण वास्तववादी.
  • Log in or register to post comments

आमचा क्रिकेट चा देव सुद्धा

निनाद मुक्काम …
Tue, 04/26/2011 - 03:36 नवीन
आमचा क्रिकेट चा देव सुद्धा रडला . अवांतर आम्ही कधीपासून कल्की अवताराची वाट पाहत आहोत . आमचे साई भक्तांच्या हाकेला ओ देऊन मृत्युच्या दाढेतून परत आले होते . हा साई फकीर म्हणून प्रसिद्ध होता . असो ते ४०००० कोटी सरकार च्या तिजोरीत जमा करा सिंधुताई सकपाळ ह्यांना अजून पुरेशी अनाथ मुलांसाठी मदत मिळाली नाही आहे .आणी ह्यांना मात्र एवढे ................ सर्व पैसा सेवाभावी संस्थांना व विधार्भातील व भारतातील शेतकऱ्याला द्या .
  • Log in or register to post comments

अरे वा

चिरोटा
Tue, 04/26/2011 - 14:13 नवीन
४०००० कोटी सरकार च्या तिजोरीत जमा करा
अरे वा. आणि मग आपले सरकारी मंत्री/नोकरशहा तोच पैसा स्विस बँकेत ठेवणार आणि आपल्या पोराबाळांचे कल्याण करणार. सत्य साई हॉस्पिटल पाहिले आहे का? नसेल तर एकदा तेथील सेवा,सुविधा पाहून या. समाजातला एक उपेक्षित गरीब वर्ग बाबांच्या निधनाने का हळहळला असावा ते कळेल. तिथे दिल्या जाणार्‍या सुविधांबद्दल अब्दुल कलाम काय म्हणतात पहा- I can see god's mission being carried out here. The doctors and staff looked to me as angels अनेक डॉक्टर्स्,तज्ञ तेथे मोफत सुविधा पुरवतात. सत्य साईबाबा चमत्कार करतात म्हणून हे सगळे झूट आहे, ही बनवाबनवी आहे असे वाटत असेल तर प्रश्न मिटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

पण तरीबी सरपंच शंकरभाऊच !!

टारझन
Tue, 04/26/2011 - 14:22 नवीन
पण तरीबी सरपंच शंकरभाऊच !! -टोयोटा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

@चिरोटा साहेब लोकांनी दिलेली

निनाद मुक्काम …
Sat, 04/30/2011 - 01:56 नवीन
@चिरोटा साहेब लोकांनी दिलेली संपत्ती लोकांसाठी खर्च करणारे साईबाबा मोठे आणी बरेच काही ............ तर स्व कष्टाने मिळवलेले अब्जावधी संपत्ती मधील अर्धी समाजासाठी देणारे बिल गेट्स व वॉरेन साहेबांना काय म्हणायचे . अगदी भारतातील उदाहरण द्यायचे तर जाणता राजा ह्या महा नाट्यातून मिळालेली संपत्ती शिव सृष्टी निर्माण करण्यासाठी खर्च करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे ह्यांना काय म्हणायचे .? अभय बंग किंवा प्रकाश आपटे .व कोणत्याही वी आय पी व श्रींमत देणगीदार नसतांना अनाथांची आई असलेल्या सकपाळ बाईंना काय म्हणायचे ? व जो गरीब वर्ग त्यांच्या मृत्युनंतर रडला त्यांना अंत्य दर्शन सचिन सारखे व्यवस्थित घेता आले का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

+१

माझीही शॅम्पेन
Sat, 04/30/2011 - 18:31 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

सत्य साईबाबांच्या निधनाची

अविनाशकुलकर्णी
Tue, 04/26/2011 - 21:01 नवीन
सत्य साईबाबांच्या निधनाची वार्ता समजल्या वर लक्षावधिंच्या गळ्यातला ताईत सचिन याने वाढ दिवस साजरा केला नाहि.. स्वतास खोलीत कोंडुन घेतले... तसेच बाबांच्या अंत्यदर्शनाला गेला असता त्यास अश्रु आवरले गेले नाहि..या गोष्टीवर ब~याच ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात आली.... तसेच मिडियाने पण याला अमाप प्रसिद्धि दिली...खरे तर..अनेक देशविदेशातिल मान्यवर बांबांच्या निधनाने व्यथित झाले हदरले...पण फोकस व चर्चा सचिन बाबत होति.. सचिनची बाबा वर असलेली श्रद्धा लोकांना खटकते असे चित्र आहे का?
  • Log in or register to post comments

नक्की

चिरोटा
Wed, 04/27/2011 - 15:52 नवीन
नक्की माहित नाही. पण नेहमी 'समाज प्रबोधना'चे काम करणार्‍या मराठी वृत्तपत्रांनी मात्र मौन बाळगणेच पसंत केलेय. सामना,लोक्सता,मटा कोणीच साईबाबांविषयी अग्रलेख लिहिलेला दिसत नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

त्रिकोण का चौथा कोन

विकास
Wed, 04/27/2011 - 18:23 नवीन
मी काही सत्य श्री साईबाबांना भेटलेलो नाही त्यामुळे त्यांच्याबद्दलचे सर्वच ऐकीव. म्हणून त्यांचा समर्थकही नाही अथवा विरोधकही नाही. त्यामुळे खालील प्रतिसाद हा देखील समर्थन अथवा विरोधातला नाही... मात्र येथे त्यांच्यावर तोंडसुख घेणार्‍यांना इतके नक्की विचारावेसे वाटते की त्यांनी अथवा त्यांच्या गणंगांनी तुम्हाला फसवले आहे का की ज्यामुळे आज इतके तावातावाने बोलावेसे वाटते? जर तसे असेल तर अवश्य अनुभव येथे सांगावात... बाकी त्यांच्या बद्दलच्या चमत्कारांबद्दल आणि सेवांबद्दलच बोलायचे असले तर तसे मदर तेरेसांबद्दलही बोलता येईल, ज्यांना तर जगाने नोबेल पारीतोषिक दिले आणि भारत सरकारने भारतरत्न दिले... इतकेच नाही तर अंत्ययात्रेस जो मान राष्ट्रपिता गांधीजींना दिला होता तो दिला गेला. त्यांच्या चमत्काराला पोपने मान्यता दिली आणि संतपदासाठी पुढे नेले. नशिब! आपल्याकडे पब्लीकच बाजूने अथवा विरोधात ठरवून एखाद्याला संत करते अथवा गुंड ठरवते! पण त्यांच्यावर कधी अशी टिका कोणी केल्याचे आठवत नाही. (हे मी मिपाकरांना उद्देशूण म्हणत नाही. मला माहीत आहे, तेंव्हा मिपा नव्हते. :-) कुठल्याही व्यक्तीस नाही पण ह्या वृत्तीस नक्कीच उद्देशून बोलत आहे). बाकी. रमताराम यांच्या प्रतिसादाशी सहमत. प्रकाशरावांनी दिलेले उदाहरण जर एकमेवच असेल आणि ते देखील चित्रलेखेतले असले तर केवळ त्यावर अवलंबून राहून निष्कर्ष काढणे मला योग्य वाटणार नाही. कारण नाईलने भारतात प्रकरणे जशी दाबता येतात असे म्हणले आहे, त्याच्या उलट पण म्हणता येते. (खोटी प्रकरणे तयार करता येतात). असे म्हणताना मी प्रकाशरावांवर अविश्वास दाखवत नाही आहे! :-) कलामांच्या हिंदूस्थान टाईम्स मधील लेखातील साईबाबांच्या सामाजिक कार्याबद्दलचे ठळक मुद्दे जाणवले ते असे: Value-Based Education, Water Mission, Healthcare, Project Management. प्रतिभा पाटलांनी देखील त्यांच्या शोकसंदेशात याच गोष्टीवर भर दिला आहे. आयबीएन वरील माहितीप्रमाणे:
The demise of Satya Sai Baba came as a deep shock for those are engaged in various social programmes launched by the godman through his trust in Andhra Pradesh. Prominent among the programmes started by the Sathya Sai Central Trust is Sri Satya Village Integrated Programme (SSVIP) under which 212 villages in East Godavari district were provided drinking water in a phased manner. Another programme, the Sri Sathya Sai Drinking Water Project (SSSDWP), launched on January 20, 2008, covers 25 tribal-dominated villages in East and West Godavari districts, an official of the project said on Sunday.
अजून काही माहिती येथे देखील मिळेल. आता राहीला सचिनचा प्रश्न. तो पब्लीक फिगर असला तरी त्याच्या कर्तुत्वावर आहे. जर त्याला कोणी म्हणाले असते की त्याने स्वतःपेक्षा मोठ्या, गुजराथी मुलीशी लग्न का केले, तर आपण ऐकून घेऊ का? तो त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे. तेच साईबाबांसंदर्भात मी समजेन. त्याने कधी कुणाला साईबाबांच्या मागे लागा म्हणून सांगितले नाही की पैसे द्या म्हणून सांगितले नाही. बर सचिनचा आदर्शच घेयचा असेल तर त्याने त्याच्यावर अचानक आलेल्या दु:खद प्रसंगाला देखील संयमित तोंड देऊन १९९९ साली परत वर्ल्ड कप खेळायला जायला कमी केले नव्हते आणि कर्तव्यात (कामात नाही) चुकारपणा केला नव्हता, ते का नाही लक्षात ठेवायचे? आजही भले त्याच्या डोळ्यातून पाणी आले असेल आणि खोली बंद केली असेल, पण तो माध्यमांच्या मागे लागला होता का की कसेही करा आणि याला प्रसिद्धी द्या म्हणून? शिवाय त्यावेळेतही त्याचे कर्तव्य करण्यात तो चुकार ठरला आहे का? मग कशाला त्याला नावे ठेवा?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा