व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना
लेखनविषय:
काव्यरस
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना
मामा अहो मामा,
तुमच्या पोरीला काय समजवाना
फोन केला तर म्हनती,
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||धृ||
कालच आणला मोबाईल नवा
मार्केटमधी लई त्याची हवा
वाटतंय तिनं एकदा तो पहावा
पण तिची भेटच होत नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||१||
आता सगळं कसं सांगू तुमाला
मोबाईलचा हायटेक जमाना आला
तिला सारं काही समजते
रोजरोज एसऐमएस पाठवते
पर व्हायब्रेटर ही काही रिंगटोन नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||२||
मी म्हनलं आपण एकदा भेटूका?
मोबाईलचं टेकनीक समजून देवूका?
तुझ्या हातात माझा मोबाईल देतो
एकएक मेनूचा डेमो देतो
पन असली चेष्टा बरी नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०४/२०११
वाचने
3434
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
वाह........
वॉव
हाअ!! हा! पाभे!! एकदम हायटेक
मस्त एकदम .. दादा कोंडकेच
हा हा हा भारी ! साला ह्या
लय भारी......
=)) =)) =))
हाण हाण
ख्या ख्या ख्या...खी खी
विनोद किती जणाना
In reply to विनोद किती जणाना by ईश आपटे
तुम्हाला समजला का?
सच्या, मस्त रे !!
हॅहॅहॅ