✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ओरिजिनल म्हणी

P
Pearl यांनी
Fri, 02/25/2011 - 10:01  ·  लेख
लेख
कालच मला १ इंटरेस्टिंग गोष्ट कळाली. (इंटरेस्टिंग ला तंतोतंत समानार्थी शब्द सुचवा. मला तरी आत्ता सुचत नाहिये :-/) आपण वर्षानुवर्षे वापरत असलेल्या २ म्हणींचे खरे रूप कळाले. त्या २ म्हणी आहेत, १) पुराणातली वांगी पुराणात २) अठरा विश्वे दारिद्र्य (लहानपणी ह्या म्हणींचा अर्थ मला खरेच कधी लागला नव्हता. नंतर मी तो लावून घेतला ;-)) पण या म्हणी अपभ्रंश झालेल्या म्हणी असून ओरिजिनल म्हणी अशा आहेत १) पुराणातली वानगी पुराणात (वानगी = दाखला, उदाहरण) २) अठरा विसे दारिद्र्य (याचा अर्थ असा आहे की १८ * २० = ३६०. म्हणजेच वर्षातले ३६५ पैकी ३६० दिवस दारिद्र्य, जेमतेम ५ दिवस खायला मिळते.) तुम्हालाही मराठी शब्द/म्हणी/वाक्प्रचार शी संबंधित अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी मराठी शब्द/म्हणी/वाक्प्रचार माहिती असतील तर शेअर करा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
43069 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

मूळ रूप महिती नव्हतं हे पण

मी ऋचा
Tue, 03/01/2011 - 11:44 नवीन
मूळ रूप महिती नव्हतं हे पण आवडलंच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

वा !

प्राजक्ता पवार
Fri, 02/25/2011 - 17:23 नवीन
म्हणींबद्दल अनेक 'इंटरेस्टिंग' गोष्टी कळल्यात. :)
  • Log in or register to post comments

"गावदेवीला नव्हता नवरा न

तुषार घवी
Fri, 02/25/2011 - 17:31 नवीन
"गावदेवीला नव्हता नवरा न झोटिन्गाला नव्हती बायको" ही पण अशीच एक 'इंटरेस्टिंग'म्हण कशी तयार झाली असेल ही म्हण?
  • Log in or register to post comments

म्हण

नितिन थत्ते
Fri, 02/25/2011 - 20:38 नवीन
ही म्हण "सटवाईला नाही नवरा आणि म्हसोबाला नाही बायको" अशी ऐकलेली आहे. "मला पहा आणि फुलं वहा" ही म्हण अलिकडेच नव्याने ऐकायला मिळाली. अवांतर: आम्हाला बर्‍याच कोकणी म्हणी माहिती आहेत पण त्या इथे लिहिण्यासारख्या नाहीत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार घवी

"गावदेवीला नव्हता नवरा न

तुषार घवी
Sat, 02/26/2011 - 10:04 नवीन
"गावदेवीला नव्हता नवरा न झोटिन्गाला नव्हती बायको" फी म्हण डहाणू भागात फार प्रसिद्ध आहे. तुम्ही म्हणता ती म्हणही ऐकलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

"मला पहा आणि फुलं वहा" आमची

वपाडाव
Mon, 02/28/2011 - 14:24 नवीन
"मला पहा आणि फुलं वहा"
आमची प्रगती-पुस्तके हातात पडली की हिच म्हण ऐकण्याची पद्धत आम्हाला बानं लावुन दिलि व्हती. वर्षातुन ३-४ वेळा ऐकयलाच लागे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अठरा विश्वे दारिद्र ?

रोमना
Fri, 02/25/2011 - 17:49 नवीन
दुवा काही अर्थ लागतोय का?
  • Log in or register to post comments

अठरा विश्वे दारिद्र ?

रोमना
Fri, 02/25/2011 - 17:51 नवीन
दुवा काही अर्थ लागतोय का?
  • Log in or register to post comments

http://mhani.tripod.com/ http

नरेशकुमार
Fri, 02/25/2011 - 18:08 नवीन
http://mhani.tripod.com/ http://marathiforum.9.forumer.com/index.php?s=111dac6f7d0894e07961f4d8e1b816f5&showtopic=27 http://www.marathimazi.co.in/search/label/Marathi%20Mhani
  • Log in or register to post comments

म्हणींचे पुस्तक

तुषार घवी
Fri, 02/25/2011 - 18:12 नवीन
खालील लिन्क वर म्हणींचा सन्ग्रह मिळेल. http://www.marathipustake.org/books/leni.pdf
  • Log in or register to post comments

१. भितीने 'गाळण' उडणे. २.

मराठे
Fri, 02/25/2011 - 19:02 नवीन
१. भितीने 'गाळण' उडणे. २. पाचावर धारण बसणे. ह्या वाक्प्रचारांचा उगम माहित आहे का?
  • Log in or register to post comments

गाढव हि गेले अन ब्रह्मचर्य हि

अविनाशकुलकर्णी
Fri, 02/25/2011 - 19:32 नवीन
गाढव हि गेले अन ब्रह्मचर्य हि गेले हाति धुपाटणे आले... ह्या म्हणीचा उगम कुणी सांगु शकेल का?
  • Log in or register to post comments

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय

पर्नल नेने मराठे
Sat, 02/26/2011 - 15:26 नवीन
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय चित्रपटातुन... कावळ्याच्या हातात दिला कारभार न त्याने घाण करुन भरला सगळा दरबार !!! आजीच्या तोन्डुन.. मुगींस मुताचा पुर =)) =)) एका मराठी चित्रपटातुन.. १)घेणे न देणे न फुकटच कंदिल लावणे. २) आल घोड्यावरुन न गेल गाढवावरुन.
  • Log in or register to post comments

मुगींस मुताचा पुर =))

टारझन
Sat, 02/26/2011 - 16:14 नवीन
मुगींस मुताचा पुर =)) =))
ह्याच म्हणीसाठी जंग जंग पछाडत होतो गेल्या पावसाळ्यापासुन :) बाकी आमची चुचु म्हणजे "केसभर गजरा आणि गावभर नजरा " बरोबर ना गं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

केस हवेत न गजरा घालायला =))

पर्नल नेने मराठे
Sat, 02/26/2011 - 16:20 नवीन
केस हवेत न गजरा घालायला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अगं म्हण आहे ती ... बरं केस

टारझन
Sat, 02/26/2011 - 16:39 नवीन
अगं म्हण आहे ती ... बरं केस नाही तर मग अजुन एक म्हण आहे माझ्या पोतडीत . खाली मुंडी आणि पाताळ धुंडी .. आता मुंडी नाही असे म्हणु णकोस !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

खाली कशाला करेन मुन्दी :ओ

पर्नल नेने मराठे
Sat, 02/26/2011 - 16:53 नवीन
खाली कशाला करेन मुन्दी :ओ कोणाला घाब्रतेय कि काय ;) हवे तर 'वर मुन्डी न पाताळ धुण्दी' असे कर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

रिकामा न्हावी कुडाला तुंबड्या लावी

कापूसकोन्ड्या
Sat, 02/26/2011 - 20:55 नवीन
माझा एक शब्द प्रभू मित्र आहे. एकदा आमच्या ऑफिसात काही परप्रांतीय मित्र आले होते.त्याना वरील म्हण इंग्रजी मध्ये भाषांतर हवे होते. त्याने ते असे केले. when the barber is free he shaves tree
  • Log in or register to post comments

) अठरा विसे दारिद्र्य (याचा

अप्पा जोगळेकर
Sat, 02/26/2011 - 23:32 नवीन
) अठरा विसे दारिद्र्य (याचा अर्थ असा आहे की १८ * २० = ३६०. म्हणजेच वर्षातले ३६५ पैकी ३६० दिवस दारिद्र्य, जेमतेम ५ दिवस खायला मिळते.) अनेक वर्षांपूर्वी हे एका मासिकात वाचले होते पण ते पटण्यासारखे नाही. जसे १८*२० = ३६०तसेच ३६*१० = ३६० ५*७२ = ३६० असे अवयव पाडून असंख्य व्युत्पत्ती जन्माला येउ शकतील. यामागे काही एक निश्चित लॉजिक असायला हवे. पूर्वीच्या काळी वीस दिवसांचा एक महिना असे काही होते का ? जाणकारांनी प्रकाश टाकावा. झोपा केला बैलाला बांधून ठेवण्याच्या दोरीला झोपा म्हणतात असा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments

थोडं माझ्याकडुन पण

५० फक्त
Sun, 02/27/2011 - 23:46 नवीन
१) मूग गिळणे - आई आपल्या लेकीला सांगत असते की सासरी गेल्यावर कोणि रागावुन बोलायला लागलं की तोंडात मुग धरुन ते मउ होईपर्यंत गप्प बसणे, - बहुधा मुग तोंडात भिजायला जेवढा वेळ लागत असेल तेवढ्यात समोरच्याचा राग शांत होईल यासाठी असावं असं. ६)म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो - एखाद्या वाईट गोष्टीचा पायंडा पडु नये याची खबरदारी घेणे, जसे आपण आपले काम लवकर होण्यासाठी सरकारी कर्मचा-याला लाच देतो, पण नंतर तो प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मागायला लागतो म्हणुन एखादं काम झालं नाहीतरी चालेल पण लाच देण्याची सुरुवातच करु नका तसे. आपलं काम झालं नाही तरी (म्हातारी मेली तरी ) चालेल पण एखाद्याला पैसे घेण्याची सवय लागु नये ( काळ सोकावु नये ) ७) रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी (यात तुंबड्या म्हणजे काय?) - फार पुर्वी काही विशिष्ट त्वचारोगात व रक्तदोषांमध्ये शरिरातिल एखादयाच ठिकांणाचे रक्त काढुन टाकावे लागे, त्यासाठी शहनाई सारख्या तुंबडिचा उपयोग केला जात असे. तुंबडीचे तोंड फार छोटे व लवचिक असे, शरिरावर जिथले रक्त किंवा जखमेतील घाण काढायची असेल, तिथे न्हावी त्याच्या वस्त-याने एक छोटा घाव करी व त्यावर तुंबडिचे तोंड ठेवुन तिच्या दुस-या बाजुने रक्त किंवा तो द्राव ओढुन काढी. यावरुन जेंव्हा न्हावी रिकामा असेल तेंव्हा तो ही तुंबडी भिंतीला लावुन बसे असे म्हणण्याची प्रथा पडली. ८) साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण - हे साठा उत्तराची कहाणि असं आहे, हे बहुधा श्रावणांत वाचण्यात येणा-या कहाण्यांच्या शेवटी असतं. माझा अंदाज असा आहे 'उत्तरी हे 'उतारा' याचं बोली रुप असावं.
  • Log in or register to post comments

अजून एक

विकास
Mon, 02/28/2011 - 01:00 नवीन
अजून एक आठवली: शिकारीच्या वेळेस कुत्र परसकडेस. =))
  • Log in or register to post comments

लंकेची पार्वती ...............

पिलीयन रायडर
Tue, 03/01/2011 - 13:10 नवीन
लंकेची पार्वती होणे... पार्वती लंकेची कशी असेल? तर याची कथा अशी आहे कि कुणीतरी रावणास असे सांगितले कि शंकराची बायको पार्वती अत्यंत सुंदर आहे.. तिला मिळवण्याची अभिलाषा निर्माण झाल्याने रावणाने अतिशय कठोर तप केले व शंकरास प्रसन्न करून पार्वतीस मागितले.. शंकरास प्रश्न पडला कि आता काय करावे? त्यांनी विष्णू देवाला विचारले. तेव्हा त्यांनी एक उपाय सांगितला.. त्यांनी पार्वतीस रावणा सोबत पाठवले. जेव्हा लंका जवळ आली तेवा त्यांनी रूप बदलून रावणास येऊन सांगितले कि "अरे तुला फसवले, हि पार्वती नाहीच.. खरी पार्वती तर शंकराच्या आसना खाली बेडकी च्या रुपात लपवली आहे..." रावणाने जेव्हा पार्वतीकडे पहिले तेव्हा माये च्या प्रभावानी ओंगळ, दरिद्री दिसू लागली. रावणाने रागात जाऊन शंकरास आसना खालची बेडकी मागितली. शंकराने त्यास ती दिली. आता हि बेडकी शापित मंदोदरी होती जिला शाप होता कि जोवर तिला ब्राह्मण राक्षस येऊन स्पर्श करणार नाही तोवर तिला बेडकी बनून राहावे लागेल. रावणाचा स्पर्श होताच ती मंदोदरी झाली. तीई मुळातच सुंदर असल्याने रावण तिच्यावर भाळला व तिला घेऊन गेला... म्हणून लंकेची पार्वती म्हणजे दरिद्री स्त्री... असा मला माझ्या आईनी सांगितलाय... आता ह्यात फरक असू शकेल...
  • Log in or register to post comments

मंदोदरी सुंदर असल्याने रावण

वपाडाव
Tue, 03/01/2011 - 14:54 नवीन
मंदोदरी सुंदर असल्याने रावण तिच्यावर भाळला व तिला घेऊन गेला...
शेवटी काय? मनुष्यच तो... प्रकृतीच त्याची ललनांवर भाळण्याची.. -सखाराम बायंडर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

शेवटी काय? मनुष्यच तो...

टारझन
Tue, 03/01/2011 - 15:14 नवीन
शेवटी काय? मनुष्यच तो...
रावण माझ्या मते हायब्रीड होता ... राक्षस आणि ब्राम्हण च्या ब्रिड चे मिक्सचर .. अधीक प्रकाश रावणाचे नातेवाईक ... उप्स .. जाणकार टाकतील .. !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा