Skip to main content

ओरिजिनल म्हणी

लेखक Pearl यांनी शुक्रवार, 25/02/2011 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
कालच मला १ इंटरेस्टिंग गोष्ट कळाली. (इंटरेस्टिंग ला तंतोतंत समानार्थी शब्द सुचवा. मला तरी आत्ता सुचत नाहिये :-/) आपण वर्षानुवर्षे वापरत असलेल्या २ म्हणींचे खरे रूप कळाले. त्या २ म्हणी आहेत, १) पुराणातली वांगी पुराणात २) अठरा विश्वे दारिद्र्य (लहानपणी ह्या म्हणींचा अर्थ मला खरेच कधी लागला नव्हता. नंतर मी तो लावून घेतला ;-)) पण या म्हणी अपभ्रंश झालेल्या म्हणी असून ओरिजिनल म्हणी अशा आहेत १) पुराणातली वानगी पुराणात (वानगी = दाखला, उदाहरण) २) अठरा विसे दारिद्र्य (याचा अर्थ असा आहे की १८ * २० = ३६०. म्हणजेच वर्षातले ३६५ पैकी ३६० दिवस दारिद्र्य, जेमतेम ५ दिवस खायला मिळते.) तुम्हालाही मराठी शब्द/म्हणी/वाक्प्रचार शी संबंधित अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी मराठी शब्द/म्हणी/वाक्प्रचार माहिती असतील तर शेअर करा.

वाचने 43216
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

अजून एक आठवली: शिकारीच्या वेळेस कुत्र परसकडेस. =))

लंकेची पार्वती होणे... पार्वती लंकेची कशी असेल? तर याची कथा अशी आहे कि कुणीतरी रावणास असे सांगितले कि शंकराची बायको पार्वती अत्यंत सुंदर आहे.. तिला मिळवण्याची अभिलाषा निर्माण झाल्याने रावणाने अतिशय कठोर तप केले व शंकरास प्रसन्न करून पार्वतीस मागितले.. शंकरास प्रश्न पडला कि आता काय करावे? त्यांनी विष्णू देवाला विचारले. तेव्हा त्यांनी एक उपाय सांगितला.. त्यांनी पार्वतीस रावणा सोबत पाठवले. जेव्हा लंका जवळ आली तेवा त्यांनी रूप बदलून रावणास येऊन सांगितले कि "अरे तुला फसवले, हि पार्वती नाहीच.. खरी पार्वती तर शंकराच्या आसना खाली बेडकी च्या रुपात लपवली आहे..." रावणाने जेव्हा पार्वतीकडे पहिले तेव्हा माये च्या प्रभावानी ओंगळ, दरिद्री दिसू लागली. रावणाने रागात जाऊन शंकरास आसना खालची बेडकी मागितली. शंकराने त्यास ती दिली. आता हि बेडकी शापित मंदोदरी होती जिला शाप होता कि जोवर तिला ब्राह्मण राक्षस येऊन स्पर्श करणार नाही तोवर तिला बेडकी बनून राहावे लागेल. रावणाचा स्पर्श होताच ती मंदोदरी झाली. तीई मुळातच सुंदर असल्याने रावण तिच्यावर भाळला व तिला घेऊन गेला... म्हणून लंकेची पार्वती म्हणजे दरिद्री स्त्री... असा मला माझ्या आईनी सांगितलाय... आता ह्यात फरक असू शकेल...

In reply to by पिलीयन रायडर

मंदोदरी सुंदर असल्याने रावण तिच्यावर भाळला व तिला घेऊन गेला...
शेवटी काय? मनुष्यच तो... प्रकृतीच त्याची ललनांवर भाळण्याची.. -सखाराम बायंडर

In reply to by वपाडाव

शेवटी काय? मनुष्यच तो...
रावण माझ्या मते हायब्रीड होता ... राक्षस आणि ब्राम्हण च्या ब्रिड चे मिक्सचर .. अधीक प्रकाश रावणाचे नातेवाईक ... उप्स .. जाणकार टाकतील .. !