एकदा एका झुरळाने घेतला, शाळेमध्ये प्रवेश;
सर्वात पुढच्या बाकावर बसले, घालून कोरा गणवेश.
बाई येताच उडी मारुन, ते चाळू लागले मस्टर;
घाबरुन जाऊन, फेकून मारले, बाईंनी त्याला डस्टर.
झुरळाच्या पाठीत धपकन बसला, भलताच जोरात दणका;
तुटला बहुदा कमरेचा त्याच्या, दुसरा – तिसरा मणका.
सुसाट त्याने गाठली, समोरच्या भिंतीमधली भेग;
शिक्षण राहू दे बाजूला, आपली लांबूनच बरी भेट!!
काव्यरस
वाचने
2075
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे आठवले
ढेकुण डास आणि झुरळ, तिनही
हे बालगीतही आवडले हो
बालगीत म्हणुन छान
छान आहे बालगीत.
मस्त आहे.