✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रंजना देशमुख.

ग
गणपा यांनी
गुरुवार, 01/27/2011 - 17:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
51875 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

अवखळ

गवि
गुरुवार, 01/27/2011 - 17:52 नवीन
रंजना ही अभिनेत्री जरी जरा थोराड असली तरी तिने तरुण अवखळ रोल ही केल्याचं आठवतं. एका कुठल्यातरी सिनेमात डबलरोल होता. दोन बहिणी असल्याचे दाखवत.. एक साधी एक मॉड. इ इ. बादवे या धाग्याचा विषय मर्यादित का ठेवला.. मराठी गाण्यांवरही धमाल चालू होती. त्याचाही समावेश करायला हवा होता.
  • Log in or register to post comments

गुपचुप गुपचुप

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 01/27/2011 - 17:56 नवीन
एका कुठल्यातरी सिनेमात डबलरोल होता. दोन बहिणी असल्याचे दाखवत.. एक साधी एक मॉड. इ इ.
"गुपचुप गुपचुप" हे त्या पिक्चरचं नाव. धमाल पिक्चर आहे तो; ती ज्या पद्धतीने अशोक सराफला "अहो, धोंऽड" म्हणून हाक मारते ते एकदम मस्तच वाटतं. त्याच पिक्चरमधलं पाहिले न मी तुला हे गाणंही छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ती ज्या पद्धतीने अशोक सराफला

मेघवेडा
गुरुवार, 01/27/2011 - 18:38 नवीन
ती ज्या पद्धतीने अशोक सराफला "अहो, धोंऽड" म्हणून हाक मारते ते एकदम मस्तच वाटतं.
त्यापेक्षा अधिक पेक्युलीयर अशोक सराफ ज्यापद्धतीने दोन्ही कोपरांनी पँट वर करत "आमी धोंऽऽड" म्हणतो ते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी अगदी. मिडीया प्लेयर वर

स्वानन्द
गुरुवार, 01/27/2011 - 21:41 नवीन
अगदी अगदी. मिडीया प्लेयर वर मराठी गाणी चालू असतात, अचानक 'पाहिले न मी तुला' हे गाणं लागतं आणि त्यानंतर तीच गाणं किमान २-३ वेळा ऐकलं जातंच. आणि त्याबरोबर आठवतो रंजना आणि अशोक सराफचा गुपचुप गुपचुप मधला झकास अभिनय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

"चानी" (नाव नक्की आठवत नाही

नन्दादीप
गुरुवार, 01/27/2011 - 18:07 नवीन
"चानी" (नाव नक्की आठवत नाही पण त्या प्रमुख पात्राचे नाव चानी होते.) हा देखील त्यांचाच चित्रपट होता का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हो चानी देखील रंजनाचाच

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 01/27/2011 - 18:07 नवीन
हो चानी देखील रंजनाचाच चित्रपट. त्यात 'तो एक राजपुत्र..' सारखी मस्त मस्त गाणी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

धन्स रे गणपा. कृपया निनादनी

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 01/27/2011 - 17:55 नवीन
धन्स रे गणपा. कृपया निनादनी मगाशी तीच्या अपघातानंतर आलेल्या नाटकाची अजुन माहिती दिली तर वाचायला आवडेल. बाकी रंजना म्हणले की आम्हाला आठवते ते 'पाहिले न मी तुला..' हे MP3 शेअर करुन मी कमीत कमी १००+ दोस्त ऑर्कुटवर गोळा केले असतील ;)
  • Log in or register to post comments

धन्यवाद ...

छोटा डॉन
गुरुवार, 01/27/2011 - 17:57 नवीन
सायली ताईंचा हा धागा आम्ही हायजॅक केला... देर आये दुरुस्त ये म्हणत तिथे आवंतर न करता मुद्दाम हा वेगळा धागा खास रंजना ताईंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. आपणा पैकी कुणालाही तिच्या बद्दल काही बोलायच / सांगायच असल्यास इथे मांडा
धन्यवाद गणपाशेठ, आपण घेतलेला पुढाकार पाहुन आनंद झाला. अनेक आभार ... - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

रंजना..

स्वाती दिनेश
गुरुवार, 01/27/2011 - 18:01 नवीन
रंजनाच्या आठवणी वाचण्यास उत्सुक, ब्लॅक & व्हाइट टीव्हीच्या जमान्यात दर शनिवारी मराठी सिनेमे लागायचे, तेव्हा रंजनाचे अनेक सिनेमे पाहिलेले आठवत आहेत आणि मराठी चित्रहार मध्ये गाणी.. स्वाती
  • Log in or register to post comments

पूर्वी शनिवारी संध्याकाळी

निनाद मुक्काम …
गुरुवार, 01/27/2011 - 18:20 नवीन
पूर्वी शनिवारी संध्याकाळी मराठी सिनेमे दाखवायचे . त्यातून ह्या गुणी अभिनेत्रीचे दर्शन व्हायचे . टोकीज मध्ये पहिला तो मुंबईचा फौजदार ह्यात सागरी किनारा हे वाद्कारांचे गाणे अंगावर रोमांच उभा करतात मला आवडलेली भूमिका भुजंग सिनेमातील मदर इंडिया किंवा आराधना मधील नायिकेप्रमाणे तारुण्य ते वृध्ध्वस्थेत तिचा प्रवास समर्थ अभिनयाने सजतो . बाकी शहरी किंवा ग्राम्य अश्या कोणत्याही भूमिकेला साजेसा अभिनय व अत्यंत आत्मविश्वासाने पद्यारील वावर अभिनय व अदा ह्यांचे बेमालून मिश्रण .भूमिकेची पारख व शांताराम बाबूंचे मार्गदर्शन ह्यामुळे ह्या अभिनेत्रीने मराठी सिनेमा गाजवला . तिच्या नंतर घेड गुजरी विनोदपट त्यात केसाळ छातीचे पोट पुढे आलेले (मद्य सेवनाचा अतिरेक ) चित्र विचित्र कपडे घालून उद्यानात सुबल सरकारांच्या तालावर कवायत चालायची .व हास्याचे फवारे उडायचे. ह्यातून उद्यानात लाफ्टर क्लब ची कल्पना निघाली असावी . तिच्या अदा नि अभिनय हे पडद्यावर पाहणे हि एक पर्वणी असायची . ती आली /तिने पहिले /तिने जिंकले तिच्या नंतर सिनेमा पोरका झाला. तिच्या अदा नि अभिनय हे पडद्यावर पाहणे हि एक पर्वणी असायची .
  • Log in or register to post comments

नाटकाचे नाव फक्त एकदाच ह्यात

निनाद मुक्काम …
गुरुवार, 01/27/2011 - 19:37 नवीन
नाटकाचे नाव फक्त एकदाच ह्यात विल चेअर ला खिळलेली नायिका जिची तिच्या नायाकाकडून फसवणूक झाली आहे .असे काहीसे वास्तव व कल्पनेची सरमिसळ करून हे नाटक आल्याचे आठवते . पण का कुणास ठावूक कदाचित दबावामुळे असेन पण त्याचे फारसे प्रयोग झाले नाहीत . माझ्या मते चानी हा सिनेमा बापूंनी सत्य कथेवर आधारित कांदबरी वरून घेतला होता . हे बापूंचे ड्रीम प्रोजेक्ट पैकी तो एक होता .http://www.youtube.com/watch?v=nkwoJHcvNos झुंज सिनेमातील हेच ते प्रसिध्द दंद्वागीत तिचा संवाद अथवा गाण्याचे बोल नसले तरी नुसत्या देहबोलीतून तिचा आत्मविश्वास झळकतो .
  • Log in or register to post comments

बिनकामाचा नवरा....... अणखी एक

मनराव
गुरुवार, 01/27/2011 - 18:23 नवीन
बिनकामाचा नवरा....... अणखी एक तुफान चित्रपट....
  • Log in or register to post comments

रंजना..

मी-सौरभ
गुरुवार, 01/27/2011 - 18:42 नवीन
एक अतिशय प्रथितयश अभिनेत्री होती :) तिचा न आवडणारा चित्रपट निवडण अवघड आहे, कारण तिचे सगळेच चित्रपट चान चान असत :)
  • Log in or register to post comments

भूमिकेला पुरेपूर न्याय देणारी अभिनेत्री...

योगप्रभू
गुरुवार, 01/27/2011 - 18:43 नवीन
मिळालेल्या भूमिकेचा बाज लक्षात घेऊन ती व्यक्तीरेखा सुरेख साकारणारी अभिनेत्री म्हणजे रंजना... गंभीर चित्रपटात रंजनाचा अभिनय मन हेलावून टाकायचा. भुजंग नावाचा साधारण कथा असलेला चित्रपट, पण त्यात रंजनाने गावाकडच्या स्त्रीची केलेली भूमिका अप्रतिम. तिचे चुलीवर भाकरी भाजणे, शेणसडा टाकणे, डोक्यावर मोळी वाहणे आणि ग्रामीण उच्चार सगळे काही भूमिकेशी चपखल बसणारे. पण तेच 'भालू' चित्रपटातील वकिलीण बघा. अगदी शहरी आणि उच्चशिक्षित बाईची भाषा. 'सासू वरचढ जावई' चित्रपटात रंजना, अशोक सराफ, पद्मा चव्हाण आणि निळू फुले यांनी जी धमाल उडवून दिलीय ती औरच..
  • Log in or register to post comments

अगदी अगदी. शब्दा शब्दाशी सहमत

गणपा
गुरुवार, 01/27/2011 - 18:46 नवीन
अगदी अगदी. शब्दा शब्दाशी सहमत आहे. हे चित्रपट जालावर कुठे उपलब्ध आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

मुंबईचा फौजदसर, गुपचूप गुपचूप

मराठे
गुरुवार, 01/27/2011 - 18:55 नवीन
मुंबईचा फौजदसर, गुपचूप गुपचूप .. रंजनाचे एकसेएक बहारदार चित्रपट ! काही मराठी चित्रपट राजश्री.कॉम वर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हो

प्रचेतस
गुरुवार, 01/27/2011 - 19:01 नवीन
'सासू वरचढ जावई' अप्रतिमच. त्यात घाण्यावर बसलेल्या जयराम कुलकर्णीला पद्मा चव्हाण उठवते आणि अशोक सराफला त्याजागी बसवते. रंजना हताश होउन पाहात राहाते. रात्री रंजनाकडे चोरून जातांना अचानक तिच्या शेजारी झोपलेल्या पद्मा चव्हाणला जाग येते. मग जे म्यांव म्यांव सुरु होते ते पडद्यावर पाहाण्यातच गंमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

एक्दा हा पिच्चर

प्रीत-मोहर
Fri, 01/28/2011 - 10:26 नवीन
एक्दा हा पिच्चर दुरचित्रवाणीवर पाहत असताना म्यांव म्यांवचा सीन सुरु झाला आणि ते ऐकुन आतल्या खोलीतुन माझा बोका ओरडत बाहेर येउन अजुन कोण उपटसुंभ इकडे आलाय अश्या थाटात शोधत होता ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ही कशानं धुंदी आली.... या

प्राजु
गुरुवार, 01/27/2011 - 19:01 नवीन
ही कशानं धुंदी आली.... या गाण्यात रंजना एखद्या अप्सरे सारखी दिसली आहे.. असला नवरा नको गं बाई ... हा धम्माल होता चित्रपट. रंजना, राजा गोसावी आणि शरद तळवलकर.
  • Log in or register to post comments

चेष्टा करत नाही.खरंच

गवि
गुरुवार, 01/27/2011 - 19:28 नवीन
चेष्टा करत नाही.खरंच सांगतो. 'ही कशानं धुंदी आली' गाण्यात बापसदृश राजा गोसावींसोबत हिला लाडाने गाणे म्हणताना बघून आधी 'खरंच का बरं बापासोबत ही आपल्या धुंदीबद्दल बोलतेय??', असं वाटलं. मग लक्षात आलं की हाच तिचा 'तो'. मग मलाही प्रश्न पडला.खरंच कशानं आली असावी बरं धुंदी हीस? असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

बिनधास्त अभिनेत्री

कच्ची कैरी
गुरुवार, 01/27/2011 - 19:17 नवीन
माझी खूपच आवडती अभिनेत्री !सिनेमातला त्यांचा बिनधास्त वावर मला खूपच आवडायचा .
  • Log in or register to post comments

झुंज

मेघवेडा
गुरुवार, 01/27/2011 - 19:21 नवीन
झुंज मधील "कोण होतीस/होतास तू"! चित्रपट फारसा आठवत नाही मात्र चित्रपटाच्या सुरूवातीलाच हे गाणं आहे. रवींद्र महाजनी आणि रंजनाबाई एकमेकांकडे टशनमध्ये बघत "सार्‍यांना भुलवीत रस्त्यानं चालली, सडक लैला अशी बदनाम झालीस तू.." "पोरींची छेडाछेडी लोचट लाडीगोडी, सडक मजनू असा बदनाम झालास तू" असे आळीपाळीने आरोपांच्या तोफा डागत असलेले आठवतात! "कालची सीता आज डॅडींची रीटा झाली" अशाही काही ओळी आहेत गाण्यात. लै इनोदी गाणं आहे! "निसर्गराजा ऐक सांगते" याच चित्रपटातलं गाणं ना?
  • Log in or register to post comments

कोण होतीस तु फुल्ल टीपी गाणं

Nile
गुरुवार, 01/27/2011 - 20:37 नवीन
कोण होतीस तु फुल्ल टीपी गाणं आहे, अ‍ॅक्टींग वगैरे पाहुन हहपुवा होतं.. पण पुरुष गायकाची स्टाईलपण भारी आहे. काळ बद्द्ल्लल्ला... तु ही बद्दल्ल्ली वगैरे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

अगदी अगदी

चित्रा
Fri, 01/28/2011 - 07:17 नवीन
काळ बदलल्ला .. आठवले. :)) बदलला, बदलली हे बरोबर की बदललास, बदललीस असे बरोबर असते? बाकी रंजना माझी आवडती मराठी नटी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

दोन्ही बरोबर असावं असं वाटतं.

Nile
Fri, 01/28/2011 - 08:36 नवीन
दोन्ही बरोबर असावं असं वाटतं. तु बदललास/बदललीस. तो बदलला, ती बदलली, काळ/ऋतु बदलला वगैरे. (काय ती प्रथम, द्वितीय तृतीय वचनाची भानगड असते ती ;-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

(काय ती प्रथम, द्वितीय तृतीय

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 01/28/2011 - 09:33 नवीन
(काय ती प्रथम, द्वितीय तृतीय वचनाची भानगड असते ती Wink )
बोल्लास! पूर्ण, अपूर्ण, संपूर्ण अशी भानगड असते ती. डान्रावांना माहित्ये सगळं! (हे उगाच)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

वचन नाही रे

आजानुकर्ण
Fri, 01/28/2011 - 09:36 नवीन
वचन नाही रे पुरूष. घाबरतोस की काय पुरुष हा शब्द उच्चारायला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

तुम्ही आणि अदिती आधी ठरवा बरं

Nile
Fri, 01/28/2011 - 10:09 नवीन
तुम्ही आणि अदिती आधी ठरवा बरं नक्की काय असतं ते. तुमच्या पिढीतल्या (तुमच्या सारख्याच) ढ शिक्षकांनी नीट न शिकवल्याने आज मराठीची अशी दुरावस्था झाली आहे. ;-) बाकी कर्णा, ती (बदलली) चा पुरुषाशी काय सबंध रे? च्यायला वांदा करुन ठेवतोस काय माझा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

स्पष्टीकरण

आजानुकर्ण
Fri, 01/28/2011 - 10:24 नवीन
तू बदललास/तो बदलला मध्ये द्वितीय आणि तृतीय पुरूष आहेत तो बदलला/ती बदलली मध्ये लिंगबदल आहे. 'ती'चा संबंध पुरुषाशी असणे संभवनीय असले तरी नक्की सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मुबईचा फौजदार असेल तर लिन्क

विशाखा राऊत
गुरुवार, 01/27/2011 - 19:53 नवीन
मुबईचा फौजदार असेल तर लिन्क हवी आहे..
  • Log in or register to post comments

मला रंजनाबाईंचा मुंबईचा

रेवती
गुरुवार, 01/27/2011 - 21:34 नवीन
मला रंजनाबाईंचा मुंबईचा फौजदार मधील अभिनय लक्षात आहे. बाकी फारसे सिनेमे पाहिले जायचे नाहीत तेंव्हा.
  • Log in or register to post comments

मस्त रे गणपा !! अभिनय +

सुहास..
गुरुवार, 01/27/2011 - 21:46 नवीन
मस्त रे गणपा !! अभिनय + मेक-अप च जबरदस्त नॉलेज असाव या अभिनेत्रीला, आता हेच बघ ना !! झुंज च्या गाण्यात (कोण होतास तु मध्ये) एका हातात घातलेले लेडीज घड्याळ , त्या काळातली मॉडर्न स्त्री दाखविते, उलट ' ओ प्यांटवाल " उच्चारताना गावरान वाटते. तिचा 'भुजंग. पाटलीण, चानी ' कोणी पाहिला आहे का ?
  • Log in or register to post comments

मी रंजनाबाईंचे फक्त दोन

शहराजाद
Sat, 01/29/2011 - 04:42 नवीन
मी रंजनाबाईंचे फक्त दोन चित्रपट पाहिले आहेत. एक डाव भुताचा आणि तुम्ही उल्लेखलेला चानी. खानोलकरांची चानी कादंबरी मला आवडली होती. आणि हा चित्रपटही चांगला काढला आहे. वास्तविक, पुस्तक वाचून माझ्या डोळ्यांपुढे जी चानी उभी राहिली होती ती सतरा- अठराच्या कोवळ्या वयाची, नाजूक चेहर्‍यामोहर्‍याची, अटकर बांध्याची , खारीसारख्या भुरक्या केसांची. रंजनाबाईंची चानी तशी नव्हती. पण तरीही बाईंच्या अभिनयसामर्थ्याने ती व्यक्तिरेखा जिवंत झाली आहे. आता चानी म्हटले की मला बाईंचे त्या भूमिकेतले, चांदीच्या लहान घंटा किणकिणाव्यात तसे खळखळून हसणे आठवते. विस्मरणात गेलेल्या ह्या गुणवंत नटीबद्दल धागा काढल्याबद्दल धागाकर्त्याचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

रंजना आणि अपघात...!!

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 01/27/2011 - 23:02 नवीन
रंजना यांची भूमिका असलेला पाहिलेला एकमेव चित्रपट म्हणजे "एक डाव भुताचा" तोही टीव्हीवर. पण त्यातही त्याना तसे दुय्यमच स्थान होते, कारण जवळपास सर्व चित्रपट श्री.अशोक सराफ व श्री.दिलीप प्रभावळकर या दुकलीभोवतीच गुंफला गेला होता. असे असले तरी वर कित्येक प्रतिसादकांनी उल्लेख केल्याप्रमाणे रंजना देशमुख यांनी आपल्या बिनधास्त (अगदी 'चालबाज'मधील श्री देवीप्रमाणे) अभिनय शैलीने मराठी चित्रपटातील एक दशक गाजविले होते यात शंका नाही. व्ही.शांताराम यांच्यासारख्या दिग्गजाचे त्याना सुरुवातीच्या काळात मिळालेले मार्गदर्शनही फार उपयुक्त ठरले असणार. [मला वाटते 'संध्या' या अभिनेत्री रंजनाच्या मावशी होत....चू.भू.दे.घे.] एका दुर्दैवी मोटर अपघातात त्याना कायमचे अपंगत्व आले होते असे ऐकिवात आहे (फार माहिती नाही याबद्दल) आणि त्यामुळे त्यांची सिनेकारकिर्दही अकालीच संपुष्टात आली. मोटर अपघाताने संपविलेले आणखीन दोन नामवंत कलाकार म्हणजे भक्ती बर्वे आणि अरुण सरनाईक. [अपघातानंतर रंजना काही काळ जगल्या तरी, पण हे दोन दुर्दैवी जीव जागीच गेले....असो.] इन्द्रा
  • Log in or register to post comments

अपघात..

स्वाती दिनेश
गुरुवार, 01/27/2011 - 23:09 नवीन
ह्यावरुन अपघाती मरण आलेले दुर्दैवी शांताबाई जोग, जयराम हर्डीकर आठवले. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

आणि

विकास
गुरुवार, 01/27/2011 - 23:30 नवीन
आणि भक्ती बर्वे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

भक्ती

स्वाती दिनेश
गुरुवार, 01/27/2011 - 23:35 नवीन
भक्ती बर्वे आणि अरुण सरनाई़कांचा उल्लेख केला आहे पवारांनी म्हणून परत नाही केला.. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

उप्स!

विकास
Fri, 01/28/2011 - 07:16 नवीन
माझ्या नजरेतून निसटला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

जयराम हर्डीकर म्हणजे सामना

llपुण्याचे पेशवेll
Fri, 01/28/2011 - 09:21 नवीन
जयराम हर्डीकर म्हणजे सामना मधला स्मगलर ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

अरे सामना नाही..

स्वाती दिनेश
Fri, 01/28/2011 - 12:32 नवीन
सामना? सिंहासन मधला स्मगलर... स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

इन्द्रा पवार

चित्रा
Fri, 01/28/2011 - 07:22 नवीन
हे आपल्यापेक्षा वयाने बरेच लहान असावेत, याची हा प्रतिसाद वाचून जाणीव झाली :) रंजनाचा केवळ एकच चित्रपट पाहिला असणे हे आमच्या काळात (आई ग!) वाढला असतात तर शक्यच नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

अरेच्च्या! इंद्रराजपवार

Nile
Fri, 01/28/2011 - 08:40 नवीन
अरेच्च्या! इंद्रराजरावभाउसाहेब पवार आमच्याही पेक्षा लहान असावेत तर, आम्ही तर लै पिच्चर पाहिल रंजनाचे. ;-) आमचा फेव्हरेट म्हंजी... तो एक राजपुत्र.. मी मी.. एक रानफुलं... ****** चा घो रे चानी.....! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

अकाली मृत्यू....!!

इन्द्र्राज पवार
Fri, 01/28/2011 - 22:08 नवीन
चित्राताई....स्वातीताई....नाईल....विकास....सर्वांना उद्देश्यून, ~ रंजना यांचेच असे नव्हे तर एकूणच मराठी चित्रपट आमच्या कोल्हापुरातील थिएटर्समधून पाहाणे हे एक प्रकारचे दिव्यच आहे...(आज मल्टिप्लेक्सच्या जमान्याची डोळ्यांना आणि देहाला सवय होत असताना, मराठी निर्माते तिथे चित्रपट लावण्यास धजत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे....कारण? अनेक आहेत, पण इथे या एका गुणवान अभिनेत्रीच्या आठवणीसाठी काढलेल्या धाग्यात ती चर्चा नको...) त्यामुळे रंजनाचेच नव्हे तर अगदी ताज्या दमातील दिग्दर्शकांचे चित्रपटही ते कोणत्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत यावर इथला प्रेक्षक पाहायचे की नाही असा विचार करतो. असे असले तरी चित्रपट कलेचा एक अभ्यासक (वा प्रेमी) या नात्याने मी वेळोवेळी वाचन मात्र भरपूर केले आहे,विविध चर्चेत, क्षेत्रातील ज्येष्ठांसमवेत (कोल्हापुरात यांची कमतरता नाही) या विषयावर प्रदीर्घ गप्पागोष्टी याद्वारेही ज्ञानात भर पडत जातेच. त्यामुळे प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे रंजना यांचा एकच चित्रपट जरी पाहिला असला तरी त्यांच्या एकूण कारकिर्दीबाबत मला तशी बर्‍यापैकी माहिती आहे. विशेषतः 'त्या' दुर्दैवी अपघातानंतर तर माहितीत आपसूकच भर पडत गेली. श्रीमती शांता जोग आणि अकाली गेलेला तो एक देखणा कलाकार जयराम हर्डीकर यांच्या अपघाती मृत्युचा उल्लेख माझ्याकडून निसटला....कसा काय कोण जाणे....बट थॅन्क्स टु स्वाती दिनेश. जयराम हर्डीकर यांची ओळख आहे ती निव्वळ 'सिंहासन' (दयानंद पानिटकर या भूमिकेत) मुळे नव्हे तर पटवर्धन दांपत्याच्या "२२ जून १८९७' या गाजलेल्या चित्रपटातील 'गणेश द्रविड' च्या भूमिकेमुळेही. 'मंतरलेली चैत्रवेल' टीमच्या बसला कोल्हापूरच्याच दौर्‍यावर असताना (इस्लामपूरच्या आसपास) झालेल्या अपघातात जयराम हर्डिकरांचा चटका लावणारा मृत्यू झाला....[बातमी तर अशीही होती की, पेटत्या बसमधून स्वतः सुखरूप बाहेर येऊनही आत शांताबाई अडकल्याचे समजल्यावर परत त्या बसमध्ये त्यानी धाव घेतली होती व त्याना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही जळून गेले].....तीच गोष्ट अरुण सरनाईक यांची, त्यांच्या पत्नीची आणि त्यांच्या ज्येष्ठ मुलीची, कोल्हापुर-पुणे महामार्गावरील एका जबरदस्त अपघातात मृत्यू....ड्रायव्हरदेखील वाचला नाही......दुसर्‍या मुलीची बारावीची परीक्षा चालू असल्याने ती प्रवासात त्यांच्यासोबत नव्हती....म्हणून वाचली. भक्ती बर्वे यांचाही असाच क्षणार्धात झालेला अपघाती मृत्यू.....[योगायोगाने त्याच पुणे महामार्गावर] अकाली गेलेल्या या कलाकारांच्या संदर्भात फार हळव्या आठवणी आहेत.....जरी अपघाती नसले तरी स्मिता पाटील, मच्छिन्द्र कांबळी, शंकर घाणेकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याही अकाली मृत्युने मराठी रसिक मनाला चटके दिलेच आहेत. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

ह्या सिनेमातील अजून एक

निनाद मुक्काम …
Fri, 01/28/2011 - 13:13 नवीन
ह्या सिनेमातील अजून एक महत्वाचे पात्र म्हणजे खलनायक सरपंच .निळू फुले ते शाळेत येतात व शिक्षक दिलीप ला म्हणतात कि पास कोण करतो दिलीप ;; मी नापास कोण करतो ? दिलीप '' मी मग खर्जातील आवाज काढून म्हणतात निळूभाऊ मास्तर मग माझा मुलगा नापास कसा झाला ? लय भारी हा शिनेमा अशोकाचा प्रमुख भूमिका असलेलें त्यात रंजनाने त्यासाठी फक्त हा सिनेमा केला हे जाणवते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

बिनकामाचा नवरा

अडगळ
गुरुवार, 01/27/2011 - 23:22 नवीन
रंजना : हातात काय हाय ? अशोक सराफ : हे . आपलं कुठं काय. सर्कस. सर्कशीची ह्यान्डबिलं. रं : सर्कशीला जाताय. कशाला ? चड्ड्या घातलेल्या बायका बगायला ? अ.स.: तुला फकस्त तेच आठिवनार.. सर्कशीत वाघशिव्ह बी असत्यात. ते बी चड्डी न घातलेले. ग्रामीण ढंगाच्या भुमिका करताना रंजना यांची देहबोली आणि ग्रामीण (पश्चिम महाराष्ट्रातली )भाषा लाजवाब असायची.
  • Log in or register to post comments

अगदी!

पैसा
Fri, 01/28/2011 - 22:20 नवीन
धमाल पिक्चर आहे. त्यातले 'लोकशाई' बद्दलचे विनोद, रंजनाच्या नुसत्या डोळ्यांकडे पाहून भिजलेलं मांजर होणारं "आमचं धनी" अशोक सराफ आणि काठी घेऊन गंगीच्या मागनं गाव भटकणारी रंजना कधीच विसरणं शक्य नाही. कितीही वेळा लागला तरी आम्ही सगळे, माझी मुलं सुद्धा बघतोच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ

अजून आठवणारे

विकास
गुरुवार, 01/27/2011 - 23:30 नवीन
अजून आठवणारे दोन चित्रपट म्हणजे - सासुरवाशीण (रिबेलीयन भुमीका) आणि गोंधळात गोंधळ (विनोदी भुमीका)
  • Log in or register to post comments

सासुरवाशीण..

स्वाती दिनेश
Sat, 01/29/2011 - 12:22 नवीन
तोच ना सिनेमा, आशा काळे मोठी जाऊ आणि रंजना धाकटी.. ललिता पवार खाष्ट सासू असते आणि रंजना तिला सरळ करते.. इ. इ... मला पुण्याच्या भानुविलास थेटरात बघितलेला आठवतोय.. रंजना आणि ललिताबाईंची जुगलबंदीच होती.. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

बरोबर

विकास
Sat, 01/29/2011 - 18:32 नवीन
बरोबर तोच चित्रपट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

पहिला गणपाचे आभार! आता, रंजना

स्पंदना
Fri, 01/28/2011 - 07:33 नवीन
पहिला गणपाचे आभार! आता, रंजना सारख निरागस दिसण आजवर कुणा अभिनेत्रीला जमल नाही. तीने 'मुंबईचा फौजदार्'मध्ये मारलेला एक डायलॉग मला आजवर हसवतो, लग्ना नंतर कामावर निघालेल्या रविंद्र महाजनीला जिन्यातुन उतरु देत ती वरुन सांगते' आव लग्ना नंतर पयल्यांदाच ड्युटीवत निघालासा, चांगल दोन चार चोर पकडुन दावा'. गोंधळात गोंधळ हा आणखी एक चित्रपट. अशोक सराफला बहुतेक जणांनी अपघातानंतर तीला विसरल्याचा वा फसवल्याचा आरोप केला आहे त्यांच्या साठी, ती ज्या हॉस्पिटल मध्ये होती तिथे बहुतेक दा अशोक सराफला लोकांनी पाहिले आहे. कदाचित रिकव्हरीचे अजिबात चान्सेस नाहित म्हणुन तीनेच त्याला जाउ दिल असाव. माझ्या वाचनात तरी कुठेही तीने अशोक सराफ वर आरोप केलेले नाहीत.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा