अशीच एक राधा ....

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
20 Jan 2011 - 8:45 pm

मी एक राधा..
ओळखलत ? नाही ना ?
महाभारत ऽऽ... आठवतय काही ?
राधा ऽऽ.. हो.. पण त्या कृष्णाची नाही
मी सूतपत्नी, सूर्यपुत्राची माता.. राधा...

अधोरेखीत होत आयुष्य माझ.. झाकोळलेल..
मान्य मी नाही कृष्णाची राधा
अन नाही त्याचीच यशोधा माता
पण मी आहे दानशूर कर्णाची माता... राधा..

अथांग मातृत्व माझ ..विस्मरणात गेलेल..
महाभारत म्हंटल की आठवतो..
आठवतो तो कृष्ण, अर्जुन
आठवतो तो गंधारीपुत्र दुर्योधन
आठवते यशोदा आणि पांडव माता कुंती
आणि आठवतो माझा शापित सूर्यपुत्र ..कर्ण

नाही आठवत पण .. ही राधा व्याकुळलेली
काढली कवच कुंडले कर्णाची
तेंव्हा हीच माता होती अश्रुंसहीत.. ढळलेली
त्याच्यावर झालेला प्रतेक वार
असाह्य पणे मनावर झेलणारी

आता काहीच नाही माझ्याकडे
हं, अन कधी होत अस म्हणताल तुम्ही,
पण..पण अहो होतं माझ्या कडे दानशुरतेच देण
हो तोच .. माझा पूत्र .. राधेय..
अन विस्मरणात गेली असली तरी
खुद्द पुत्राकडुनच अखंड मातृत्वाच देणं लाभलेली
मी सुखावलेली.. अशीच एक माता
अशीच एक राधा ....

- शब्दमेघ

कविताइतिहास

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

20 Jan 2011 - 9:16 pm | प्रकाश१११

नाही आठवत पण .. ही राधा व्याकुळलेली
काढली कवच कुंडले कर्णाची
तेंव्हा हीच माता होती अश्रुंसहीत.. ढळलेली
त्याच्यावर झालेला प्रतेक वार
असाह्य पणे मनावर झेलणारी

गणेशा -मित्रा हे छान वाटले. लिहित रहा .
शब्द लवचिक आहेत लिहिल्यामुळे ते अधिक लवचिक होतील.
नवीन असेल तर खूप छान. खूप शुभेच्छा.

यामध्ये त्या माऊलीने कर्णाला जन्म दिला नसला तरी अतीव प्रेमाने सांभाळ केला होता.. हा उल्लेख यायला हवा होता. आणखी आर्त वाटली असती कविता असे मला वाटले.
पुलेशु.

गणेशा's picture

21 Jan 2011 - 4:48 pm | गणेशा

प्रथमता धन्यवाद ..

आपण म्हणता तसे बरोबर आहे, परंतु येथे कवितेत खुद्ध राधा बोलत आहे असे दाखवले आहे, त्यामुळे कदाचीत मी त्याची खरी माता नाही तरी त्याचा सांभाळ प्रेमाने केला कींवा व्यवस्थीत शब्दात ही, माझा पुत्र नसताना असे उल्लेख करणे जमले नाही.

सुरेख !

राधा म्हणलं कि ती कृष्णाचीच हे आपण गृहीत धरतो .
पण राधेचं हे माहित असलेलं , पण काहीसं विस्मृतीत गेलेलं रूप आवडलं .

काव्यवेडी's picture

21 Jan 2011 - 12:19 pm | काव्यवेडी

कर्णाची माता ही राधा !!
तिच्या भावनान्ची दखल घेवुन तिच्यावर केलेले हे पहिलेच
काव्य असेल बहुतेक !!
खूप छान जमले आहे. खूप आवडले.

ज्ञानराम's picture

21 Jan 2011 - 2:30 pm | ज्ञानराम

अप्रतिम..

सर्वांचे मनपुर्वक आभार ..

स्पंदना's picture

25 Jan 2011 - 2:14 pm | स्पंदना

'राधेय' म्हणुन बोलावत कर्णाला, आईच्या नावावरुन. पण त्या प्रेमळ धाराउचा....दुध पाजुन मोट्ठ करणारी ..उल्लेख करणारे मात्र तुम्ही पहिलेच गणेशा.