अशीच एक राधा ....
मी एक राधा..
ओळखलत ? नाही ना ?
महाभारत ऽऽ... आठवतय काही ?
राधा ऽऽ.. हो.. पण त्या कृष्णाची नाही
मी सूतपत्नी, सूर्यपुत्राची माता.. राधा...
अधोरेखीत होत आयुष्य माझ.. झाकोळलेल..
मान्य मी नाही कृष्णाची राधा
अन नाही त्याचीच यशोधा माता
पण मी आहे दानशूर कर्णाची माता... राधा..
अथांग मातृत्व माझ ..विस्मरणात गेलेल..
महाभारत म्हंटल की आठवतो..
आठवतो तो कृष्ण, अर्जुन
आठवतो तो गंधारीपुत्र दुर्योधन
आठवते यशोदा आणि पांडव माता कुंती
आणि आठवतो माझा शापित सूर्यपुत्र ..कर्ण
नाही आठवत पण .. ही राधा व्याकुळलेली
काढली कवच कुंडले कर्णाची
तेंव्हा हीच माता होती अश्रुंसहीत.. ढळलेली
त्याच्यावर झालेला प्रतेक वार
असाह्य पणे मनावर झेलणारी
आता काहीच नाही माझ्याकडे
हं, अन कधी होत अस म्हणताल तुम्ही,
पण..पण अहो होतं माझ्या कडे दानशुरतेच देण
हो तोच .. माझा पूत्र .. राधेय..
अन विस्मरणात गेली असली तरी
खुद्द पुत्राकडुनच अखंड मातृत्वाच देणं लाभलेली
मी सुखावलेली.. अशीच एक माता
अशीच एक राधा ....
- शब्दमेघ
याद्या
2001
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
नाही आठवत पण .. ही राधा
यामध्ये त्या माऊलीने कर्णाला
प्रथमता धन्यवाद .. आपण
In reply to यामध्ये त्या माऊलीने कर्णाला by प्राजु
सुरेख ! राधा म्हणलं कि ती
कर्णाची माता ही राधा !!
अप्रतिम
सर्वांचे मनपुर्वक आभार ..
'राधेय' म्हणुन बोलावत