मोबाईल फोन
त्या गावांत चौघेजण
चौघांकडेही मोबाईल फोन
वेगवेगळे हॅण्डसेट, अन्
वेगवेगळे रिंगटोन
कायम कामात असतात ते
त्यात फारसा 'चेंज' नाही
एकाच गावात असूनसुध्दा
भेटण्यासाठी 'रेंज' नाही
बोलतात, भेटतात फोनवरच
एसेमेसमधून पडते गाठ
"हाय.. हॅलो .. कसं काय"
(हे फोनलादेखील झालंय पाठ)
एके दिवशी एकजण
वैतागूनच गेला फार
गप्पा मारु, भेटू तरी
काहीतरी करु यार
त्याने मग सगळ्यांना
एके दिवशी एसेमेस केले
दिवस ठरवला, रानात गेले
फोनसुध्दा फेकून दिले
गप्पा झाल्या, खूप हिंडले,
हसले, खेळले, खूप रडले,
वेळाचेही नव्हते भान
मजा केली त्यांनी छान.
. . . . . . . . . . . . . . . . . .
हल्लीही ते कामातचं असतात
भेट अशी घडंतच नाही
हातात मोबाईल असल्यावर
काम तसं अडंतच नाही.
वर्गीकरण
छाण..
बोलतात, भेटतात
मस्त आहे कविता. आवडली.
खरंच .. कलियुग कलियुग ते हेच
मस्त.. आवडली.. खरं आहे
मोबाईल फोन
कविता खुपच छान आहे.. आवडली
अहाहा...
दहा वर्षांपूर्वीची ही कविता
वा !
इतक्या वर्षांनंतरही कविता