Skip to main content

मोबाईल फोन

लेखक दत्ता काळे यांनी मंगळवार, 18/01/2011 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
त्या गावांत चौघेजण चौघांकडेही मोबाईल फोन वेगवेगळे हॅण्डसेट, अन् वेगवेगळे रिंगटोन कायम कामात असतात ते त्यात फारसा 'चेंज' नाही एकाच गावात असूनसुध्दा भेटण्यासाठी 'रेंज' नाही बोलतात, भेटतात फोनवरच एसेमेसमधून पडते गाठ "हाय.. हॅलो .. कसं काय" (हे फोनलादेखील झालंय पाठ) एके दिवशी एकजण वैतागूनच गेला फार गप्पा मारु, भेटू तरी काहीतरी करु यार त्याने मग सगळ्यांना एके दिवशी एसेमेस केले दिवस ठरवला, रानात गेले फोनसुध्दा फेकून दिले गप्पा झाल्या, खूप हिंडले, हसले, खेळले, खूप रडले, वेळाचेही नव्हते भान मजा केली त्यांनी छान. . . . . . . . . . . . . . . . . . . हल्लीही ते कामातचं असतात भेट अशी घडंतच नाही हातात मोबाईल असल्यावर काम तसं अडंतच नाही.
लेखनविषय:

वाचने 4078
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

कविता मस्त जमलीय...

बोलतात, भेटतात फोनवरच एसेमेसमधून पडते गाठ "हाय.. हॅलो .. कसं काय" (हे फोनलादेखील झालंय पाठ) छान आणि मस्त .!!

खरंच .. कलियुग कलियुग ते हेच .. कधीतरी एखाद महिना विना इंटरनेत , विना संगणक आणि विना मोबाईल घालवण्याचा विचार आहे. आज पर्यंत काही जमलं नाही :(

कविता छान जमली आहे मला आवडली अनिल आपटे

मस्तय राव, कविता आवडली. -दिलीप बिरुटे

छान आहे.