हल्ली सरळ काही सुचत नाही
एक वाक्य धड लिहीता येत नाही
पण व्याकरणावर रण माजवतो
सध्या आम्ही कविता करतो
चार ओळी इकडून उचलून
चार ओळी तिकडून उचलून
तरीही वामनाचे आम्हीच वारस
आम्हीदेखील कविता करतो
कुणी वाचो, अथवा न वाचो
कुणी निंदो, कुणी वंदो
घंटा कुणाला फरक पडतो
म्हणूनच आम्ही कविता करतो
मदत, कौल, काथ्याकुटाचा
आता जरी का कंटाळा आला
वाचनीय तरी हल्ली कोण वाचतो
त्यासाठीच तर आम्ही कविता करतो
कुणा काही बोलणे त्याज्य, कुणा काही सांगणे त्याज्य
बोर्डावरच्या खेळातही आपल्यावरच राज्य
'हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा' समजतो
बोर्ड भरवण्यासाठी आम्ही कविता करतो
कवितेच्या खेळात या
लेख जगती, लेख मरती
चांगल्या लेखाच्या स्मृतीत आम्ही
अजून चार कविता करतो!!
याद्या
2198
प्रतिक्रिया
9
काव्यरस
मिसळपाव
??????
सहमत . [कविता] दिलगीरी लिहा
In reply to ?????? by सहज
मदत, कौल, काथ्याकुटाचा आता
In reply to सहमत . [कविता] दिलगीरी लिहा by टारझन
कविता छान मी प्रतिसाद देतो.
असुर्या, मस्त रे!
धन्यवाद!
लगे रहो । असुरभाय !!!!
कूणी निंदा अथवा वंदा कविता
खतरनाक कविता.......... अश्या