मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाटले होते...!

यशोधरा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस

वाचने 2998 वाचनखूण प्रतिक्रिया 19

नंदन 11/01/2011 - 12:03
नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता, झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते?
-- गझल आवडलीच, पण त्यातल्या ह्या दोन द्विपदी विशेष.

In reply to by नंदन

मेघवेडा 11/01/2011 - 14:35
तंतोतंत असेच! सर्व नियम पाळून, जराही इकडेतिकडे न होता केलेली रचना भावली हो अगदी! सुंदरच!

प्रकाश घाटपांडे 11/01/2011 - 12:10
जाना था हमसे दूर, बहाने बना लिये अब तुमने कितनी दूर, ठिकाने बना लिये! या (बहुतेक ) मदनमोहन संगीतकाराच्या गाण्याची आठवण झाली

नगरीनिरंजन 11/01/2011 - 12:12
छान! जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा, दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता, झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते हे विशेष!

असुर 11/01/2011 - 15:45
"आवडली" म्हणण्यापेक्षा "टोचली कुठेतरी" असं म्हणणंच योग्य होईल. अजून वाचायला मिळतील का??? --असुर

पुष्करिणी 11/01/2011 - 16:04
छानच ! >नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता, >झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते >किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी >किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते? हे एवन