मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

...

अभिषेक९ · · जे न देखे रवी...
आजचे पान कोरे-करकरीत आहे, अगदी पांढरे शुभ्र .... इतके की पेन टेकवायची पण भय... कदाचित त्याचे सौंदर्यच नष्ट होईल... मागची पाने गच्च आहेत आहेत असंख्य रंग लाल, पिवळा, निळा, भगवा गडद्द आहे, गुलाबीपण आहे ... पण फिक्कट.. आहेत अनेक अक्षरे काना, मात्रा, अनुस्वार सगळे सुष्पष्ट आहे, जोडाक्षरेही आहेत... पण खोडलेली... आहेत आकडे पण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आहेत, भागाकारही आहे... अगदी मागच्याच पानावर पुढची पाने खुणावत आहेत, आपल्या पांढऱ्या रंगानी "टेकव पेन, निर्मितीचा आनंद दे मला, डब्ब्यात नष्ट व्हायच्या आधी बहरून टाक मला, रंगव असंख्य चित्रातून, मग मीच दाखवील तुला उद्याचा उष:काळ, माझ्यातूनच ..." पण आजचे पान काही पुढे सरकेना पांढऱ्या शिवाय दुसरा रंग दाखवेन आणि पेन काही केल्या टेकेना...

वाचने 1536 वाचनखूण प्रतिक्रिया 6

यकु 10/01/2011 - 23:38
व्व्वा!!!!! फारच छान!!!! बढीया!!! क्या कहने! असा प्रतिसाद सहज लिहीता येईल.. पण >>>आणि पेन काही केल्या टेकेना... या ओळींतील प्रामाणिक कबुलीमुळे तसं काही लिहवत नाही.. लिहीण्यासारखं काही नसेल तर ओढून ताणून न लिहीता ते कबूल करण्याचा प्रामाणिकपणा आवडला. :)

गंगाधर मुटे 11/01/2011 - 18:45
आजचे पान कोरे-करकरीत आहे, अगदी पांढरे शुभ्र .... इतके की पेन टेकवायची पण भय... कदाचित त्याचे सौंदर्यच नष्ट होईल...
सुंदर काव्य.

अभिषेक९ 11/01/2011 - 18:53
धन्यवाद... पहिलीच कविता आहे... कदाचित तुमच्या प्रतिक्रिया वाचून पेन टेकवण्याची हिम्मत होईल... http://kalewadi-aghadi.blogspot.com/