...
लेखनविषय:
काव्यरस
आजचे पान कोरे-करकरीत आहे,
अगदी पांढरे शुभ्र ....
इतके की पेन टेकवायची पण भय...
कदाचित त्याचे सौंदर्यच नष्ट होईल...
मागची पाने गच्च आहेत
आहेत असंख्य रंग
लाल, पिवळा, निळा, भगवा गडद्द आहे, गुलाबीपण आहे ... पण फिक्कट..
आहेत अनेक अक्षरे
काना, मात्रा, अनुस्वार सगळे सुष्पष्ट आहे, जोडाक्षरेही आहेत... पण खोडलेली...
आहेत आकडे पण
बेरीज, वजाबाकी, गुणाकार आहेत, भागाकारही आहे... अगदी मागच्याच पानावर
पुढची पाने खुणावत आहेत, आपल्या पांढऱ्या रंगानी
"टेकव पेन, निर्मितीचा आनंद दे मला,
डब्ब्यात नष्ट व्हायच्या आधी बहरून टाक मला,
रंगव असंख्य चित्रातून,
मग मीच दाखवील तुला उद्याचा उष:काळ,
माझ्यातूनच ..."
पण आजचे पान काही पुढे सरकेना
पांढऱ्या शिवाय दुसरा रंग दाखवेन
आणि पेन काही केल्या टेकेना...
वाचने
1536
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
व्व्वा!!!!! फारच छान!!!!
मस्तच!
फारच सुंदर
धन्यवाद...
छान रूपक
धन्यवाद