तुझी माझी प्रित होती
लेखनविषय:
काव्यरस
तुझी माझी प्रित होती
तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा
जिवनात आले वादळ कधी, विसरूनी जा ||धृ||
हातांना ना कधी, गुंफण आता मिळायची
पावलांना सवय होवूदे, एकटेच चालायची
भेटलो तो किनारा, विसरूनी जा
तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||१||
त्या आर्त नजरा, ते नजरेतले बोलणे
न बोलताच कळणारे मनातील हुरहुरणे
आठवणींना सांग, स्मरणातूनी निघूनी जा
तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||२||
आठवते मला दिलेले मोरपीस निळेगार
तूही वहीत ठेवले होते पिंपळपान जाळीदार
भेट दिली घेतली, परत घेवूनी जा
तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||३||
'तुझी माझी प्रित नव्हती', सवय होईल ऐकायची
नित्य सराव करतो वाट एकट्यानेच चालायची
ऐकण्या मनाचे सारे माझ्या, एकदा भेटूनी जा
तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||४||
तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा
जिवनात आले वादळ कधी, विसरूनी जा ||धृ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/१२/२०१०
वाचने
1543
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
कविता खुप आवडली ..
अवांतर : एका कवितेची आठवण झाली मला माझ्या डायरीतल्या
-
जा हसत दूर जा
आसवांची अखंड धार नको
परत परतण्याचा विचार नको
हृद्यावर नविन घाव नको
जा हसत दूर जा !!
In reply to कविता खुप आवडली .. अवांतर : by गणेशा
अवांतर : एका कवितेची आठवण झाली मला माझ्या डायरीतल्याशक्यता नाकारता येत नाहि. अवांतर : पाभे , कविता ऐकनिय . - णेशिल
कविता आवडली
मस्त!
कविता खुप आवडली .. अवांतर :