आज रशियाचे पंतप्रधान (आणि खरेखुरे "बिग बॉस") असलेल्या पुतिनसाहेबांनी एक उत्तुंग षट्कार मारलेला आहे. वाचा इथे http://m.timesofindia.com/PDATOI/articleshow/7065924.cms
(पुतिन यांचे 'दस नंबरी' निवेदन वाचून/ऐकून चिनी नेत्यांनीसुद्धा टाळ्या वाजविल्या असतील.)
पुतिन यांनी या आधीही यू-ट्यूबद्वारा असाच २०-२० छाप षट्कार मारला होता. तो दुवा सापडल्यास (नंतर) पाठवून देईन. पण आजचे त्यांचे निवेदन वाचून मी एकदम 'दिलखुष' झालो!
आजच्या ताज्या वक्तव्यात ते म्हणतात की तुरुंगात खितपत पडलेल्या 'विकीलीक्स'चे शिट्टीवादक (याने कि whistle-blower) संचालक ज्यूलियन अस्सांज यांना सार्या जगाने मदत करावी आणि त्यांचे नांव येत्या वर्षीच्या नोबेल पारितोषिकासाठीही सुचवले जावे!
क्रेमलिनच्या सूत्रांनी रशियन वार्तासंस्थांना सांगितले कीं सामाजिक आणि बिगर-सरकारी संस्थांनी त्यांना कशी मदत करायची याचा विचार केला पाहिजे आणि त्यांना नोबेलचे पारितोषिक देण्याचाही विचार केला पाहिजे. बहुदा त्यांना शांतता पारितोषिक म्हणायचे असावे!
हा विचार त्यांनी नक्कीच कांहींशा उपरोधाने मांडला असणार! रशियाने आतापर्यंत अशा जाहीर करण्यात आलेल्या राजनैतिक 'अतिगुप्त' केबल्सवर फारसे भाष्य केलेले नसून या तर्हेच्या माहितीने रशियाचा अमेरिकेशी असलेल्या संबंधांवर फारसा परिणाम होणार नाहीं असेही नमूद केले आहे.
दरम्यान अस्सांज यांच्यावर स्वीडनमध्ये केलेल्या बलात्काराचे आरोप ठेवण्यात आलेले असून ब्रिटिश न्यायालयाने त्यांना जामीनही नाकारण्यात आला आहे. स्वीडनने त्यांना आपल्याकडे सोपविण्याची (extradition) मागणी केलेली आहे.
काल अस्सांज यांनी पहिल्यांदाच तुरुंगात एक रात्र घालविली!
जर यासेर अराफात आणि यित्साक राबिन यांना नोबेल शांतता पारितोषिक मिळू शकते तर सार्या दुतोंडी राजकारण्याचे वस्त्रहरण किंवा भांडेफोड करणार्या अस्सांजना कां मिळू नये? ते नक्कीच अशा पारितोषिकावर अधिकार सांगू शकतात. त्यांच्या 'विकीलीक्स'मुळे जगात एक तर शांतता नांदेल किंवा तिसर्या महायुद्धाला तोंड लागेल. पण अस्सांजने सार्या जगाला मस्त हिसका दाखवून सार्यांची-विशेषतः हिलरीबाईंची-भंबेरी उडविली आहे. 'विकीलीक्स'ने पाकिस्तानच्या सर्व नव्या-जुन्या दुतोंडी नेत्यांचेही वस्त्रहरण केले असून त्याची अर्थातच मला खूप खुषी झाली आहे!
जय विकीलीक्स!
वाचने
3060
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच.. आणि ओबामांना मिळू
पुतीन?
अधिकृत क्रेमलिन सूत्र....!!
In reply to पुतीन? by श्रावण मोडक
आधी मथळ्यात पुतीन यांचे नांव होते
In reply to अधिकृत क्रेमलिन सूत्र....!! by इन्द्र्राज पवार
विकीलीक्स रॉक्स... इंटरनेटवर
+१
In reply to विकीलीक्स रॉक्स... इंटरनेटवर by मदनबाण
..रोटी कपडा मकान
अस्सांज वर अमेरिकेबाहेर
@भारतातील पेपरने तर केवळ याच
अस्सांज खूपच पुढे आहेत
In reply to @भारतातील पेपरने तर केवळ याच by निनाद मुक्काम …
लेडी गागा - 'मॅन' ऑफ द यर?
In reply to अस्सांज खूपच पुढे आहेत by सुधीर काळे
जरा अवांतर :--- लेडी गागाने
In reply to लेडी गागा - 'मॅन' ऑफ द यर? by बेसनलाडू
कशीही/कसाही
In reply to जरा अवांतर :--- लेडी गागाने by मदनबाण
Person of the year
In reply to लेडी गागा - 'मॅन' ऑफ द यर? by बेसनलाडू
अस्सांज अमेरिकन inside जॉब
In reply to अस्सांज खूपच पुढे आहेत by सुधीर काळे