पुण्यातले माजोरी , xyz..... xyz...रिक्षावाले..!
.....ओठांवर अ़क्षरशः वाट्टेल त्या शिव्या येतायत.
काल काही तातडीच्या कामासाठी कोल्हापुर oneday trip मारावी लागली.६-३० शिवनेरी...पोचल्या पोच्ल्या कामे उरकायची घाई..धावपळ. आपल्या लोकांचा ढिसाळ कारभार्...अर्धवट राहिलेली कामं.फुकट,व्यर्थ ठरलेली दगदग .परत ९ च्या आत घरात्!चं tension! अक्षरशः काव आला होता! त्यात परतीच्या प्रवासात "मिळेल ती" बस घेण्याच्या नादात पांढर्या जांभळ्या बसमध्ये बसले. खबडक खबडक घोडोबा करीत ८.३० -८.४५ वाजता बस पुणे मुक्कामी पोचती झाली.
काय त्या ड्रायव्हरला कोण चावलं होतं देव जाणे काल! निव्वां........त चालु होतं. इथे थांब्..तिथे थांब. हात दाखवा बस थांबवा सारखं!
..... वास्तव्य बि.वाडीत असल्यामुळे बालाजीनगर ला उतरले. रिक्षा स्टँडवर जाउन विचारले.
दादा,रिक्षा आहे का?
मग्रूर आवाज" कुटं जायचय"
बिबवेवाडी.
त्याने पच्कन थुंकत नकारार्थी मान हलवली.
माझी परत आर्जवं, अहो चला ना. .. हवे तर ठरवून घ्या पैसे.. रीटर्न भाडे घ्या.
(actually मी चालुन जाउ शकलेही असते...पण आमचं माहेरपण नडलं... हेssssss सामान बरोबर)
जाउ दे म्हणुन मागच्या दादांना विचारले....त्यानेही पहिल्याच्या री मध्ये री ओढली.
तिथुन कशी बशी थोडे अंतर चालुन आले दुसरे रिक्षावाले फोनवर बोलत होते. मी विचारले असता त्याने असा थांबा ओ जरा असा हात केला...त्याच ते बोलण होइपर्यंत मी आशेवर उभी की हा नेइल कदाचित.
जवळ्च जायचय हे कळल्यावर त्याचेही तेच उत्तर्...मग जाम सटकलं डोकं....आवाज चढला....थोड्क्यात बाचाबाची झाली (अजुन थोड वेळ गेला असता तर शब्दशः 'बा'चा 'बा'ची झाली असती).पण एक दुसरे काका मध्ये पडले आणि सोहळा आवरता घेतला.
हे नेहमीच घडतं. हे रिक्षावाले वेळ पहात नाहीत्,सोय पहात नाहीत्. माणुसपण पहात नाहित. आजारी,म्हातारे असोत नाहितर भर दुपारी उन्हातन्हात तान्हं बाळ घेउन जाणारी बाई असो. यांना काहीही फरक पडत नाही.मीटर प्रमाणे जे पैसे होतात ते द्यायला, कधी कधी extra द्याय्ला सुद्धा तयार अस्तात लोक. पण नाही.
आणि minimum tarrif ठरलेलं असताना अशी अडवणूक करायची गरज नसते. अर्धा किलोमीटर जरी गेलंतरी त्यांचे ते minimum tarrif आपण देतो. मग मला कळत नाही की हे असे का करतात. त्यांचे नुकसान तर काहिहि होत नसते.
कँपातून तर रिक्षा तयारच नसतात याय्ला ..return देऊ असे सांगुनही नन्नाचा पाढा॑ असतो.
काही अपवाद रिक्षावाले असतातही..मी काही समस्त रिक्षावाळ्यांचा उध्धार करत नाही आहे. बर्याचदा अतिशय प्रामाणिक पणाचे अनुभावही हे लोक देऊन जातात. पण हाही प्रकार आहेच ना!
यासाठी आप्ल्याला काहीही करता येत नाही याचा इतका संताप येतो ना!
कसे react व्हावे अशा लोकांशी? काही कायदा आहे का कि ज्याने हे लोक बांधील होतिल प्रवाशांची ने-आण करायला?
काय केलं म्हणजे वठणीवर येतिल?
प्रतिक्रिया
पुण्यातले माजोरी...
पुण्यातले माजोरी... द्वीरुक्ती
>>>>रिक्षावाले म्हणजे माजोरी
मस्त मस्त
पुणेकरांचा उल्लेख माजोरी
आम्ही
पुण्याबाहेरचे? कालपरवा तर
जाहीर आभारप्रदर्शन सोहळा
अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन
सकाळा कडे पण पाठवुन द्या
सकाळा कडेच पाठवायची
२००+ प्रतिसाद. जागा राखीव. १०
दस का बीस
१० का पचास, १० का पचास १०
रिक्षावाल्यांचा हा मस्तवालपणा
काय बोलणार...परत ६ सिटर चालु
न्युयॉर्क
तिथे टॅक्स्या असतात असे ऐकले
घ्या
घ्या २
च्या मारी.
परदेशवारी
बापरे ब्ल्याकने?
अनुभव
हाहाहाहा
यू टू ब्रुटुस?
क्या बात है
झो प ये ते य ना आ ज का ल व्य
पुण्यातले रिक्षावाले जस्से
साहेब, संवेदनशील लिखाण बंद
मिपाकरांकडून कुठल्याही मदतीची
जरा मस्करी केली की आम्हालाबी
हा हा हा... हा नाना आणि
>>गप्राव !! (सौजन्य : धमाल
गाय छाप , चुनापुडी , सुपारी
गल्ली चुकली गं. 'राज'दरबादात
घरी
स्वारगेट, पुणे स्टेशन इ.
ती पण गंमतच केली मी!
शाबास.
तो रिक्षावाला...
+१
झक्कास...
मी अशीच आहे! पुण्यातले
हो....आहे...
वा वा वा. कोल्लापुरचे
पेशवे, पुणे कराराला स्मरून
ऐला तुला वडापवाले माहीत
पुणे कराराचा अवमान करणार्या
अदिती.... FYI
Pagination