Skip to main content

पुण्यातले माजोरी , xyz..... xyz...रिक्षावाले..!

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी बुधवार, 22/09/2010 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
.....ओठांवर अ़क्षरशः वाट्टेल त्या शिव्या येतायत. काल काही तातडीच्या कामासाठी कोल्हापुर oneday trip मारावी लागली.६-३० शिवनेरी...पोचल्या पोच्ल्या कामे उरकायची घाई..धावपळ. आपल्या लोकांचा ढिसाळ कारभार्...अर्धवट राहिलेली कामं.फुकट,व्यर्थ ठरलेली दगदग .परत ९ च्या आत घरात्!चं tension! अक्षरशः काव आला होता! त्यात परतीच्या प्रवासात "मिळेल ती" बस घेण्याच्या नादात पांढर्‍या जांभळ्या बसमध्ये बसले. खबडक खबडक घोडोबा करीत ८.३० -८.४५ वाजता बस पुणे मुक्कामी पोचती झाली. काय त्या ड्रायव्हरला कोण चावलं होतं देव जाणे काल! निव्वां........त चालु होतं. इथे थांब्..तिथे थांब. हात दाखवा बस थांबवा सारखं! ..... वास्तव्य बि.वाडीत असल्यामुळे बालाजीनगर ला उतरले. रिक्षा स्टँडवर जाउन विचारले. दादा,रिक्षा आहे का? मग्रूर आवाज" कुटं जायचय" बिबवेवाडी. त्याने पच्कन थुंकत नकारार्थी मान हलवली. माझी परत आर्जवं, अहो चला ना. .. हवे तर ठरवून घ्या पैसे.. रीटर्न भाडे घ्या. (actually मी चालुन जाउ शकलेही असते...पण आमचं माहेरपण नडलं... हेssssss सामान बरोबर) जाउ दे म्हणुन मागच्या दादांना विचारले....त्यानेही पहिल्याच्या री मध्ये री ओढली. तिथुन कशी बशी थोडे अंतर चालुन आले दुसरे रिक्षावाले फोनवर बोलत होते. मी विचारले असता त्याने असा थांबा ओ जरा असा हात केला...त्याच ते बोलण होइपर्यंत मी आशेवर उभी की हा नेइल कदाचित. जवळ्च जायचय हे कळल्यावर त्याचेही तेच उत्तर्...मग जाम सटकलं डोकं....आवाज चढला....थोड्क्यात बाचाबाची झाली (अजुन थोड वेळ गेला असता तर शब्दशः 'बा'चा 'बा'ची झाली असती).पण एक दुसरे काका मध्ये पडले आणि सोहळा आवरता घेतला. हे नेहमीच घडतं. हे रिक्षावाले वेळ पहात नाहीत्,सोय पहात नाहीत्. माणुसपण पहात नाहित. आजारी,म्हातारे असोत नाहितर भर दुपारी उन्हातन्हात तान्हं बाळ घेउन जाणारी बाई असो. यांना काहीही फरक पडत नाही.मीटर प्रमाणे जे पैसे होतात ते द्यायला, कधी कधी extra द्याय्ला सुद्धा तयार अस्तात लोक. पण नाही. आणि minimum tarrif ठरलेलं असताना अशी अडवणूक करायची गरज नसते. अर्धा किलोमीटर जरी गेलंतरी त्यांचे ते minimum tarrif आपण देतो. मग मला कळत नाही की हे असे का करतात. त्यांचे नुकसान तर काहिहि होत नसते. कँपातून तर रिक्षा तयारच नसतात याय्ला ..return देऊ असे सांगुनही नन्नाचा पाढा॑ असतो. काही अपवाद रिक्षावाले असतातही..मी काही समस्त रिक्षावाळ्यांचा उध्धार करत नाही आहे. बर्‍याचदा अतिशय प्रामाणिक पणाचे अनुभावही हे लोक देऊन जातात. पण हाही प्रकार आहेच ना! यासाठी आप्ल्याला काहीही करता येत नाही याचा इतका संताप येतो ना! कसे react व्हावे अशा लोकांशी? काही कायदा आहे का कि ज्याने हे लोक बांधील होतिल प्रवाशांची ने-आण करायला? काय केलं म्हणजे वठणीवर येतिल?

वाचने 21245
प्रतिक्रिया 130

प्रतिक्रिया

पुण्यातले माजोरी... द्वीरुक्ती ;) पाच का दस ... बाल्कनी फुकाट... पाच का दस ... बाल्कनी फुकाट... सेंग गरम ... पॉपकार्न.... एय.. सेंग गरम ... पॉपकार्न.. मजा येणार हे नक्की !

In reply to by अवलिया

यात थोडी दुरूस्ती. माजोरी रिक्षावाले ही द्वीरुक्ती रिक्षावाले म्हणजे माजोरी असलाच पाहीजे. (सन्माननीय अपवाद वगळता) मग तो कुठल्याही गावातील असु देत. जाता जाता पुणेकरांचा उल्लेख माजोरी म्हणून केल्याबद्दल निषेध. (पॉपकॉर्नचे पुडे आले आहेत. फांदीवर बसलो आता)

In reply to by चिंतामणी

>>>>रिक्षावाले म्हणजे माजोरी असलाच पाहीजे. (सन्माननीय अपवाद वगळता) मग तो कुठल्याही गावातील असु देत. सहमत आहे. ट्राफीक पोलिसांनी रिक्षालावाल्यांना दंडाची पावती देत असलेले दृष्य दिसले की मला खूप आनंद होतो. [हा आनंद मनातल्या मनात असतो] रिक्षावाल्यांच्या रिक्षा जप्त करुन आरटीओ कार्यालयात नेल्यावर आणि त्यांना दंड भरायला लावल्यावरचा आनंद क्या कहने. अशावेळी बिचार्‍यांचे कसे होईल, हातावरचे पोट असते, वगैरे अशा भावनांना मी नम्रपणे ठोकर मारतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुढल्या वेळी असे काही संस्मरणिय दृस्टीपथास पडले तर तर तुमचा आनंद द्विगुणित झाला असे समजा.माझ्या वतीने एखादी टाळी वाजवलीत तरी चालेल.

In reply to by चिंतामणी

पुणेकरांचा उल्लेख माजोरी म्हणून करु नका हो प्लिज. बंगलोर चे रिक्षावाले तर यांना देखील मागे टाकतील. आत्ता पण त्या विचाराने माझ्या डोक्यातील शीर ताडताड उडायला लागली आहे.

In reply to by अवलिया

आम्ही पुण्याबाहेरचेच. पुण्याला नाही पण पुणेकरांबद्दल बरेच ग्रह बाळगून आहोत. पण पुण्याला नावे ठेवायची नाहीत अशी एक फॅशन निघालीय म्हणे. पुणेरी पाट्या ऐवजी ठाणेरी पाट्यांवर सम्शोधन करायचा विचार करतोय

In reply to by अवलिया

ऐका हो ऐका.... आज पुणेमुक्कामी, छावणी भागात खरेदीसाठी गेले असता, परत येताना पहिलाच रिक्षेवाला बि.वाडीला यायला तयार झाला हो!.......... बहुदा मिसळ्पाव वर चाललेली खलबते कानावर पडलेली दिसतात.... म्हणून समस्त मिपाकरांचे आणि पुणेकर रिक्षावाल्यांचे जाहिर आभार!......

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! खरे तर ही बातमी वेगळा धागा करुनच सांगायला हवी तुम्ही!! =))

In reply to by पैसा

१० का पचास, १० का पचास १० का पचास १० का पचास १० का पचास १० का पचास मर्यादित जागा शिल्लक, फर्स्ट कम फर्स्ट सीट बेसिस.

रिक्षावाल्यांचा हा मस्तवालपणा सर्वत्र सारखाच आहे. बेंगलोरमध्येही असे अनुभव येतात. मलाही त्यांची प्रचंड चीड येते. पण ह्या रिक्षावाल्यांचा एक चांगला गुण म्हणजे तुम्ही एखादा पत्ता हुडकत असाल आणि एखाद्या रिक्षावाल्याला विचारले अमुक अमुक ठिकाण कुठे आहे तर आतापर्यंत तरी मला त्यांनी व्यवस्थित मदत केली आहे.(फक्त पत्ता सांगायला त्या ठिकाणी पोहचवायला नव्हे.)

काय बोलणार...परत ६ सिटर चालु करावि म्हणुन दादांना साकडे घातले पाहिजे... बहुतेक आपणास xyz च्या ऎवजी yz म्हणाचे असेल असे वाटते..

न्युयार्क, लंडन, सिंगापोर, ब्यांककॉक आणि प्यारिस येथील रिक्षावाल्यांच्या अनुभवा विषयीही वाचायला आवडेल.

In reply to by गुंडोपंत

वॉशिंग्टन डी. सी. ला सायकल रिक्शात बसलो होतो. स्मिथसोनियन म्युझियम मधून बाहेर पडल्यावर चार पाच सायकलरिक्शावाले आणि एक वालीपण उभे(भी) होते. त्यातल्या एका ब्लॅकच्या रिक्शात मी , माझी मुलगी व बायको असे 'वाटीत पुरण' अशा अवस्थेत बसलो. पैसे आधीच ठरवले होते. त्या सदगृहस्थाने आमच्या तिघांचे धूड चढाच्या रस्त्यावर लीलया ओढत आम्हाला जेफरसन मेमोरियल, लिंकन मेमोरियल अशी जवळची सर्व ठिकाणे दाखवली आणि ती सुध्दा रनिंग कॉमेंट्री सकट. एक उत्तम अनुभव!!!

In reply to by तिमा

चला नानाची सोय झाली

In reply to by तिमा

एक जन बी आपुन परदेशवारी केली हे सांगायची संधी सोडत नाही.

In reply to by चिंतामणी

परदेशवारी ही आता कौतुकाची उरलेलीच नाही. तिकडचे अनुभव विचारले म्हणून लिहिले. आम्ही अनुभवांचे प्रदर्शन भरवत नाही.

In reply to by तिमा

रिक्षा ब्लॅकने? बापरे हा प्रकार इकडे म्हणजे भारतात आलाततर वांदेच आहेत मग! आम्हाला तिकिटांचाच ब्लॅक माहिती आहे. शोलेच्या वेळी कसला मोठा होता तो... आमचा अनुराधा थेटर वालाच त्यात सामील असे आम्हाला सौंशय होता. असो. चमत्कारिक असणार तुमची परिस्थिती. किती पैसे दिले नक्की? त्यापेक्षा पोलिसाला बोलवायचे... मी आजवर असे ऐकले नव्हते... "वॉशिंग्टन डी. सी. ला सायकल रिक्शात बसलो होतो. " वॉशिंग्टन... शिवाय सायकल रिक्षा? काहीच समजत नाहीये मला. तुम्ही कलकत्त्या विषयी म्हणत आहात का? जरा उलगडून सांगता का हा लोच्या?

In reply to by गुंडोपंत

तुम्ही विचारलेल्या सगळ्या शहरांच्या विमानतळावरून मी ट्रांझिट केलेले आहे, पण तिथे कुठे टॅक्सीज्स दिसल्या नाहीत (कदाचित माझ्या जेट लॅगमुळे मला दिसल्या नसाव्यात). नाही म्हणायला हाँगकाँगच्या एयरपोर्टवर काही लोक एका छोट्या, आपल्या इथे गोल्फ कोर्सवर वापरतात तसल्या गाड्यांतून इथेतिथे फिरत होते, म्हटले मूर्खच दिसताहेत इथले लोक, आम्ही हे असले कार्ट्स फक्त गोल्फकोर्सेसवरच वापरतो, ते इथे विमानतळांवर आणणे शोभून दिसते का कुणाला? मी नाक मुरडले आणि त्या तसल्या गाडीवर बसलेल्या बुवाने 'काय' असे मला भुंवया उंचावत विचारले? मी म्हटले 'यू पीपल्स आर स्टूपिड, धिस इज नॉट अ रोड, नो?' आपल्याला काही हे कळलेच नाही असे तो दाखवत निघून गेला. तर ते जाऊ दे, काय सांगत होतो-- परदेशांतील टॅक्सीज. मी उत्तर कोरियात पाहिलेल्या टॅक्सीज छान होत्या. प्रशस्त मोठ्ट्।या टॅक्सीज! पुढपासून मागपर्यंत एक पंगत जेवावयास सहज बसू शकेल, असा विचार माझ्या मनात तेव्हा आला. पण क्यूबातील टॅक्सीजना तोड नाही हो!! तेथे टॅक्सीज स्थानिकांसाठी फुकट आहेत, हे समजल्यावर मी तेथील एका व्यक्तिशी दोस्ती केली व तिच्यासमवेत सगळीकडे फुकटात फिर फिर फिरलो!! त्यातून ते टॅक्सीवाले प्रत्येक गिर्‍हाईकास (फुकट अर्थात) क्यूबन सिगार देत होते. पहिली घेतली आणी झुरका घेतल्यावर इतका ठसका लागला, टॅक्सी ड्रायव्हरने रस्त्यातच थांबवून त्याच्याकडील टिश्यूने (त्यावर 'चे' चा फोटो होता) माझे डोळे व नाक पुसले. ते सगळे होईंस्तोवर मागे सारा ट्रॅफिक तसाच खोळंबून राहिला होता. नंतर मात्र संवय झाली, पुढील अनेक टॅक्सी प्रवासात मस्त क्यूबन सिगार आणी स्थानिक दारू....फुकटात.

In reply to by प्रदीप

हाहाहाहा... क्यूबाचा अनुभव मात्र याहीपेक्षा सविस्तर लिहिण्याजोगा आहे. लिहा. वाट पाहतोय.

In reply to by प्रदीप

अनुभव जबरा आहे. आवडला. टॅक्सीत सिगार आणि दारू म्हणजे खल्लास! एक ३०-४० वर्षे आधी कळले असते तर जाऊन तरी आलो असतो कॉ. डांगेंच्या बरोबर. आता काय उपयोग? असो, यावर तर एक लेख यायला हवा. फिडेल क्यास्ट्रोच्या देशा विषयी 'अमेरिका जे सांगेल तेच' जगाला माहिती आहे. तुमच्या कडून पण काही येऊ द्या, एखादा झकास लेख वगैरे?

In reply to by सुहास..

पुण्यातले रिक्षावाले जस्से पच्चकन थुंकतात तसे मी पच्चकन हसलो अशी स्मायली आहे इथे असे समजुन घ्या.

In reply to by सुहास..

साहेब, संवेदनशील लिखाण बंद केलेच आहे तर आता असे असंवेदनशील शेरे पण बंद करा. मिपाकरांकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा ठेवणे चूकच आहे का हो? की एकदा मदत मागून मग अनेक दिवस असे टोमणे ऐकत बसावे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मिपाकरांकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा ठेवणे चूकच आहे का हो? की एकदा मदत मागून मग अनेक दिवस असे टोमणे ऐकत बसावे. >>> गप्राव !! (सौजन्य : धमाल मुलगा) जरा मस्करी केली की आम्हालाबी टोला का ?

In reply to by सुहास..

जरा मस्करी केली की आम्हालाबी टोला का ? श्री सुहास यांना सुचना - सध्या मस्करीवर बंदी असुन एक एक लिटर एरंडेल पिऊन लेख, प्रतिसाद लिहिणे आवश्यक असल्याची नोंद घ्यावी.

In reply to by सुहास..

>>गप्राव !! (सौजन्य : धमाल मुलगा) गप्राव चा अर्थ माहित नाही. त्यामुळे तो काहीतरी चांगला आहे असे गृहीत धरतो. >>जरा मस्करी केली की आम्हालाबी टोला का ? माफ करा, अनेक जणांचा राग तुमच्यावर निघाला. लोकांनी यापेक्षा गंभीर विषयाची पण तर उडवायची संधी नाही सोडली. जाता जाता अवलिया यांना फुकटचा सल्ला (आम्ही न मागता पण सल्ले देतो). तुम्ही घ्याच एकदा एरंडेल. एकदा शुद्धीकरण होऊनच जाऊ दे. हघ्याहेवेसांनल

घरी कश्या गेलात शेवटी? :)

स्वारगेट, पुणे स्टेशन इ. ठिकाणी रिक्षा स्टँडजवळ बूथ बांधले होते. रिक्षा रांगेत असायच्या, स्थानकातून प्रवासी बाहेर आला की बूथपाशी जाउन जिथे जायचय तो पत्ता/ भाग सांगत असे, अंदाजे भाडे आणि रिक्षाचा नंबर हे लिहून ठेवले जात असे आणि हे पाहायला १ पोलीसही तिथे असे. भाडे नाकरणे वगैरे शक्यच नसे. इतकी चांगली योजना असल्याने ती थोड्याच दिवसात बंद पडली. मी रिक्षाने कधीच प्रवास करत नाही. फक्त बाईक, ती नसेल तर बस आणि चालणे.

आधी फिरलेलं डोकं....जर्रा पुढे जाउन एकाला विचारले.अहे का रिक्षा? तो म्हणाला कुठे जायचय? मी सांगितले बिब्वेवाडी कोंढवा रोड. बसा म्हटल्यावर मे बसले. थोडे पुढे गेल्यावर त्याला रस्ता सांगायला चालु केला इथे वळा...तिकडुन घ्या. आणि मला थांबायचे होते तिथेच थांबले.आणि मीटर प्रमाणे पैसे काढुन ठेवले. तो वैतागुन म्हणाला कि तुम्हाला कोंढवा रोड ला जाय्चे होते ना. अहो एक काम आठवलं... urgent होत ओ. sorry हं! म्हणुन मी गेटमध्ये चालु लागले!

मी अशीच आहे!
पुण्यातले रिक्षावाले तसेच आहेत. पुढे? ;-) बाकी क्वोल्हापुरात वडाप अजुन सुरु आहेत का हो? धमाल यायची त्यात बसायला.

In reply to by Nile

वडाप.... एक ट्रॅक्स .... तिच्या ड्रायव्हर शेजारच्या जागेवर ४ माणसं.ड्रायव्हर शेजारचा बसलेला गियर असा दोन गुड्घ्यांमध्ये घेउन बसलेला.बाकी ३ असे पुढे -मागे "अ‍ॅडजस्ट" झालेले. मध्ल्या जागेत कमीत कमी ५ ते साडेपाच (एखाद्या पोट्ट्याला चिंबवले जातं) आणि मागे ३+३ ...मध्ल्या रिकाम्या जागेत भाजिच्या बुट्ट्या,पिशव्या.बाहेर लोंबकळत २ जणं... हे अजुनही चालु आहे. पण इतके असुन ते मधले केर्ली (गाव) चा ष्टॉप दे रं बाबा असं एखादी आजी म्हणाली तर तो नाही म्हणत नाही. बस गं म्हातारे...म्हणून तिचे ओझे उतरून देण्यापर्यंत केले जाते.

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

वा वा वा. कोल्लापुरचे वडापवाले अंबळ सज्जन दिसतात. त्यांना सांगा पुण्यात येऊन रिक्षा चालवायला. :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वडाप.... एक ट्रॅक्स .... तिच्या ड्रायव्हर शेजारच्या जागेवर ४ माणसं.ड्रायव्हर शेजारचा बसलेला गियर असा दोन गुड्घ्यांमध्ये घेउन बसलेला.बाकी ३ असे पुढे -मागे "अ‍ॅडजस्ट" झालेले. मध्ल्या जागेत कमीत कमी ५ ते साडेपाच (एखाद्या पोट्ट्याला चिंबवले जातं) आणि मागे ३+३ ...मध्ल्या रिकाम्या जागेत भाजिच्या बुट्ट्या,पिशव्या.बाहेर लोंबकळत २ जणं...अश्या प्रकारच्या मानवी खासगी वाहतूक संस्थेला 'वडाप' असे म्हणतात. हे ग्रामिण भागात फुल्ल चालते. त्याचा मूळ शब्द ओढत नेणे...वरुन ओढाप्...आणि होता होता अपभ्रंश जाहला तयाचा 'वडाप' अशी व्युत्पत्ती व्याख्या असावी असा कयास आहे.

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

अजंठा सातमाळ रांगेत भटकताना वरचेवर प्रवासासाठी जीपड्या वापराव्या लागतात तिथेही हाच अनुभव येतो. वडाप छाप.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

स्वारगेट- कात्रज रस्त्यावर , इथल्या रिक्षेवाल्यां बरोबर चालव्तील तर फेफरं येउन फ्या होउन पड्तील. ते तिथेच बरे आहेत. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

स्वारगेट- कात्रज रस्त्यावर , इथल्या रिक्षेवाल्यां बरोबर चालव्तील तर फेफरं येउन फ्या होउन पड्तील. ते तिथेच बरे आहेत. :) शिवाय्....पुण्यातली हवा सज्जन्पणाला मानवत नाही असे ऐकिवात आहे.

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

.पुण्यातली हवा सज्जन्पणाला मानवत नाही असे ऐकिवात आहे. का हो ? अंमळ रागात दिसता... पुणेरी लोकांना रावण पिठले आवडले नाही काय ?

मुम्बैत असे अनुभव कमी येतात. रीक्षावाले पत्ता सांगितला तर नुसते घुमवत बसत नाहीत. पुण्यातील रीक्षावाले बहुतेक पुण्यातलेच आहेत. मुम्बैत बहुतेक रीक्षावाले परप्रान्तीय आहेत. ( खावा आता जोरदार दणके विजुभाऊ.... )

In reply to by विजुभाऊ

>>( खावा आता जोरदार दणके विजुभाऊ.... ) ते तुम्हाला इथले रिक्षावाले देतीलच :) तेव्हा मेलेल्याला आणखी मारण्यात काय मजा

In reply to by विजुभाऊ

मुम्बई मधले काही रिक्शा वाले पण असेच आहेत... सन्ध्याकाळ च्या वेळी तर यायला तयारच नसतात...रोजच्या नकार घण्टे मुळे कण्टाळुन आता ओफिस मधुन बस स्टॉप पर्यत रोज पायीच जातो...त्यातुन आमचे ऑफिस पण टेकडी वर आहे...(पवई ला डोन्गर पो़ख्ररुन केलेले)... मजा एकच की यामुळे आमचा रोज एक छोटा ट्रेक होतो .... :)