Skip to main content

पुण्यातले माजोरी , xyz..... xyz...रिक्षावाले..!

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी बुधवार, 22/09/2010 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
.....ओठांवर अ़क्षरशः वाट्टेल त्या शिव्या येतायत. काल काही तातडीच्या कामासाठी कोल्हापुर oneday trip मारावी लागली.६-३० शिवनेरी...पोचल्या पोच्ल्या कामे उरकायची घाई..धावपळ. आपल्या लोकांचा ढिसाळ कारभार्...अर्धवट राहिलेली कामं.फुकट,व्यर्थ ठरलेली दगदग .परत ९ च्या आत घरात्!चं tension! अक्षरशः काव आला होता! त्यात परतीच्या प्रवासात "मिळेल ती" बस घेण्याच्या नादात पांढर्‍या जांभळ्या बसमध्ये बसले. खबडक खबडक घोडोबा करीत ८.३० -८.४५ वाजता बस पुणे मुक्कामी पोचती झाली. काय त्या ड्रायव्हरला कोण चावलं होतं देव जाणे काल! निव्वां........त चालु होतं. इथे थांब्..तिथे थांब. हात दाखवा बस थांबवा सारखं! ..... वास्तव्य बि.वाडीत असल्यामुळे बालाजीनगर ला उतरले. रिक्षा स्टँडवर जाउन विचारले. दादा,रिक्षा आहे का? मग्रूर आवाज" कुटं जायचय" बिबवेवाडी. त्याने पच्कन थुंकत नकारार्थी मान हलवली. माझी परत आर्जवं, अहो चला ना. .. हवे तर ठरवून घ्या पैसे.. रीटर्न भाडे घ्या. (actually मी चालुन जाउ शकलेही असते...पण आमचं माहेरपण नडलं... हेssssss सामान बरोबर) जाउ दे म्हणुन मागच्या दादांना विचारले....त्यानेही पहिल्याच्या री मध्ये री ओढली. तिथुन कशी बशी थोडे अंतर चालुन आले दुसरे रिक्षावाले फोनवर बोलत होते. मी विचारले असता त्याने असा थांबा ओ जरा असा हात केला...त्याच ते बोलण होइपर्यंत मी आशेवर उभी की हा नेइल कदाचित. जवळ्च जायचय हे कळल्यावर त्याचेही तेच उत्तर्...मग जाम सटकलं डोकं....आवाज चढला....थोड्क्यात बाचाबाची झाली (अजुन थोड वेळ गेला असता तर शब्दशः 'बा'चा 'बा'ची झाली असती).पण एक दुसरे काका मध्ये पडले आणि सोहळा आवरता घेतला. हे नेहमीच घडतं. हे रिक्षावाले वेळ पहात नाहीत्,सोय पहात नाहीत्. माणुसपण पहात नाहित. आजारी,म्हातारे असोत नाहितर भर दुपारी उन्हातन्हात तान्हं बाळ घेउन जाणारी बाई असो. यांना काहीही फरक पडत नाही.मीटर प्रमाणे जे पैसे होतात ते द्यायला, कधी कधी extra द्याय्ला सुद्धा तयार अस्तात लोक. पण नाही. आणि minimum tarrif ठरलेलं असताना अशी अडवणूक करायची गरज नसते. अर्धा किलोमीटर जरी गेलंतरी त्यांचे ते minimum tarrif आपण देतो. मग मला कळत नाही की हे असे का करतात. त्यांचे नुकसान तर काहिहि होत नसते. कँपातून तर रिक्षा तयारच नसतात याय्ला ..return देऊ असे सांगुनही नन्नाचा पाढा॑ असतो. काही अपवाद रिक्षावाले असतातही..मी काही समस्त रिक्षावाळ्यांचा उध्धार करत नाही आहे. बर्‍याचदा अतिशय प्रामाणिक पणाचे अनुभावही हे लोक देऊन जातात. पण हाही प्रकार आहेच ना! यासाठी आप्ल्याला काहीही करता येत नाही याचा इतका संताप येतो ना! कसे react व्हावे अशा लोकांशी? काही कायदा आहे का कि ज्याने हे लोक बांधील होतिल प्रवाशांची ने-आण करायला? काय केलं म्हणजे वठणीवर येतिल?

वाचने 21245
प्रतिक्रिया 130

प्रतिक्रिया

In reply to by अवलिया

बंगलोरी माणुस डोक्याला एरंडेल तेल लावता लावता तेच प्यायला कधी सुरुवात करतो हे त्यालाच समजत नाही! :)

In reply to by अवलिया

बंगलोरचे पाणी माणसाला आडमुठा बनवते असा आमचा अनुभव आहे. डान्याल्ला विचारायला पायजे ( पुण्यात मुळा मुठा. बंगलोरी अडमुठा )

महान आहात नाना आपण.

अरे नुसता शो काय बघता? आज ८.०० वाजेपर्यंत किती प्रतिसाद येनार यावर बेट घेनार का कोणी? माझी बेट १०० रु. ८ वाजायच्या आत १५० क्रॉस होतात.

तुम्ही रिक्षावाल्यांना सांगितलं होतं का की तुम्ही कोल्हापुरहुन येत आहात ते?

In reply to by ब्रिटिश टिंग्या

...का बॉ ? अस का विचारलत?

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

नाही, कदाचित तो रिक्षावाला मिपाकर असायचा :)

०२०२७४९२८२८ ०२०२६०५१४१४ ०२०२६१२३५२० रिक्षावाल्यांबद्दल कुठलीही तक्रार करण्यासाठी ह्या नंबर वर फोन करा... जास्त भाडे आकारणे, जवळ्चे भाडे नाकारणे किंवा इअतर कुठल्याही.....

मस्त अनुभव कथन असे अनुभव येतच असतात पण आजकाल अशा अनुभवांना आपल्या प्रांतिय, गावकीचे राजकारणाचे विचार जोडून उगाचच पुणेकरांना टारगेट करायची पद्धत निघाली आहे. या अनुभव कथनाच्या शीर्षकातच रिक्षावाल्यांचा केलेला उल्लेख हा नक्कीच निंदनीय आहे. या साठी या धाग्याचा प्रती श्री आढाव यांना पाठवाव्यात अशी आम्ही जाहिर विनंती करतो. त्यानंतर रिक्षावाल्यांनी आंदोलन केले तर त्याची पुर्ण जवाबदारी जाई यांचीच आहे असे मी आज नमुद करतो. आपल्या प्रत्येक धाग्याला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावेत यासाठी लोकांची केविलवाणी धडपड पाहुन कोणतेही आश्चर्य वाटत नाही. अरे शंभर प्रतिसाद हवेत तर आम्ही एकच प्रतिसाद एका मिनिटातच १०० वेळा टाकुन धाग्याची शंभरी गाठुन देउ ना. त्याच बरोबर प्रत्येक धाग्यावर प्रतिसादरुपी टिका करण्याची फॅशन सुद्धा आजकाल फारच बोकाळलेली आहे असे दिसते, जोक्स अपार्ट जाई ताई या प्रश्न युनिवर्सल आहे. मुंबईत हा प्रॉब्लेम नाही येत असे म्हणणार्‍या विजुभाउंनी मला एअरपोर्ट वरुन पार्ल्या साठी जास्तिचे पैसे न देता ऑटो मिळवुन दाखवावी. आम्ही त्यांचा जाहिर सत्कार घडवून आणु. बाकी कुणी आजवर या लिंक वर तक्रार नोंदवली आहे का???

In reply to by निखिल देशपांडे

श्री.देशपांडे ह्यांना एक नम्र विनंती गेल्या वर्षी मुंबईतील रिक्षा, त्यांचे मिटर्स आणि वाहतुक ह्यासंदर्भात श्री.देशपांडे ह्यांनी केलेले बहुमोल संशोधन त्यांच्या जागृत सामाजिक जाणीवेला स्मरुन सामान्य नागरिकांसमोर मांडावे अशी मी त्यांना विनंती करतो. ह्या संशोधनाच्या निमित्ताने त्यांना आलेल्या निरनिराळ्या अनुभवसंपन्नतेचे भांडार त्यांनी इथे द्यावे असेही मी सुचवतो. लवकरच श्री.निखील देशपांडे ह्यांची सखोल संशोधनातुन जन्म घेतलेली 'रिक्षा, एक समृध्द अडगळ' ही महाकादंबरी प्रकाशित होत आहे, तरी इच्छुकांनी (चुकुन भाविकांनी लिहिणार होतो.) प्रकाशनपुर्व सवलतीसाठी नोंदणी करावी. नोंदणीसाठी श्री.बिपीन कार्यकर्ते (प्रकाशक्,वाळवंट पब्लिकेशन हाऊस) ह्यांच्याशी संपर्क करावा.

In reply to by धमाल मुलगा

'पुणेरी रिक्षा, एक समृध्द अडगळ' असे शीर्षक दिल्याशिवाय कादंबरी हिट्ट जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. वाटल्यास "माजोरडे पुणेरी रिक्षावाले आणि कोल्हापुरी प्रवासी" असा उपसंहार जोडुन द्यावा. प्रस्तावना जाईतै लिहुन देतील (या प्रकारामुळे उपसंहाराला प्रस्तावना असा एक नाविन्यपुर्ण पायघडा पण पडेल).

In reply to by निखिल देशपांडे

संपादकीय म्हणजे काय, असा प्रश्न ज्यांना पडला आहे, त्यांनी हा प्रतिसाद वाचावा! ;) आणि त्यावर 'वाचकाचे पत्र'ही बोनस! ;)

In reply to by चेतन

लेखाला काय म्हणायचे ते म्हणा, हा देशपांडे आण्णांचा प्रतिसाद म्हणजे 'संपादकीय' आहे. त्यापुढे सर्वाधिकार वाचकाच्या हाती!!!

In reply to by श्रावण मोडक

हा प्रतिसाद देशपांडे आण्णांचा आहे म्हणजे नक्किच 'संपादकीय' आहे. त्यापुढे कोणतेहि अधिकार वाचकाच्या हाती नाहित ;)

In reply to by चेतन

हेssssssss, कळलं तुला. :) तेंव्हा संपादकीयाविषयी (किंवा अग्रलेखाविषयी) कधीही काहीही प्रश्न करायचे नसतात. तुझ्या धाग्याचा समारोप इथेच झाला पहा!

In reply to by निखिल देशपांडे

मुंबईत हा प्रॉब्लेम नाही येत असे म्हणणार्‍या विजुभाउंनी मला एअरपोर्ट वरुन पार्ल्या साठी जास्तिचे पैसे न देता ऑटो मिळवुन दाखवावी. आम्ही त्यांचा जाहिर सत्कार घडवून आणु. मी सत्काराला तयार आहे. एअर पोर्ट पासून चालत जाण्याच्या अंतरावर माझे घर आहे तरीदेखील माझ्या सुदैवाने मला आत्तापर्यन्त एअरपोर्टवरून घरी जायला रीक्षा अजिबात मिळाली नाही असे कधीच झालेले नाही. रात्री अपरात्री कधितरी एअरपोर्टवरचा एखादा रिक्षावाला दुप्पट पैसे मागतो. पण येतात हे महत्वाचे

वास्तविक त्या बस ड्रायव्हरलाच सांगायला हवे होते तुम्ही बस बि. वाडी मार्गे घ्यायला , मग अगदी घराजवळ उतरता आले असते.

मुंबईचा अनुभव ऐका. वर सांगितल्याप्रमाणे एअरपोर्ट ते पार्ला, पार्ला स्टेशन ते आसपास कुठेही, अंधेरी स्टेशन (ईस्ट वा वेस्ट) ते जवळपास कुठेही, अजिबात येणार नाहीत. ठाणे स्टेशनलाही तीच स्थिती! मात्र सायनहून अंधेरी वा पार्ले सांगा, लगेच तयार, पण हायवेने इतक्या जोरात चालवेल की गंतव्य स्थानापर्यंत प्राण कंठाशी येणे म्हणजे काय याचा याचि देही अनुभव घ्याल.

जाई मॅडम, पुणे असो वा मुंबई वा कोल्हापुर, माणसाच्या जाणीवा त्याच्या इन्कम नुसार बदलतात. रिक्षावाले हे तुलनेने आर्थिक बाबतीत निम्न दर्जातील असल्याने त्यांची भाषा आणि वागणे देखील सर्वसाधारणपणे तसेच असते. हा खरेतर देशपातळी वरील प्रश्न असुन यासाठी सर्व रिक्षा, टॅक्सी चालक-मालकांचे मनपरिवर्तन कार्यशाळांद्वारे होणे गरजेचे आहे. मला देखील कोल्हापुर मध्ये असाच अनुभव आला आहे. रेल्वे स्थानक ते महालक्ष्मी मंदिर ते एस टी स्थानक या साधारण ४-५ किमी प्रवासाकरता आधी रुपये ७० सांगितले आणी प्रवास पुर्ण झाल्यावर रुपये २०० मागत होता. शेवटी पोलिसांचे नाव काढल्यावर रु १२५ मध्ये त्याने माझी सुटका केली. मला रुपये २०० फार काही जास्त नाहीत, पण तरी देखील फसवले गेल्या बद्दल वाईट हे वाटतेच. असो. जमेल तसे या विषयावर अजुन लिहिन.

In reply to by पैसा

....जाउ द्या ओ...... ज्याला जसा अनुभव येतो तो तसा समज करुन घेतो.... तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे का? चार आंधळ्या मित्रांची आणि हत्तीची? तसे आहे....!

अहो शेवटी पुण्याचेच ते रिक्षावाले. जसे तिथले लोक असणार तसेच तिथले रिक्षावाले असणार. अवांतर - ऐरणीच्या भूमिकेत असताना घाव सोसायचे आणि घणाच्या भूमिकेत असताना घाव घालायचे असं आमचे एक दोस्त सांगतात.

आमच्या गोव्यात किनई, रिक्षा टॅक्सींसारख्या एकाच जागेवर ( स्टँडवर) उभ्या असतात. तुमच्यासारख्या फिरत नाहीत काही! रेट किती माहित आहे? २ किमी ला ४०/- रु. मीटर कसा चालतो ते आम्ही आजपर्यंत काय बघितलंच नाही. १० किमी जायचं तर काढा २००/- रु. घुमवणार मात्र नाहीत! परवडतं तर बघा!

In reply to by पैसा

नीट चौकशी करा नक्की पुणेकर असतील. पुण्याचे सगळे लोक हे असलेच हो. सगळीकडे जाउन वातावरण बिघडवुन टाकतात पार

अगदीच नाईलाज झाल्याशिवाय मी रिक्षाने कधीही प्रवास करतच नाही. बेस्ट बस, पश्चिम रेल्वे, माझी कार किंवा बाईक, नाहीतर चालत जाणे पसंद करतो. (स्वावलंबी)

In reply to by इंटरनेटस्नेही

तुमच्याकडे कार, बाईक आहे, पश्चिम रेल्वे रुटवर राहता आणि २०० रु . भाडे (४-५ किमी साठी) जास्त वाटत नाही हे वाचून आनंद झाला... लहान वयात बरीच प्रगती आहे म्हणायची...

धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड प्रतिसादाचे शतक पुर्ण झाल्याबद्दल माननीय मिसळपाव भगिनी जाई यांचे अभिनंदन! येथे एक सत्तर फुटी बॅनर समजावा!> धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड

>>मी चालुन जाउ शकलेही असते...पण आमचं माहेरपण नडलं... हेssssss सामान बरोबर आव एवढ सामान नका? बरोबर घेऊ लय त्रास व्हातो आपन म्हनता माझ घर पाई चालन्या इतक जवळ आहे मग.......तुमि पाई चालु शकत नाही तो काय?पुने xyz करांचा दोश आहे का ? आमाला न समझलेले xyz

आई आजारी होती. हॉस्पिटल तसे जवळ होते पण आजारी माणसाला कसे चालवायचे म्हणून रिक्षा शोधायला लागायची. त्यावेळेस जे दादापुता करायला लागले आणि रिक्षावाले इतके हलकटपणाने वागत होते की सगळ्या रिक्षावाल्याना चाबकाने फोडून काढावे असे वाटायचे. काय वाट्टेल ते पैसे मागणे, गिर्‍हाईक नाकारायला वाट्टेल त्या सबबी सांगणे. सगळे प्रकार पाहिले. एक आठवडा हा माज सहन करावा लागला. हा उर्मटपणा इतका सर्रास आढळतो की रिक्षावाल्यांना लायसन मिळवताना उर्मटपणातील प्रावीण्य सिद्ध करावे लागते का अशी शंका यावी! असो. ह्या जमातीविषयी मला काडीचीही सहानुभूती वाटत नाही.

In reply to by हुप्प्या

अगदी असाच अनुभाव मला माझ्या सासर्‍यांच्या आजारपणात आलेला आहे. आणि मग जो संताप मनात बसला आहे ना घर करुन्.....तो जात नाही.

वा वा वा!!!सुंदर लेख. आजकाल स्वतःच्या लेखाचा टी.आर्.पी. वाढवायचा असेल तर एक अतिशय सोपा आणि उत्तम उपाय. पुण्यातील दुकानदार, रस्ते, बस, री़क्षा यावर एक लेख लिहायचा. आपोआपच लेखाचा, लेखकाची/चा टी.आर्.पी वाढतो. छान हो छान. कोल्हापुर म्हणजे अगदी जणु कॅलिफोर्नियाच. सगळ आल बेल्.अगदी १० फुटावर जायच असेल तरीसुद्धा री़क्षेवाले मागे लागतात माझ्याच रीक्षेत बसा म्हणुन.आणि ति़कडचे रीक्षेवाले पान्,तंबाखु, बिडी आदीच सेवन म्हणजे..छे छे..काहीतरीच काय. आणि पैसे मीटर प्रमाणे? पैसे किती घेणार विचारल तर चिडतात. सगळे तिकडचे री़क्षेवाले समाजसेवा नाही का करत.पैसे कसे घेतील? आणि बर सगळ्यांना असे अनुभव पुण्यातच येतात. बाकी सगळीकडे हे जिथ जातील तिकड याना अगदी जणु डोक्यावरच घेतात. चालुदे पोऱकट पणा..

In reply to by Dhananjay Borgaonkar

अनुभव महत्वाचा... स्थान हे केवळ नाममात्र उल्लेखले गेले आहे. कोल्हापुरात किन्वा इतरही कुठे असे अनुभव येउ शकतात. पण इथे आजुबाजुच्या बर्‍याच लोकांना similar अनुभव आलेला आहे. आणि खरच तो त्रास दायक होता. त्यामागचा thought काय हे जाणुन घ्यायची इच्छा होती.आणि अर्थात पुढच्या वेळी असे घड्ल्यास काय करायचे यासाठी धागा टाकला होता. हे टी.आर्.पी वगैरे वाढवायची असते .....ती कोणत्या प्रकारचे लेख टाकल्यावर वाढते.. हे मोलाचं ज्ञान आपल्या कडुनच मिळालं. पुढल्या वेळी लक्षात ठेउ! :)

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

>>>>>>हे टी.आर्.पी वगैरे वाढवायची असते .....ती कोणत्या प्रकारचे लेख टाकल्यावर वाढते.. हे मोलाचं ज्ञान आपल्या कडुनच मिळालं. बरोबर आहे, जाई ताई, तुमच्या भावना समजु शकतो. इकडचे काही लोक असे आहेत ज्यांना पुणे आणि पुणेकरांविषयी काहीही लिहिले की ते टीआरपी वाढवण्यासाठी लिहलंय असं वाटतं... मी सुद्धा मागे असाच एक लेख लिहिला होता. पण माझ्या वरती सुद्धा हेच 'अ‍ॅलिगेशन' करण्यात आलं. काय बोलणार अशावेळेस.. निमुट सहन करावं लागतं. :( (कधीकाळी किंचित दुखावला गेलेला, पण आता सावरलेला)