लाटा
उगवले चंद्र माझे सांज झाकोळली जरी
माझ्या अवखळ लाटा आल्या तुझ्याच किनारी
चंद्रबळे उचंबळ तारांबळ लहरींची
पाचूगर्भात बळावे हुरहूर ओळखीची
लाभे लाटांना किनार सोनसळी किरणांची
मंद गुलाबी प्रेमाची, शुभ्र धवल मायेची
झाकोळली सांज झाली सखी कातळ रात्रीची
माझे चांदभरे डोळे वाट पाहती उद्याची... नव्या सुवर्ण प्रभेची
एकदा
+१
वा
पाचूगर्भ रोचक. सुंदर,
सुंदर!
ताराबलं चंद्रबलम्
छान शब्द.. कविता खूप आवडली.
छान
गुर्जींच्या कविता
चांदभरे डोळे - हा शब्द हृदयात
भावनांचा मजेदार शब्दखेळ
शब्दमौज आहे खरी
+१
सुरेख कविता. चंद्रबळ- तारांबळ
सुरेख
पाचूगर्भात
पाचूगर्भात
मजेदार!!!