Skip to main content

लाटा

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 22/09/2010 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
उगवले चंद्र माझे सांज झाकोळली जरी माझ्या अवखळ लाटा आल्या तुझ्याच किनारी चंद्रबळे उचंबळ तारांबळ लहरींची पाचूगर्भात बळावे हुरहूर ओळखीची लाभे लाटांना किनार सोनसळी किरणांची मंद गुलाबी प्रेमाची, शुभ्र धवल मायेची झाकोळली सांज झाली सखी कातळ रात्रीची माझे चांदभरे डोळे वाट पाहती उद्याची... नव्या सुवर्ण प्रभेची
लेखनविषय:

वाचने 2454
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

एकदा वाचली. परत वाचेन. शब्दांची एक वेगळी मजा दिसते आहे.

In reply to by श्रावण मोडक

हेच म्हणतो.

सुंदर आहे! चंद्रबळे उचंबळ तारांबळ लहरींची हे आवडले!

शब्द अन् भाव यांची सुंदर अलवार गुंफण! खूप खूप आवडली कविता. छान लयीत बसते आहे. वाचनमात्र येत असतो मी मधून मधून, पण ह्या कवितेला प्रतिसाद दिल्यावाचून राहवले नाही! :) राघव

ताराबलं चंद्रबलम् ! हे भरती-ओहोटी अनुभवणार्‍या लाटांबद्दल वापरणे नाविन्यपूर्ण आहे.

छान, नादमय कविता. चंद्रांचं अनेकवचन का वापरलं असावं याचा विचार करतो आहे.
ताराबलं चंद्रबलम् ! हे भरती-ओहोटी अनुभवणार्‍या लाटांबद्दल वापरणे नाविन्यपूर्ण आहे
असेच म्हणतो. "वैवाहिक जीवन हे असेच अव्याहत भरती-ओहोटीचे असते. सुखाची पौर्णिमा आणि दु:खाची अमावस्या यांच्यात एकमेकांच्या 'कले'कलेने नक्षत्रांचे देणे फेडायचे असते..." अशी काही दवणीय वाक्यं सुचली ;)

In reply to by नंदन

गुर्जींच्या कविता समजल्या तरी तसं वाटत नाही पण या वेळेस कविता समजली आणि आवडलीदेखील! याची जाणीव दवणीय गाईड वाचल्यानंतर झाली.

माझ्या अवखळ लाटा आल्या तुझ्याच किनारी ही सुटी ओळ, चंद्रबळे उचंबळ तारांबळ लहरींची यातील ळ चा अनुप्रास, हे विशेष आवडले. (आस्वादक) बेसनलाडू गेयतेच्या दृष्टीने आणाखी सुधारता येईलसे वाटते. चू. भू. द्या. घ्या. (सुधारक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सहमत आहे कवितेतील कल्पना व शब्दयोजना खासच! मात्र मला तालात नीट म्हणता आली नाही (कदाचित माझा दोष)

आणि सुरेल कवितेचा वेगळाच अनुभवानंद !!

नावा प्रमाणेच कवीता हि अथांग... आहे....... छान.......

नावा प्रमाणेच कवीता हि अथांग... आहे....... छान.......