✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात?

य
युयुत्सु यांनी
Mon, 09/06/2010 - 13:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24316 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

पाशवी पणाचा कळस ! ! !

निरन्जन वहालेकर
Mon, 09/06/2010 - 14:04 नवीन
भंयंकर प्रकार ! पाशवी पणाचा कळस ! ! !
  • Log in or register to post comments

बाप रे !! 'जख्मी औरतची' आठवण

परिकथेतील राजकुमार
Mon, 09/06/2010 - 14:23 नवीन
बाप रे !! 'जख्मी औरतची' आठवण झाली. आमचे पका काका म्हणतात तसा एखादा योग त्या रिक्षावाल्याच्या पत्रिकेत आला असावा.
  • Log in or register to post comments

बापरे! अशा गुन्हेगारांना मग

इंटरनेटस्नेही
Mon, 09/06/2010 - 14:36 नवीन
बापरे! अशा गुन्हेगारांना मग स्त्री असो वा पुरुष, सौदी स्टाईल शिक्षाच व्हायला हवी. लाहोल विलाकुवत!
  • Log in or register to post comments

अश्या प्रकारांना....

प्रसन्न केसकर
Mon, 09/06/2010 - 16:00 नवीन
इंग्रजीत बॉबिट (bobbit)असे म्हणतात. १९९३ मधे लॉरेना बॉबिट या महिलेने आपल्यावरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी आपल्याच पतीचे तो झोपेत असताना लिंग कापले होते. या प्रकारावरुन हे नांव पडले. परंतु अश्या प्रकारचे गुन्हे त्याआधीही घडत. क्रिमिनॉलॉजीमधे अश्या प्रकारच्या गुन्ह्यांना लिंगविकृतीशी संबंधित गुन्हे समजले जाते. बहुतेकदा बॉबिट च्या प्रकरणातील आरोपी एकतर लैंगिक अत्याचाराचा बदला घेण्यासाठी गुन्हा करतात तर काही अपवादात्मक प्रकरणांमधे ते लिंगपिसाट असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
  • Log in or register to post comments

पाशवी असतात व मायावी पण असतात

अविनाशकुलकर्णी
Mon, 09/06/2010 - 16:02 नवीन
पाशवी असतात व मायावी पण असतात
  • Log in or register to post comments

भयानक.

llपुण्याचे पेशवेll
Mon, 09/06/2010 - 16:20 नवीन
भयानक.
  • Log in or register to post comments

खरेच भयानक!!!

मस्त कलंदर
Mon, 09/06/2010 - 16:30 नवीन
पण मला एक कळत नाही, नेमक्या तुम्हालाच अशा बातम्या कशा काय सापडतात??? आम्हाला उगाच राजकारण्यांचे लंबुळके चेहरे, अमक्या सेलिब्रिटीचे लग्न ढमक्याशी, भारत हजार ठिकाणी खेळात हरला असल्याच बातम्या सापडता!!!
  • Log in or register to post comments

भयानक आहे खरं

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 09/06/2010 - 16:47 नवीन
पण मकीला पडलेला प्रश्न मलाही पडलाय; मला तर कोंकोणा आणि रणबीरच्या लग्नाची बातमी दिसली टीओआयमधे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

'पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना'

मेघवेडा
Mon, 09/06/2010 - 16:59 नवीन
'पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना' मुळे असावं! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हॅ हॅ

सुनील
Mon, 09/06/2010 - 17:01 नवीन
पेपर सगळ्याच बातम्या देतो. ज्याला जे हवे ते त्याने वाचावे! कुणाला काश्मिर तर कोणाला कोंकणा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

हाहाहाहा

श्रावण मोडक
Mon, 09/06/2010 - 18:52 नवीन
नेमक्या तुम्हालाच अशा बातम्या कशा काय सापडतात???
शोधा म्हणजे सापडेल, असं म्हणतात बुवा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

नेमक्या तुम्हालाच अशा बातम्या कशा काय सापडतात?

युयुत्सु
Mon, 09/06/2010 - 19:50 नवीन
नेमक्या तुम्हालाच अशा बातम्या कशा काय सापडतात?
नित्शे नावाच्या एका प्रसिद्ध तत्त्वज्ञाचे एक प्रसिद्ध वाक्य आहे - women are barbarous in love and vengeance. नित्शेचे हे विधान खरं की खोटं याचा शोध घेतो आहे. अशा बातम्या नित्शेच्या विधानाला पुष्टी देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

ज्योती फळ विक्रेता आहे.

वेताळ
Mon, 09/06/2010 - 17:31 नवीन
मला वाटते ती मिक्स फ्रुट कापुन विकत असावी. माणुस न मारता असे काम तिची कलाकुसर दाखवते. बाकी ते वाईट होती का चांगली किंवा रिक्षावाला चांगला का वाईट हे पुर्ण सत्य कळाल्या खेरीज समजणार नाही.
  • Log in or register to post comments

आग बाबो

jaypal
Mon, 09/06/2010 - 18:38 नवीन
"पुरुष" नाटकाची आठवण झाली. Image removed.
  • Log in or register to post comments

"पुरुष" नाटकाची आठवण

मदनबाण
Mon, 09/06/2010 - 18:51 नवीन
"पुरुष" नाटकाची आठवण झाली. हेच म्हणतो... (नाना पाटेकरचा पंखा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

आणि कुठं गेल्या त्या स्त्रीमुक्तीवाल्या

यशवंतकुलकर्णी
Mon, 09/06/2010 - 18:45 नवीन
एका बाईंना काहीतरी कापाकापी केली म्हणून स्त्रीया पाशवी असतात का असला जाहीर प्रश्न कसा काय विचारू शकता तुम्ही?? आणि कुठं गेल्या त्या स्त्रीमुक्तीवाल्या... ;-)
  • Log in or register to post comments

स्त्रीया पाशवी असतात का असला

युयुत्सु
Mon, 09/06/2010 - 19:40 नवीन
स्त्रीया पाशवी असतात का असला जाहीर प्रश्न कसा काय विचारू शकता तुम्ही??
मी काय प्रश्न विचारला आणि तुम्ही माझ्या तोंडी काय घातले? असा प्रश्न विचारणे बेकायदेशीर आहे की अनैतिक??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी

मी म्हणतो स्त्रीया पाशवी नसतात!!!!

यशवंतकुलकर्णी
Mon, 09/06/2010 - 19:45 नवीन
मी कशाला तुमच्या तोंडी काही घालू...शीर्षकच पाहा तुमचे "कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात?" तुमचा हा प्रश्न बेकायदेशीर आहे आणि अनैतिकसुध्दा आहे. आमच्यासारख्या अननुभवी लोकांच्या मनात त्यामुळं उगाच स्त्रीयांबद्दल भीती निर्माण होईल. मी म्हणतो स्त्रीया पाशवी नसतात!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत

सूड
Mon, 09/06/2010 - 19:53 नवीन
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हेच खरं. अवांतरः आम्हाला स्वर्ग पहायचा नाही, मूळ प्रश्नावर ऑब्जेक्शन नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी

तुमचा हा प्रश्न बेकायदेशीर

युयुत्सु
Mon, 09/06/2010 - 20:41 नवीन
तुमचा हा प्रश्न बेकायदेशीर आहे आणि अनैतिकसुध्दा आहे.
योग्य दाखले देऊन आपले म्हणणे सिद्ध करा नाहीतर मी तरी तुमच्या प्रतिसादांकडे दूर्लक्ष करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी

थांबतो

यशवंतकुलकर्णी
Mon, 09/06/2010 - 21:00 नवीन
व्वा!!! सिध्द झाले नाही आणि तुम्ही माझ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले तर जसं काय आकाशच कोसळणार आहे. आणि यात दाखले देऊन सिध्द करण्यासारखं काय आहे?? कुठल्यातरी पागल बाईनं काहीतरी कापाकापी केली, कोणत्यातरी बाराण्याच्या पेपरनं त्याची बातमी करून छापली आणि तुम्ही त्यावर आधारीत राहून "कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात??" असा जाहीर सवाल विचारताय. इथं चर्चा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एखादी स्त्री अपवाद असू शकेल असा विचार बिलकुल करावा वाटला नाही. तुमचा हा प्रश्न तुमचा बेकायदेशीर, अनैतिक प्रश्न आहे म्हणून सिद्ध करताना तुम्हालाही विचारात घ्यावं लागेल आणि मग पुढची चर्चा व्यक्तिगत पातळीवर उतरेल. म्हणून थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

तुमचा हा प्रश्न तुमचा

युयुत्सु
Tue, 09/07/2010 - 07:20 नवीन
तुमचा हा प्रश्न तुमचा बेकायदेशीर, अनैतिक प्रश्न आहे म्हणून सिद्ध करताना तुम्हालाही विचारात घ्यावं लागेल
एखादा प्रश्न कायदेशीर आणि नैतिक आहे अथवा नाही हे ठरवणे जर व्यक्तीसापेक्ष असेल ( म्हणजे प्रश्न विचारणा-या व्यक्तीवर अवलंबून असेल) आणि ते जर सिद्ध करता येत नसेल तर माझ्या दृष्टीने तो जातिवंत बिनडोकपणा असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी

प्रश्न तुमचा आहे

यशवंतकुलकर्णी
Tue, 09/07/2010 - 12:34 नवीन
तुमचा जन्म पाशवी स्त्री च्या पोटी झालेला नाही ही सत्यता असूनही तुम्हाला असला अश्लाघ्य प्रश्न विचारावा वाटला.
तुम्ही जी कोणती स्त्री साथीदार म्हणून निवडली असेल ती पाशवी नाही ही सत्यता असूनही तुम्ही ही निर्लज्ज आरोळी ठोकली.
तुमच्या पोटी स्त्री जन्माला आली असेल ती पाशवी नाही ही सत्यता असूनही भर चव्हाट्यावर ही असंबध्द बडबड तुम्ही करू शकता. वरील सत्यतांचा ढळढळीत प्रकाश तुम्हाला दिसू शकत नाही. यावरून हेच दिसतं की व्यक्तिसापेक्षतेचा विचार तुम्हाला तुमच्यापुरतासुध्दा देखील करता येत नाही. आणि हाईट ऑफ इट २४ तास उलटून गेले तरी तुम्हाला असा प्रश्न विचारल्याबद्दल यत्किंचितही पश्चात्ताप होत नाही. जाहीर मंचावर "कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात" याच शीर्षकाखाली चर्चा पुढे चालू ठेवता. तुम्हाला मागच्या प्रतिसादात चर्चा व्यक्तीगत पातळीवर येईल याबद्दल सावधान केल्यानंतरही नसती गरळ टाकीत उगाच वाद पुढे रेटता. मी तुमच्यासमोर काहीही सिद्ध केलं तरी काही अर्थ नाही कारण प्रश्न तुमचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

योग्य दाखले देऊन आपले म्हणणे

शाहरुख
Mon, 09/06/2010 - 21:12 नवीन
योग्य दाखले देऊन आपले म्हणणे सिद्ध करा नाहीतर मी तरी तुमच्या प्रतिसादांकडे दूर्लक्ष करेन.
हा हा हा...मेलो !! बाकी, बातमीतील पुरुषाबद्दल सहानुभूती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

मत बदलेल

सूड
Mon, 09/06/2010 - 18:48 नवीन
स्त्रिया पाशवी नसतात असं ज्यांचं मत असेल ते कदाचित बदलेल हे वाचून.
  • Log in or register to post comments

मत वगैरे काही बदलणार नाही कुणाचं

यशवंतकुलकर्णी
Mon, 09/06/2010 - 20:04 नवीन
असल्या पाणचट बातम्या एकतर छापूनच येऊ नयेत. त्या येतात. लगेच त्यांचं जनरलायझेशन करून "स्रीया पाशवी असतात" असे काही ध्वनितसुद्धा करायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

स्रीया हा शब्द काळजास भिडला.

llपुण्याचे पेशवेll
Mon, 09/06/2010 - 20:17 नवीन
स्रीया हा शब्द काळजास भिडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी

>>असल्या पाणचट बातम्या एकतर

सूड
Mon, 09/06/2010 - 20:25 नवीन
>>असल्या पाणचट बातम्या एकतर छापूनच येऊ नयेत ही बातमी तुम्हाला पाणचट वाटते ?? मला निव्वळ अमानुषपणा वाटतो. अवांतरः बाकी स्रीया शब्दाबाबतीत आमचं काहीसं पुपेंसारखंच झालंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी

दोन्ही सारखंच

यशवंतकुलकर्णी
Mon, 09/06/2010 - 21:20 नवीन
पाणचटपणा ही अमानुष होण्याची सुरूवात आहे. म्हणून दोन्ही सारखंच. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>> पाणचटपणा ही अमानुष

सूड
Mon, 09/06/2010 - 23:38 नवीन
>> पाणचटपणा ही अमानुष होण्याची सुरूवात आहे. नवीन माहितीबद्दल धन्यवाद. स्वगतः पाणचट आमटी, भाजी नवर्‍याला वाढणे स्त्रियांच्या अमानुषपणाची सुरुवात असते असा अर्थ घ्यावा का रे भाऊ ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी

तुमचं तुम्ही बघून घ्या

यशवंतकुलकर्णी
Mon, 09/06/2010 - 23:47 नवीन
मी कधी कुणाला कशाचा अर्थ विचारत नाही आणि सांगत तर बिलकुलच नाही. तुमचं तुम्ही बघून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तुम्हाला विचारत सुद्धा

सूड
Tue, 09/07/2010 - 09:10 नवीन
तुम्हाला विचारत सुद्धा नाही. >>पाणचटपणा ही अमानुष होण्याची सुरूवात आहे. म्हणून दोन्ही सारखंच. हे असले अर्थ म्हणजे कळलं आम्हाला एकंदर काय आहे ते. ज्याला सुरुवात आणि त्याच्या पुढची पायरी हे दोन्ही सारखं वाटतं असल्या माणसाला काय विचारणार ? म्हणूनच 'स्वगत' चा अर्थ आपणांस उमगला नसावा, आणि आपण ते स्वतःवर ओढवून घेतलंत. आपल्या मराठीच्या ज्ञानाबद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे. त्यामुळे तुमचं चालू द्या, मी निरोप घेतो. जाता जाता पुन्हा एकदा: आपला स्रीया हा शब्द काळजाला भिडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी

मी अर्थ सांगत नाही आणि विचारत

यशवंतकुलकर्णी
Tue, 09/07/2010 - 13:25 नवीन
मी अर्थ सांगत नाही आणि विचारत नाही याचा अर्थ मी विधाने करीत नाही असा घेतलात यात सर्व आले. मी सुद्धा या चर्चेतून आता रजा घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पुरुष व स्त्री ह्यांत काहीच

शानबा५१२
Mon, 09/06/2010 - 18:59 नवीन
पुरुष व स्त्री ह्यांत काहीच फरक नसतो फक्त काही शारीरीक बदल सोडुन्,माझे म्हणने आज जगाला पटले तर. some Qs, 1.why did she choose THAT PART OF BODY? 2.What was that person doing while she was CHOPPING?why did not he object?
  • Log in or register to post comments

शानबा अजुन तुझे लग्न व्हायचे आहे.

वेताळ
Mon, 09/06/2010 - 19:34 नवीन
काहीतरी मते आताच बनवायची घाई करु नकोस.
  • Log in or register to post comments

माझे 'तिच्या'बद्दल काय मत आहे

शानबा५१२
Mon, 09/06/2010 - 22:47 नवीन
माझे 'तिच्या'बद्दल काय मत आहे ते महत्वाचे,बाकी सर्व गेल्या मसनात. 'ती' नाही भेटली तर मी ही मसनात जाईन्,दुसरीला शोधत. वाचलस ना,मग आता तु पण जा मसनात!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

अरे वा.......

वेताळ
Tue, 09/07/2010 - 10:11 नवीन
तुझ्या "त्या"सगळ्याजर मसनात येणार असल्यातर मला काही काळजी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

युयुत्सुंना अपवाद म्हणजेच

शिल्पा ब
Mon, 09/06/2010 - 21:25 नवीन
युयुत्सुंना अपवाद म्हणजेच सर्वसामान्य असे काहीसे वाटत असावे...नाहीतर सारखे अशा पद्धतीचे धागे त्यांनी काढले नसते.. बातमीतील पुरुशाविषयी सहानुभूती. बाकी किती स्त्रियांना हुंड्यावरून जिवंत जाळले आहे...किती तरुण अन शोडशवर्षीय मुलींना प्रेमाला प्रतिसाद देत नाही म्हणून जिवंत जाळणे, असिड फेकणे इ. ना तोंड द्यावे लागते आहे... किती स्त्रियांना बलात्कार करून मारून टाकले आहे....अन या सगळ्यांना पुरून जेव्हा स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहतेय , स्वसंरक्षण करते तेव्हा तिला अबला म्हणायचे... अरेरे आमचेच चुकले..हा पिडीत महिलांचा आकडा कमीच असावा, कारण स्त्रिया मेल्या फारच पाशवी आहेत...पाशवी अबला म्हणा हवे तर, कारण यांना स्वसंरक्षण पण जमत नाही असे म्हणतात.
  • Log in or register to post comments

+1000000

पैसा
Mon, 09/06/2010 - 22:58 नवीन
अर्थात असं जनरायलेझशन तुम्हाला का करावंसं वाटलं? अशी वृत्ति कोणाचीही असू शकते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

-1000000

शाहरुख
Mon, 09/06/2010 - 23:21 नवीन
युयुत्सुनी जनरलायझेशन कुठं केलंय पण ? कुणीतरी त्यांना कधीतरी म्हटलेले आहे की "स्त्रिया पाशवी नसतातच".. त्यावर त्यांनी या बातमीद्वारे हे उत्तर दिलंय "हे बघ, आहे की नाही एकतरी स्त्री पाशवी "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

-१

पैसा
Mon, 09/06/2010 - 23:23 नवीन
कुणीतरी त्यांना कधीतरी म्हटलेले आहे की "स्त्रिया पाशवी नसतातच"
हे पण जनयरलायझेशन झालं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख

हे पण जनयरलायझेशन झालं! तोच

शाहरुख
Mon, 09/06/2010 - 23:26 नवीन
हे पण जनयरलायझेशन झालं!
तोच तर त्यांचा मुद्दा आहे :-) युयुत्सु राव, चहा तरी पाजा आता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सुपारी

पैसा
Mon, 09/06/2010 - 23:29 नवीन
तुम्हाला सुपारी दिल्ये का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख

मुद्दा

पैसा
Mon, 09/06/2010 - 23:50 नवीन
आमचा कोणत्याही प्रकारच्या जनरालायझेशनला विरोध आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख

चहा तरी पाजा आता

युयुत्सु
Tue, 09/07/2010 - 13:29 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख

सगळे टोणगे गाभण काय हो

अनाम
Tue, 09/07/2010 - 15:00 नवीन
सगळे टोणगे गाभण काय हो युयुत्सु?? (एकंदर स्त्री जमातीशी तुमच वाकड असल्याने म्हशी म्हणालो नाही. ) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

म्हशी

मिसळभोक्ता
Tue, 09/07/2010 - 17:56 नवीन
म्हशी ह्या पशु असल्यामुळे ऑटोम्याटिक पाशवी प्रवृत्तीच्या असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनाम

मिभोकाकांचा विजय

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/07/2010 - 18:03 नवीन
मिभोकाकांचा विजय असो. युयुत्सु, सॉयमिल्क वापरता येईल. पाशवी वृत्तीचा संबंधच नाही येणार! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

कालिजात असताना तर्कशास्त्र

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 09/07/2010 - 03:39 नवीन
कालिजात असताना तर्कशास्त्र शिकवले होते आम्हाला. त्यातील नियमानुसार "स्त्रिया पाशवी नसतात" या वाक्याचे विरुद्धार्थी वाक्य "काही स्त्रिया पाशवी असतात" असे होते "सर्व स्त्रिया पाशवी असतात" असे होत नाही. युयुत्सु साहेबांनी प्रश्न खूपच ओपन एन्डेड विचारला आहे. मुळात "स्त्रिया पाशवी नसतात" हे वाक्य कुणाचे आहे हेच मला माहित नाही. तसे कुणी म्हणाले नसेल तर हा वादच निराधार आहे. असेही बघता असे काही करणारी ही काय पहिली स्त्री आहे काय? अबु घारेब मधील छळाच्या कहाण्या वाचा. केवळ २३-२४ वर्षाच्या अमेरिकन तरुणींनी काय काय अत्याचार केले युद्धाबंद्यांवर ते वाचा. संदर्भासाठी विकिपीडिया चाळावा. हे घ्या... http://en.wikipedia.org/wiki/Abu_Ghraib_torture_and_prisoner_abuse http://en.wikipedia.org/wiki/Lynndie_England बाकी मिसळपाव ची या आधीची वाटचाल पाहता, इथे अजून दंगा झाला नाही हे नवलच आहे. कुठे गेल्या साऱ्या रणरागीण्या? अमेरिकेत मोठा वीकांत चालू आहे म्हणून की काय ? (समस्त रणरागीण्यांनी हलके घ्यावे)
  • Log in or register to post comments

हे अबु घारीब प्रकरण माहीती

शिल्पा ब
Tue, 09/07/2010 - 04:55 नवीन
हे अबु घारीब प्रकरण माहीती नव्हते...कोणत्याही कैद्यांवर असे अत्याचार होणे अमानुशच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा