इतिहासाचे पुनर्लेखन
आमचे तुल्यबळ शत्रु श्री. पुण्याचे पेशवे ह्यांच्या 'इतिहासाचे पुनर्लेखन कराच' ह्या आव्हानाला सामोरे जाण्याचे आम्ही ठरवले आहे. तसे त्यांना कळवल्याबरोब्बर त्यांनी आपल्या वाड्यातील एक ओसरी आम्हास नेमस्त करुन दिली आहेच.
असो..
तर नुसत्या बहुजनांच्या इतिहासाचेच नाहीतर राम-लक्ष्मणापासुनच्या संपुर्ण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यासाठी मिपावरील मान्यवर अभ्यासु सदस्यांची मदत मिळाल्यास आमचे कार्य अधिक सुखकर होईल.
आमचे चालु इतिहासा विषयीचे काही आक्षेप :-
१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?
ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ?
२) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ?
३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?
४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही.
५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ?
गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ?
आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।।
आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।।
तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।।
५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ?
ह्या आणि अशा अनेक खोट्या संदर्भांचे वस्त्रहरण करणे हाच आमचा ह्या लेखनामागील उद्देश आहे. येथील जाणकार अजुन मुद्दे उपस्थीत करुन इथल्या दांभिक लोकांना घाम फोडतीलच. तुम्हा सर्व जाणकारा अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट उगवणार आहे हे निश्चीत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सहमत आहे. सत्य बाहेर आलेच
अजुन एक प्रश्न.....
पित्याच्या सांगण्यावरुन.
पण का?
हो.
काय? बसते?
सहमत आहे. जाणकार उत्तर देतील.
फरक हा की हिंदु संस्कृती
मुस्लिम संस्कृतीत मारलेल्या
परत जिवंतच करायचे होते तर मारले कशाला ?
कसे काय?
आमच्या घराण्याची
पुपे, उत्तर बरेचसे
असे म्हणतात की काही वृद्ध
धन्स रे नानुस पण ह्या
दशरथादी राजे राणीवशात लपुन
तुम्हीच बघा म्हणजे झाले.
म्हणजे थोडक्यात पृथ्वी नि:क्षत्रिय झालीच नाही.
सापडले देवीचे नाव.
जरा विस्तृत माहिती द्या या
हे घ्या
धन्यवाद. अतिशय बहुमोल माहिती
सहस्त्रार्जुनाचा वध
गीता
बघा बघा... खरा इतिहास बाहेर
इतिहास बाहेर योतोय ??
कृष्णाने अर्जुनाला सांगितली,
अशी किती वेळा गीता कुणी
आमच्या सरमळकर सरांनी एकदा मला
पण ती गीता म्हणजे हीच गीता
कारण ही ती नाही म्हणुन ती ही
कदाचित ह्यातली असेल बॉ!
गीता सांगायच्या काळात
नसते प्रश्न नका बॉ विचारु!
वेड्यात काढू नका,
पंखे अपौरुषेय आहेत.
अरेरे.. इतक्या सिरीयस
ते मघाशी संपादक म्हणून हा
त्यांच्याकडील
अरेच्या!
पण मुळ मुद्दा बाजुलाच राहिला.
पण मुद्द्याला धरुन चर्चा
पुनर्लेखनाच्या कामात तुम्ही
आमाला सुपारी मिळाली आहे.
मला नारळ मिळालाय
गीता रामाने सांगितली,
अष्टावक्रानंही सांगितली
तशी तर आम्हीही गीता
रेवतीताईला गीतापठणाबद्दल बरीच
गीता !!