Skip to main content

इतिहासाचे पुनर्लेखन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 03/09/2010 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे तुल्यबळ शत्रु श्री. पुण्याचे पेशवे ह्यांच्या 'इतिहासाचे पुनर्लेखन कराच' ह्या आव्हानाला सामोरे जाण्याचे आम्ही ठरवले आहे. तसे त्यांना कळवल्याबरोब्बर त्यांनी आपल्या वाड्यातील एक ओसरी आम्हास नेमस्त करुन दिली आहेच. असो.. तर नुसत्या बहुजनांच्या इतिहासाचेच नाहीतर राम-लक्ष्मणापासुनच्या संपुर्ण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यासाठी मिपावरील मान्यवर अभ्यासु सदस्यांची मदत मिळाल्यास आमचे कार्य अधिक सुखकर होईल. आमचे चालु इतिहासा विषयीचे काही आक्षेप :- १) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ? ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ? २) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ? ३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ? ४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही. ५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ? गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ? आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।। आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।। तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।। ५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ? ह्या आणि अशा अनेक खोट्या संदर्भांचे वस्त्रहरण करणे हाच आमचा ह्या लेखनामागील उद्देश आहे. येथील जाणकार अजुन मुद्दे उपस्थीत करुन इथल्या दांभिक लोकांना घाम फोडतीलच. तुम्हा सर्व जाणकारा अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट उगवणार आहे हे निश्चीत.

वाचने 97333
प्रतिक्रिया 352

प्रतिक्रिया

In reply to by अवलिया

http://en.wikipedia.org/wiki/Hinglaj_Mata http://www.shaktipeethas.org/hinglaj-darshan-t180.html http://bhavsarsamaj.com/history/ एक मंदिर महाराष्ट्रात सुद्धा आहे , पण नक्की ते कुठे आहे ते माहित नाही. नाशिक का कुठे तरी आहे.

In reply to by अवलिया

सहस्त्रार्जुनाचा वध परशुरामाने केला नाही, सहस्त्रार्जुनाने समाधी घेतली. त्यांना शेवटी दत्तांनी दृष्टांत दिला आणि सर्वप्रथम गीता सांगितली.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अहो गीता म्हणजे "सांगणे"/अर्थबोध करणे... गुरु गीता, गणेश गीता, हंस गीता, यम गीता, शिव गीता, राम गीता... अश्या अनेक गीता आहेत. श्रीकृष्णाने सांगितली तिला भगवत्गीता म्हणतात... हि माहिती तुम्हाला नव्याने कळणे म्हणजे इतिहास बाहेर येणे ?? (इतिहास प्रेमी) अर्धवटराव

In reply to by अवलिया

आमच्या सरमळकर सरांनी एकदा मला सांगितली होती मागे.. इतिहासाचं पुनर्लेखन करताना हा मुद्दा ध्यानात ठेवा परासेठ..

In reply to by परिकथेतील राजकुमार

प रा राजवाडे तुमचा अभ्यास कमी पडतोय! बासनात गुंडाळून ठेवलेल्या वह्या बाहेर काढा! ;)

In reply to by चतुरंग

वेड्यात काढू नका, तो विमानाचा पंखा नाहीये, तो घरातला हवा घेण्याचा पंखा आहे. विमानाचा पंख असा असतो. कधि कधि दोन पन असत्यात एका विमानाच्या पंख्याच्या बजेट मध्ये एक हिंदी चित्रपट होऊ शकतो. अवांतर : बिनापंख्याचे विमान कोणी बघितले आहे काय ?

In reply to by चतुरंग

अरेरे.. इतक्या सिरीयस धाग्यांवर संपादकांनी असे अवांतर करावे याचे वाईट वाटले. -दो-तीन भत्ते

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ते मघाशी संपादक म्हणून हा धागा वाचत होते, त्यामुले त्यांना धाग्यावर करडी नजर ठेवणे भाग होते. आता सद्ध्या ते फक्त सभासद म्हणून आलेत, सबब धुमाकूळ घालायला मोकळे आहेत. त्यांच्याकडील असलेल्यागीतेच्या नियमावलीत हेच सांगितले आहे! :)

In reply to by यशोधरा

त्यांच्याकडील असलेल्यागीतेच्या नियमावलीत हेच सांगितले आहे मला हि गीता पाठवा ना. लई उपकार व्ह्तील

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आम्हाला नेहेमीच संपादक ह्या भूमिकेतून बघून आमचे सदस्यरुपी लेखन हळू हळू संपुष्टात आणण्याच्या पुपे ह्यांच्या सुप्त डावाचा निषेध असो! ;) -रंगा

In reply to by परिकथेतील राजकुमार

पण मुद्द्याला धरुन चर्चा करायची असा काय नियम आहे का? आहे का सांगा! असला तर पुरावा द्या बघू!

In reply to by परिकथेतील राजकुमार

गीता रामाने सांगितली, शिवानेदेखील सांगितली. त्यातली सर्वात जास्त प्रसिद्ध कृष्णाची गीता.

In reply to by अवलिया

रेवतीताईला गीतापठणाबद्दल बरीच माहिती आहे असं नंदन पेशव्याला सांगत होता असं धमू मकीला सांगताना बिकाने ऐकल्याचं सहजकाकांनी मला व्यनीतून सांगितलं.

In reply to by अवलिया

भगवत्गीतेत श्रीकृष्णाने सूर्य-मनु-विवस्वान (असाच काहिसा ऑर्डर आहे.. मला नक्की आठवत नाहि) अशी गीता ज्ञानाची परंपरा सांगितली आहे. आणि मुख्य म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत नवीन-जुने, पहिला-शेवटचा.. असं काहि नसतं हो. माणसाच्या पिढया बदलतात, संदर्भ बदलतात, साधनं, दृष्टीकोन बदलतो.. ज्ञान तेच राहतं. (अज्ञानी) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

ओ ती ऑर्डर फक्त ज्ञानकर्मसंन्यास योगाची, फुल्टू १८ अध्यायांची नाही आहे. म्हणजे अध्याय नं ४ ची फक्त. याच अध्यायात यदा यदाही धर्मस्य सारखे सुप्रसिद्ध श्लोक आहेत. असे आहेत ते श्लोक इमं विवस्वते योगं प्रोक्तवाहनमव्ययम विवस्वान मनवेप्राह मनुरिक्ष्वाकवेब्रवीत एवम्परंपराप्राप्त मिमंराजर्षयोविदु: सकालेनेहमहता योगोनष्टःपरंतप

In reply to by llपुण्याचे पेशवेll

१८ अध्यायी गीता एक आणि एकच आहे. पण तीत सांगीतलेले ज्ञान कालातीत आहे. (गीताभ्यासी) अर्धवटराव

In reply to by नरेश धाल

अरे वा, नविन माहिती... पूर्वीच्या इतिहासानुसार :) परशुराम हाही एक विष्णूचा अवतार होता...आता विष्णू स्वतःच्याच अवताराला मारायला वर कशाला देइल? काही संदर्भ देता येतील का ?

In reply to by अवलिया

श्री परा यांचा धागा म्हणजे एक्दम मोहिनी नॄत्य करता करता स्वतःच्या डोक्यावर हात ठेवतीय आणि ते बघून समोरची पार्टी पण ... धाल साहेब, माफ करा.

In reply to by पुष्करिणी

परशुराम हि एक व्यक्ती नसून ती एक पदवी आहे, जसे शंकराचार्य. एकूण १४ परशुराम होऊन गेले ह्या पराशुरामाबद्दल बरेचसे ऐकून आहे कि, जसे स्वताच्या आई चा वध देखील केला ह्यांनी.

In reply to by मृत्युन्जय

आणि नसला चुकून कली ब्राह्मण तरी त्याचे पिताश्री ब्राह्मण होते असं नंतर पसरवलं जाईलच ;-) याला म्हणतात (भविष्यातल्या) इतिहासाचे पूर्वलेखन!

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ओ पेशवे.. कली का कल्की ??? कृष्ण क्षत्रिय कसा? जन्माने यादव (गवळी) वैश्य होईल. कर्माने युद्ध केले क्षत्रिय.. गीता सांगितली ब्राह्मण.. रथ हाकला शुद्र होईल

In reply to by योगी९००

चुकून तो वाढला अवलिया घरी. असे वाचले.>>>> तसेच असावे, नाहीतर एवढा मोठा कुटनितीज्ञ कसा काय झाला असता? ;)

In reply to by अवलिया

हेच म्हण्ते, श्रीकॄष्ण यादव हे गवळी होते. त्यांची आत्या कुंती क्षत्रिय होती. त्यांने स्वतः सारथ्य करत करत गीता सांगितली आणि वर जानवं पण घालायचे ...नक्की काय चालू होतं तेंव्हा? देवकी /वसुदेव क्षत्रिय होते आणि नंद/यशोदा गवळी अशी भानगड आहे का ? ब्रम्हदेवांबद्दल विशेष माहिती नाही , शंकर स्मशानात चितेतली राख बिख अंगाला फासून भूतांबरोबर डान्स करायचा जानवं घालून इतकच माहिती आहे. डायरेक्ट विष्णूपेक्षा अवतार जास्त फेमस आहेत, ते सर्व वर्णांमधले आणि पशु अवतारात्ले पण आहेत. प्राण्यामधे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र इ. असत का याची माहिती नाही. जानव म्हणके एक फॅशन आयट्म असावा असं वाटतय

In reply to by पुष्करिणी

हो आहेत कि, तुमास्नी माहित ना का ? वाघ सिंह : क्षत्रिय डुक्कर, घुबडे, लांडगे : ब्राम्हण मोर, ससे, शेळी : शुद्र आणि कोण राहिले बरे, हा हत्ती, जिराफ : वैश्य (एक पुणेरी पाटी : पुरावे मागू नयेत, मागितल्यास अपमान करण्यात येईल )

In reply to by पुष्करिणी

बिनधास्त, सगळे अवतार ब्राम्हणांच्या नावावर करा, फुकटात, नो प्रोब्लेम, परा साहेबांना कळवा, आणि लिहून टाका. त्यांचं सध्या कडक झालेले आहे, धोरण हो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

दाखवले नाही म्हणजे घालत नव्हते किंवा तसे नव्हते असे नाही. रावंण ब्राम्हण होता व दुष्ट होता. गणेशपुराणात, रावण पिंड ठेवून लघुशंकेला गेला तेव्हा कानावर जानवे चढवले होते, असा स्पष्ट उल्लेख आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ह्या शब्दात "लिंग" असल्याने तो अश्लील मानला जावा.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

केळ्यात काय अश्लील आहे रे पुप्या ? केळ्याने होत आहे रे आधी केळेची पाहिजे, असे खुद्द समर्थ रामदार स्वामी म्हणून गेले आहेत.

In reply to by मिसळभोक्ता

स्वामींनी ल च म्हटले होते. ल चा ळ करायचा मान वेगळ्यालाच