रुपांगी ज्योतिष.
सौंदर्याचा चाहता नाही असा माणूस दुर्मिळच आणि म्हणूनच Beauty is an object of joy foreverअशी इंग्रजीत म्हण आहे. आपल्याला लाभलेल्या निसर्गदत्त रुपरंगाला प्रसाधनांच्या सहाय्याने खुलविण्याचा मानवी अट्टाहासही पुरातन आहे.
स्त्रियांचा तर हा खास आवडीचा आणि जिव्हाळ्याचा प्रांत.
एका तत्ववेत्त्याने असे म्हटले आहे ,There is no ugly woman ,but there are women who do not know how to look beautiful .
याचा मतितार्थ एवढाच की सुयोग्य काळजी घेतल्यास व विषयाची जाण वाढविल्यास प्रत्येक स्त्री सुंदर दिसू शकते.
ज्योतिषशास्त्राचा संशोधक व २५-३० वर्षाचा अभ्यासक या नात्याने पत्रिकेच्या माध्यमातून सौंदर्यवृध्दीला सहाय्यभूत घटक शोधून काढणे ,सौंदर्यविषयक निदान आणि उपाय यांचा ज्योतिषशास्त्रीय परामर्श घेणे ,मला आव्हानात्मक वाटले व म्हणून इतर अनेक प्रांतांमध्ये संशोधन पूर्ण केल्यानंतर मी सौंदर्य व ज्योतिषशास्त्र यांची सांगड घालणारा "रुपांगी ज्योतिष " हा विषय निवडला.
संशोधनाला सुरुवात झाली तीच मुळात विषयाच्या नावापासून .
ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून रुपवर्धन चिकीत्सा करणारा म्हणून रुपांगी = रुप +अंग(रुप ज्याने अंगी भिनते) ज्योतिष असे शिर्षक दिले. अंगलक्षण होराशास्त्र , देहबोली, (बॉडी लॅंग्वेज) मेडीकल पामीस्ट्री अशा संलग्न विषयांच्या आधारे संशोधनाला अधिक आखीव ,रेखीव व उपयुक्त करण्याची प्रक्रिया अव्याहत चालू आहे.
रुपांगी ज्योतिषाची तोंडओळख तुम्हा जिज्ञासू वाचकांना व्हावी ,ज्ञानाची काही नवी क्षितीजे पाहण्यास तुम्ही उद्युक्त व्हावे एवढाच या लेखाचा माफक उद्देश आहे.
सौंदर्याचे तीन प्रमुख घटक (असे की ज्यात बदल घडवणे शक्य असते.) म्हणजे सतेज कांती-नितळ कांती.तजेलदार काळेभोर केस ,व सुडौल बांधा.
आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून याचा वेध घेऊ या.
सतेज कांती:
कातडीचे दोन स्तर असतात . बाह्य व अंतर्गत.
बाह्य कातडी शुक्र या ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. तर अंतर्गत कातडी बुध हा ग्रह दर्शवितो.
हे दोन ग्रह पत्रिकेत कोणत्या राशीत व कोणत्या भागात आहेत यावरून व्यक्तीच्या कांतीचे स्वरुप ठरते.
जलतत्वाच्या राशी (कर्क ,वृश्चिक ,मीन ) आर्द्रतादर्शक (high moisture)
तर अग्नितत्वाच्या राशी (मेष,सिंह, कन्या )शुष्कतादर्शक आहेत.
पृथ्वीतत्वाच्या राशी (वृषभ ,कन्या ,मकर )कांतीचा घोटीवपणा (tenacity) दर्शवितात,
तर वायुतत्वाच्या राशी (मिथून तूळ ,कुंभ) शुष्क व निबर कांती देतात.
पत्रिकेतील लग्न (प्रथम स्थान ) व चतुर्थ स्थानी असलेल्या राशींचा व ग्रहांचा प्रभाव कांतीवर पडतो हे लक्षात घ्यावे.
कांतीचा तलमपणा (smoothnes.) छिद्रे (porasity) चिवटपणा (elasticity), घोटीवता (tenacity) तापमान (heat level )आर्द्रता (moisture level) या सहा घटकांचा अभ्यास पत्रिकेवरून व अन्य परिक्षण निरीक्षणातून करता येतो व त्यातील असंतुलन झालेले घटक योग ध्यानधारणा घरगुती उपाय व विशिष्ट प्रसाधनांच्या सहाय्याने संतुलीत करता येतात.
चेहेर्यावर उठणार्या तारुण्यपिटीकांचे कारणही अनेक वेळा पचन प्रक्रिया ,मासिक धर्म, अथवा त्वचेच्या छिद्रांचा मोकळेपणा यांच्याशी निगडीत असतो. व त्याचा अचूक वेध पत्रिकेतून घेता येतो.
चंद्र हा मासिक धर्माचा कारक
गुरु यकृताचा (लिव्हरचा ) कारक.
केतू हा त्वेचेवरील छिद्रांचा कारक.
चेहर्यावरची अती तैलता (ऑयली फेस) बुध व शनीच्या कुयोगामुळेसंभवते.
तर जीवाणू संसर्गामुळे कांतीची होणारी हानी हा 'राहू' चा त्रास आहे.धूळ आणि प्रदूषक घटक यामुळे संसर्गाला वाव मिळतो.
अडथळ्यांचे कारण व निराकरण
सतेज कांती प्राप्त होण्यासाठी आड येणार्या गोष्टींमध्ये काही शरीरांतर्गत आहेत ,तर काही बाह्य घटक आहेत.
मानसिक तणाव (चंद्र )
कोठासाफ नसणे (गुरु)
रक्त दोष आणि सदोष मासिक धर्म (शनी )
अष्टम स्थान ही चार प्रमुख कारणे आहेत.
बाह्य घटकांमध्ये चेहेर्याची व सर्वांगाची अस्वच्छता ,उन ,धूळीचे कण व प्रदूषक घटकांचा प्रभाव प्रसाधनांची अॅलर्जी कातडीला होणार्या जखमा ही प्रमुख कारणे आहेत .या कारणांचे निराकरण करण्यासाठी अष्टौ प्रहर जागरुकता लागते.
आहार -विहार - निद्रा यांचाही कांतीवर प्रभाव पडतो.
सौम्य संतुलीत आहार ,योग निद्रा, मसाज , कमरेचे व्यायाम ,सुयोग्य साबणाचा वापर ,गरम पाण्याचे स्नान (एकवीस मिनीटे) ,कृत्रीम रंग आणि घटकांचा वापर टाळणे,बाहेरून घरी आल्यावर चेहेरा गरम -गार पाण्याने धुणे असे साधे सोपे उपायही सतेज मुलायम व दोषविरहीत कांती बहाल करतात.
पुढच्या भागात आपण केशसंभाराचा विचार करू आणि त्यापुढील भागाचा विषय आहे सुडौल बांधा .
तोपर्यंत हा भाग वाचा आणि प्रश्न विचारा.
प्रतिक्रिया
गुरु यकृताचा (लिव्हरचा )
रुपांगी ज्योतिष हा शब्द
+१
इंटरेस्टिंग
असेच म्हणतो !
>>पत्रिकेतील लग्न (प्रथम
हा हा हा
याचा मतितार्थ एवढाच की
नक्रकर्तरी योग
पराचा कावळा
मग परा उगाचच लक्ष्मणाने
अगदी सहमत. असो. रामाचे आणि
?????????????
ह. घ्या
बरोबर आहे, मागील जन्मी तो
मागील जन्मी तो शरीराने आणि
सौम्य संतुलीत आहार ,योग
नक्की काय सांगितलं आहे?
खरा प्रश्न !
ठ्ठो ....
+१०
कशाला??
आधी इतका सासुरवास करायचा आणि
कुठला सासुरवास?
सासुरवासाला अजून सुरुवातच
सहमत. वादग्रस्त लेख टाकून
-१
झकास !
-१
मस्त
रुपांगी ज्योतिष !
सुंदर केशसंभार आणि
केशसंभाराविषयी एकवेळ एकमत
छे, कोणाला काय वाटेल तेही
>>>>छे, कोणाला काय वाटेल तेही
>>>सुंदर केशसंभार आणि
नको नको.. अश्लील म्हणुन
नको नको.. अश्लील म्हणुन
खाली नाना फडणवीस. ऐवजी
रिवर्स इन्जिनिअरींग
एका तत्ववेत्त्याने असे म्हटले
सौंदर्य
-१
आणखी एक 'सेन्सलेस' धागा
निषेध!!!
त्यात तुम्ही लोकांच्या कमरा,
एकवीस मिनिटे
एकवीस मिनिटे थेंबथेंब पाणी
माफ करा, आंघोळीचा एकूण
एकवीस मिनिटे थेंबथेंब पाणी
Pagination