असेच म्हणतो.
माढ्याला माझ्या आत्याची कुलदेवता/ तसेच पुर्वी मावशी राहत असल्याने बर्याचदा जाणे झाले, पण विठोबाला जायचा चान्स नाही आला.. पण घरात बघितलेल्या जुन्या फोटोंवरून आठवतंय की माझ्या आईची मंगळागौर झाली होती माढ्यात आणी सगळ्यांचे विठ्ठलाच्या गाभार्यात फोटो आहेत ते.... :)
लेख आवडला. बरीच नवी माहिती मिळाली. औरंगजेबाच्या तावडीत मूर्ती सापडण्यापूर्वी ती हलवली गेली हे ठीकच. पण तसे अफझलखान येण्यापूर्वी तुळजापूरची मूर्ती का हलवली गेली नसावी? की तो येणार, मूर्ती फोडणार हे अनपेक्षित होते?
मूर्तींची अशी हलवाहलव गोव्यातदेखिल झालेली आहे. आज फोंडा परिसरात दिसणारी सगळी देवळे ही गोव्याच्या अन्य भागांतून स्थलांतर करून आणलेली आहेत. फोंडा भाग तसा डोंगराळ तेव्हा देवळे तिथे सुरक्षित राहतील, अशी अपेक्षा असावी.
फोंडा गावात पोर्तुगिजांनी सौंद्याच्या राजाला शरण दिली होती, आणि तिथे हिंदू धर्मस्थळांना (सौंदेकरांशी तह करून) अभय दिले होते.
म्हणून फोंड्याला ही देवळे आली.
फोंड्याला टेकड्या-दर्या आहेत खर्या, पण तशा केपें, सांगे वगैरे ठिकाणी सुद्धा आहेत. शिवाय फोंड्याजवळची देवळे दुर्गम नसून सहज पोचण्यासारखी आहेत.
ही माहिती आमच्या शालेय इतिहासाच्या पुस्तकात होती, आणि अन्यत्रही वाचलेली आहे.
सौंदेकरांचे अखेरचे वंशज अगदी हल्लीहल्लीच वारले (गेल्या काही दशकांत).
>>>>अफझलखान येण्यापूर्वी तुळजापूरची मूर्ती का हलवली गेली नसावी? की तो येणार, मूर्ती फोडणार हे अनपेक्षित होते?
अफजलखानाने शिवाजी महाराजांना 'जिवंत कैद करुन घेऊन येतो' अशी प्रतिज्ञा केली आणि तो जेव्हा निघाला तो थेट तुळजापूरास मुक्कामास पोहचला. हे अनपेक्षितच घडले असे वाटत नाही. . पण महाराजांच्या कुलदेवतेवर हल्ला करायचे हे अफजलखानाने निश्चित केले असावे असे त्याच्या कृतीवरुन वाटते. [पाहा: सभासदाची बखर]-
'' श्रीभवानी कुलदेवता महाराजांची, तीस फोडून, जातियांत घालून, भरडून पीठ केले. [ इथे आकाशवाणी झाली की आजपासून एकविसाव्या दिवशी तुझें शीर कापल्या जाईल...]पुढे लष्कर कूच करुन श्रीपंढरीस आले. भीमातीरीं उतरले. देवास उपद्रव देऊन वांईस आलें.''
दुसरा उल्लेख मल्हारराव चिटणीसाच्या बखरीतला पाहा-
'' एकंदर तीस हजार जमावानिशी अफजलखान मोठे अहंकारे करुन, निघोन दरमजल येतां तुळजापुरी श्रीदेवीस उपद्रव केला. परंतु देव बडवे यांणी लपवून ठेविला'' यावरुन लक्षात येते की, मूर्तीस उपद्रव झाला किंवा मूर्तीस लपवून ठेवल्या गेले होते. असेही म्हटल्या जाते की, अफजलखान मुर्तीची नासधुस करेल म्हणून भोप्यांनी मूळ मूर्ती लपवून ठेवून तिथे दुसरी मूर्ती ठेवली आणि त्या मूर्तीची तोडफोड अफजलखानाने केली. तो गेल्यानंतर पुन्हा मूळ मूर्तीची स्थापना केली गेली. अर्थात या गोष्टीला माझ्याकडे अनुक्रमे आता फारसे संदर्भ नाही. पण वरील संदर्भ बोलके आहे. [अर्थात बखरीतले वास्तव किती हाही शंकेचा विषय आहेच]
-दिलीप बिरुटे
तुळजापूरची श्रींची मूर्ती चल आहे. (हलवता येते)
आणि माढ्याप्रमाणेच तुळजापुरातील मूर्तीसंदर्भात सुध्दा आख्यायिका आहेत. जवळच्या तीर्थ नामक गावात तशीच मूर्ती आहे आणि ती अस्सल आहे असे समजले जाते. तेथील गावकरी सुध्दा तसेच सांगतात की अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी तुळजापुरातील मूर्ती येथे आणली गेली.
बाकी माढ्याच्या मंदिरात कैकदा गेलो आहे. तिथे देवी रुक्मिणीची सुध्दा मूर्ती आहे. ही कहाणी माहीत आहे.
धन्यवाद डॉक्टरसाहेब..
माढ्याच्या विठ्ठलाबद्दल ही नवीनच माहिती कळली. एकदा जाऊन आले पाहिजे. रा. चिं. ढेर्यांचे पुस्तकही वाचले पाहिजे.
>> पण ज्या शिळेपासून माढ्याचा विठ्ठल घडलेला दिसतो त्याच शिळेपासून रुक्मिणी घडलेली दिसते.
मी लहानपणी पंढरपूरला राहात होतो तेव्हाही मला पांडुरंग आणि रुक्मिणी यांच्या शिळेत बराच फरक वाटत असे. अजिबात गर्दी नसण्याच्या त्या काळात पांडुरंगाची महापूजा बर्याच वेळा अनुभवली आहे. पांडुरंगाची शिळा (तुलनेने) खडबडीत आहे. दर्शनामुळे किंवा नारळ ठेवल्यामुळे पाय खडबडीत होतील, पण संपूर्ण अंग का खडबडीत असेल का हा प्रश्नच आहे खरा..
आमची अर्थात पांडुरंगावर भक्ती! मग पाषाणमूर्ती पंढरपूरला असो नाहीतर माढ्याला नाहीतर अजून कुठे. हृदयस्थ विठोबा सगळ्यात खरा!!
अवांतरः माढ्याला एकटाच विठोबा आहे का? का तिथे रुक्मिणीची वेगळीच मूर्ती आहे?
छान माहिती.
ही मूर्ती हलवण्याच्या प्रकारावरून एक गमतीदार वचन आठवलं.
'विलियम शेक्सपिअरची नाटकं त्याने लिहिली नाहीच मुळी. ती त्याच नावाच्या दुसऱ्याच एकाने लिहिली.'
खरा शेक्सपिअर कुठचा तर तो नाटकं लिहिणारा, तसंच खरी विठ्ठलाची मूर्ती कुठची तर पंढरपूरच्या मंदिराच्या गाभ्यात असलेली. त्या स्थळाला भक्तांच्या श्रद्धेमुळे महात्म्य आहे. एरवी 'खरा विठ्ठल' हा खऱ्या भक्ताच्या हृदयातच असतो. अमुक मूर्तीत, किंवा माठात जर त्याचा आत्मा ठेवता आला असता तर आणखीन काय हवं होतं?
माहितीपूर्ण लेख. फोटो दिल्यामुळे खूपच बहार आली.
विठ्ठलाच्या चेहर्याचा फोटो मोठा लावता येईल का? हा चेहरा जरा जास्त निमुळता आहे का? आपल्याकडे दिसणार्या बर्याचशा मूर्तींमध्ये चेहरे गोलसर असतात असे वाटते.
>>>त्यावर काही शास्त्रीय संशोधन, पुरावे सरकारने काही चौकशी काम केले आहे का?
श्री. रा.चि.ढेर्यांनीच त्यावर काम केले आहे असे वाटते. संशोधनातील निष्कर्षे काही अंतिम असत नाही. त्यामुळे अजूनही संशोधनाला वाव आहेच. श्री रा.चि.ढेर्यांच्या या संशोधनावर 'सवंग लेखन' म्हणूनही खूप टीका झाली होती. सरकार असे काही काम करेल असे वाटत नाही.
-दिलीप बिरुटे
>>>पांडुरंगाचा आत्मा एका माठात काढून ठेवल्याने ...................या वाक्याचा अर्थ सान्गाल का ?
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी सानेगुरुजींनी प्राणांतिक उपोषण सुरु केले होते. मंदिर प्रवेशामुळे मोठा गदारोळ माजला होता. पुजार्यांनी दलितांना प्रवेश देऊ नये म्हणून प्रकरण न्यायालयात नेले. तिथे त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली. शासकीय आदेशानुसार विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले झाले. पण कट्टर पुजार्यांना ती गोष्ट काही मान्य झाली नाही. मंदिरात दलितांनी प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीची महापूजा करुन मूर्तीतील देवत्त्व काढून एका घागरीत ठेवले. पुढे ती घागर एका वाड्यात ठेवण्यात आली. एकादशीला कर्मठ लोक त्या माठाची पूजा करत असायचे. अर्थात दर्शनार्थी प्रचलित मूर्तीचीच पूजा करीत होते. पुढे कर्मठ लोकांना पश्चाताप झाला ती गोष्ट वेगळी. असो, असा आहे त्या वाक्याचा अर्थ. आणि ही गोष्ट फक्त त्रेसष्ठ वर्षापूर्वीची आहे. :)
-दिलीप बिरुटे
बाकी आत्मा माठात वगैरे काढता येण्याइतका काही पांडुरंग काही छोटा वाटत नाही.
रा चिं ढेरे यांचे लेखन विद्वत्तापूर्ण असते.
या पांडुरंगाबद्द्ल वाचलेले आहे. त्यावेळेला बराच मोठा वादंग यावरून झाला होता हे ही ऐकले आहे.
पांडुरंगाची मूर्ती शाळिग्रामाची असूदे नाहीतर POPची त्यामुळे माझी श्रद्धा कमी होईलसे वाटत नाही.
सरांनीही चांगला लेख लिहीला आहे.
<><पण कोणता मानू मी विठ्ठल; पंढरपूरचा की माढ्याचा ? हा प्रश्न मात्र मनात रेंगाळत राहिला.
विठ्ठल आचरणात येऊ द्या.. पंढरपूर काय किंवा माढ्याचा काय.. विठ्ठल तो विठ्ठलच! आचरणात येईल तो खरा!
बाकी माहीती आवडली..
वा ! छान पाहितीपूर्ण लेख.
फोटो उत्तम- चित्रा यांच्या नीरिक्षणाशी सहमत.
(ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर हे वेगळे आहेत अशी एक चर्चा उपक्रम किंवा मिपावर पूर्वी वाचली होती, तीची आठवण झाली. )
इतक्या सुंदर माहितीपर धाग्यात उगाचच कोणीतरी पिंक टाकल्यासारखा गरज नसतानाही बादरायण धुणी धुण्याचा अवांतर पिंक प्रतिसाद टाकला आहे.
तसा प्रतिसाद अवलिया अथवा इतर कोणी टाकला असता तर तात्काळ संपादीत झाला असता.
असो.
जॉर्ज ऑरवेल म्हणतो तेच खरे. ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल.
श्री विट्ठल एक महासमन्वय हे ढेरे यांचे पुस्तक अत्यंत वाचनीय आहेच पण त्यांची बाकीची सर्वच पुस्तके इतिहासाच्या आणि नाथ ,दत्त आणि शाक्त संप्रदायांच्या अभ्यासकांनी जरूर वाचावींत अशी आहेत. त्यांचे लिखाण, सहज सोपे, प्रासादिक आणि नेमक्या शब्दांत आशय व्यक्त करणारे असते. समर्पक शब्दांचा वापर हे आणखी एक वैशिष्ट्य. ते कुठल्याही रूढी/कल्पनांचे दैवीकरण अथवा उदो उदो करीत नाहीत तर उलट दैवतांच्या मूळ मानवी स्वरूपाचा वेध घेतात. कुणाच्याही भावना न दुखवता अलगद श्रद्धां-परंपरांच्याच्या मुळाशी जाऊन सत्य शोधण्याचा त्यांचा प्रयत्न अभिनव आहे. हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्यात वावरते आहे हे आपल्या पिढीचे अहोभाग्य आहे.
प्रतिक्रिया
नवीन माहीती
+१
+२
असेच म्हणतो
खूप माहितीपूर्ण
पोच ...
लेख आवडला. रा. चिं.
मस्त
अत्यंत माहितीपुर्ण लेख! आवडला
मूर्तींची हलवाहलव
फोंड्याचे वैशिष्ट्य
मुर्तीची हालवाहलव..!
तुळजापूरची श्रींची मूर्ती चल
माढ्याच्या विठ्ठलाबद्दल नवीनच माहिती कळली
छान माहिती.
सुंदर
निमुळता चेहरा.
अजुन एक माहिती.
चांगली
उत्तम माहिती... राजेशचा
एकदम भारी!!
छान माहितीपूर्ण लेख, बरीच
मस्त
छान लेख
>>>त्यावर काही शास्त्रीय
कोणता मानू मी विठठल ?
देवत्त्वाची गोष्ट
ही गोष्ट बहुतेक यशवंत
लेख आवडला
बाकी आत्मा माठात वगैरे काढता
<><पण कोणता मानू मी विठ्ठल;
वा ! छान पाहितीपूर्ण
>>> पण कोणता मानू मी विठ्ठल;
प्रा डॉ- सुंदर आणि
माहितीपूर्ण लेख
.
नवीन माहिती!
आभार..........!
इतक्या सुंदर माहितीपर धाग्यात
सुंदर लेख आणि अनमोल माहिती...
अरे वा. उत्तम माहिती.
+१
अतिश्य माहितीपूर्ण लेख ....
खूप माहितीपूर्ण. लेख आवडला.
माहितीपुर्ण !!
सुरेख लेख!
उत्तम लेख
तुमच्यामुळे मुळ विठोबाचे दर्शन झाले.
रा.चि. ढेरे
सुंदर लेख !