कोणता मानू मी विठठल ?
महाराष्ट्राचं लोकदैवत पंढरपूरचा पांडुरंग अनेकांचा श्रद्धेचा विषय. पंढरपूरचा पांडूरंग सर्वसामान्यांचा देव. गरिबांना पावणारा. भक्ताच्या रक्षणासाठी धावत येणारा. असा महिमा महाराष्ट्रभर मराठी माणसाच्या मनात दडून बसलेला आहे. पंढरपूरचा हा विठोबा वारक-यांचा देव आणि वारकरी संप्रदाय हा बहुजनांचा पंथ. निमंत्रणाशिवाया लाखोंची 'पाऊले पंढरीची वाटं चालतात हे एक आश्चर्यच आहे. अशा या पांडुरंगाच्या भेटीचे योग जुळुन येणार होते. पंढरपूरला पूर्वी पंडरंगे, पांडरंगपल्ली,
![]() |
माढा येथील विठोबाचे मंदिर |
युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।
अशा लोकभावनेचा मी आदर करतो पण ते काही खरे वाटत नाही. संत ज्ञानदेव आणि नामदेव यांच्या भेटीनंतर पंढरपूर क्षेत्रातील पांडुरंग दर्शनाचे महत्त्व वाढले. जातीभेद कर्मकांडाच्या पुढे जाऊन सर्व वारकरी आणि भक्तमंडळींची अराध्य दैवताची पुजा आठशे नऊशे वर्षापासून चालूच आहे. असे असले तरी अनेक आवडत्या नावडत्या गोष्टी पंढरीत घडल्या आहेत. पांडुरंगाचे दर्शन सर्वसामान्यासाठी खुले झाले तेव्हा पांडुरंगाचा आत्मा एका माठात काढून ठेवल्याने आता मुर्तीत देवत्व राहिले नाही अशा घटनेने माझी असलेली श्रद्धा डळमळीत होते. असो, या सर्व गोष्टी सांगण्याचा उद्देश असा की या पंढरीरायाचे दर्शन व्हावे म्हणून मी पहिल्यांदाच जाण्याचे ठरविले. पण थेट प्रचलित पंढरपूरचे पांडुरंगाच्या दर्शनाऐवजी वाट जरा वाकडी केली आणि मागे एकदा एका उपक्रमावरील विठोबा कोणता खरा ? चर्चेवरुन
![]() |
| माढ्याचा विठ्ठल |
विठ्ठल मुर्तीचे अनेक वेळा अनेक कारणाने स्थलांतर झाल्याचे इतिहासात नमुद केलेले आहे. औरंगजेब जेव्हा
![]() |
माढ्याचा विठ्ठल... |
ब्रह्मगिरीपर्यंत हिंदुची एकेक देवळे फोडत आला तेव्हा बडव्यांनी विठ्ठलमुर्तीला देगावला एका देशमुखाकडे हलविले त्याने ती मुर्ती विहिरीत लपविली होती. पुढे आक्रमण परतल्यावर ती मुर्ती पुन्हा पंढरपुरवासियांच्या विनंतीवरुन पंढरपूरला आणन्यात आली. चिंचोली, गुळसरे, अशा गावीही ती मूर्ती हलविल्या गेली आहे. '' एकदा तर एका बडव्यानेच मुद्दाम मूर्ती पळवून नेऊन आणि लपवून ठेवून स्वार्थसाधनासाठी दर्शनोत्सुक भक्तांची अडवणूक केली होती.'' सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठ्ठलमूर्ती आपल्या राज्यात नेली. भव्य मंदिर बांधून त्यात विठ्ठलमुर्तीची स्थापनाही केली. पुढे वारीला जेव्हा संतमंडळी आली तेव्हा त्यांना मुर्ती दिसली नाही त्यांच्याबरोबर भक्तमंडळीही व्याकूळ झाली आणि या भक्तजनांनी एकनाथमहाराजांचे आजोबा भानुदास महाराज यांना मूर्ती परत आनण्याची विनवणी केली. भानुदास महाराजांनी कृष्णदेवरायांचे मन पूरिवर्त्न करुन विठलमूर्ती परत आणली. पुढे ''अफजलखानाच्या हाती मुर्ती येणार होती त्यापूर्वीच बडव्यांनी पंढरपूरहून वीस मैल असलेल्या 'माढा' या गावी [जि.सोलापूर] येथे नेऊन ठेवली. वर ह्या गंडांतराच्या स्मरणार्थ माढ्यात विठोबाचे एक स्वतंत्र देऊळ व मूर्ती स्थापण्यात आली. पुढे ती मूर्ती पंढरपूरला आणल्या गेली का ? पंढरपूरातली पांडुरंगाची मूर्ती ती आद्य मूर्ती का ? या विषयावर श्री रा.चि.ढेरे यांनी श्री विठ्ठल एक महासमन्व्यक हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे त्यात ते अनेक संदर्भ ग्रंथावरुन त्यांनी माढ्याची विठ्ठलाची मूर्ती ही आद्य मूर्ती ठरवली आहे. त्यांचे केसरी मधील दोन लेखांनी [वर्ष १९८२] महाराष्ट्रभर वैचारिक धुमाकूळ घातला होता असे म्हणतात.
श्री रा. चि. ढेरे यांनी या विषयावर मोठे संशोधन केलेले आहे आणि ते मला पटणारे आहे. त्या विषयी इथे अधिक काही टंकत नाही. विठ्ठलतेच्या अचूक निरीक्षणावरुन मूळ मूर्ती माढ्यालाच आहे असे त्यांचे म्हणने आहे.
![]() |
| पायातले तोडे |
विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ । -दयकमळ मंत्रसिद्ध ॥ दिगंबर मूर्ती गोजरी सांवळी । तोडे पायी वाळी मनगटी ॥ कटीवर हात, हाती पद्म शंख । पुष्पकळी मोख अंगुलीत ॥ सावता माळी म्हणे शब्दब्रह्म । नाम विठ्ठलाचे कलियुगीं ॥
सावता माळ्याला [महाराजांना ] जसे रुप दिसले तसे त्यांनी वर्णन केले आहे. विठ्ठल कसा आहे तर दिगंबर आहे. वर्ण सावळा आहे. त्याच्या पायात तोडे आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. या सर्व
![]() |
| मंत्राक्षर |
प्रचलित पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीत अशी कोणतीही ओळख दिसत नाही. माढे येथील मूर्ती खडबडीत नाही. सध्याची पंढरपूर येथील पांडुरंग मूर्ती खडबडीत वाटते. इतक्या वर्षापासून वेगवेगळ्या अभिषकामुळे त्याची झीज झाली असावी असाही मुद्दा रेटता येतो. पण ज्या शिळेपासून माढ्याचा विठ्ठल घडलेला दिसतो त्याच शिळेपासून रुक्मिणी घडलेली दिसते. आणि श्री. रा.चि. ढेरे ज्या ''पांडुरंगमाहात्म्य'' चा संदर्भ देतात आणि आद्य मूर्तीची जी लक्षणे सांगतात ती अशी
ही तिन्ही लक्षणे आजच्या पंढरपूर मूर्तीत नाही. ती सर्व लक्षणे माढ्याच्या मूर्तीत दिसतात. या सर्व लक्षणावरुन मलाही ती मूर्तीच मूळ वाट्ली. अर्थात, मंदिरातल्या देव वगैरे अशा गोष्टींवर माझा विश्वास नसला तरी क्षणाक्षणाला असंख्य अद्बुत चमत्कार घडणा-या या सृष्टीत एखादी शक्ती कार्यरत असावी यावर विश्वास आहे. असो, तो विषय वेगळा. श्री.रा.चि.ढेरे म्हणतात ''मूर्तीद्रव्य हे भंगुर आणि जंगम असल्यामुळे त्याच्या बदलामुळे देवत्वाची आणि देवत्त्वाशी संबंध झालेल्या क्षेत्राची प्रतिष्ठा कधीच उणावत नसते. केवळ मूर्तीच्या बदलामुळे किंवा मूर्त्तीवर संकट आल्यामुळे स्थानमहिमा उणावत नाही ”त्यामुळे कोणाची श्रद्धा दुखावण्याचे मलाही कारण नाही. फक्त आपण कधी माढ्याला गेलात तर याही विठ्ठल मूर्तीची आणि आपली भेट व्हावी त्यासाठी हा प्रपंच. असो, पुढे चंद्रभागेला नमस्कार करुन पंढरपूर येथील प्रचलित पांडुरंगाचेही दर्शन घेतले. पण कोणता मानू मी विठ्ठल; पंढरपूरचा की माढ्याचा ? हा प्रश्न मात्र मनात रेंगाळत राहिला. अधिक संदर्भासाठी जिज्ञासूंनी ''श्रीविठ्ठल एक महासमन्व्यक. लेखक. श्री रामचंद्र चिंतामण ढेरे. श्री विद्या प्रकाशन, 250 शनिवार पेठ, पुणे ४११०३०” हे वाचावे. त्यातील ''आद्य मूर्तीचा शोध'' हे प्रकरण वरील विषयावर आहे.





नवीन माहीती
In reply to नवीन माहीती by विकास
+१
In reply to +१ by गणपा
+२
In reply to नवीन माहीती by विकास
असेच म्हणतो
खूप माहितीपूर्ण
पोच ...
लेख आवडला. रा. चिं.
मस्त
अत्यंत माहितीपुर्ण लेख! आवडला
मूर्तींची हलवाहलव
In reply to मूर्तींची हलवाहलव by सुनील
फोंड्याचे वैशिष्ट्य
In reply to मूर्तींची हलवाहलव by सुनील
मुर्तीची हालवाहलव..!
In reply to मुर्तीची हालवाहलव..! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुळजापूरची श्रींची मूर्ती चल
माढ्याच्या विठ्ठलाबद्दल नवीनच माहिती कळली
छान माहिती.
सुंदर
In reply to सुंदर by चित्रा
निमुळता चेहरा.
In reply to निमुळता चेहरा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजुन एक माहिती.
चांगली
उत्तम माहिती... राजेशचा
एकदम भारी!!
छान माहितीपूर्ण लेख, बरीच
मस्त
छान लेख
In reply to छान लेख by सहज
>>>त्यावर काही शास्त्रीय
कोणता मानू मी विठठल ?
In reply to कोणता मानू मी विठठल ? by पारुबाई
देवत्त्वाची गोष्ट
In reply to देवत्त्वाची गोष्ट by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ही गोष्ट बहुतेक यशवंत
लेख आवडला
बाकी आत्मा माठात वगैरे काढता
<><पण कोणता मानू मी विठ्ठल;
वा ! छान पाहितीपूर्ण
>>> पण कोणता मानू मी विठ्ठल;
In reply to >>> पण कोणता मानू मी विठ्ठल; by अवलिया
प्रा डॉ- सुंदर आणि
माहितीपूर्ण लेख
.
नवीन माहिती!
आभार..........!
इतक्या सुंदर माहितीपर धाग्यात
सुंदर लेख आणि अनमोल माहिती...
अरे वा. उत्तम माहिती.
In reply to अरे वा. उत्तम माहिती. by प्रचेतस
+१
अतिश्य माहितीपूर्ण लेख ....
खूप माहितीपूर्ण. लेख आवडला.
माहितीपुर्ण !!
सुरेख लेख!
उत्तम लेख
तुमच्यामुळे मुळ विठोबाचे दर्शन झाले.
रा.चि. ढेरे
सुंदर लेख !
मी पंढरपूरला ३०-३५ वेळा गेलो
आजच वाचले.
अजुन एक माहिती.
छान माहिती !
In reply to छान माहिती ! by मालोजीराव
.
In reply to छान माहिती ! by मालोजीराव
शैव-वैष्णव
In reply to शैव-वैष्णव by अनिरुद्ध प
ते शिवलिंग नसून दक्षिणी
In reply to ते शिवलिंग नसून दक्षिणी by प्रचेतस
वल्ली जी
In reply to वल्ली जी by अनिरुद्ध प
माढा येथील मूर्तीचे छायाचित्र
In reply to वल्ली जी by अनिरुद्ध प
मूर्ती प्रत्यक्षात पहिली नाही
In reply to मूर्ती प्रत्यक्षात पहिली नाही by मालोजीराव
धन्यवाद
नविन व उत्तम माहिती. धन्यवाद!
सुरेख लेख
In reply to सुरेख लेख by विटेकर
माढा
In reply to सुरेख लेख by विटेकर
बाकी, प्रतिसाद वाचतो आहेच.
छान माहिती आणि फोटो. प्रतिसाद
लेख नजरेतून निसटला होता. फार
गावडेसरांशी सहमत. लेख आवडला.
खूप छान लेख.. बर्याच नवीन
श्रीविठ्ठलमूर्ती वाद खंडन लेखक- डॉ. गोपाळ गोविद बेणारे यांच्या
वा.
वीटेवरी उभा पांडुरंग