दुरावा
मिटून डोळे क्षणभर पाहून मग हा दुरावा
जाता-जाता क्षणभर राहून मग हा दुरावा
दिवस-रात्रीचा पाठशिवणीचा खेळ
सांजवेळी क्षणभर भेटून मग हा दुरावा
लाटेस भेटणारा किनारा शहारा
चिंबचिंब क्षणभर भिजून मग हा दुरावा
गाडीच्या प्रतिक्षेत थिजला फलाट
धड-धड क्षणभर खेटून मग हा दुरावा
भ्रमरासाठी नटून बसलेले फूल
मनसोक्त क्षणभर शोषून मग हा दूरावा
एकाच खिडकीस न्याहळीत बसता
दृष्टीभेट क्षणभर लाजून मग हा दूरावा
'दूरावा' आवडला.
ऋ, मस्त आहे कविता..
गाडीच्या प्रतिक्षेत थिजला
हेच म्हणतो
सुंदर रचना!
भ्रमरासाठी नटून बसलेले
छान
मस्त!
सुरेख ! ! !
छान रे!
सुन्दर गझल !
आभार
मस्त रे ..
ऋ कविता आवडली रे...
सुंदर
आवडली.
ये दूरियां..........