पण जेव्हा झोपायची वेळ येते तेव्हा दोघांपैकी एकाला तडजोड भाग पडणे आणि त्रास होणे हे नक्कीच.
नक्कीच. झोपायच्या वेळी नवराबायको नक्की कुठच्या पोझिशनमध्ये झोपतात हाही वादाचा किंवा वाद टाळायचे असतील तर तडजोडीचा मुद्दा होऊ शकतो.
ब्रेड मिळत नाही तर केक खा हे चालणार नाही
ब्रेड खाताना केक खातोय अशी कल्पना करणं फक्त आपल्या हाती असतं.
एकाला तिखटजाळ जेवायची सवय आणि दुसर्याला सपक जेवणाची सवय.
व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाला वेगळी चव प्रिय असते. काहींना तिखट तर्रीचा झणका हवा असतो, तर काहींना रोज तोच तो वरणभात. अशी चवींची सांगड घालणं विरळाच. त्यात संकोच म्हणा की समाजरीत म्हणा, पण लग्नाआधी हे प्रश्न विचारले जात नाहीत... लग्नाआधीच आवडीनिवडींबद्दल भरपूर सुसंवाद करावा या मताचा मी आहे.
च्यायला नखरे नुस्ते!!
आमच लग्न नाही झाल,पण झोपायच्या बाबतीत आपले नखरे फार!
मी तर फारच 'नको ते' प्रश्न विचारतो अस सर्वच बोलतात.जेव्हा श्रीमती शानबी येईल तेव्हा आम्ही असे फालतु प्रश्न डीस्कस नाही करणार.
जर आपल खर प्रेम असेल तर 'दीसण्यात'ही तडजोड करता येते,पंखा वगैरेच काय बोलता!
आता माझी नजर सारखी ह्या लेखावर राहील्,पण 'ऐकाव जानाचे,करावे मनाचे' असच वागणार आपण!
आता 'स्त्रीद्वेष्टयां'नी 'लग्नाच्याआधी घटस्फोटाची तयारी' असा लेख लिहा.
दोन्ही जोडीदारांपैकी एकाला ढणाढणा पंखा लावून बसण्या/झोपण्याची सवय असणे आणि दुसर्याला जरासा पंखा असला तरी लगेच सर्दी, डोकेदुखी होणे. <<<
आमचीच कहाणी सांगताय राव. दिवसभरात वाजलं नाही तर रात्री या वरून तरी नक्की वाजणार अशी परिस्थिती असायची सुरूवातीला. आता कुछ कदम हम चले कुछ कदम तुम चलो करत सुवर्णमध्याच्या जवळ पोचण्याची प्रक्रिया आहे. :)
तुम्ही पण आमचीच कहाणी सांगताय राव!
मी क्विल्ट मध्येच झोपते, पण एक सांगु ? जर पंखा बंद झाला वा ए सी चा आवाज नाही आला तर सगळ्यात पहिला मी जागी होते.
सवय होते यार एक मेकाची अगदी त्याच्या न आवडणार्या गोष्टींचीही.
त्याला ही तसच होत असाव.
आमचा अपवादच म्हणायचा! दोघंही पंख्याच्याबाबतीत मात्रा मुंबईकर (!) आहोत. पंख्याचा आवाज ऐकल्याशिवाय झोप लागत नाही नीट!
आमची "भांडणं" सुरूवातीला भाजीत, पदार्थात गूळ/साखर घालण्यावरून व्हायची! मला काहीही बनवता येत नसेलच असं त्याचं गृहीतक होतं आणि याला काय चवीढवीतलं कळतंय असं माझं ... अजूनही त्यावरून दोघंही एकमेकांची टांग खेचत बसतो!
जेव्हा एकाचे 'अन्न' हे दुसर्याचे 'विष' असते त्यावेळी तडजोड संपुष्टात येते. व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच केल्याशिवाय तडजोडीपर्यंत जाता येत नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा अवकाश हा व्यक्ति, मूड, संस्कृती इ सापेक्ष असल्याने तो कमी जास्त होत राहतो.
एकमेकाचे व्यक्तिस्वातंत्र्य जपत सहजीवन जगणे म्हणजे तारेवरची कसरत असते.
सहसा या आजमावण्याच्या काळातले विषय म्हणजे देवधर्मविषयक, साहित्य, संगीत, नाटक सिनेमा, मुले, कुटुंब नियोजन, मुलगी नोकरी करणार की नाही, पैसा कमावणे/खर्चणे, भविष्यातील स्वप्ने, एकत्र/विभक्त कुटुंब (आणि स्वयंपाक) वगैरे.
विवाह अभ्यास मंडळ म्हणुन अनिल भागवत यांनी चालवलेला उपक्रम, साथ साथ विवाह संस्थेचे उपक्रम हे फॉर्म भरुन घेतानाच ही माहिती घेतात.
विवाह हीच एक तडजोड आहे हे ज्यांना मान्य नसेल त्यांना विवाह हे जाचक बंधन वाटते.
प्रतिक्रिया
उदाहरणार्थ:
प्र.का.टा.आ.
सुसंवाद
आवड
च्यायला नखरे नुस्ते!! आमच
दोन्ही जोडीदारांपैकी एकाला
>>आमचीच कहाणी सांगताय राव. हा
तुम्ही पण आमचीच कहाणी सांगताय
अखिल भारतीय
आमचा अपवादच म्हणायचा! दोघंही
आमच्या बाबतीत
=)) =)) =)) =)) लै
तडजोड
प्रतिसाद देणार होतो पण अवांतर
बाकी सर्व सोडा.. पंख्याच्या
केक