✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आयला!! हे अवघड आहे बुवा !!!

न
नितिन थत्ते यांनी
Sat, 07/31/2010 - 21:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3834 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

उदाहरणार्थ:

विलासराव
Sat, 07/31/2010 - 21:48 नवीन
एखद्याला जोराने घोरण्याची सवय असते,त्याचा दुसर्याला बराच त्रास होतो चला तर अनुभवी पतींनो आणि पत्नींनो !!! असा अनुभवी नाही पण तरिही त्रास तर होतोच
  • Log in or register to post comments

प्र.का.टा.आ.

नावातकायआहे
Sat, 07/31/2010 - 21:51 नवीन
प्र.का.टा.आ. (माझा ह्यो प्रतिसाद थत्ते साहेबांना अडचणीत तर आणणार नाय ना?)
  • Log in or register to post comments

सुसंवाद

राजेश घासकडवी
Sat, 07/31/2010 - 22:04 नवीन
पण जेव्हा झोपायची वेळ येते तेव्हा दोघांपैकी एकाला तडजोड भाग पडणे आणि त्रास होणे हे नक्कीच.
नक्कीच. झोपायच्या वेळी नवराबायको नक्की कुठच्या पोझिशनमध्ये झोपतात हाही वादाचा किंवा वाद टाळायचे असतील तर तडजोडीचा मुद्दा होऊ शकतो.
ब्रेड मिळत नाही तर केक खा हे चालणार नाही
ब्रेड खाताना केक खातोय अशी कल्पना करणं फक्त आपल्या हाती असतं.
एकाला तिखटजाळ जेवायची सवय आणि दुसर्‍याला सपक जेवणाची सवय.
व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाला वेगळी चव प्रिय असते. काहींना तिखट तर्रीचा झणका हवा असतो, तर काहींना रोज तोच तो वरणभात. अशी चवींची सांगड घालणं विरळाच. त्यात संकोच म्हणा की समाजरीत म्हणा, पण लग्नाआधी हे प्रश्न विचारले जात नाहीत... लग्नाआधीच आवडीनिवडींबद्दल भरपूर सुसंवाद करावा या मताचा मी आहे.
  • Log in or register to post comments

आवड

विनायक प्रभू
Sat, 07/31/2010 - 22:11 नवीन
झोपायच्या पोझीशन आधीच चर्चा झाली होती त्यामुळे काहीही त्रास नाही. इतर गोष्टीबद्दल बोलायचे झाले तर प.प.प.झा. अगदी दोघांनाही.
  • Log in or register to post comments

च्यायला नखरे नुस्ते!! आमच

शानबा५१२
Sat, 07/31/2010 - 22:46 नवीन
च्यायला नखरे नुस्ते!! आमच लग्न नाही झाल,पण झोपायच्या बाबतीत आपले नखरे फार! मी तर फारच 'नको ते' प्रश्न विचारतो अस सर्वच बोलतात.जेव्हा श्रीमती शानबी येईल तेव्हा आम्ही असे फालतु प्रश्न डीस्कस नाही करणार. जर आपल खर प्रेम असेल तर 'दीसण्यात'ही तडजोड करता येते,पंखा वगैरेच काय बोलता! आता माझी नजर सारखी ह्या लेखावर राहील्,पण 'ऐकाव जानाचे,करावे मनाचे' असच वागणार आपण! आता 'स्त्रीद्वेष्टयां'नी 'लग्नाच्याआधी घटस्फोटाची तयारी' असा लेख लिहा.
  • Log in or register to post comments

दोन्ही जोडीदारांपैकी एकाला

नीधप
Sat, 07/31/2010 - 23:49 नवीन
दोन्ही जोडीदारांपैकी एकाला ढणाढणा पंखा लावून बसण्या/झोपण्याची सवय असणे आणि दुसर्‍याला जरासा पंखा असला तरी लगेच सर्दी, डोकेदुखी होणे. <<< आमचीच कहाणी सांगताय राव. दिवसभरात वाजलं नाही तर रात्री या वरून तरी नक्की वाजणार अशी परिस्थिती असायची सुरूवातीला. आता कुछ कदम हम चले कुछ कदम तुम चलो करत सुवर्णमध्याच्या जवळ पोचण्याची प्रक्रिया आहे. :)
  • Log in or register to post comments

>>आमचीच कहाणी सांगताय राव. हा

गणपा
Sun, 08/01/2010 - 01:53 नवीन
>>आमचीच कहाणी सांगताय राव. हा हा हा अगदी असच म्हणतो. शेवटी भेट म्हणुन बायकोला क्विल्ट आणुन दिल. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

तुम्ही पण आमचीच कहाणी सांगताय

स्पंदना
Sun, 08/01/2010 - 09:11 नवीन
तुम्ही पण आमचीच कहाणी सांगताय राव! मी क्विल्ट मध्येच झोपते, पण एक सांगु ? जर पंखा बंद झाला वा ए सी चा आवाज नाही आला तर सगळ्यात पहिला मी जागी होते. सवय होते यार एक मेकाची अगदी त्याच्या न आवडणार्‍या गोष्टींचीही. त्याला ही तसच होत असाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अखिल भारतीय

ऋषिकेश
Sun, 08/01/2010 - 09:35 नवीन
आयला हा पंख्याचा प्रश्न अखिल भारतीय दिसतोय :प **मला वाटायचं की आमच्याकडेच आहे की काय ;)**
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

आमचा अपवादच म्हणायचा! दोघंही

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 08/01/2010 - 12:14 नवीन
आमचा अपवादच म्हणायचा! दोघंही पंख्याच्याबाबतीत मात्रा मुंबईकर (!) आहोत. पंख्याचा आवाज ऐकल्याशिवाय झोप लागत नाही नीट! आमची "भांडणं" सुरूवातीला भाजीत, पदार्थात गूळ/साखर घालण्यावरून व्हायची! मला काहीही बनवता येत नसेलच असं त्याचं गृहीतक होतं आणि याला काय चवीढवीतलं कळतंय असं माझं ... अजूनही त्यावरून दोघंही एकमेकांची टांग खेचत बसतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

आमच्या बाबतीत

विकास
Sun, 08/01/2010 - 06:31 नवीन
काय लिहीणार?... :( लिहलं असतं देखील, पण तात्काळ प्रतिसाद संपादीत होण्याची भिती असल्याने टाळत आहे. ;)
  • Log in or register to post comments

=)) =)) =)) =)) लै

Nile
Sun, 08/01/2010 - 09:22 नवीन
=)) =)) =)) =)) लै भारी विकासराव. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

तडजोड

प्रकाश घाटपांडे
Sun, 08/01/2010 - 08:55 नवीन
जेव्हा एकाचे 'अन्न' हे दुसर्‍याचे 'विष' असते त्यावेळी तडजोड संपुष्टात येते. व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच केल्याशिवाय तडजोडीपर्यंत जाता येत नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा अवकाश हा व्यक्ति, मूड, संस्कृती इ सापेक्ष असल्याने तो कमी जास्त होत राहतो. एकमेकाचे व्यक्तिस्वातंत्र्य जपत सहजीवन जगणे म्हणजे तारेवरची कसरत असते.
सहसा या आजमावण्याच्या काळातले विषय म्हणजे देवधर्मविषयक, साहित्य, संगीत, नाटक सिनेमा, मुले, कुटुंब नियोजन, मुलगी नोकरी करणार की नाही, पैसा कमावणे/खर्चणे, भविष्यातील स्वप्ने, एकत्र/विभक्त कुटुंब (आणि स्वयंपाक) वगैरे.
विवाह अभ्यास मंडळ म्हणुन अनिल भागवत यांनी चालवलेला उपक्रम, साथ साथ विवाह संस्थेचे उपक्रम हे फॉर्म भरुन घेतानाच ही माहिती घेतात. विवाह हीच एक तडजोड आहे हे ज्यांना मान्य नसेल त्यांना विवाह हे जाचक बंधन वाटते.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देणार होतो पण अवांतर

अवलिया
Sun, 08/01/2010 - 11:19 नवीन
प्रतिसाद देणार होतो पण अवांतर म्हणुन उडला जायचा. सध्या भेंडीची भाजी मिसळीपेक्षा जास्त चमचमीत असते. तीच खातो.
  • Log in or register to post comments

बाकी सर्व सोडा.. पंख्याच्या

भारतीय
Sun, 08/01/2010 - 11:45 नवीन
बाकी सर्व सोडा.. पंख्याच्या प्रश्नावर एक जालिम उपाय सुचलाय.. ज्याला पंखा हवाय त्याने ब्रेड खावा अन् ज्याला नकोय त्याने केक खावा..;)
  • Log in or register to post comments

केक

नितिन थत्ते
Sun, 08/01/2010 - 12:11 नवीन
हॅ हॅ हॅ. आम्ही एसीत पण पंखा लावून झोपतो बॉ. म्हणजे केक पण पावात घालून खातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारतीय

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा